



Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान आज पार पाडले. महाराष्ट्र राज्यात 54.98% एवढे मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (63.71%) झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (47.84%) एवढे झाले आहे.
- लातूर 55.38 %
- सांगली 52.56 %
- बारामती 47.84%
- हातकणंगले 62.18%
- कोल्हापूर 63.71%
- माढा 50%
- उस्मानाबाद 58.24%
- रायगड 50.31%
- रत्नागिरी – सिंधुदुर्ग 53.75 %
- सातारा 56.38 %
- सोलापूर 49.17%
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 53.75% मतदान झाले आहे. या मतदारसंघात सावंतवाडीत सर्वाधिक 60.30% एवढे मतदान झाले असून राजापुरात सर्वात कमी 47.31% एवढे मतदान झाले आहे.
- कुडाळ 59.09%
- कणकवली 55.14%
- सावंतवाडी 60.30%
- राजापूर 47.31%
- चिपळूण 52.62%
- रत्नागिरी 49.83%
रायगड लोकसभा मतदारसंघात 50.31% मतदान झाले आहे. या मतदारसंघात दापोली येथे सर्वाधिक 59.12% एवढे मतदान झाले असून महाड मध्ये सर्वात कमी 45.60% एवढे मतदान झाले आहे.
- अलिबाग 52.33%
- दापोली 59.12%
- गुहागर 53.77%
- महाड 45.60%
- पेण 51%
- श्रीवर्धन 49.48 %
देशात आज निवडणूकीच्या तिसर्या टप्प्यात एकूण 61.60% एवढे मतदान झाले असून आसाम राज्यात सर्वाधिक सुमारे 75.30% एवढे मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत (54.98%) सर्वात मागे आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. मतदानाच्या टक्क्यावर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाला असून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.
टीप : वरील आकडेवारी शासनाच्या अधिकृत माध्यमांतून उपलब्ध झाली असली तरी ती अंदाजित स्वरूपाची आहे. ही माहिती टप्प्याटप्प्याने येत असल्याने त्यात काहीशी वाढ अपेक्षित आहे. यात टपालाने केलेल्या मतांचा समावेश नाही आहे.
Ad -
Vision Abroad