गोवा वार्ता – तळकोकणात अधून मधून काळे बिबटे दृष्टीस येत आहेत असे बोलले जात होते. तळकोकणत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेरी येथे रात्री एका नागरिकास काळा बिबटा दिसल्याची बातमी आली होती. परंतु या बातमीस काही जणांनी आक्षेप घेऊन ती बातमी खोटी असल्याचे दावे केले होते. मात्र जिल्ह्या लगतच्या गोवा राज्यातील केपे तालुक्यातील बाळ्ळी येथे लोकवस्तीत फिरणाऱ्या काळ्या बिबट्याला (ब्लॅक पॅंथर) वनविभागाने 1 एप्रिल रोजी पिंजऱ्यात पकडले आहे. त्यामुळे तळकोकणत आणि लगतच्या गोवा राज्यात ब्लॅक पॅन्थर चा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे.
गोव्याच्या जंगलांमध्ये काळ्या बिबट्यांचा वावर होता, हे यापूर्वी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये सिद्ध झाले होते. आता बाळळी परिसरातील लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या सापडला आहे.
लक्ष ठेवण्याकरता ट्रॅकिंग डिव्हाईस
पकडण्यात आलेल्या बिबट्याला नेत्रावली च्या अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. तो पुन्हा मानवी वस्तीत जाऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे, म्हणूनच त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता हे ट्रॅकिंग डिव्हाईस लावण्यात येत आहे. राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे, असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
Facebook Comments Box