Category Archives: गोवा वार्ता

गोव्यात भारतीय बनावटीचे मद्य आणि बिअरचे दर वाढणार

गोवा वार्ता : अबकारी खात्याने भारतीय बनावटीचे मद्य आणि बियरवरील उत्पादन शुल्क, इतर फी आणि लेबल रेकॉर्डिंग फीमधील बदल अधिसूचित केले आहेत. त्यात भारतीय बनावटीचे मद्य, विदेशी मद्य आणि बियरच्या कमाल किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे 750 मिलीपेक्षा कमी क्षमतेच्या बॉटलवरील शुल्क वाढण्याची शक्यता आहे.

कमाल किरकोळ किंमत व्हॅल्यूमची गणना करण्याच्या हेतूने भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विदेशी दारू, वाईन आणि इतर देशी दारू उत्पादन शुल्क आणि लेबल रेकॉर्डिंग 60 मिली, 90 मिली, 180 मिली, 375 मिली यांचे शुल्क 750 मिलीप्रमाणे समतुल्य असेल.

भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विदेशी मद्य, 200 मिली, 250 मिली, आणि 275 मिली यांचे 275 मिलीच्या सममूल्य असेल. 325 मिली, 330 मिली, 500 मिली आणि 650 मिलीपेक्षा जास्त बियरचे मूल्य शुल्क 650 मिलीप्रमाणे आकारले जाईल.

 

Loading

गोव्यात सापडलेल्या ‘काळ्या बिबट्याला’ ट्रॅकिंग डिव्हाईस लावून जंगलात सोडणार….

गोवा वार्ता – तळकोकणात अधून मधून काळे बिबटे दृष्टीस येत आहेत असे बोलले जात होते. तळकोकणत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेरी येथे रात्री एका नागरिकास काळा बिबटा दिसल्याची बातमी आली होती. परंतु या बातमीस काही जणांनी आक्षेप घेऊन ती बातमी खोटी असल्याचे दावे केले होते. मात्र जिल्ह्या लगतच्या गोवा राज्यातील  केपे तालुक्यातील बाळ्ळी येथे लोकवस्तीत फिरणाऱ्या काळ्या बिबट्याला (ब्लॅक पॅंथर) वनविभागाने 1 एप्रिल रोजी पिंजऱ्यात पकडले आहे. त्यामुळे तळकोकणत आणि लगतच्या गोवा राज्यात ब्लॅक पॅन्थर चा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे. 
गोव्याच्या जंगलांमध्ये काळ्या बिबट्यांचा वावर होता, हे यापूर्वी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये सिद्ध झाले होते. आता बाळळी परिसरातील लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या सापडला आहे.
लक्ष ठेवण्याकरता ट्रॅकिंग डिव्हाईस
पकडण्यात आलेल्या बिबट्याला नेत्रावली च्या अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. तो पुन्हा मानवी वस्तीत जाऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे, म्हणूनच त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता हे ट्रॅकिंग डिव्हाईस लावण्यात येत आहे. राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे, असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Loading

पणजीतील लॉकडाउनची बातमी ‘एप्रिल फूल’ करण्यासाठी; सरकारचे लक्ष वेधण्यासाठी…..

गोवा वार्ता – काल दिनांक १ एप्रिल रोजी  पणजी शहरात एक महिन्यासाठी लॉकडाउन लागणार असे गोवा राज्यातील गोमंतक या अग्रगण्य वृत्तप्रत्रात प्रसिद्ध झाल्याने एकच खळबळ उडाली होती. पणजीतील स्मार्ट सिटी प्रकल्प व कोरोनाच्या सावटावरील स्थितीला अगदी तंतोतंत जुळणाऱ्या या बातमी एका अग्रगण्य वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने बातमीमध्ये वाचकांना विश्वासाहर्ता वाटली आणि चर्चा सुरु झाल्या. पण त्याच वृत्तप्रत्रात ती बातमी ‘एप्रिल फूल’ करण्याच्या उद्धेशाने असल्याचे आज जाहीर केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
पणजी शहरातील रस्ते गेल्या तीन महिन्यांपासून खोदल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याची सरकारने दखल घ्यावी व हे काम त्वरित पूर्ण करावे, या उद्देशाने ‘गोमन्तक’ने ही मनोरंजनात्मक बातमी प्रसिद्ध केली असे म्हंटले आहे. 
काहीही असो, पण ही बातमी फक्त ‘एप्रिल फूल’ असल्याचे आज कळताच येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे. 

Loading

पर्यटनासाठी गोव्यात जात असाल तर ही बातमी वाचा; पणजीत एक महिन्यांचा लॉकडाऊन जाहीर..

गोवा वार्ता – एप्रिल महिन्यात गोवा राज्याला भेट देणार असाल तर तुमच्या साठी एक महत्त्वाची बातमी आहे. गोवा विधानसभेचे अधिवेशन संपल्याच्या रात्रीच विशेष मंत्रिमंडळ बैठकीत गोवा सरकारने एका महिन्याचा पणजी बंद लॉकडाऊन आज जाहीर केला आहे. त्याची कार्यवाही 1 एप्रिलच्या पहाटेपासून सुरू केली जाईल.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बेदरकारपणे चाललेल्या बांधकामांमुळे मेटाकुटीस आलेल्या राजधानीतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी गोवा सरकारने हा लॉकडाऊन लावला आहे. 

शनिवारी सर्व वाहने पणजीमध्ये येण्यापासून रोखून ठेवली जातील. शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांना दुपारी एकपर्यंत मुभा राहील. केवळ अग्निशामक व रुग्णवाहिका यांना शहरात फिरण्यास अनुमती आहे.

एक वाजल्यानंतर मात्र लॉकडाऊनची कठोर कारवाई सुरू होणार आहे. त्यात मच्छी व भाजी मार्केट बंद ठेवण्याचाही निर्णय समाविष्ट आहे.

‘पोलिस खात्‍याच्‍या वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना शहराचे शेरीफ म्हणून एका महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना लॉकडाऊनची कडक कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे,’ अशी माहिती एका अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने रात्री उशिरा जाहीर केली.







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
   

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search