वेंगुर्ले: शिरोडा समुद्रात नौका उलटली; दोघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

   Follow us on        

वेंगुर्ले: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला जवळील शिरोडा समुद्रात आज २४ मे २०२६ रोजी सकाळी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्या आणि पावसामुळे एक मासेमारी नौका उलटली. या दुर्घटनेत नौकेवरील तीन मच्छिमार समुद्रात पडले. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत दोघांना वाचवले, तर शिरोडा केरवाडी येथील राजन सारंग यांचा अद्याप शोध सुरू आहे.

दुर्घटना घडल्यानंतर स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली आहे. समुद्रात अजूनही खवळलेले पाणी आणि वादळी स्थिती असल्याने शोधकार्य आव्हानात्मक बनले आहे. प्रशासनाने देखील मदत कार्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या प्रकारची घटना सिंधुदर्ग किनारपट्टीवर अधूनमधून घडत असल्याने छोट्या नौकांमधून मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी हवामान पूर्वसूचना लक्षात घेऊन समुद्रात जाण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. राजन सारंग यांचा शोध लवकरात लवकर लागावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Photo Credit – Google

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search