Category Archives: महाराष्ट्र

दहावी बारावी परीक्षांना बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी; मंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्रालयाला पत्र

   Follow us on        

मुंबई – पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या बुरखा बंदीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी परीक्षेला बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. राणेंनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून ज्या मुली बुरखा घालून परीक्षेला येतील त्यांना केंद्रावर प्रवेश देऊ नये असं म्हटलं आहे. राज्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना नितेश राणेंनी केलेल्या मागणीवर सरकार काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे आहे.

दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्याआधी मंत्री नितेश राणेंनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलंय की, १० वी आणि १२ वी परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षा आहेत. या परीक्षेवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. जर या परीक्षेत बुरखा घालून कुणी परीक्षा देत असेल तर संबंधित युवती इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा वापर करून परीक्षेत हेराफेरी आणि कॉपीचीही शक्यता नाकारता येत नाही. जर अशा घटना घडल्या तर अनेक समस्या निर्माण होतील म्हणुन परीक्षेला बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

धक्कादायक! ठाण्यात तब्बल ८१ शाळा बेकायदेशीर; यादी ईथे वाचा

(File Photo)

   Follow us on        

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा सुरू असलेल्या ८१ शाळांची यादी पालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. यात एक मराठी, दोन हिंदी तर, ७८ इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दिवा परिसरात सर्वाधिक म्हणजे ५५ शाळा बेकायदा सुरू असल्याची बाब यादीतून समोर आली आहे. या शाळा तात्काळ बंद केल्या नाहीतर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई सुरू केलेली आहे.

ठाणे महापालिकेची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. वाढत्या नागरिकरणाबरोबरच शहरात बेकायदा शाळा सुरू करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात सुरू झाले आहेत. अशा बेकायदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी पालिका प्रशासन गेल्या काही वर्षांपासून बेकायदा शाळांची यादी जाहीर करत आहे. यंदाही पालिकेने शहरातील बेकायदा शाळांची यादी जाहीर केली असून त्यानुसार संपुर्ण पालिका क्षेत्रात ८१ शाळा बेकायदा सुरू असल्याचे उघड झाले आहे.दिवा परिसरात ५५ बेकायदा शाळा असल्याचे समोर आले,या शाळा तात्काळ बंद करण्याचा आदेश. नाहीतर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई सुरू केलेली आहे.

बेकायदेशीर शाळांची यादी

आरंभ इंग्लीश स्कूल, आगापे इंग्लिश स्कूल, नालंदा हिंदी विद्यालय, रेन्बो इंग्लिस स्कूल, सिम्बाॅयसेस हायस्कूल, जीवन इंग्लिश स्कूल, एम.एस इंग्लिश स्कूल, कुबेरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल, आर.एल.पी हायस्कूल, आदर्श हायस्कूल, श्री. दत्तात्रय कृपा इंग्लिश स्कूल, एम.आर.पी इंग्लिश स्कूल, एस.एस. मेमोरियल इंग्लिश स्कूल, ओम साई इंग्लिश स्कूल, स्टार इंग्लिश हायस्कूल, श्री. विद्या ज्योती इंग्लिश स्कुल, केंब्रिज इंग्लिश स्कुल, पब्लिक इंग्लिश स्कूल, पब्लिक मराठी स्कूल, टिवकल स्टार इंग्लिश स्कूल, होली एंजल इंग्लिश स्कूल, आर्या गुरूकुल इंग्लिश स्कूल, सेंट सायमन हायस्कूल, शिवदिक्षा इंग्लिश स्कूल, श्री. राम कृष्णा इंग्लिश स्कूल, केंट व्हॅलो इंटरनॅशनल स्कूल, ब्रायटन इंटर नॅशनल इंग्लिश स्कूल, अक्षर इंग्लिश स्कूल, स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूल, यंग मास्टर्स इंग्लिश स्कूल, स्मार्ट इंटरनॅशनल स्कूल, एस.एम. ब्रिल्ऐट इंग्लिश स्कूल, न्यु माॅर्डन स्कूल, एस.डी.के इंग्लिश स्कूल, डाॅन बाॅस्को स्कूल, मदर टच, लिटील विंगस, आर.म. फाॅउंडेशन, कुबेरेश्वर महादेव, जिनियस, ऑरबिट इंग्लिश स्कूल, जागृती विद्यालय सेमी इंग्लिश स्कूल, नंदछाया विद्यानिकेतन, सेंट सिमाॅन हायस्कूल, अलाहादी मक्तब ॲँड पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम), होलो ट्रोनेटो हायइंग्लिश स्कूल, एस.जी. इंग्लिश स्कूल, अलहिदाया पब्लिक स्कूल, ड्रिम वर्ल्ड इंग्लिश स्कूल, प्रभावती इंग्लिश स्कूल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, बुरहानी स्मार्ट चॅम्प, लिटील एंजल्स प्रायमरी स्कुल, आयेशा इंग्लिश प्रायमरी स्कूल, द कॅम्पेनियन हायस्कुल, इव्हा वर्ल्ड स्कूल, गुरूकूल ब्राईट ब्लर्ड स्कूल, खैबर इंग्लिश स्कूल, गौतम सिंघानिया स्कूल (घोडबंदर), झोरेज इंग्लिश ॲँड इस्लामिक स्कूल, अशरफी स्कूल, अल-हमद इंग्रजी स्कूल, ह्युमिनीटी पब्लिक स्कुल, आइशा इंग्लिश स्कूल, एम.एम. पब्लिक स्कूल, हसरा इंग्रजी ॲकेडमी अशी बेकायदा शाळाची यादी आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानकात प्रवासी संघटनेचे ‘रेल रोको’ आंदोलन पोलिसांनी रोखले…सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित…

बेलापूरच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या एकञित बैठकीत लवकरचं सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी पञ दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित…

… अन्यथा गनिमी काव्याने ‘रेल रोको’ करु ; प्रवासी संघटनेचा कोकण रेल्वे प्रशासनाला निर्वाणीचा इशारा…

   Follow us on        

सावंतवाडी: ९ वर्षे होऊन अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आज प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी यांच्याकडून रेल रोको चे लक्षवेधी आंदोलन हाती घेण्यात आले होते, या आंदोलनासाठी सकाळी रेल्वे स्थानकात आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते, आंदोलनाची पार्श्वभूमी बघता रेल्वे सुरक्षा दल, पोलीस यांनी स्टेशन परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता,

यावेळी स्थानकाबाहेर बसलेल्या प्रवासी संघटनेच्या आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी कोकण रेल्वे चे क्षेत्रीय वाहतूक नियंत्रक श्री.शैलेश आंबर्डेकर आले असता, त्यांच्यावर संतप्त आंदोलकांनी प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी उपस्थित आंदोलकांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस मंजूर आहे की नाही ते सांगा, जर झाले असेल ते अद्याप अपुर्ण अवस्थेत का आहे..? वेळोवेळी आंदोलने, उपोषण करुनही का दखल घेतली जात नाही असे अनेक प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आले.

 यावर ठोस लेखी लिहून देण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली, त्यानंतर श्री.आंबर्डेकर यांनी आंदोलकांना बेलापूर येथील उच्च स्तरीय अधिकारी व प्रवासी संघटना पदाधिकारी यांची बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी पञ आंदोलकांना दिली, त्यानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करीत आहोत असे जाहीर केले.

यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी स्थानकाचे रखडलेल्या कामासाठी कोकण रेल्वेने निधीची तरतूद याच आर्थिक वर्षात करावी. नवीन प्लॅटफॉर्म किंवा टर्मिनस लूप लाईन चिपळूण स्थानकाचा धर्तीवर सावंतवाडी स्थानकात उभारावे. या स्थानकाचा समावेश केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेत करावा. या ठिकाणी शून्य आधारित काढून घेण्यात आलेल्या राजधानी, गरीब रथ एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत करावे. नव्याने मंगलोर एक्सप्रेस या गाडीला थांबा देण्यात यावा, रेल्वे स्थानकात ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस’ असा बोर्ड लावण्यात यावा अश्या मागण्या करण्यात आल्या.

अध्यक्ष ऍड.संदीप निंबाळकर, सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, मिलिंद देसाई, सुधीर राऊळ, रेल्वे प्रवासी संघटना सचिव मिहिर मठकर, जगदीश मांजरेकर, बाळासाहेब बोर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग राऊळ, पांडुरंग नाटेकर, संजय नाटेकर, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबईचे गणेश चव्हाण, शांताराम गावडे, उमाकांत वारंग, निरवडे सरपंच सुहानी गावडे, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, तेजस पोयेकर, सुभाष शिरसाट, उमेश कोरगावकर, रवी जाधव, विलास जाधव, उमाकांत वारंग, साईल नाईक, केतन गावडे, मेहुल रेडिझ, सचिन गावडे, अजित सातार्डेकर, सुहास पेडणेकर, भुषण मांजरेकर, संदीप राऊळ, सुदेश राऊळ, मनोहर पारकर, रिक्षा व्यावसायिक, रेल्वे प्रवासी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 

कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्ग विरोधात 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

   Follow us on        

कोल्हापूर: कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्गाबद्दल 15 ऑक्टोबर रोजी शासन आदेशाने येथील सहा तालुक्यातील महामार्गाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे संघर्ष समितीने कोल्हापुरामध्ये थांबा व पहा ही भूमिका घेतली.पण आमच्या शांत बसण्यामुळे आता शक्तिपीठ महामार्गाच्या बाजूने कंत्राटदारांच्याकडून सुपार्‍या फोडत व अफवा पसरवली जात आहे. महायुतीला मिळालेल्या पाचवी बहुमतानंतर तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपले शब्द फिरवत आता महामार्ग भेटण्याचे आदेश दिले आहेत. प्रसंगी पोलिसांचेही सहकार्य घेत दंडुकशाही वापरण्याचा जणू फतवाच काढला आहे. पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव दिला असला तरी पर्यावरण विभाग कोणताही ग्राम सर्वे न करता महामार्गास मंजुरी देत आहे. मागील आठवड्यात दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये ठरलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर सहित इतर महामार्ग बाधित जिल्ह्यांमध्ये 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. कोल्हापुरात देखील इतर जिल्ह्यांच्या आंदोलनाला समर्थन देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते २ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील महामार्ग रद्द अधिसूचनेमध्ये काही पळवाटा आहेत यावर जिल्हा प्रशासन व मंत्र्यांना जाब विचारला जाईल.

कोल्हापूर मधून जरी महामार्ग भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा आदेश काढला असला तरी नेमका महामार्ग कोठून व कसा नेणार याचे लेखी काही पुरावे मंत्रांच्याकडे नाहीत. त्यामुळे यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न कोल्हापुरातील शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे या आंदोलनातून अधिसूचना कोल्हापुरातील रद्द झाली आहे तर महामार्ग कसा जाणार आहे हे लेखी दाखवा याचा जाब विचारणार आहोत.

Jalgaon Railway Accident: आगीच्या अफवेने घेतला सात ते आठ जणांचा बळी

   Follow us on        

Jalgaon Railway Accident : नुसत्या एका आगीच्या अफवेने सात ते आठ प्रवाशांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज जळगावला घडला. मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीनं काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसनं त्यांना चिरडलं. या अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जळगावातील परांडा स्टेशनजवळ हा अपघात झाला.

मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसनं अचानक ब्रेक लावल्यानं त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे तिथे आग लागल्याचा काही प्रवाशांचा समज झाला. आग लागल्याच्या भीतीनं प्रवासी घाबरले. त्यांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन बंगळुरु एक्स्प्रेस येत होती. उड्या मारणारे प्रवासी बंगळरु एक्स्प्रेसच्या खाली चिरडले गेले. अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे प्रशासनाकडून मदत घेतली जात असून जखमींवर उपचार केले जात आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.

दावोसमध्ये महाराष्ट्र ‘Unstoppable’. आतापर्यंत झालेत 4 लाख 99 हजार 321 कोटींचे 20 सामंजस्य करार; यादी ईथे वाचा

   Follow us on        

Davos Parishad 2025: दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिल्झर्लंड दौऱ्यावर गेलेत. या परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक होत असून काल एकाच दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे एकूण 20 सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. गडचिरोली, पुणे, रत्नागिरी, नागपूर या भागांमध्ये विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. उद्या आणखी कंपन्यांमध्ये करार होण्याची शक्यता आहे.

आता पर्यंत झालेले सामंजस्य करार 

1) कल्याणी समूह:

क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही

गुंतवणूक : 5200 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : गडचिरोली

 

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 16,500 कोटी

रोजगार : 2450

कोणत्या भागात : रत्नागिरी

 

3) बालासोर अलॉय लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 17,000 कोटी

रोजगार : 3200

 

 

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 12,000 कोटी

रोजगार : 3500

कोणत्या भागात : पालघर

 

5) एबी इनबेव

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 750 कोटी

रोजगार : 35

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

6) जेएसडब्ल्यू समूह

क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स

गुंतवणूक : 3,00,000 कोटी

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : गडचिरोली

 

7) वारी एनर्जी

क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे

गुंतवणूक : 30,000 कोटी

रोजगार : 7500

कोणत्या भागात : नागपूर

 

8) टेम्बो

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 1000 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : रायगड

 

9) एल माँट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 2000 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : पुणे

 

10) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : एमएमआर

 

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी

क्षेत्र : डेटा सेंटर्स

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर

 

12) अवनी पॉवर बॅटरिज

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 10,521 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

13) जेन्सोल

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 4000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

14) बिसलरी इंटरनॅशनल

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 250 कोटी

रोजगार : 600

कोणत्या भागात : एमएमआर

 

15) एच टू ई पॉवर

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 10,750 कोटी

रोजगार : 1850

कोणत्या भागात : पुणे

 

16) झेड आर टू समूह

क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स

गुंतवणूक : 17,500 कोटी

रोजगार : 23,000

 

17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स

क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही

गुंतवणूक : 3500 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : पुणे

 

18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 8000 कोटी

रोजगार : 2000

 

19) बुक माय शो

क्षेत्र : करमणूक

गुंतवणूक : 1700 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर

 

20) वेल्स्पून

क्षेत्र : लॉजिस्टीक

गुंतवणूक : 8500 कोटी

रोजगार : 17,300

 

 

महत्वाचे: मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग उद्यापासून ‘या’ वेळे दरम्यान तीन दिवस बंद रहाणार

   Follow us on        

मुंबई: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर डोंगरगाव/ कुसगांव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू आहे. या कारणाने दि. 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक ण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे. (Mumbai Pune Expressway)

द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या अधिकार्‍यां तर्फे करण्यात आले आहे.

 

पालकमंत्री पद एवढे महत्वाचे कां?

   Follow us on        

विश्लेषण: महाराष्ट्र राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची नुकतीच घोषणा झाली. यादी निघाल्या नंतर काही मंत्र्यांकडून नाराजीचा सूर निघायला सुरुवात झाला. यावरून महायुतीतील सुद्धा घमासान सुरू झाले. हा वाद एवढा टोकाला गेला की दोन जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा निर्णय विद्यमान सरकारला स्थगित करावा लागला. पालकमंत्री पदासाठी एवढी मारामारी कशाला हा प्रश्न साहजिकच पडतो.

महाराष्ट्रातील राजकारणात पालकमंत्री पद अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे कारण या पदाच्या माध्यमातून राज्य सरकार स्थानिक प्रशासनावर थेट नियंत्रण ठेवते. पालकमंत्री हा जिल्ह्याचा मुख्य शासकीय प्रतिनिधी असतो आणि त्याला त्या जिल्ह्याच्या विकासाबाबत जबाबदारी असते.

प्रशासनिक नियंत्रण:
पालकमंत्री जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यकाळासाठी एक प्रमुख प्रशासनिक व्यक्ती म्हणून कार्य करतो.तो जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा अधिकारी,आणि इतर सरकारी विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवतो.

विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणी:
जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि योजनांच्या अंमलबजावणीला चालना देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे. यात ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो.

राजकीय प्रभाव:
स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव असलेला पालकमंत्री त्या जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर नियंत्रण ठेवतो, त्यामुळे त्याच्या समर्थनाच्या आधारावर शासकीय कामे व इतर निर्णय होतात.

कायदा व सुव्यवस्था:
पालकमंत्री हा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही घेतो. त्याच्या अधीन असलेल्या जिल्ह्यातील भागात शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याला विशेष अधिकार मिळतात.

जिल्ह्याच्या सर्व विकासात्मक आणि प्रशासकीय निर्णयांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका:

कोणत्याही जिल्ह्यातील सरकारी योजनांचे निर्णय घेण्यास आणि त्या क्षेत्रातील आवश्यक निर्णय घेण्यास पालकमंत्री प्रमुख भूमिका निभावतो.

मोठी बातमी: रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती

   Follow us on        

मुंबई:रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्त केलेल्या आदिती तटकरेंच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे. फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांच्या विरोधानंतर ही स्थगिती देण्यात आली आहे. मंत्रीपदावर वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मोर्चेबांधणी केली होती. जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजप आमदारांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून फलोत्पादन व रोजगार हमीमंत्री भरत गोगावले यांची निवड करण्याची मागणी केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांच्याकडे रायगडचे पालकमंत्रीपद आले आहे. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन, भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. तरीही तटकरे यांना पद मिळाले हे विशेष मानले जाते. हा निर्णय मनाला पटण्यासारखा नाही, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी व्यक्त केली. त्यांच्या समर्थकांनी महामार्गावरील वाहतूक रोखून या नियुक्तीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर ही स्थगिती देण्यात आली असल्याचे समजते.

गिरीश महाजनांच्या नियुक्तीलाही स्थगिती
गोगावलेंप्रमाणेच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पालकमंत्रीपद मिळालेले नाही. दादा भुसे हे पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील होते, परंतु हे पद जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले होते. या दोन्ही जिल्ह्यांतील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे

 

७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता होणार मुख्य शासकीय समारंभ; जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर

मुंबई, दि. १९: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील.

  • ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे,
  • पुणे – उपमुख्यमंत्री अजित आशाताई अनंतराव पवार,
  •  नागपूर – मंत्री सर्वश्री चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे,
  • अहिल्यानगर – राधाकृष्ण सिंधुताई एकनाथराव विखे पाटील,
  • वाशिम – हसन सकीना मियालाल मुश्रीफ,
  • सांगली – चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील,
  • नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन,
  • पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक,
  • जळगाव- गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील,
  • यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड,
  • मुंबई शहर- मंगलप्रभात प्रेमकवर गुमनमल लोढा,
  • मुंबई उपनगर- ॲड.आशिष मीनल बाबाजी शेलार,
  • रत्नागिरी- उदय स्वरूपा रवींद्र सामंत,
  • धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल,
  • जालना- श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे,
  • नांदेड- अतुल लीलावती मोरेश्वर सावे,
  • चंद्रपूर- अशोक जनाबाई रामाजी उईके,
  • सातारा- शंभुराज विजया देवी शिवाजीराव देसाई,
  • बीड- दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे,
  • रायगड- आदिती वरदा सुनील तटकरे,
  • लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले,
  • नंदुरबार- ॲङ माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे,
  • सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे,
  • हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ,
  • भंडारा- संजय सुशीला वामन सावकारे,
  • छत्रपती संभाजीनगर संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट,
  • धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक,
  • बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील),
  • सिंधुदुर्ग- नितेश नीलम नारायण राणे,
  • अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर,
  • गोंदिया- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील,
  • कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर,
  • गडचिरोली- ॲड. आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल,
  • वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर,
  • परभणी- श्रीमती मेघना दीपक साकोरे – बोर्डीकर
  • अमरावती- इंद्रनील अनिता मनोहर नाईक.

राष्ट्रध्वजारोहण करणारे मंत्री अथवा राज्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रम स्थळी उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी तसेच इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान स्वीकारतील.

राज्यात वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच जिल्ह्यांमध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, असेही कळविण्यात आले आहे.

राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक एफएलजी-१०९१/३०, दिनांक २ मार्च १९९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९१(२)/३०, दिनांक ५ डिसेंबर १०९१ तसेच क्रमांक एफएलजी १०९८/ ध्वजसंहिता/३०, दिनांक ११ मार्च १०९८ अन्वये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. याप्रसंगी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे. तसेच उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करावयाचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी व व्यक्तींनी परिधान करावा. स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई- वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना या परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search