Category Archives: महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे शिवसेनेची पहिली यादी जाहीर.

   Follow us on        

Shivsena first list declared:शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. ही विधासभा निवडणुकीसाठीची पहिली यादी असून त्यात 45 उमेदवारांची नावे आहेत. उदय सामंत यांना रत्नागिरी, किरण सामंत यांना राजापूर तर दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पाहिल्या यादीतील उमेदवारांची नावे. 
एकनाथ शिंदे, कोपरी पाचपाखाडी
मंजुळाताई गावित,साक्री
चंद्रकांत सोनवणे,चोपडा
गुलाबराव पाटील, जळगाव ग्रामीण
अमोल पाटील, एरंडोल
किशोर पाटील, पाचोरा
चंद्राकांत पाटील, मुक्ताईनगर
संजय गायकवाड, बुलढाणा
संजय रायमुलकर, मेहकर
अभिजित अडसूळ, दर्यापूर
आशिष जैस्वाल, रामटेक
नरेंद्र भोंडेकर, भंडारा
संजय राठोड, दिग्रस
बालाजी कल्याणकर, नांदेड उत्तर
संतोष बांगर, कळमनुरी
अर्जुन खोतकर, जालना
अब्दुल सत्तार, सिल्लोड
प्रदीप जैस्वाल, छ. संभाजीनगर मध्य
संजय शिरसाट, छ. संभाजीनगर पश्चिम
विलास संदिपान भूमरे, पैठण
रमेश बोरनारे, वैजापूर
दादा भुसे, मालेगाव बाह्य
प्रताप सरनाईक, ओवळा माजीवाडा
प्रकाश सुर्वे, मागाठाणे
मनिषा वायकर, जोगेश्वरी पूर्व
दिलीप लांडे, चांदिवली
मंगेश कुडाळकर, कुर्ला
सदा सरवणकर, माहीम
यामिनी जाधव, भायखळा
महेंद्र थोरवे, कर्जत
महेंद्र दळवी, अलिबाग
भरतशेठ गोगावले, महाड
ज्ञानराज चौगुले, उमरगा
तानाजी सावंत, परांडा
शहाजीबापू पाटील, सांगोला
महेश शिंदे, कोरेगाव
योगेश कदम, दापोली
शंभूराज देसाई, पाटण
उदय सामंत, रत्नागिरी
किरण सामंत, राजापूर
दीपक केसरकर, सावंतवाडी
प्रकाश आबिटकर, राधानगरी
चंद्रदीप नरके, करवीर
सुहास बाबर, खानापूर

Loading

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात

   Follow us on        

MNS candidate List अविनाश जाधव आणि राजू पाटील यांची उमेदवारी राज ठाकरेंनी सोमवारी जाहीर केल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत. या यादीतील लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

विधानसभेसाठी मनसेची यादी

१) राजू पाटील- कल्याण पाटील

२) अमित ठाकरे -माहीम

३) शिरीष सावंत-भांडुप

४) संदीप देशपांडे-वरळी

५) अविनाश जाधव-ठाणे शहर

६) संगिता चेंदवणकर -मुरबाड

७) किशोर शिंदे- कोथरुड

८) साईनाथ बाबर-हडपसर

९) मयुरेश वांजळे- खडकवासला

१०) प्रदीप कदम-मागाठाणे

११) कुणाल माईणकर-बोरीवली

१२) राजेश येरुणकर-दहिसर

१३) भास्कर परब-दिंडोशी

१४) संदेश देसाई-वर्सोवा

१५) महेश फरकासे-कांदिवली पूर्व

१६) वीरेंद्र जाधव -गोरेगांव

१७) दिनेश साळवी-चारकोप

१८) भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व

१९) विश्वजीत ढोलम-विक्रोळी

२०) गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम

२१) संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व

२२) माऊली थोरवे-चेंबूर

२३) जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर

२४) निलेश बाणखेले-ऐरोली

२५) गजानन काळे-बेलापूर

२६) सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा

२७) विनोद मोरे- नालासोपारा

२८) मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम

२९) संदीप राणे – मिरा भाईंदर

३०) हरिश्चंद्र खांडवी- शहापूर

३१) महेंद्र भानुशाली-चांदिवली

३२) प्रमोद गांधी-गुहागर

३३) रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड

३४) कैलास दरेकर-आष्टी

३५) मयुरी म्हस्के-गेवराई

३६) शिवकुमार नगराळे-औसा

३७) अनुज पाटील-जळगाव

३८) प्रवीण सूर- वरोरा

३९) रोहन निर्मळ- कागल

४०) वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ

४१) महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण

४२) संजय शेळके-श्रीगोंदा

४३) विजयराम किनकर-हिंगणा

४४) आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण

४५) परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर

Loading

पर्यटन: माथेरानच्या राणीची सेवा १ नोव्हेंबर पासुन सुरु होणार

   Follow us on        

Matheran toy train: हिवाळी पर्यटनासाठी माथेरानला जाण्याचा बेत असलेल्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येथे धावणारी टॉय ट्रेन सेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात चार महिने अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची भीती असते. या कारणास्तव मिनीट्रेनची ही सेवा बंद करण्यात येते. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी ही मिनीट्रेनची सेवा सुरु होते.का

ही तांत्रिक आडचणींमुळे या वर्षी 1 नोव्हेंबरपासून माथेरानची ही मिनी ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे

 

Loading

जेष्ठ नागरीक मोफत एसटी प्रवासाच्या योजनेत बदल करण्याची मागणी

   Follow us on        

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी एसटी ने प्रवास मोफत केला आहे. मात्र या वयोगटातील प्रवाश्यांची संख्या कमी आहे. शारीरीक अडचणीमुळे जेष्ठ नागरीकांना बस मध्ये चढणे, उतरणे कठीण जाते. तसेच त्यांना एस टी ने प्रवास करण्यास कुटुंबही नकार देतात. या स्थितीत ६५ वर्षापासुन वयोगटांतील जेष्ठ नागरीकांनाही मोफत प्रवासाचा लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे.

आर्थिक अडचणीमुळे अनेक जेष्ठ नागरीकांना आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास करता येत नाही. या समस्येचा सारासार विचार करून शासनाने या वयोगटातील नागरीकांनाही मोफत प्रवास योजनेत सहभागी करुन घ्यावे, तसेच या मागणीचे समर्थन पावस विभागातील काही सामाजिकक संस्थानीही केले असुन ६५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरीकांना मोफत एस टी प्रवासाची सुविधा मिळावी व शासनाने जेष्ठ नागरीकांच्या प्रवास सोईकडे विशेष लक्ष घालावे, असे संतोष पोकडे यांनी सांगितले.

Loading

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

   Follow us on        

BJP Candidates List : आता होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

भाजपची पहिली उमेदवार यादी 

  1. नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस
  2. कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
  3. शहादा – राजेश पाडवी
  4. नंदूरबार- विजयकुमार गावीत
  5. धुळे शहर -अनुप अग्रवाल
  6. सिंदखेडा – जयकुमार रावल
  7. शिरपूर – काशीराम पावरा
  8. रावेर – अमोल जावले
  9. भुसावळ – संजय सावकारे
  10. जळगाव शहर – सुरेश भोळे
  11. चाळीसगाव – मंगेश चव्हाण
  12. जामनेर -गिरीश महाजन
  13. चिखली -श्वेता महाले
  14. खामगाव – आकाश फुंडकर
  15. जळगाव (जामोद) – संजय कुटे
  16. अकोला पूर्व – रणधीर सावरकर
  17. धामगाव रेल्वे – प्रताप अडसद
  18. अचलपूर – प्रवीण तायडे
  19. देवली – राजेश बकाने
  20. हिंगणघाट – समीर कुणावार
  21. वर्धा – पंकज भोयर
  22. हिंगना – समीर मेघे
  23. नागपूर दक्षिण – मोहन माते
  24. नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे
  25. तिरोरा – विजय रहांगडाले
  26. गोंदिया – विनोद अग्रवाल
  27. अमगांव – संजय पुरम
  28. आर्मोली – कृष्णा गजबे
  29. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
  30. चिमूर – बंटी भांगडिया
  31. वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार
  32. रालेगाव – अशोक उडके
  33. यवतमाळ – मदन येरवर
  34. किनवट – भीमराव केरम
  35. भोकर – श्रीजया चव्हाण
  36. नायगाव – राजेश पवार
  37. मुखेड – तुषार राठोड
  38. हिंगोली – तानाजी मुटकुले
  39. जिंतूर – मेघना बोर्डीकर
  40. परतूर – बबनराव लोणीकर
  41. बदनापूर -नारायण कुचे
  42. भोकरदन -संतोष दानवे
  43. फुलंब्री – अनुराधा चव्हाण
  44. औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
  45. गंगापूर – प्रशांत बंब
  46. बगलान – दिलीप बोरसे
  47. चंदवड – राहुल अहेर
  48. नाशिक पुर्व – राहुल ढिकाले
  49. नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे
  50. नालासोपारा – राजन नाईक
  51. भिवंडी पश्चिम – महेश चौघुले
  52. मुरबाड – किसन कथोरे
  53. कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड
  54. डोंबिवली – रवींद्र चव्हाण
  55. ठाणे – संजय केळकर
  56. ऐरोली – गणेश नाईक
  57. बेलापूर – मंदा म्हात्रे
  58. दहिसर – मनीषा चौधरी
  59. मुलुंड – मिहिर कोटेचा
  60. कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर
  61. चारकोप – योगेश सागर
  62. मालाड पश्चिम – विनोद शेलार
  63. गोरेगाव – विद्या ठाकूर
  64. अंधेरी पश्चिम – अमित साटम
  65. विले पार्ले – पराग अलवणी
  66. घाटकोपर पश्चिम – राम कदम
  67. वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
  68. सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
  69. वडाळा – कालिदास कोळंबकर
  70. मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
  71. कुलाबा – राहुल नार्वेकर
  72. पनवेल – प्रशांत ठाकूर
  73. उरन – महेश बाल्दी
  74. दौंड- राहुल कुल
  75. चिंचवड – शंकर जगताप
  76. भोसली -महेश लांडगे
  77. शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले
  78. कोथरुड – चंद्रकांत पाटील
  79. पर्वती – माधुरी मिसाळ
  80. शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
  81. शेवगाव – मोनिका राजले
  82. राहुरी शिवाजीराव कर्डिले
  83. श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
  84. कर्जत जामखेड – राम शिंदे
  85. केज – नमिता मुंदडा
  86. निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
  87. औसा – अभिमन्यू पवार
  88. तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील
  89. सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
  90. अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
  91. सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
  92. मान -जयकुमार गोरे
  93. कराड दक्षिण – अतुल भोसले
  94. सातारा – शिवेंद्रराजे भोसले
  95. कणकवली – नितेश राणे
  96. कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
  97. इचलकरंजी – राहुल आवाडे
  98. मिरज – सुरेश खाडे
  99. सांगली – सुधीर गाडगीळ

 

Loading

अभिमानास्पद! छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘गनिमीकावा’ जेएनयुच्या अभ्यासक्रमात

   Follow us on        
राज्यातील तमाम जनतेला अभिमान वाटावा अशी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. या द्वार अखंड भारताची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या – कुलगुरू प्रा. शांति श्री घुलीपूडी पंडित यांनी याबाबत माहिती दिली.
हा अभ्यासक्रम जेएनयू येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत सुरू केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रैटिजिक स्टडीज वा नावाने सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे.  या कोर्समध्ये इतर विषयांसह भारतीय सामरिक विचार, मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची नौदल रणनीती आणि गनिमी युद्ध शिकविण्यावर भर दिला जाईल. जेएनयूमध्ये मराठा ग्रँड स्ट्रॅटेजि, गुरिल्ला डिप्लोमसी, शिवाजी महाराजांच्या काळातील स्टेटक्राफ्ट आणि त्यानंतर स्टेटक्रापट इत्यादी सहा अभ्यासक्रम शिकवण्याचा प्रस्ताव आहे. या कोर्ससाठी पहिल्या पाच वर्षात सुमारे १५ ते ३५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो.
महाराष्ट्र सरकारकडून १० कोटींचा निधी
“आम्हाला भारतीय ज्ञान व्यवस्थेत बदल घडवून आणायचा होता आणि भारताच्या सुरक्षा आणि धोरणात्मक अभ्यासासाठी पर्यायी मॉडेल्स आणायचे होते. जेएनयुमधील सध्याचा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने पाश्चात्य अँग्लो-अमेरिकन मॉडेलचा आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, विशेषतः त्यांची नौदल शाखा, त्यांची नौदल युद्धाची संकल्पना आणि हिंदवी स्वराज या संकल्पनेचा नीट अभ्यास केलेला नाही. आम्हाला वाटले की यांचाही अभ्यास करायला हवा. महाराष्ट्र सरकारने या उपक्रमासाठी खूप उत्साह दाखवला आणि आम्हाला १० कोटी रुपयेही दिले. भारत बदलाच्या काळातून जात आहे आणि म्हणूनच आपला इतिहास आणि प्रतीके पुनर्मूल्यांकन करणे देखील महत्त्वाचे आहे. असं जेएनयूच्या प्राचार्या शातिश्री धुलीपुडी पंडित यांनी सांगितलं.

Loading

महत्वाचे: रेल्वे आरक्षण नियमांत १ नोव्हेंबर पासून होणार मोठा बदल

Indian Railway: भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांत एक मोठा बदल केला आहे. सध्या आगाऊ आरक्षण 120 दिवस आधी करता येते त्यात बदल करून ही मर्यादा 60 दिवसांवर आणण्यात आली आहे . म्हणजे आता रेल्वे आरक्षण फक्त 60 दिवस अगोदर करता येणार आहे. गुरुवारी (17 ऑक्टोबर 2024) रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता आगाऊ आरक्षणाची अंतिम मुदत कमी करण्यात आली आहे. यामुळे लोकांना आगाऊ तिकीट काढण्यासाठी कमी वेळ मिळेल.
रेल्वेने या अधिसूचनेत म्हटले आहे की 1 नोव्हेंबर 2024 पासून, ट्रेनमधील आगाऊ आरक्षणाची सध्याची वेळ मर्यादा 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी केली जाईल (प्रवासाची तारीख वगळता). तथापि, 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 120 दिवसांच्या ARP अंतर्गत केलेले सर्व बुकिंग कायम राहतील. हा नवा नियम नोव्हेंबरपासून केलेल्या बुकिंगवर लागू होणार आहे.
ताजसारख्या ट्रेनला नियम लागू होत नाहीत
ताजसारख्या दिवसा काही वेळा धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांच्या बाबतीत कोणताही बदल होणार नाही, असेही रेल्वेने म्हटले आहे. एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस इत्यादींमध्ये आगाऊ आरक्षणाची वेळ मर्यादा कमी आहे. याशिवाय विदेशी पर्यटकांसाठी ३६५ दिवसांच्या मर्यादेत कोणताही बदल होणार नाही.

Loading

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाघांच्या संख्येत वाढ

   Follow us on        

सिंधुदुर्ग: जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या जनगणनेत आठ वाघांची नोंद झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच विक्रमी ८ वाघांची नोंद झाली आहे. यात तीन नर आणि पाच मादींचा समावेश आहे. जानेवारी २०२४ ते मे २०२४ या कालावधीत वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत हे वाघ टिपण्यात आले आहेत.
सावंतवाडी व दोडामार्ग या दोन तालुक्यांत गेल्या काही महिन्यांपासून जनावरांवर मोठ्या प्रमाणात हल्ले वाढू लागले होते. त्यामुळे हे हल्ले वाघाकडूनच होत असल्याचे वनविभागाच्या लक्षात आले होते. तसेच काही ठिकाणी वाघ प्रत्यक्षात वन कर्मचाऱ्यांना दिसले.

सिंधुदुर्ग वनविभाग तसेच सह्याद्री टायगर रिझर्व्ह, फॉरेस्ट  डब्लू सी टी ही स्वयंसेवी संस्था अशा तिघांनी मिळून जानेवारी महिन्यात वाघांची जनगणना केली यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत जंगलातील प्रमुख ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यात सावंतवाडी पासून दोडामार्ग तालुक्यातील जंगलात तब्बल आठ वाघ आढळून आले. एवढे मोठ्याप्रमाणात वाघ दिसण्याचे सिंधुदुर्ग च्या इतिहासात प्रथमच घडले आहे.कारण २०१४ च्या जनगणेत वाघांची संख्या ही पाच होती तर २०१९ मध्ये हीच संख्या शून्य वर आली होती मात्र आता २०२४ मध्ये वाघांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.विशेष म्हणजे यात तीन नर व पाच मादीचा समावेश आहे.

 

Loading

Konkan Railway: मध्य रेल्वेचा शनिवार – रविवार ब्लॉक; कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘या’ गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

Konkan Railway: मध्य रेल्वेच्या मुंबई सीएसएमटी आणि मस्जिद स्थानकांदरम्यान रेल्वे रूळावरील पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले जाणार असून या कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या ब्लॉकचा परिणाम कोकण रेल्वे सेवेवर होणार आहे,तो खालील प्रमाणे

या गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन:

गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “जनशताब्दी” एक्सप्रेसचा दिनांक १२/१०/२०२४ आणि १३/१०/२०२४ रोजी सुरू होणारा प्रवास दादर येथे समाप्त होईल.

दिनांक १२/१०/२०२४ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक २०११२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “कोकणकन्या” एक्सप्रेसचा प्रवास पनवेल येथे समाप्त होईल.

दिनांक १२/१०/२०२४ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक २२१२० मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी “तेजस” एक्सप्रेसचा प्रवास दादर येथे समाप्त होईल.

या गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन : 

गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “जनशताब्दी” एक्सप्रेसचा दिनांक १३/१०/२०२४ प्रवास दादर येथून सुरू होणार आहे.

गाडी क्रमांक १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. मांडवी एक्सप्रेसचा दिनांक १३/१०/२०२४ प्रवास पनवेल स्थानकावरून सुरू करण्यात आहे.

Loading

पालघर येथील बेंचरेस्ट रायफल शुटींग स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद; ४०० हून जास्त खेळाडूंची उपस्थिती. 

   Follow us on        

पालघर: राज्यात मोठ्याप्रमाणावर नेमबाज तयार करण्याच्या ध्येय्याने प्रेरीत झालेल्या अनेक मातब्बर नेमबाजांसह प्रेसीहोल कंपनीने ऑलंपिक धर्तीवर आयोजीत राज्य स्तरीय बेंचरेस्ट रायफल शुटींग स्पर्धा पालघर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मोनल कारदानी यांनी प्रथम तर राल्सन सिइल्हो द्वितीय तर विनय पाणीग्रही यांनी तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले. तर रत्नागिरीच्या पुष्कराज इंगवले रायफल शुटींग स्पोर्टस अकॅडमीच्या किमया जाधवला यंगेस्ट शुटर ॲवॉर्ड देवून गौरविण्यात आले.

पालघर येथील समीर पाटील रायफल शुटींग अकॅडमीच्या भव्य आधुनिक मैदानात आयोजित या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून सुमारे ४०० हून अधिक खेळाडू उपस्थित होते. त्यामुळे मैदानाला मिनी ऑलंपिकचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत होते.

जगभरात तब्बल ६७ पेक्षा अधिक देशांमध्ये बेंचरेस्ट रायफल शुटींग खेळले जाते. तसेच आगामी काही वर्षात ऑलंपिकमध्ये या खेळाची वर्णी लागण्याची शक्यता जेष्ठ नेमबाज व टायरो कंपनीचे राजीव ठाकूर यांनी व्यक्त केली .यावेळी प्रेसीहोल कंपनीचे मालक डॉ .श्री. वाय पी. तथा योगेंद्र शिरसाट व अंजूम काझी यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना नियम पाळा ,खेळा आणि जिंका असा सल्ला दिला. दरम्यान बॉलीवुडचे जेष्ठ विनोदवीर टिकू तलसानिया यांनी देखील स्पर्धक म्हणून हजेरी लावल्याने उपस्थितांना आणखी प्रेरणा मिळाली. राज्यसरकारने याकडे लक्ष पुरविल्यास महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल अस उद्गार त्यांनी यावेळी काढले. सदर स्पर्धेत वयाने सर्वात कमी असलेल्या यंगेस्ट शुटर ठरलेल्या किमयाचे प्रेसीहोल्सच्या अंजूम काझी व जेष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांनी विशेष अभिनंदन केले. यावेळी जेष्ठ राष्ट्रीय नेमबाज पुष्कराज इंगवले , एज्युकेशन ॲण्ड स्पोर्टस प्रमोशन फाऊंडेशनचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष व स्काऊट मास्टर ॲड . प्रशांत जाधव , ठाणेचे प्रथितयश नेमबाज मनिष कर्णिक , एसपीएसएसए पालघर चे सर्वेसर्वा समीर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search