नागपूर: आताची मोठी बातमी समोर येत आहे, अखेर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज मंत्र्यांचं खाते वाटप जाहीर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडेच गृहमंत्रालय असणार आहे. . तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृह निर्माण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
कोणाला कोणतं खातं?
देवेंद्र फडणवीस – गृह
अजित पवार – अर्थ
एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण
चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
गणेश नाईक – वन मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा
पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा
दादा भुसे – शालेय शिक्षण
गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
संजय राठोड – मृद व जलसंधारण
धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
मुंबई : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनिवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला. मात्र, नारायण राणेंची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाते नेते विनायक राऊत यांनी केली आहे. याबाबत, अॅड. असीम सरोदे, अॅड. किशोर वरक ,अॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत कायदेशीर नोटिसही विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे.
निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली, त्याचाही उल्लेख या नोटिसमध्ये करण्यात आलेला आहे.
निवडणूक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगने चौकशी करावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिसमधून केलेली आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने 07 दिवसात या नोटिसवर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल, असेही माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणुक निर्णय अधिकार्यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी म्हटले म्हणाले.
सिंधुदुर्ग: भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून सुद्धा त्यांना पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या मंत्रिमंडळात स्थान आणि नारायण राणे यांचा राजकारणातील अनुभव आणि वजन पाहता त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची सर्वाधिक शक्यता होती. एनडीएने बहुमत सिद्ध केल्यावर राज्यातील सर्व न्यूज माध्यमांनी नारायण राणे यांचे नाव मंत्रिमंडळात असणार अशा बातम्या प्रसिद्धही केल्या होत्या. मात्र घडले उलटेच. नारायण राणे यांना मंत्रीपद न मिळण्यामागे काय कारण असेल याच्याही चर्चा चालू झाल्यात.
या आधीच्या मंत्रीमंडळात नारायण राणे यांच्यावर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र नारायण राणे यांच्या कारकिर्दीत सरकारच्या अपेक्षेप्रमाणे लघु उद्योगाची निर्मिती झाली नाही. नारायण राणे यांना मंत्रिपद नाकारण्यात हे कारण असल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.
कणकवली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे राज्याच्या राजकारणात आपली चमक दाखवत आहेत. राज्यात मंत्रिपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असूनही विधानसभेच्या या टर्म मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही . मात्र येणाऱ्या निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आल्यास नितेश राणे यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. भाजप एकाच घरात दोन मंत्रीपदे देत नसल्याने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला गेला नाही आहे अशी चर्चा राणे समर्थकांमध्ये होत आहे.
दिल्ली:कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि मराठवाड्यातील नेते भागवत कराड यांना मंत्रीमंडळ स्थान दिले जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये कोकण आणि मराठवाड्याचे नेतृत्त्व आता कोण करणार? या भागातून अन्य कोणत्याच नेत्याला संधी मिळणार नाही का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
दिल्लीतून कराड, नारायण राणे यांना फोन
मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नारायण राणे यांच्याकडे शूक्ष्म व लघु उद्योगमंत्री होते. तर भागवत कराड हे राज्य अर्थमंत्री होते. खरं म्हणजे नारायण राणे यांना यावेळीदेखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कारण ते कोकणातील एक मोठा चेहरा आहेत. दुसरीडे भागवत कराड हेदखील मराठवाड्यातील मोठे नाव आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्ष मात्र आता मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली जाणार नसल्याचं सांगितलं जातंय. तसा फोनदेखील भाजपच्या दिल्लीतील नेतृत्त्वाकडून कराड आणि नारायण राणे यांना गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुले आता कराड आणि राणे या दोघांचाही पत्ता कट झाल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
वेगळी महत्वाची जबाबदारी दिली जाणार?
भाजपचे सरकार आल्यावर नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तविण्यात येत होती. मात्र भाजपने नारायण राणे यांना मंत्रीपद देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र नारायण राणे यांचे राज्यातील खासकरून कोकण भागातील राजकीय वजन पाहता त्यांना दुसरी महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे.
सिंधुदुर्ग : लोकसभा निवडणुकीत कोकणात १००% यश मिळवलेल्या महायुतीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजप नेते निलेश राणे यांनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. त्या आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. तर आमदार नितेश राणे यांनी भर पत्रकार परिषदेत राजापूर मतदार संघावर भाजप पक्षातर्फे दावा केला आहे.
निलेश राणेंचे रत्नागिरी मतदारसंघाबाबत ट्वीट
निलेश राणे ट्वीटमध्ये लिहितात, नितेशने फक्त राजापूर मतदार संघावर भाजपचा दावा सांगितला… माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदार संघ पण पारंपारिक भारतीय जनता पार्टीचा आहे तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार
मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये ते उच्चशिक्षण मंत्री होती. तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे उद्योगमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उदय सामंत आत्तापर्यंत 4 वेळा रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. दोन वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली तर दोन वेळेस शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडून आले आहेत.
तर लोकसभा निवडणुकीत भाजपला राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात दोन नंबरची मते मिळाली आहेत. फक्त 21 हजार मतांनी भाजपा पिछाडीवर आहे. 2019 च्या तुलनेत राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघात भाजपा ने चांगला लोकाश्रय मिळवला आहे. हे भाजपसाठी सुचिन्ह असुन येत्या विधानसभेला राजापूर विधानसभेवर भाजपाचा दावा असणार असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर असताना निलेश राणे आणि नितेश राणे यांनी असे ठोकल्याने महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
Loksabha Election Result 2024: राज्यात जरी मविआ ला भरघोस यश मिळाले असले तरी कोकणात मात्र महायुतीने १००% जागांवर यश मिळवले आहे. ठाणे, कल्याण, रायगड, पालघर आणि रतनागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात युतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे.
ठाणे मतदारसंघात ठाकरे गटाचे राज विचारे यांचा पराभव झाला, तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी उमेदवार ठरले. पालघरमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत. हेमंत सावरा 184422 मताधिक्याने विजयी ठरले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. सुनील तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते (Anant Gite) यांचा 82784 मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये देखील ठाकरे गटाला अपयश आलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्धात नारायण राणेंचा 47 हजार 858 मतांनी विजय झाला आहे.
ठाणे, कोकणातील विजयी खासदारांची यादी
ठाणे – नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
पालघर – हेमंत विष्णू सवेरा (भाजप)
रायगड – सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
रत्नागिरी-सिंधुदर्ग – नारायण राणे (भाजप)
रायगडमध्ये अजित पवारांचा हुकमी ‘एक्का’
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रायगडमध्ये मिळालं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय झाला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा पराभव केला आहे. अजित पवार यांनी राज्यात चार जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांनी अजित पवारांचा हुकमी ‘एक्का’ असं म्हणावं लागेल.
पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा विजयी
पालघर लोकसभेवर अखेर महायुतीने आपला झेंडा फडकवला असून महायुती भाजपाचे डॉ. हेमंत सावरा हे एक लाख 84 हजार ह्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतं. पालघर लोकसभेवर अखेर पुन्हा एकदा महायुतीने आपलं नाव कोरलं असून भाजपाचे डॉक्टर हेमंत सावरा हे एक लाख 84 हजार मतांनी विजयी झाले असून. या विजयानंतर जिल्ह्यातील प्रश्न आहेत. त्यांना प्राधान्य देण्याचं त्यांनी सांगितलं असून हा विजय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून भाजपचे नारायण राणे विजयी झाले असून त्यांनी शिवसेना उबाठा गटाचे विनायक राऊत यांचा ४७८५८ मतांच्या फरकाने पराभव केला आहे. सावंतवाडी भाजपने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरविल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची लढत प्रतिष्ठेची झाली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या आधी दोनदा खासदार झालेल्या विनायक राऊत यांचे आव्हान त्यांच्यासमोर होते. शिवसेनेला असलेली सहानुभूती, जातीय ध्रुवीकरणाची शक्यता, रत्नागिरीत असलेले संघटनात्मक बळ याच्या जोरावर लढणाऱ्या राऊत यांचे बळ भाजपच्या नियोजनबद्ध रणनीतीसमोर कमजोर पडले. शिवसेनेतील फुटीनंतर मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत हे शिंदे शिवसेनेत आले. साहजिकच त्यांच्या अनुक्रमे सावंतवाडी आणि रत्नागिरी मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे बळ कमी झाले. त्या दोघांनी राणेंसाठी ताकद लावली..
Exit Poll: लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवार दिनांक ०४ जून रोजी हाती येणार आहे. मंगळवारी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे ? कशा पद्धतीने तो घेतला जातो ? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.
निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असून त्यातील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.
एक्झिट पोल कधी जाहीर केला जातो ?
एक्झिट पोल हा नेहमी निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर घेतला जातो. भारतात एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर त्यादिवशी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केला जातो.
कशा पद्धतीने घेतला जातो एक्झिट पोल ?
एक्झिट पोल हा ज्यादिवशी मतदान होते म्हणजे मतदानाच्या दिवशीच घेतला जातो. मतदानाच्या दिवशीच मतदारांकडून माहिती गोळा केली जाते. मतदान करुन आल्यानंतर मतदाराला कुणाला मत दिलं आहे यासंबंधी विचारलं जातं. यावेळी त्या मतदान केंद्रावर किती मतदार आहेत याची माहिती आधीच घेतली गेलेली असते. त्याच्या आधारेच मतदान केंद्रांची निवड करण्यात आलेली असते. मतदान करुन येणार पंधरावा, विसावा माणूस सॅम्पल म्हणून निवडला जातो. यावेळी मतदारांनी दिलेल्या उत्तराच्या आधारे सर्व्हे केला जातो आणि संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो.
एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये काय फरक ?
ओपिनियन पोल म्हणजे जनमत चाचणी. ओपिनियन पोल मतदानापुर्वी सादर केला जातो. मतदान होण्यापुर्वी विविध मतदारसंघांमध्ये जाऊन मतदारांचा कल जाणून घेतला जातो आणि त्यानुसार ओपिनियन पोल तयार केला जातो.
ओपनियन पोलवर कितपत निर्भर राहू शकतो ?
एक्झिट पोल आणि ओपनियन पोलमधील मुख्य फरक म्हणजे एक मतदानाआधी आणि एक मतदानानंतर घेतला गेलेला असतो. ओपनियन पोल मतदानाच्या आधी घेतला गेला असल्याने तो बदलण्याची शक्यता असते. त्याचे अंदाज बदलू शकतात. पण एक्झिट पोल हा मतदान घेतल्यानंतरचा असल्याने त्याच्यावर निर्भर राहू शकतो.
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली ?
एक्झिट पोलची सुरुवात कधी झाली यामध्ये मतांतर आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी एक्झिट पोलची सुरुवात केली असं म्हटलं जातं. १५ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिला एक्झिट पोल आला होता.
एक्झिट पोल निकालाचं चित्र स्पष्ट करतात का?
आता प्रश्न उरतो की निकालाचं चित्र हे एक्झिट पोल स्पष्ट करतात की नाही? या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. बऱ्याचदा एक्झिट पोलचा अंदाज हा निकालाच्या जवळ जाणाराच असतो असं दिसून आलं आहे. मात्र एक्झिट पोल म्हणजे निकाल नाही हे मात्र आपण लक्षात ठेवायला हवं.
सी व्होटर, चाणक्य, इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या आणि अशा अनेक संस्था न्यूज चॅनल्सच्या सोबतीने त्यांचे अंदाज वर्तवतात. या अंदाजामध्ये जनतेचा सहभाग असतो. कारण अंदाज जनतेशी बोलून झाल्यानंतर हा अंदाज बांधण्यात आलेला असतो. त्यामुळेच निकालाचं चित्र स्पष्ट करणारे हे एक्झिट पोल ठरतात. देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकालाच्या दिवसापर्यंत विविध जनमत चाचण्या आणि अंदाज घेतले जातात. बऱ्याचदा राजकीय विश्लेषकही काही अंदाज वर्तवत असतात त्यावरूनही एक्झिट पोलचे अंदाज बांधले जातात.
लोकांनी दिलेली माहिती, एक्झिट पोल मांडणाऱ्या संस्थाचं तयार झालेला अंदाज, राजकीय तज्ज्ञ, विश्लेषकांनी वर्तवलेले अंदाज या सगळ्यातून एक्झिट पोल आकाराला येत असतो. त्याचमुळे तो निकालाचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट करणारा ठरतो. सत्ताधारी पक्षाला किती जागा? विरोधी पक्षाला किती जागा? अपक्षांची कामगिरी काय? हे आणि अशा अनेक प्रकारचे अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत असतात. त्यामुळे एक्झिट पोल हे निकाल काय लागू शकतो याचा अंदाज वर्तवणारं एक उत्तम माध्यम ठरतं.
Maharashtra Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतील?
एक्झिट पोल एजन्सी
महायुती
महाविकास आघडी
इतर
ABP News-CVoter
24
23
1
TV9 पोलस्ट्राट
22
25
1
Republic Bharat-Matrize
30-36
13-19
0
Republic PMARQ
29
19
0
News18 exit poll
32-35
13-16
0
School of Politics
31-35
42705
0
TIMES NOW Survey exit polls
26
24
0
News 24 Chanakya exit polls report
33
15
0
Rudra survey
13
34
1
NDTV India – Jan Ki Baat
34-41
42614
0
Lok Sabha Poll of Exit Poll : 2024 एक्झिट पोलमध्ये देशात कुणाला किती जागा मिळतील?
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान आज पार पाडले. महाराष्ट्र राज्यात 54.98% एवढे मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (63.71%) झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (47.84%) एवढे झाले आहे.
लातूर 55.38 %
सांगली 52.56 %
बारामती 47.84%
हातकणंगले 62.18%
कोल्हापूर 63.71%
माढा 50%
उस्मानाबाद 58.24%
रायगड 50.31%
रत्नागिरी – सिंधुदुर्ग 53.75 %
सातारा 56.38 %
सोलापूर 49.17%
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 53.75% मतदान झाले आहे. या मतदारसंघात सावंतवाडीत सर्वाधिक 60.30% एवढे मतदान झाले असून राजापुरात सर्वात कमी 47.31% एवढे मतदान झाले आहे.
कुडाळ 59.09%
कणकवली 55.14%
सावंतवाडी 60.30%
राजापूर 47.31%
चिपळूण 52.62%
रत्नागिरी 49.83%
रायगड लोकसभा मतदारसंघात 50.31% मतदान झाले आहे. या मतदारसंघात दापोली येथे सर्वाधिक 59.12% एवढे मतदान झाले असून महाड मध्ये सर्वात कमी 45.60% एवढे मतदान झाले आहे.
अलिबाग 52.33%
दापोली 59.12%
गुहागर 53.77%
महाड 45.60%
पेण 51%
श्रीवर्धन 49.48 %
देशात आज निवडणूकीच्या तिसर्या टप्प्यात एकूण 61.60% एवढे मतदान झाले असून आसाम राज्यात सर्वाधिक सुमारे 75.30% एवढे मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत (54.98%) सर्वात मागे आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. मतदानाच्या टक्क्यावर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाला असून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.
टीप : वरील आकडेवारी शासनाच्या अधिकृत माध्यमांतून उपलब्ध झाली असली तरी ती अंदाजित स्वरूपाची आहे. ही माहिती टप्प्याटप्प्याने येत असल्याने त्यात काहीशी वाढ अपेक्षित आहे. यात टपालाने केलेल्या मतांचा समावेश नाही आहे.
Ad -
मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंडयेथे नोकरीच्या संधी....
सिंधुदुर्ग : काल कणकवली येथे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यापासून राज ठाकरे यांची निवडणूक प्रचारासाठी पाहिलीच जाहीर सभा होती. या सभेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यापासून या मतदारसंघातील विविध प्रश्न त्यावरील उपाय, नारायण राणे यांचे येथे निवडून येण्याचे फायदे याबाबत आपल्या भाषणात अनेक मुद्दे मांडलेत.
काय म्हणालेत राज ठाकरे?
शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर जाहीर सभा घेण्याचा मनोदय नव्हता पण नारायणराव राणेंशी असलेला स्नेह आणि आग्रहामुळे त्यांना नाही म्हणून शकलो नाही. कारण ते माझे जुनेसहकारी आणि मित्र आहेत.
जितकं आपलं तळकोकण देखणं आहे तितकीच इथली जनताही सुजाण आहे कारण महाराष्ट्र राज्याला ९ भारतरत्न आहेत त्यापैकी ७ भारतरत्न एकट्या कोकणातून येतात.
माझी राजकीय वाटचाल आडेवेढे घेणारी नसते… सरळ आणि सुस्पष्ट असते. एखादी भूमिका पटली तर मी समर्थन करतो आणि नाही पटली तर टोकाचा विरोध करतो.
२०१४ ते २०१९ मोदी सरकारकडून जी धोरणं आखली गेली त्यातल्या ज्या नाही पटल्या त्यांना २०१९ निवडणुकांमध्ये दाखवून जाहीर विरोध केला. नोटबंदी, पुतळ्यावर खर्च करणं अशा अनेक बाबी आजही नाही पटत.
पण जेव्हा काश्मीरमधलं ३७० कलम रद्द झालं, तेव्हा पहिलं अभिनंदन करणारा मीच होतो.
देश स्वतंत्र झाल्यापासून ३७० कलम रद्द करा ही मागणी होती. का? तर आपल्या देशाच्या भागात काश्मीरमध्ये एक इंचही जमीन खरेदी करू शकत नाही. असं ३७० कलाम आज मोदी सरकारने रद्द केलं हे मान्यच करावं लागेल.
राम मंदिर उभं राहिलं आणि कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली. आताच सुप्रीम कोर्ट आणि प्रामुख्याने सत्तेत श्री. नरेंद्र मोदी नसते तर हे राममंदिर उभं राहिलंच नसतं.
मित्राची खरडपट्टी काढताना आपण मागेपुढे पाहू नये आणि शत्रूची स्तुती करतानाही आपण मागे पुढे पाहू नये.
२०१९ च्या निवडणुकांमध्ये माझी मांडणी लक्षपूर्वक ऐका आजच्या विरोधी पक्षांची बोलायचीही हिंमत होणार नाही इतके तीक्ष्ण प्रश्न मी उपस्थित केले होते कारण ते माझा हेतू शप्ष्ट होता तो विरोध फक्त धोरणांसाठीचा होता. मला काहीतरी हवं म्हणून नव्हते.
श्री. उद्धव ठाकरे म्हणतात अडीच-अडीच वर्षाचा शब्द पाळला नाही म्हणून मी युतीतून बाहेर पडलो. ह्याचा अर्थ समजा भाजपाने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद दिले असते तर हे मोदींविरोधात बोलले असते का? ह्याचा अर्थ सत्तेचा बोळा तोंडात कोंबला असता तर आज विरोधात नसते.
कोकणातले उद्योगधंदे गुजरातला जात आहेत असं श्री. उद्धव ठाकरे म्हणाले. मला एकंच प्रश्न विचारायचा आहे, वर्ष २०१४ ते २०१९ तुम्ही भाजप बरोबर सत्तेत होतात नंतर २०१९ ते २०२२ स्वतः मुख्यमंत्री होतात म्हणजे गेल्या दहा वर्षात तुम्ही साडेसात वर्ष सत्तेत होतात मग उद्योग गुजरातला गेलेच कसे? तुम्ही विरोध का केला नाहीत?
उद्योगधंदा आला कि उद्धव ठाकरेंचा खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार. हे कोणतं पक्षाचं धोरण ?
अणुऊर्जा प्रकल्प आला तर नाश होईल असा प्रचार जैतापूरच्या प्रकल्पाला विरोध झाला. पण देशात तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, तारापूर (महाराष्ट्र) इतके अणुऊर्जा प्रकल्प भारतात आहेत आणि सगळ्यात महत्वाचा भाभा अणू संशोधन केंद्र मुंबईच्या मध्यात आहे मग उद्या तिथे काही विस्फोट झाला तर… असे प्रकल्प निर्धोक सुरु असताना का आणि कसली भीती घातली जाते आहे.
नाणारला विरोध केला. तिथे हजारो एकर जमिनी कशा विकत घेतल्या गेल्या ? मग बारसू तिथेही ५००० एकर जमीन आधीच विकत घेतली होती. प्रकल्प कुठे येणार हे दलाल – अधिकारी – राजकारणी ह्यांना आधीच माहित असतं मग त्या जमिनी कवडीमोल दराने विकत घ्यायच्या आणि चढ्या भावाने सरकारला विकायच्या. हे कोणतं षडयंत्र ? कोण रचतंय ? ह्यावर खासदाराने लक्ष ठेवायला हवं होतं ना?
कोकण रेल्वे किती वेगात पूर्ण झाली कारण तेव्हा जमिनीचे दलाल फिरत नव्हते.
कोकणात चांगले उद्योग यावेत, प्रदूषणमुक्त उद्योग यावेत.
गोवा राज्य फक्त पर्यटनावर सुरु आहे मग आपला रत्नागिरी-सिंधुदुर्ग का नाही ?
परदेशी पर्यटक आले कि आपल्या काही लोकांचं पालुपद असतं कि ‘संस्कृतीवर घाला येतो. संस्कृती बिघडेल’ वगैरे. दोन वेळेचं अन्न देऊ शकत नाही अशी कोणती संस्कृती. आपल्याच मुलांच्या हाताला रोजगार मिळेल. आपल्या लोकांच्या हाती पैसे येईल.
परदेशी पर्यटक आल्याने गोव्याची, केरळची संस्कृती बिघडली का? तिथली संस्कृती रसातळाला गेली का? नाही. पर्यटक येतील, आपल्या प्रदेशाचा आनंद घेतील, चांगले पैसे इथे खर्च करतील आणि जातील.
मी मलेशियाला गेलो होतो. मलेशिया हा मुस्लिम देश आहे. मुस्लिमांमध्ये दारू पिणं आणि जुगार खेळणं वर्ज्य मानलं जातं. तिथे जेंटिंग हाईलँड्स म्हणून एक ठिकाण आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर दारू आणि कसिनोचा आनंद घ्यायला लोकं येतात. आम्हीही तिथे गेलो पण मला जुगार खेळात येत नाही फक्त ५ वर्षातून एकदा जुगार खेळतो.
मलेशियाच्या एका रेस्टोबारमध्ये एक पाटी दिसली ‘मुस्लिमांना प्रवेश नाही’. मी विचारपूस केली, तेव्हा कळलं. त्यांची धार्मिक मान्यता काहीही असली तरी पर्यटन आणि त्यातून आर्थिक सुबत्ता येणार असेल तर त्यांनी धर्म बाजूला ठेवला. मग आपण कोणती संस्कृती घेऊन बसलोय.
गोवा, केरळ अशी बाकीची राज्य पुढे जात आहेत आपण तारकर्ली घेऊन बसलोय.
आपलं कोकण जैविविधतेने इतकं समृद्ध आणि सुंदर आहे की, जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेझॉन नंतर ह्या सह्याद्री पश्चिम घाटाची दखल घेतली जाते. आपल्याला त्याची जाणीवच नाही.
माझी नारायणराव राणे ह्यांना विनंती आहे. जगातील सुसज्ज हॉटेलची साखळी उभी करा. परदेशी पर्यटकांशी बोलायला इंग्लिश स्पिकिंग क्लासेस आणा.
नारायणराव राणेंना मुख्यमंत्रीपदाचे फक्त ६ महिने मिळाले ते जर पुढची ५ वर्ष मिळाली असती ना तर कुणाला इथे प्रचाराला यायची गरजच लागली नसती. ते ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हा मलाही प्रश्न पडला होता कि मुख्यमंत्री पदाचा आवाका पाहता नारायणरावांना हे जमेल का? पण त्यांनी ज्याप्रकारे मुख्यमंत्रीपद हाकलं, हाताळलं ते भल्याभल्यांना नाही जमलं आहे.
झपाटल्यासारखं काम करणं आणि कामाचा सपाटा लावणं हे काय असतं हे नारायणरावांकडे बघून तुम्हाला कळेल. मी
सन्मा. बाळासाहेब असे कधी गप्पांना बसायचो तेव्हा बाळासाहेब सांगायचे अंतुलेनंतर कुणी कामाचा वाघ बघितला असेन तर आपले नारायणराव राणे.
एखादा विषय समजून घेणं आणि समजल्या नंतर तो मांडणं… ह्याचं एक उत्तम उदाहरण देतो. नारायणराव राणे विरोधी पक्षनेते होते तेव्हा माझे आजचे सहकारी अनिल शिदोरे एकेदिवशी सामाजिक कार्यकर्ते श्री. अभय बंगांना घेऊन त्यांना भेटले. श्री. बंगांनी बालमृत्यू, कुपोषण ह्या समस्येबद्दल नारायणरावांना माहिती दिली. दुसरी दिवशी सभागृहात नारायणरावांनी तो विषय ज्या विस्तृतपणे, अभ्यासपूर्ण तासभर मांडला त्यावर बालमृत्यू, कुपोषण प्रश्नावर काम करणारे अभय बंगही बेहद्द खुश होते. असा माणूस तुमच्यासमोर खासदारकीचा उमेदवार म्हणून उभा आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्गवासियांना माझी विनंती आहे कि, तुम्हाला नुसताच बाकड्यावर बसणार खासदार पाहिजे कि केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवून तळकोकणाचा विकास करणारा खासदार पाहिजे.
कोकणाबद्दलची जी काही मतं आहेत, माझ्या ज्या कल्पना आहेत ते मी नारायणराव राणेंकडे घेऊन गेल्यावर ते चालढकल करणार नाहीत. त्या विषयांना न्याय देतील हा मला विश्वास आहे. मा
झा कोकणी माणूस आज उद्योग नाही, सुबत्ता नाही म्हणून कोकण सोडतो. त्या कोकणी माणसाला आपल्या कुटुंबापासून विभक्त व्हायची पुन्हा वेळ येणार नाही ह्यासाठी आम्ही काम करू.
येत्या ७ मे ला, श्री. नारायणराव राणे ह्यांना प्रचंड मतांनी विजयी कराल, हि अपेक्षा.
रत्नागिरी, दि. ०१ मे: सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रत्नागिरीत सामंत विरुद्ध सामंत असा सामना सुरू झाला आहे. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयावरील बॅनर बदलला आहे. उदय सामंत जनसंपर्क कार्यालय असा बॅनर होता. आता किरण सामंत संपर्क कार्यालय असे बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे किरण सामंत अद्यापही उमेदवारीवरून नाराज असल्याची चर्चा तळ कोकणात सुरू झाली आहे. नव्याने लावण्यात आलेल्या बॅनरवरून उदय सामंत यांचाही फोटो काढण्यात आला आहे.
उदय सामंत यांचे बॅनर हटवण्यात आल्यानंतर किरण सामंत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “माझं कार्यालय आहे. तिथेच मी बसणार. माझ्या कार्यालयात काय करायचं हे मी ठरवणार, अशी प्रतिक्रिया किरण सामंत यांनी दिली आहे. शिवसेनेचं जिल्हा संपर्क कार्यालय हे माझ्या मालकीचं आहे”, असं किरण सामंत यांनी म्हटलं आहे.
नारायण राणेंच्या अडचणींत वाढ
किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेसाठी इच्छुक होते. शेवटपर्यंत ही जागा शिवसेनेकडे जाते कि भाजपाकडे याबाबत रस्सीखेच चालू होता. अखेर भाजपने बाजी मारून नारायण राणे यांना उमेदवारी दिली. उदय सामंत आणि किरण सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि माघार घेत असल्याची घोषणा केली.. महायुतीचे उमेदवार नारायण राणेंचा प्रचार करणार.. असं आश्वासन उदय सामंत आणि किरण सामंतांनी पत्रकार परिषदेतून दिले होते. मात्र आजची घटना नारायण राणे आणि भाजपाची झोप उडवणारी ठरणार आहे. किरण सामंत यांची नक्की भूमिका काय आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण किरण सामंत यांनी साथ न दिल्यास ही निवडणूक जिंकणे युतीला कठीण होणार असून सामंत बंधुतील या वाढच फायदा शिवसेना (उबाठा) च्या विनायक राऊत यांना होणार आहे.
किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयावरील बॅनर बदलला आहे. नव्याने लावण्यात आलेल्या बॅनरवरून उदय सामंत यांचा फोटो नाही.