Category Archives: देश
Mahakumbh Stampede Prayagraj : कुंभ मेळ्याच्या दुसऱ्या शाही स्नानापूर्वी म्हणजेच मौनी अमावस्येपूर्वी प्रयागराजच्या त्रिवेणी संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 14 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. विशेष खबरदारी घेत, आखाडा परिषदेने शाही स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
संगम परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बॅरिकेडिंग हटवण्यात आले आहे. पण तरीही नदीच्या काठावर अजूनही लोकांची तुफान गर्दी आहे. चेंगराचेंगरीनंतरही लोक संगमावर पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. साधू आणि संत लोकांना संगम परिसरात न जाण्याचं आवाहन करत आहेत.
13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत सुमारे १५ कोटी लोकांनी गंगा नदीत स्नान केलं आहे. आज म्हणजेच बुधवारी मौनी अमावस्येला 10 कोटींहून अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. मात्र, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरातील गर्दी कमी ठेवण्याचं मोठं आवाहन यंत्रणांसमोर असणार आहे.
नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज मनू भाकर आणि बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश यांना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित केले. मनू-गुकेश यांच्या व्यतिरिक्त भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा-ॲथलीट प्रवीण कुमार यांनाही क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल समान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याशिवाय राष्ट्रपती मुर्मू यांनी अर्जुन पुरस्कार (आजीवन), राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित आणि लाइटटाइम श्रेणी) आणि मौलाना अबुल कलाम आझाद (MAKA) ट्रॉफी विजेत्यांनाही सन्मानित केले.
भारताला पहिले गोल्ड मेडल मिळवून देणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तसेच ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि पॅरा ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता सचिन खिलारी यांना मानाचा अर्जुन पुरस्कारदेण्यात आला, तसेच जागतिक दर्जाचे भारतीय खेळाडू घडविणाऱ्या प्रशिक्षिका दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार आज नवी दिल्ली येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला
1. डी गुकेश (बुद्धिबळ)
2. हरमनप्रीत सिंग (हॉकी)
3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स)
४. मनू भाकर (शूटिंग)
यांना अर्जुन पुरस्कार मिळाला
1. ज्योती याराजी (ॲथलेटिक्स)
2. अन्नू राणी (ॲथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जर्मनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजित सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा तिरंदाजी)
12. प्रीती पाल (पॅरा ॲथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ती (पॅरा ॲथलेटिक्स)
14. अजित सिंग (पॅरा ॲथलेटिक्स)
15. सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा ॲथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा ॲथलेटिक्स)
17. प्रणव सुरमा (पॅरा ॲथलेटिक्स)
18. एच होकातो सेमा (पॅरा ॲथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा ॲथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा ॲथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्य श्री सुमती सिवन (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा ज्युदो)
26. मोना अग्रवाल (पॅरा नेमबाजी)
27. रुबिना फ्रान्सिस (पॅरा नेमबाजी)
28. स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
29. सरबज्योत सिंग (शूटिंग)
30. अभय सिंग (स्क्वॉश)
31. साजन प्रकाश (पोहणे)
32. अमन (कुस्ती)
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार (आजीवन श्रेणी)
- सुचा सिंह (ऍथलेटिक्स)
- मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार
- सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
- दीपाली देशपांडे (शूटिंग)
- संदीप सांगवान (हॉकी)
उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)
- एस मुरलीधरन (बॅडमिंटन)
- अरमांडो अग्नेलो कोलाको (फुटबॉल)
GST Notice to Panipuri Vendor:तमिळनाडूतील पाणीपुरी दुकानदाराने ऑनलाइन पेमेंटद्वारे एका वर्षात 40 लाख रुपये कमावल्याचं समोर आलं आहे. यानंतर या दुकानदाराला जीएसटीची नोटीस मिळाली आहे. हीच नोटीस सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. ही नोटीस पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जीएसटी नियमानुसार, 40 लाख एवढी वार्षिक उलाढाल असलेल्या व्यवसायांने नोंदणी करणे आणि कर आकारणी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
नोटीसचा फोटो अनेकांनी शेअर करत आपल्या पोस्ट केल्या आहेत. या व्हायरल नोटीसमध्ये 17 डिसेंबर 2024 ही तारीख लिहिली आहे. ही नोटीस ‘तामिळनाडू वस्तू आणि सेवा कर कायदा’ आणि ‘केंद्रीय जीएसटी कायद्याच्या कलम 70’ अंतर्गत जारी करण्यात आली आहे. यामध्ये विक्रेत्याकडून गेल्या तीन वर्षातील व्यवहारांचा तपशील मागवण्यात आला आहे.
विशेष म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षात मिळालेल्या मोठ्या रकमेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही माहिती डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरून गोळा करण्यात आली आहे. 40 लाख वार्षिक उलाढालीची मर्यादा ओलांडल्यानंतरही जीएसटी नोंदणी न करता वस्तू किंवा सेवांचा पुरवठा करणे हा गुन्हा मानला जातो, असेही या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. जीएसटीची नोटीस मिळाल्यानंतर सोशल मीडियावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Manmohan Singh Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचं निधन झालं आहे. प्रकृती खालावल्याने आज त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) दाखल करण्यात आलं होतं. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर उपचार करत होती. पण त्यांना यश आलं नाही. रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. मागील अनेक काळापासून ते आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करत होते. याआधी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
मनमोहन सिंग यांना 8 वाजून 6 मिनिटांनी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल करताच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी तिथे पोहोचल्या होत्या. दुसरीकडे बेळगावमध्ये उद्या होणारी काँग्रेसची बैठक रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आज रात्री बेळगावहून दिल्लीला रवाना झाले आहेत.
EPFO Updates: केंद्र सरकार आता भविष्य निर्वाह निधीशी (EPFO) संबंधित व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. सरकारचा EPFO ३.० उपक्रमांतर्गत EPFO सदस्यांसाठी सेवा वाढविण्याचा उद्देश आहे. रिपोर्ट्सनुसार, या योजनेचा एक भाग म्हणून केंद्रीय कामगार मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये योगदान वाढविण्याचा आणि डेबिट कार्डसारखे एटीएम (ATM card) कार्ड जारी करण्याबाबत विचार करत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात थेट ‘एटीएम’मधून पैसे काढता येतील. ही योजना मे-जून २०२५ पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे.
सध्या EPF सदस्याला पीएफचे पैसे काढण्यासाठी ७ ते १० दिवस वाट पाहावी लागते. हा वेळ पीएफचे सर्व पैसे काढण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे EPFO ला सादर केल्यानंतर लागतो. यात अधिक वेळ वाया जातो.
सध्या पगारदार कर्मचारी दर महिन्याला त्यांच्या कमाईच्या १२ टक्के रक्कम त्यांच्या EPF खात्यासाठी योगदान देतात. दरम्यान, नियोक्ता ३.६७ टक्के रक्कम EPF खात्यात जमा करतात. उर्वरित ८.३३ टक्के कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (EPS) वितरीत केली जाते. नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) खात्यात ०.५० टक्के योगदानदेखील देतो.
Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सध्या सोसाव्या लागत असलेल्या अनेक गैरसोयीवर उपाय असलेल्या कोकण रेल्वे विलिनीकरणच्या प्रश्नाला आता खासदार संसदेत मांडत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत खासदार धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर चार राज्यांच्या हक्क सोडण्यावर कोकण रेल्वेचे विलीनीकरण अवलंबून असल्याने ते काहीसे किचकट आहे, असे उत्तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे.
कंपनी अॅक्टनुसार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची नोंदणी झाली आहे. यात भांडवली खर्चासाठी भारतीय रेल्वे, महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार, केरळ आणि गोवा सरकार यांनी गुंतवणूक केली आहे. 25 वर्षांपासून कोकण रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालय भागीदार असून कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचा खर्च चार राज्ये करत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करणे हे चार राज्यांच्या हक्क सोडण्याच्या अटीवरच अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ केंद्र सरकारचा नसून चार राज्यांच्या अखत्यारितील ही आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, रोहा ते वीर सेक्शनचे दुपदरीकरण, अतिरिक्त थांबे यावर भर देतानाच प्रवाशांना सोयीसुविधा देण्यावरही भर दिला दिला गेला आहे असे उत्तर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर गेल्या पाच वर्षांत सात नवीन ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत त्यात दोन वंदे भारत ट्रेन चा समावेश आहे. प्रवासी तसेच स्थानिकांच्या सोयीसाठी ओव्हरब्रिज, सबवे, पाथवे, नवीन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण या सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे ते म्हणाले.
कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी अशी मागणी राज्यसभेत केल्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनांनी आमदार धैर्यशील पाटील यांचे आभार मानले आहेत.
”अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी आणि कोकणातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता महत्वाचा असलेला हा मुद्दा संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी संसदीय आयुधाचा वापर केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी स्वर्गीय मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे स्मरण आजही केले जाते त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही देखील ऐतिहासिक घटना असेल. त्यासाठी संसदेत पाठपुरावा केल्याबद्दल आपलेही नाव इतिहासात नोंदवले जाईल यात शंका नाही. लवकरच आपली भेट घेऊन आम्ही आमची भूमिका आणखी विस्तृतपणे मांडू. तूर्तास आपले खूप खूप आभार.” या शब्दात पत्र आणि ईमेल पाठवून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र ने यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले असल्याची माहिती संघटनेचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.
Bareilly, UP
>3 men attended a wedding
>Used Google Maps on their way back.
>Map directed them to an incomplete bridge.
>The car sped ahead & fell down.
>All three tragically lost their lives. pic.twitter.com/H7SQbkeMX7— Gems (@gemsofbabus_) November 24, 2024











