Category Archives: महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत महत्वाचे बदल.

   Follow us on        

Ladki bahin Yojna: महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या काही अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना फक्त गरजवंत महिलांना पोहोचावी यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा तपशील खालीलप्रमाणे

● नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे.

● दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई- केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच पुढील लाभ दिला जाणार.

● या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे ही अट असली तरी त्याचे उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून आयकर दाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यातून अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे.

● अन्य मार्गांनीही एखाद्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना अपात्र करण्यात येणार आहे. या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे.

● अशा लाभार्थ्यांची जिल्हास्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाकड्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येईल.

कोकण रेल्वेच्या रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेला २५ वर्षे पूर्ण; आता थेट सेवा मिळणार

RORO Service on Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) तर्फे देण्यात येत असलेल्या रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन १९९९ रोजी ही सेवा सुरु करण्यात आली  होती. कोलाड -वेर्णा-  सुरतकल दरम्यान ही सेवा देण्यात येत आहे. या सेवेच्या विपणन आणि संचालनासाठी मेसर्स अंजना ट्रेड आणि एजन्सीला दिलेला आऊटसोर्सिंग करार १४/०२/२०२५ रोजी संपुष्टात आला असल्याने आता ट्रक वाहतूक व्यायसायिकांनी  थेट कोकण रेल्वे च्या कोलाड आणि सुरथकल स्थानकांवरील बुकिंग कार्यालयांशी संपर्क साधावा असे आव्हान कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
 रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सुविधा म्हणजे दूसरे तिसरे कांही नसून रेल्वेच्या ओपन फ्लॕट वॕगन्सवर (ज्याला रेल्वेत BNR वॕगन्स म्हणतात) मालाने भरलेल्या ट्रक्सची रोड ऐवजी मालगाडीवरून एका गावापासून दूस-या गावी केलेली वाहतूक होय. या सेवा मुंबई(कोलाड)-गोवा(वेर्णा) अशी ४१७ किमी तर मुंबई(कोलाड)-सूरतकल(कर्नाटक) 721 किमी या मार्गावर सुरू आहे. वरील अंतर रोडमार्गे अनुक्रमे २४ तास व ४० तास घेते. पण RORO मुळे ते अंतर अनुक्रमे १२ ते २२ तासात कापले जाते.

रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेचे फायदे 

या योजनेमुळे केन्द्र सरकारच्या ‘Operation Green’ ला चांगलाच फायदा होत आहे. डिझेलची मोठ्या प्रमाणावर बचत होते  व सरकारचे इम्पोर्ट बिलही कमी होते  त्यामुळे देशातून डाॕलर्सचा बाहेर जाणारा प्रवाह थांबतो. जलद वाहतूक झाल्याने वेळेचा अपव्यय टळतो. रस्त्यावर होणारे ट्रॅफिक कमी होण्यास मदत होते आणि प्रदूषणही कमी  होते. ट्रक चालकांना लांबच्या ड्रायविंगचा त्रास व होणारा टोल, आदिचा खर्चही वाचतो. ट्रकच्या टायर व इंजनचा वापर कमी झाल्याने त्याचा घसारा कमी होतो .अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. या सेवेमुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात सुद्धा मोठी भर पडली आहे.

या सेवेचे दर खालीलप्रमाणे

सिंधुदुर्ग: पंढरपूरला वारीला गेलेल्या वृद्ध महिलेचे आकस्मिक निधन

   Follow us on        
सिंधुदुर्ग: माघी वारीला पंढरपूरला गेलेल्या ज्येष्ठ महिलेचे काल शनिवारी हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले.  सौ.  जयश्री सखाराम राऊळ  असे नाव त्या महिलेचे नाव असून त्या सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले- गावठणवाडी येथील रहिवाशी होत्या. त्यांचे वय ६९ वर्षे होते.
रविवारी पहाटे तीन वाजता त्यांचे पार्थिव पंढरपूर येथून वेर्ले गावी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. रविवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी सैनिक सखाराम राऊळ यांच्या त्या पत्नी तर रिक्षाचालक विजय राऊळ, बँकिंग क्षेत्रातील सिसको कंपनीचे वाहन चालक पपू राऊळ यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
 

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर धावणार गोवा सरकारच्या ‘महाकुंभमेळा विशेष’ गाड्या

   Follow us on        

गोवा: गोवेकरांना कुंभमेळ्यात सहभागी होता यावे यासाठी गोवा सरकारने विशेष रेल्वेसेवेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा या योजनेअंतर्गत ही घोषणा करण्यात आली असून समाजकल्याणमंत्री सुभाष देसाई यांनी मडगावहून प्रयागराजला जाण्यासाठी तीन रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकाची माहिती माध्यमांना दिली.

 

पहिली ट्रेन

6 फेब्रुवारी : मडगाववरून सकाळी 8 वाजता सुटणार

10 फेब्रुवारी : प्रयागराजवरून संध्याकाळी 4:30 वाजता सुटणार

 

दुसरी ट्रेन

13 फेब्रुवारी : मडगाववरून संध्याकाळी 4:40 वाजता सुटणार

18 फेब्रुवारी : प्रयागराजवरून सकाळी 11:50 वाजता सुटणार

 

तिसरी ट्रेन

21 फेब्रुवारी : मडगाववरून रात्री 7:40 वाजता सुटणार

26 फेब्रुवारी : प्रयागराजवरून सकाळी 10.30 वाजता सुटणार

 

या ट्रेनला थिवी आणि करमाळी अशा दोन ठिकाणी थांबा आहे.

विशेष सेवा फक्त गोव्यातील नागरिकांना

या गाड्या गोवा सरकारने फक्त गोव्यातील नागरिकांसाठी चालविल्या असून या गाड्यांचे आरक्षण रेल्वे तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असणार नाही. प्रथम येणाऱ्या प्राधान्य या निकषानुसार भाविकांना या गाड्यांचे तिकीट मिळेल, अशी माहिती गोवा सरकारने दिली आहे. तिकीट बूकिंग साठी भाविकांनी 0832-2232257 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

त्यामुळे या गाड्या जरी कोकण रेल्वे मार्गे जात असल्या तरीही महाराष्ट्रातील भाविकांना या गाडीचा फायदा होणार नाही.

Konkan Railway | “… तर रात्रीची दिवा – सावंतवाडी गाडी चालविणे शक्य.”

   Follow us on        

वाचकांचे व्यासपीठ: सावंतवाडीहून दिव्याला आलेली गाडी सकाळपर्यंत स्लाइडिंगला उभी करून ठेवण्यात येते. तसे न करता हीच गाडी पुन्हा रात्री दहा वाजता सावंतवाडी करता सोडण्यात यावी.

दुसर्‍या बाजूने दिव्याहून सकाळी मडगावसाठी निघालेली गाडी रात्रभर मडगाव स्थानकावर उभी करून ठेवण्यात येते. तीच गाडी रात्री मुंबईसाठी सोडल्यास दोन्ही बाजूने रात्रीची सेवा उपलब्ध होईल. रेल्वे प्रशासनाने याबद्दल तांत्रिक बाबींचा विचार करावा आणि रात्रीची दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.

पनवेल स्थानकावरील राखीव जनरल डबे पूर्ववत करावेत

मुंबई उपनगरातील शेवटचे रेल्वे स्टेशन पनवेल असून प्रवाशांची वर्दळ असणारे शेवटचे स्थानक आहे. या स्टेशन वरती पनवेल, उलवा, उरण ,अलिबाग, पेण , मानखुर्द ,गोवंडी, चेंबूर कोपरखैरणे, वाशी, बेलापूर नवी मुंबई परिसरातील लोक शेवटची कोकण कन्या किंवा तुतारी गाडी पकडून कोकणात जाण्यासाठी येतात. पूर्वी येथे कोकणकन्या, तुतारी एक्सप्रेस ईत्यादी गाड्यांचा एक जनरल डबा राखीव असायचा, मात्र ती सोय बंद केल्याने येथील प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

कोकणातील आमदार खासदारांनी यात लक्ष घालून तो डबा पूर्ववत पनवेलला सुरू करावा जेणेकरून उपनगरातील व शेवटचे जंक्शन स्टेशन असलेले पनवेल रेल्वे स्टेशनला स्वतंत्र जनरल डबा उपलब्ध होईल.

सुरेन्द्र हरिश्चंद्र नेमळेकर

संस्थापक सदस्य कोकण रेल्वे

मोठी बातमी: सरकारी कार्यालयात मराठी भाषा अनिवार्य; तसा फलक लावणे बंधनकारक

   Follow us on        

मुंबई: मराठी भाषा बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात सर्वत्र मराठी फलक असणार आहेत. तसेच मराठी भाषेचा वापर करण्यास नकार दिल्यास शिस्त भंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

मराठी भाषेला अलिकडेच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेचे महत्व टीकविण्यासाठी मराठी बोलणे आणि मराठीत व्यवहार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने मराठी भाषेचे संवधर्न करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्राच्या सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयात मराठी बोलणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारी कार्यालयात दर्शनी भागात मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावण्याचे बंधन करण्यात येणार आहे.

शिस्तभंगाची कारवाई होणार

मराठी भाषा बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलक लावावा लागणार आहेत. शासकीय कार्यालयांतील संगणकावरील कळफलक देखील मराठी भाषेतच असणार आहेत. मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ अनुसार सर्व शासकीय कार्यालयांतील मूळ प्रस्ताव, सर्व पत्रव्यवहार, टिप्पण्या, आदेश, संदेशवहन मराठीतच असतील आणि कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणे आणि संकेतस्थळे मराठीत असतील याची काळजी घेण्याचे आदेश राज्य सरकारने पारित केले आहे. मराठी भाषा धोरणाच्या जिल्हा स्तरावरील अंमलबजावणीचे काम जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीकडे सोपवण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या कार्यालयातील फलक मराठी

केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये आणि सर्व बँका इत्यादींमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारे सूचनाफलक, अधिकाऱ्यांचे नामफलक, अर्ज नमुने मराठीतून असणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासकीय आणि निमशासकीय आस्थापनांची तसेच महामंडळे, मंडळे, शासन अंगीकृत उपक्रम, कंपन्या यांची शासनाने (मंत्रिमंडळाने) निश्चित केलेली मराठी नावेच आस्थापनांच्या कामकाजात वापरली जातील. नवीन नावे निश्चित करताना मराठीतील एकच नाव निश्चित केले जाईल. त्याचे इंग्रजीत भाषांतर न करता रोमन लिपीत केवळ त्याचे रुपांतर करण्यात येईल. ज्या आस्थापनांना द्विभाषिक नावे आहेत त्यांचा कारभार यापुढे मराठी नावाने होईल असे सरकारने म्हटले आहे.

Union Budget 2025: महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात आतापर्यंतची सर्वात मोठी तरतूद

   Follow us on        

मुंबई :- महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २३ हजार ७७८ कोटी रुपयांची तरतूद केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

यापूर्वी २००९-१४ या काळात महाराष्ट्राला वर्षाला सरासरी १ हजार १८१ कोटी रुपये मिळायचे. यंदा एकाच वर्षातील तरतूद ही तब्बल २० पटींनी अधिक आहे. २०१४ ते २०२५ या दरम्यान राज्यात दरवर्षी सरासरी १९१ किलोमीटर्सचे नवे रेल्वे मार्ग विकसित केले गेले आहेत. हे प्रमाण यापूर्वीच केवळ दरवर्षी सरासरी ५८ किलोमीटर इतके होते. २००९-१४ या कालावधीत एकाही मार्गाचे विद्युतीकरण झाले नव्हते. त्यानंतर २०१४ ते २०२५ या काळात दरवर्षी सरासरी ३२६ किलोमीटर्स मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले यामुळे महाराष्ट्रातील ३ हजार ५८६ म्हणजेच पूर्णपणे विद्युतीकरण झाले आहे.याच कालावधीत महाराष्ट्रात २ हजार १०५ किलो मीटर्सचे नवे रेल्वे मार्ग बांधण्यात आले. तुलनाच करायची झाल्यास ही लांबी मलेशियातील आता अस्तित्वात असलेल्या संपूर्ण रेल्वे मार्गाच्या लांबी इतकी होते.

महाराष्ट्रात सध्या १ लाख ५८ हजार ८६६ कोटी रूपयांचे ४७ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. यातून ६ हजार ९८५ किलोमीटर मार्गाची बांधणी सुरू आहे. यामध्ये बुलेट ट्रेनसह केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या ‘डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर- डिएफसी’ चार महत्वाकांक्षी प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यात ५ हजार ५८७ कोटी रुपयांच्या तरतुदीतून १३२ अमृत रेल्वेस्थानकांची निर्मिती केली जात आहे.

रेल्वेची कवच सुरक्षा प्रणाली ४ हजार ३३९ मार्ग अंतरासाठी कार्यान्वीत केली जाणार आहे. यातील सध्या ५७६ किमीसाठीची यंत्रणा कार्यान्वीत आहे. राज्यभरात २०१४ पासून आतापर्यंत विविध ठिकाणी १ हजार ६२ रेल्वे उड्डाण मार्ग, भुयारी मार्ग (आरएफओबी, आरयुबी) बांधण्यात आली आहेत. याशिवाय २३६ ठिकाणी लिफ्ट, ३०२ एस्कलेटर्स बसविण्यात आले आहेत. तसेच ५६६ रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा उपलब्ध दिली आहे. याशिवाय राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी उपयुक्त ठरतील अशा ११ वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या वाटचालीत रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व अशी वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांकरिता सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. माल वाहतूक सुविधा सहज सुलभ आणि मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. या सगळ्यातून महाराष्ट्र हे रेल्वेच्या नकाशावरील सशक्त आणि सदृढ राज्य बनले आहे.

मुंबई परिवहन मंत्र्यांचा कर्नाटक दौरा; महाराष्ट्रात कर्नाटक परिवहन विभागाचा पॅटर्न राबविण्याची शक्यता

   Follow us on        

मुंबई : कर्नाटकमधील परिवहन महामंडळ प्रवाशांना देत असलेल्या लांब पल्ल्याच्या उत्तम सेवेसाठी ओळखले जाते. कर्नाटक परिवहन सेवेतर्फे चालवण्यात येणाऱ्या ‘गरुडा’, ‘ऐरावत’, ‘अंबारी’ आदी लांबपल्ल्याच्या सेवा प्रवासीभिमुख ठरल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक परिवहन विभागाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कर्नाटकात दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. लवकरच कर्नाटक परिवहन विभागाचा पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्यात येण्याची शक्यता आहे.

इतर राज्यातील चांगल्या गोष्टींना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा. जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक १ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या दौऱ्यावर गेले होते . या दोन दिवसीय दौऱ्यात ते कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेची माहिती घेतली. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र) हे अधिकारी होते.

या दौऱ्यात त्यांनी बंगळुरू येथे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांच्या “ऐरावत”, “अंबारी”, “राजहंस”, तसेच “कर्नाटक सर्वोदय”, “कर्नाटक सिरीगंधा” या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या बस सेवेचा अभ्यास केला.

”कर्नाटक परिवहन सेवेतील आधुनिक तंत्रज्ञान, प्रादेशिक व्यवस्थापन, प्रवाशांसाठीच्या उत्कृष्ट सोयी-सुविधा, जसे की वायफाय, ई-तिकीट, ऑनलाईन बुकिंग, आणि युरिनल सारख्या सेवांचा समावेश प्रभावी वाटला. ही सेवा खासगी बसेसच्या तुलनेत सुरक्षित व वेळेवर असल्याने प्रवाशांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनानुसार, इतर राज्यांतील यशस्वी योजना महाराष्ट्रात राबवण्याचा विचार आहे. कर्नाटक परिवहन सेवेतील आदर्श कल्पना आपल्या एसटी महामंडळासाठी उपयोगी ठरतील यासाठी सकारात्मक पाऊल उचलणार आहे.”

प्रताप सरनाईक

परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य

 

 

ST Bus Fare Hike: मुंबई-पुण्यातून कोकणात एसटीने जाण्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार?

   Follow us on        

ST Fare Hike:हकिम  समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये  १४.९५  टक्के वाढ केल्यामुळे एसटी प्रवास आता महागला आहे. भाडेवाढ दिनांक २५ जानेवारीपासून एसटीच्या  गाडयांना लागू करण्या आली आहे. ही भाडेवाढ खालीलप्रमाणे आहे. 

अशी आहे भाडेवाढ

  • सेवेचा प्रकार :  साधी बस – सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,
  • जलद सेवा (साधारण) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.
  • रात्र सेवा (साधारण बस) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.
  • निम आराम : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.
  • विनावातानुकूलीत शयन आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.
  • विनावातानुकूलीत शयनयान : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.७५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.
  • शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.२० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.
  • जनशिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२.९५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १४.९० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.
  • शिवशाही स्लिपर (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.
  • शिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १८.५० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २३ रुपये.
  • शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. २२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २८ रुपये,
  • ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १३.८० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये,
  • ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६  कि.मी. १३.२० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५  पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी  प्रवास भाडेदर १५.१५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

मुंबई पुण्यातून कोकणात जाण्यासाठी उपलब्ध असेलल्या काही सेवांचे सुधारित भाडे

प्रवास साधी सेवा सेमी लक्झरी शिवशाही सामान्य स्लीपर
पुणे ते सावंतवाडी ६५३ ९४८ ९६७
पुणे ते कणकवली ६०९ ८२५ ९०३ ८९१
पुणे ते रत्नागिरी ५३९ ७९९
पुणे ते चिपळूण ४२८ ६३६ ५७९
कोल्हापूर ते सावंतवाडी २५१ ४०२
कोल्हापूर ते कणकवली २०७ २७९
कोल्हापूर ते रत्नागिरी २३७
कोल्हापूर ते चिपळूण २८७
मुंबई ते खेड ३९८ ५३८
मुंबई ते चिपळूण ४५८ ६२० ६२०
मुंबई ते दापोली ३९८ ५३८
बोरिवली ते रत्नागिरी ६३९
मुंबई ते कणकवली ७५० ११५६
मुंबई ते मालवण १२६०
बोरिवली ते महाड ५०२

खेड | क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे सातवे राज्यस्तरीय कुलसंमेलन यंदा खेडमधील जामगे गावात ….

   Follow us on        

खेड: महाराष्ट्रातील प्राचीन कदम घराण्याचे सातवे भव्य राज्यस्तरीय कुलसंमेलन यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील जामगे ( खेड ) येथे शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार ८ फेब्रुवारी व रविवार ९ फेब्रुवारी यादिवशी आयोजित करण्यात आले आहे.

प्राचीन सत्ताधीश कदंब राजवंशाचा इतिहास लाभलेल्या कदम कुटुंबीयांना स्वतःचे कुलाचार, परंपरा , वारसा याबद्दल माहिती व्हावी, नोकरी व्यवसायात एकमेकांना सहकार्य मिळावे तसेच घराण्यातील नामवंतांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून क्षत्रिय मराठा कदम परिवार संस्थेने आजतागायत तुळजापूर, गिरवी ( फलटण ), गढीताम्हाणे ( सिंधुदुर्ग) , गलांडवाडी ( दौंड) , धामदरी ( नांदेड) , आणि आंबेचिंचोली( पंढरपूर) याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहेत. या वर्षाचे सातवे राज्यस्तरीय वार्षिक कुलसंमेलन कोकणातील खेडजवळच्या जामगे या गावामध्ये ८ व ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या कुलसंमेलनासाठी विद्यमान गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम यांचे मूळगावामध्ये महाराष्ट्रासह गोवा , मध्यप्रदेश, कर्नाटक , बडोदा या राज्यातूनही कदम बांधव उपस्थित राहणार आहेत.

नोकरी, व्यवसाया निमित्त अनेक गावात, शहरात वास्तव्यास असलेले कदम भाऊबंद कुलसंमेलना निमित्त एकत्र येणार असून, घराण्याचा जाज्वल्य वारसा जपण्याचा मानस मेळाव्यातून केला जाणार आहे. कुलसंमेलनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता कुलदेवता श्रीतुळजाभवानीच्या जागर गोंधळाने कार्यक्रमाची सुरूवात होणार आहे.तसेच मागील कुलसंमेलनाच्या छायाचित्रांचा स्लाईड शो दाखवला जाणार आहे.

कुलसंमेलनाच्या मुख्य दिवशी सकाळी जामगे गावचे ग्रामदैवत श्रीकोटेश्वरी मानाई देवीचे दर्शन आणि पूजन झाल्यानंतर कदंब राजवंशाचे ध्वजारोहण गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे हस्ते होणार आहे.त्यानंतर बदलापूर येथील सुप्रसिद्ध शस्त्रसंग्राहक सुनील कदम यांच्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

कदम कुलसंमेलनाचे उदघाटन शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या हस्ते झाल्यानंतर प्रा. डाॅ. सतीश कदम, उद्योजक मनोज कदम आणि चिपळूण येथील पराग कदम(अडरे) यांची कदम घराण्याचा इतिहास आणि सद्यस्थितीतील तरूणांना मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. मागील वर्षभरात ज्या ज्या कदम बंधू किंवा भगिनींनी उल्लेखनीय कार्य केले आहे अशा कर्तृत्ववान कदमांचा सन्मान सोहळा सुध्दा संपन्न होणार आहे. या कुलसंमेलनास सांगली लोकसभा खासदार विशाल पाटील (कदम), गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर (कदम) , पलूस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम, घाटकोपर पश्चिम मतदारसंघाचे आमदार राम कदम, नांदेडचे हदगाव विधानसभा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची उपस्थिती लाभणार आहे. कुलसंमेलनाचे निमंत्रक खेड पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत गंगाराम कदम असून, या राज्यस्तरीय कुलसंमेलनास सर्व कदम बंधूंनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्षत्रिय मराठा कदम परिवार महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमरराजे कदम, सचिव रामजी कदम, सल्लागार माऊलीशेठ कदम पाटील, कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखर कदम तसेच जामगे कदम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search