गोव्यात पर्यटनासाठी येण्याच्या विचारात असाल तर आता गोवा कसे फिरावं ही चिंता कायमची मिटली असं समजा. गोव्यात रेंटल बाईक किंवा गाड्यांची सोय उपलब्ध असली तरीही अनेकवेळा यामुळे बजेट हलण्याची शक्यता असते. इथे बऱ्यापैकी सरकारी आणि खासगी बसेस उपलब्ध असतात तरीही कोणत्यावेळी कोणती बस कुठे जाईल याचा ठाव लागत नाही. अनोखळी जागेत मनसोक्त फिरायचं आणि हिंडायचं असेल तर गोव्यात डबल डेकर बस Goa Sightseeing Bus एक उत्तम सेवा देते महत्वाचं म्हणजे यामुळे कमीतकमी खर्चात तुमचा संपूर्ण गोवा फिरून होईल.
या बससेवेच्या मदतीने केवळ दोन ते तीन तासांत अगदी सहज गोवा फिरून होतो. खर्चाचा अधिक विचार करावा लागत नाही कारण या संपूर्ण प्रवासासाठी फक्त २९९ रुपये आकारले जातात. या बसद्वारे दोन प्रकारच्या सेवा दिल्या जातात, एक निळ्या रंगाची बस असते तर दुसरी लाल. निळ्या बसच्या प्रवासात सर्व समुद्र किनारे पाहायला मिळतात तर लाल रंगाची बस सर्व प्रकारच्या ऐतिहासिक जागांची सफर करवते.
निळ्या बसच्या प्रवासात काय काय बघाल?समुद्रकिनारा
पर्यटन भवन
अगुडा किल्ला
Sinqeurim किल्ला
कांडोलीम समुद्रकिनारा
कलंगुट समुद्रकिनारा
बागा समुद्रकिनारा
अंजुना समुद्रकिनारा
व्हागातोर समुद्रकिनारा
शापोरा किल्ला
लाल बसच्या प्रवासात काय काय बघाल?
पर्यटन भवन
दोना पावला
गोवा सायन्स सेंटर
मिरामर समुद्रकिनारा (Miramar Beach)
कला अकादमी
पणजी बाजार
पणजी जेट्टी
दीवजा सर्कल
ओल्ड गोवा चर्च
मंगेशाचे देऊळ
अटल सेतू
या बसची सेवा सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु असते. त्यामुळे परिवारासह गोव्याला जायच्या तयारीत असाल तर प्रवासाची चिंता विसरून जा. या बसेस च्या सीट बुकिंग साठी ०७३७९६०८६१ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा,
गोवा वार्ता: कुरिअरद्वारे गोव्यातून विदेशी दारु मागवणाऱ्या दोन व्यावसायिकांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील शेरपूर येथे हा प्रकार उघडकीस आला. कुरिअर करण्यात आलेली दारु स्कॉर्पिओमधून घेऊन जाण्यासाठी व्यावसायिक आले असता पोलिसांनी ही कारवाई ही केली.
एका प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, शेरपूर येथील कुरिअर कंपनीच्या ऑपरेटरच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. विजय कुमार आणि अरविंद कुमार (रा. महेशपूर) अशी अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकांची नावे आहेत.पोलिसांनी व्यावसायिकांकडून पाटणा क्रमांकाची स्कॉर्पिओ जप्त केली आहे. चौकशीनंतर संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.इन्स्पेक्टर ब्यूटी कुमारी यांना एक्सप्रेस सीड कुरिअर कंपनीचा संचालक विशाल प्रताप यांनी याबाबत फोन करुन माहिती दिली. एका अज्ञात कुरिअर कंपनीने शेरपूर येथील कुरिअर कार्यालयात तीन मोठ्या कार्टनमध्ये पॅक केलेली वस्तू आल्याचे त्यांनी सांगितले..
पार्सल घेण्यासाठी दोनजण स्कॉर्पिओमध्ये आले आहेत. संशय आल्याने त्याने दोघांनाही कार्यालयात बसवल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत चौकशी केली असता त्यांना गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली.पोलिसांनी एकूण 86 लिटर विदेशी दारू जप्त करत दोघांना अटक केली. चौकशीत दोघांनी कुरिअरद्वारे विदेशी दारू मागवल्याचे कबुल केले.
Konkan Expressway: विद्यमान सरकारने देशातील सर्व शहरे महामार्गाने जोडण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबई आणि गोवा जोडणारा एक नवा महामार्ग म्हणून कोकण द्रुतगती महामार्ग Konkan Expressway बांधण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. कोकण एक्सप्रेसवे (ME-6) हा पनवेल (नवी मुंबई) आणि सिंधुदुर्गला रायगड आणि रत्नागिरी मार्गे जोडणारा महाराष्ट्रातील मार्ग संरेखन असलेला प्रस्तावित 6 लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एमएसआरडीसीने महामार्गासाठी पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महामार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
एमएसआरडीमार्फत कोकण द्रुतगती द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हा द्रुतगती महामार्ग 375.94 किमी लांबीचा असून तो कोकणातून जाणार आहे. एकूण १७ तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे. तर संपूर्ण मार्गावर १४ इंटरचेंज असणार आहेत. महामार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसीला सुमारे ८७१ छोटे-मोठे पूल, बोगदे, एफओबी, व्हायाडक्ट, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधा तयार कराव्या लागणार आहेत. कोकण द्रुतगती महामार्ग चार पॅकेजमध्ये तयार करण्याच्या आराखड्यावर काम सुरू आहे.
कोकण एक्स्प्रेसवेसाठी 68 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई ते गोवा अंतर 523 किमी आहे. कोकण एक्स्प्रेसवे प्रकल्पासाठी सुमारे 3,792 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी सुमारे 146 हेक्टर जमीन वनविभागाची आहे.
मुंबई ते गोव्याला जोडणाऱ्या नवीन महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या सहा तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या या प्रवासासाठी 12 ते 15 तास लागत आहेत.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरु करण्यात आलेली वांद्रे (टी) – मडगाव जं- वांद्रे (टी) द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसची नियमित फेरी आजपासून सुरु झाली असून आज सकाळी गाडी क्रमांक 10116 मडगाव जं.-वांद्रे(टी) द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस मोठ्या उत्साहाने मडगाववरुन मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे.
गोवा सरकारचे कायदा आणि न्यायव्यवस्था, पर्यावरण, बंदरे आणि विधिमंडळ कामकाजाचे कॅप्टन श्री.अलेक्सो ए. सिक्वेरा यांच्या तर्फे या गाडीला हिरवा बावटा दाखविणायत आला. यावेळी मडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिगंबर कामत, नवलीम विधानसभा मतदार संघाचे आमदार उल्हास तुयेकरआदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई: वांद्रे – मडगाव दरम्यान धावणाऱ्या नवीन गाडीचा शुभारंभ उद्या दिनांक २९ ऑगस्ट रोजी बोरिवली येथे होणार आहे. त्यासाठी शुभारंभ Inaurgual विशेष गाडीला दुपारी १.२५ वाजता बोरिवली येथे हिरवा कंदील दाखविला जाणार आहे. या सोहळ्याला कोकणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उत्तर मुंबई भाजप पक्षातर्फे करण्यात आले आहे.
गुरुवार २९ ऑगस्ट रोजी दुपारी १.२५ वाजता बोरीवली वरून कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेनचा नं ०९१६७ असून त्याचे आरक्षण बुधवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन पीआरएस आणि आरक्षण खिडक्यांवर सुरु होणार आहे.
ही गाडी टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०२, थ्री टियर एसी इकॉनॉमी – ०१, स्लीपर – ०६, जनरल – ०३, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१ असे मिळून एकूण १५ एलएचबी डब्यांसहित चालविण्यात येणार आहे.
शुभारंभ विशेष गाडीचे वेळापत्रक
बोरिवली – १३.२५ (गुरुवार)
वसई – १४.१०
भिवंडी – १५.०५
पनवेल – १६.०७
रोहा – १७.३०
वीर – १८.००
चिपळूण – १९.२५
रत्नागिरी – २१.३५
कणकवली – ००.०१ (शुक्रवार)
सिंधुदुर्ग – ००.२०
सावंतवाडी – ०१.००
थिवी – २.००
करमाळी – २.३०
मडगाव – ०४.००
हीच गाडी वेगळ्या वेळापत्रकावर आणि २० डब्यांच्या संरचनेसह पुढील आठवड्यापासून दर बुधवार व शुक्रवार वान्द्रे – मडगाव (गाडी नं १०११५) एक्सप्रेस आणि दर मंगळवार व गुरुवार मडगाव – वान्द्रे एक्सप्रेस (गाडी नं १०११६) एक्सप्रेस अशी चालविण्यात येणार आहे.
पणजी:कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दक्षिण गोव्यात सुरू असलेल्या दुहेरी मार्गाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या गाड्या उशिराने धावत असल्याची अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) उपमहाव्यवस्थापक बबन घाटगे यांनी सांगितले की, दक्षिण पश्चिम रेल्वेने दक्षिण गोव्यातील माजोर्डा Majorda आणि कासावली Cansualim स्थानकांदरम्यानच्या मार्गाचा दुहेरी ट्रॅकच्याकामामुळे रविवारपासून कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या किमान तीन ते चार तास उशिराने धावत असून मंगळवार दिनांक ११ जून पर्यंत ही वाहतूक सूरळीत होणार आहे.
दरम्यान उन्हाळी सुट्ट्या लवकरच संपत असल्याने चाकरमानी वर्ग मुंबईला परतीचा प्रवासाला लागला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाडयांना मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यात बहुतेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील तीन नियमित गाडया रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत १० जून नंतर रद्द (Train Cancelled )दाखवत होत्या. रेल्वेने या संदर्भात कोणतेही प्रसिद्ध जाहीर केले नसल्याने असल्यामुळे आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. एलटीटी मडगाव एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत रद्द दाखवत गेल्या होत्या. काही दिवसानंतरच गणेश चतुर्थीचे आरक्षण सुरु होणार असल्याने रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर या गाड्या आरक्षण प्रणालीत ऍक्टिव्ह दाखवाव्यात अशी मागणी होत होती. त्याची दखल घेत रेल्वे प्रशासनाने या गाड्यांचे आरक्षण या प्रणालीत दाखवले आहे. मात्र पावसाळी हंगामात या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आली आहे.
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
३) 22229 /22230 Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express 22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे. 22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.
या सर्व गाड्यांचे वेळापत्रकही बदलून पावसाळी वेळापत्रकानुसार या गाड्या चावलेण्यात येणार आहेत.
टीप: सदर माहिती अंतिम स्वरूपाची नसून रेल्वे प्रशासनातर्फे काही बदल केला जाऊ शकतो. आपल्या प्रवासाची योजना आखताना कृपया रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशीच्या इतर पर्यायाचा वापर करावा ही विनंती
गोवा पर्यटन:गोवा म्हंटले तर डोळ्यासमोर येतात येथील सागरी किनारे, जुनी मंदिरे आणि देशातील ईतर भागांपेक्षा येथे निर्माण झालेली एक वेगळी संस्कृती. या गोष्टींमुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. मात्र याव्यतिरिक्त गोव्यात अजून काही गोष्टी आहेत ज्यामुळे येथील पर्यटनात भर पडत आहे.
उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज Usgalimal Rock Engravings म्हणजे गोव्याच्या हिरव्यागार जंगलात एक लपलेले रत्न जणूच जे प्राचीन भूतकाळातील रहस्ये उलगडत आहे. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस मुसळधार पावसाने कुशावती नदीच्या उत्तरेकडील किनारी भागाच्या जमिनीचा वरील स्तर मोकळा होऊन लॅटराइट-स्टोन ग्राउंडच्या विस्तीर्ण भागात पसरलेल्या शंभर कातळशिल्पांचा शोध लागला. ही कातळशिल्पे जवळ जवळ 20,000 ते 30,000 जुनी असल्याचे बोलले जाते. या कातळशिल्पांच्या अभ्यासाअंती प्राचीन काळातील अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे. अशी ही दगडावर कोरलेली रहस्यमय कातळशिल्पे केवळ आपल्या पूर्वजांच्या कलात्मक क्षमतेचाच पुरावा नाही तर त्या प्रदेशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलकही देतात. तुमचा जर गोव्यात पर्यटनासाठी जाण्याचा बेत असेल तर ही तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमात हे स्थळ समाविष्ट करायला विसरू नका.
उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज 20,000 वर्षे जुनी आहेत आणि भारतातील सर्वात जुनी रॉक कला आहे, जी प्रागैतिहासिक काळापासून आहे. ते प्राणी, मानव, चिन्हे आणि नमुने दर्शवितात, बहुधा सुरुवातीच्या शिकारी-संकलक समुदायांनी तयार केले होते. ज्याचा उपयोग विधी आणि कथाकथनासाठी केला गेला असण्याची शक्यता आहे. साइटचा सखोल अभ्यास करणाऱ्या लेखक थेमिस्टोक्ल्स डिसिल्व्हा यांच्या म्हणण्यानुसार, कोरीव काम करण्यासाठी दगडी अवजारांचा वापर करण्यात आला होता. कोरीव काम समुदायासाठी महत्त्वपूर्ण होते, जे त्यांचे जग आणि त्यांच्या सभोवतालचे ज्ञान प्रतिबिंबित करते. दगड आणि खडकांवर अनुभवांची नोंद करण्याची ही प्रथा पूर्व-साक्षर काळात मानवी पूर्वजांमध्ये प्रचलित होती.हे कोरीवकाम ज्यांनी निर्माण केले त्या लोकांच्या सांस्कृतिक पद्धती, श्रद्धा आणि दैनंदिन जीवनाबद्दल ते प्रकट करतात. प्रत्येक कोरीवकाम दीर्घकाळ गेलेल्या युगाची झलक देते, जे आम्हाला आमच्या पूर्वजांच्या जीवनावर आणि त्यांच्या नैसर्गिक जगाशी असलेल्या खोल संबंधांवर विचार करण्यास भाग पाडत आहे. डिसिल्व्हा यांनी एका वैज्ञानिक पेपरच्या स्वरूपात केलेल्या दस्तऐवजीकरणानुसार, उसगालिमल रॉक एनग्रेव्हिंग्ज हे कोरलेल्या प्रतिमांचे वर्गीकरण आहे ज्यात साप, बैल, कुत्रे, शेळ्या, हरीण, मोर, गरुड, मासे आणि पृथ्वी माता यांसारख्या प्राण्यांचा समावेश आहे. मानवी आकृत्या प्रामुख्याने पूर्वेकडे वसलेल्या आहेत. अनेक लहान प्राणी, मुख्यतः कॅप्रिड्स, खडकाळ प्लॅटफॉर्मवर विखुरलेले आहेत.
कशी भेट द्याल?
पत्ता: 44CM+86P, Rivona VP, Goa 403704
वेळ: 24 तास उघडे
विशेष सुचना:कोरीव कामांची तोडफोड आणि इतर हानीपासून संरक्षण करण्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणावर जाहिरात केली जात नाही. तथापि, त्यांचे अन्वेषण करण्यास उत्सुक असलेले अभ्यागत स्थानिक पुरातत्व अधिकारी किंवा हेरिटेज संस्थांद्वारे मार्गदर्शित टूरची व्यवस्था करू शकतात. हे टूर सामान्यत: अभ्यागतांना विशिष्ट साइटवर घेऊन जातात जेथे ते प्रशिक्षित तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खडकातील कोरीवकाम पाहू शकतात जे त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबद्दल अंतर्दृष्टी देतात.
मुंबई दि. २९:कोकण रेल्वे मार्गावर चालू करण्यात आलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीही दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. त्यामुळे या गाडीचे डबे वाढविण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.
मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा सध्या चालविण्यात येणारा रेक आठ डब्यांचा आहे. देशात सुरु करण्यात आलेल्या यशस्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये तिची गणना केली जात आहे. ही गाडी सातत्याने सुमारे ९५% क्षमतेने Occupancy धावत आहे. या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीच या गाडीला असलेली लोकप्रियता दाखवून देत आहे. तथापि, मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रवासांचा हिरमोड होत आहे.
या मार्गावरील प्रवासाची उच्च मागणी लक्षात घेता, या समस्येवर त्वरित लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे, आम्ही रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला विनंती करू इच्छितो की, मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची 16 डब्यांची रेक तैनात करून डब्यांची क्षमता वाढविण्याचा विचार करावा.
अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी ट्रेनची क्षमता वाढवल्याने सध्याची सीटची कमतरता तर दूर होईलच पण एकूण प्रवासाचा अनुभवही वाढेल. शिवाय, ते मुंबई आणि गोवा दरम्यान कार्यक्षम आणि आरामदायी वाहतूक पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करता येईल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रस्तावाचा अनुकूलपणे विचार करा आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचला. आगामी उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन हा बदल करण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला केली आहे.
गोवा: रेल्वे प्रशासन एक्सप्रेस गाड्यांच्या स्लीपर आणि जनरल डब्यांच्या संख्येत कपात करून त्याजागी एसी डबे जोडून सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे प्रवास अधिक त्रासदायक बनवत आहे असा आरोप केला जात आहे. मात्र एका गाडीच्या एसी डब्यांत कपात करून त्या जागी सामान्य आणि सेकंड स्लीपर डबे जोडून मार्गावर प्रवास करणार्या सामान्य प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे. गाडी क्रमांक 12779 / 12780 वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन – वास्को द गामा गोवा सुपरफास्ट एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत हा बदल करण्यात आला आहे. एक दोन नाही तर एसीच्या एकूण सहा डब्यांचे रूपांतर सेकंड स्लीपरच्या चार आणि सामान्य श्रेणी General च्या एकूण दोन डब्यांत कायमस्वरूपा साठी करण्यात आले आहे.
दिनांक 16 जून 2024 पासून हा बदल अंमलात आणला जाणार आहे.