Category Archives: महाराष्ट्र

कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करावी या मागणीसाठी अखंड कोरे प्रवासी सेवा समितीचा पत्रव्यवहार

   Follow us on        
Konkan Railway Merger:कोकण रेल्वेचे विलीनीकरण, रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेत समाविष्ट करणे आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यासाठी अखंड कोरे प्रवासी सेवा समिती तर्फे प्रयत्न केले जात असून या मागणीचा/निवेदनाचा  एक ई-मेल समितीच्या वतीने समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी महाराष्ट्र राज्य सरकार, मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य आणि केंद्र सरकार मधील संबंधित लोकप्रतिनिधींना केला आहे.

या निवेदनात समिती म्हणते  

”मुंबई आणि मंगळुरु ही दोन बंदरे जोडण्याच्या दृष्टीने रोहा ते मंगळुरु दरम्यान नवीन ब्रॉडगेज मार्ग बांधण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्य शासनांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना १९९० मध्ये करण्यात आली. १५ वर्षांनंतर किंवा सर्व देणी देऊन झाल्यावर यांपैकी जे आधी होईल तेव्हा हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन होणे अपेक्षित होते. त्यानुसार वर्ष २००८-०९ मध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता असताना केंद्र शासनाने सर्व देणी देऊन झाल्यावरही हे महामंडळ स्वतंत्रच राहील असे प्रथम आर्थिक पुनर्रचना प्रस्तावात ठरवले (संदर्भ: रेल्वे बोर्डाचे दि. ०७.०१.२००९ चे पत्र क्र. 2007/PL/50/7). त्यानंतर सार्वजनिक उपक्रम विभाग (DPE)च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोकण रेल्वे महामंडळ Sick Company म्हणून गणले जाऊ नये याकरिता द्वितीय आर्थिक पुनर्रचना प्रस्तावात कोकण रेल्वेतील केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे ४०७९.५१ कोटींचे Non-Cumulative Redeemable Preference Shares (RPS) चे रूपांतर Compulsorily Convertible Non-Cumulative Preference Shares (CCPS) मध्ये करण्यात आले (संदर्भ: रेल्वे बोर्डाचे दि. २६.१२.२०१७ चे पत्र क्र. 2015/PL/50/9).

रोहा – वीर दुहेरीकरणानंतर दि. १६.०८.२०१६ ला रेल्वे बोर्डाने कोकण रेल्वेच्या १४७.६८ किमीच्या मार्गाच्या टप्पा दुहेरीकरणाच्या आणि २१ नवीन स्थानके बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन यासाठी लागणारा ४४६० कोटींचा निधी ५०% समभाग (Equity) आणि ५०% कर्जाच्या रूपात उभा करण्याचे ठरवले. दि. २६.०६.२०१८ ला रेल्वेच्या विस्तारित बोर्डाने (Expanded Board for Railways) या प्रकल्पाची किंमत ४९८० कोटी रुपयांपर्यंत वाढवली. नंतर हा प्रस्ताव कॅबिनेट समितीकडे व त्यांच्याकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. दि. १८.०६.२०१९ ला त्याविभागाने प्रस्तावाला मान्यता दिली व संबंधित राज्य शासनांकडून (महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ) निधी देण्याबद्दल लेखी हमीची मागणी केली. त्यात महाराष्ट्र ४९६.४६९ कोटी, गोवा १३५.४०१ कोटी, कर्नाटक ३३८.५०२ कोटी आणि केरळ १३५.४०१ कोटी असा आर्थिक सहभाग अपेक्षित होता.

कोकण रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना पत्र पाठवून आर्थिक सहभागाची हमी देण्याबाबत विनंती केली (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. ३० ऑगस्ट, २०१९ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Equity Infusion). राज्यांकडून निधी मिळण्यास उशीर झाल्यास एकूणच प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊन त्याचा परिणाम एकूणच प्रगतीवर होऊ नये याकरिता राज्यांनी तो निधी प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच एकरकमी देण्यासंदर्भात लेखी हमी मागितली. पूर्वीच्या पत्राला उत्तर न आल्यामुळे व केंद्रीय कॅबिनेटच्या नवीन सूचनांनुसार महाराष्ट्राकडून अपेक्षित असलेला ४९६.४६९६ कोटींचा निधी एकरकमी देणेबाबत कोकण रेल्वेने महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना सूचित केले (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. १३ सप्टेंबर, २०१९ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Equity Infusion).

त्यानंतर रेल्वे बोर्डाने या प्रस्तावात काहीसा बदल करून १४७.६८ ऐवजी १४१ किलोमीटर टप्पा दुहेरीकरण व २१ ऐवजी १८ नवीन स्थानकांचा ४५१३ कोटींचा सुधारित प्रस्ताव केला. राज्यांवर एकरकमी निधी देण्याचा ताण येऊ नये याकरिता राज्य शासनांनी पहिल्या वर्षी २०%, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी प्रत्येकी ४०% अशा तीन हप्त्यांमध्ये निधी द्यावा परंतु त्याबद्दल लेखी हमी देण्याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सूचित केले. त्यामुळे कोकण रेल्वेने पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना पत्र पाठवून निधीबाबत विचारणा केली (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. १६ एप्रिल, २०२१ चे पत्र क्र. CO/S/Bonds/State Correspondence).

वरीलपैकी एकही पत्राला महाराष्ट्र शासनाने किंवा परिवहन सचिवांनी उत्तर न दिल्यामुळे कोकण रेल्वेने महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री. मनू कुमार श्रीवास्तव (भा.प्र.से.) यांना महाराष्ट्राच्या ५७२.४४ कोटींच्या आर्थिक सहभागाबद्दल सहमती किंवा असहमती विचारण्याकरता पत्र पाठवले (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. २ डिसेंबर , २०२२ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Rights Issue). त्याच्या प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्राच्या तत्कालीन गृह (परिवहन) विभागाचे सह सचिव श्री. सिद्धार्थ खरात यांनी महाराष्ट्राच्या कोकण रेल्वेमध्ये असलेल्या आतापर्यंतच्या भागभांडवलावर किती लाभांश (Dividend) मिळाला व तो जर रु. ५७२.४४ कोटी किंवा त्याहून अधिक असेल आणि पुढील उपयोगाकरिता राखून ठेवला असेल तर तो सदर क्षमतावृद्धीच्या खर्चासाठी वापरण्यात येऊ शकेल का याबाबत विचारणा केली (संदर्भ: दि. १८ जानेवारी, २०२३ चे पत्र क्र. आरएलवाय-०४२२/प्र.क्र.११२/परि-५).

या सर्व प्रक्रियेत बराच कालावधी लोटल्यामुळे प्रकल्पाची किंमत ४३१९ कोटींवरून ५२०४ कोटींपर्यंत वाढली व यातून अपेक्षित परतावा १२.४३% वरून २.९५% पर्यंत कमी झाला. राज्य शासनांपैकी कर्नाटक राज्याने निधी देण्यास नकार दिला व इतर राज्यांनी वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही उत्तर न दिल्यामुळे संचालक (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) यांनी कोकण रेल्वेचा हा १४१ किलोमीटर टप्पा दुहेरीकरणाचा प्रस्ताव रद्द केल्याचे कळवले (संदर्भ: दि. २७.०२.२०२३ चे पत्र क्र. 2022/P/50/10). याकाळात महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ महायुती, २०१९ ते २०२२ महाविकास आघाडी व २०२२ ते २०२४ महायुतीचे शासन होते.

राज्य शासनांनी निधी देण्यास नकार दिल्यामुळे किंवा वेळेत उत्तर न दिल्यामुळे रेल्वेचा दुहेरीकरण प्रकल्प रद्द झाल्याचे देशातील हे एकमेव उदाहरण असावे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून भारतीय रेल्वेत आधुनिकीकरण व क्रांती सुरु असताना कोकण मात्र त्यापासून वंचित आहे. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेचा भाग नसून स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे हे घडते. केंद्रीय अर्थसंकल्पातून कोकण रेल्वेला निधी मिळत नाही. त्यांना पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी लागणाऱ्या निधीकरिता राज्य शासन व बाहेरील कर्जांवर अवलंबून राहावे लागते.

संपूर्ण देशात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अर्थसंकल्पातून रेल्वे विकास प्रकल्प सुरु असताना केवळ स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे कोकणाला त्याचा लाभ न देणे अन्यायकारक आहे. ६ ऑगस्ट, २०२३ ला आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केलेल्या अमृत भारत स्थानक योजनेत कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील (म्हणजेच महाराष्ट्रातील) एकाही स्थानकाचा समावेश नाही.

महाराष्ट्रातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या सावंतवाडी टर्मिनसचे कामही तत्कालीन रेल्वे मंत्री श्री. सुरेश प्रभू व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये भूमिपूजन करूनही अपूर्णच आहे. यालाही कोकण रेल्वेचे स्वतंत्र अस्तित्वच कारणीभूत आहे. २००८ मध्ये होणारे विलीनीकरण आज २०२४ पर्यंतही न झाल्यामुळे रेल्वे सुधारणांच्या बाबतीत कोकण आधीच १५ वर्षे मागे पडला असून आणखी उशीर झाल्यास आणखी बऱ्याच संधी हुकतील.

देशातील व्यस्त व जास्त प्रवासी घनता असलेल्या मार्गांचे High Density Network (HDN) किंवा Highly Utilized Network (HUN) असे वर्गीकरण केले जाते. या मार्गांच्या क्षमतावृद्धीसाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न केले जातात. यात दुहेरीकरण, तिहेरीकरण, चौपदरीकरण, गाड्यांचा वेग वाढवण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधांचे काम व इतर अनेक कामे केली जातात. परंतु, केवळ स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे १६८% वापर असूनही कोकण रेल्वे मार्गाचा यात समावेश झालेला नाही.

याचकरिता महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील सर्व समाजघटक कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांपैकी माजी खासदार श्री. विनायक राऊत, माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टी, खासदार श्री. सुनील तटकरे, खासदार व माजी केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे, खासदार श्री. रविंद्र वायकर, खासदार श्री. धैर्यशील पाटील तर कर्नाटकातील खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार कॅप्टन ब्रिजेश चोवटा यांनी व इतर बऱ्याच लोकप्रतिनिधींनीही ही मागणी लावून धरली आहे.

कोकण रेल्वेत सुरुवातीला केंद्र शासन ५१%, महाराष्ट्र २२%, कर्नाटक १५% तर गोवा व केरळ प्रत्येकी ६% आर्थिक भागीदार होते. आताच्या बदलांनुसार हे समभाग केंद्र शासन ६५.९७%, महाराष्ट्र १५.५७%, गोवा ३.५९%, कर्नाटक १०.६२% आणि केरळ ४.२५% या प्रमाणात आहेत. परंतु, सर्वात कमी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या दोन राज्यांनाच कोकण रेल्वेकडून सर्वाधिक गाड्या व सुविधा मिळाल्या आहेत. सर्वाधिक गुंतवणूक करून महाराष्ट्र व त्याखालोखाल कर्नाटक अजूनही पुरेशा रेल्वे सुविधांकरिता अजूनही संघर्ष करत आहेत.

कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याआधी ही कंपनी १००% मालकी हक्कांसहित केंद्र शासनाच्या अखत्यारित येणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित राज्य शासनांनी त्यांचे समभाग केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या स्वाधीन केले पाहिजेत असे खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी व खासदार श्री. धैर्यशील पाटील यांनी संसदेत विचारलेल्या प्रशांत उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

म्हणून, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्राकडून मान्यता मिळण्याकरिता आपण प्रयत्न करावेत. त्यासाठी गरज पडल्यास महाराष्ट्राच्या ताब्यात आता असलेले ३९६.५४२५ कोटी रुपयांचे समभाग कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला सुपूर्द करावेत. ते केल्यानंतर कोकण रेल्वे केंद्र शासनाच्या ताब्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम न राहता ताबडतोब भारतीय रेल्वेत विलीन केले जाईल याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून लेखी हमी घ्यावी.

दोन शासकीय विभागांतील समन्वय कठीण असून दोन रेल्वे विभागांसंबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी रेल्वे बोर्डाची मध्यस्थी आवश्यक ठरते. तर एकच विभाग असल्यास संबंधित महाव्यवस्थापक (General Manager) आपल्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेऊ शकतात. कोणत्याही विभागातील नागरिकांना आपल्या राज्याच्या राजधानीकडेच जास्त प्रवास करावा लागतो. त्यानुसार कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग (रोहा ते मडुरे मार्ग) मध्य रेल्वेत व कारवार विभाग (पेडणे ते ठोकूर मार्ग) नैऋत्य (दक्षिण पश्चिम) रेल्वे विभागात विलीन झाल्यासच स्थानिकांच्या मागण्या व्यवस्थित पूर्ण होऊ शकतील.

मुंबई, पुणे, भुसावळ व सोलापूर विभागांच्या माध्यमातून ७०% महाराष्ट्र मध्य रेल्वेच्या अखत्यारित असल्यामुळे कोकणही त्याच विभागाकडे असावा हेच प्रवासी हिताचे आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे एकाच विभागा अंतर्गत येतील व राज्यांतर्गत वाहतूक सुरळीत होईल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात सक्षम रेल्वे सुविधा पुरवणे मध्य रेल्वेला शक्य होईल. नांदेड विभाग मध्य रेल्वेकडे नसून दक्षिण मध्य रेल्वेकडे असल्यामुळे तेथून मुंबईला येणाऱ्या गाड्यांपेक्षा तेलंगणातील हैदराबादला जाण्यासाठी जास्त गाड्या आहेत.

कोकण रेल्वे स्वतंत्र झोन झाल्यास त्याचे मुख्यालय महाराष्ट्रातून बाहेर जाईल. हा महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा तोटा असेल. तसेच, स्वतंत्र झोनसाठी महाव्यवस्थापक आणि इतर प्रशासकीय पद निर्मिती तसेच नवीन मुख्यालयासाठी भूसंपादन व मुख्यालयाचे बांधकाम ही अत्यंत खर्चिक कामे आल्यामुळे विलीनीकरणास आणखी उशीर होईल. तसेच मुख्यालय महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे कोकण रेल्वेत आपला कोकण व महाराष्ट्र क्वचितच दिसेल. इतर सर्व रेल्वे झोन २००० ते ५००० किलोमीटर मार्गाचे असताना केवळ ७४१ किलोमीटरचा स्वतंत्र कोकण झोन तयार करणे व्यवहार्य नाही.

वरील सर्व बाबींचा व प्रवाशांच्या हिताचा विचार करता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेला व कारवार विभाग नैऋत्य रेल्वेला जोडण्यासाठी आपण आपल्या अधिकारात प्रयत्न करावेत, ही नम्र विनंती.

सध्याच्या विधानसभेच्या २०२४ ते २०२९ या कार्यकाळातच हा ऐतिहासिक निर्णय व्हावा अशी कोकणवासीयांची इच्छा आहे. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या स्थापनेकरिता आदरणीय श्री. मधू दंडवते, श्री. जॉर्ज फर्नांडिस व सर्व मुख्यमंत्र्यांची आजही आठवण काढली जाते त्याचप्रमाणे ज्यांच्या कार्यकाळात हे विलीनीकरण होईल त्यांचे नावही इतिहासात अजरामर होईल. आपण ही संधी गमावू नये, ही नम्र विनंती.” 

 

 

MSRTC: एसटीचा “आवडेल तेथे कोठेही प्रवास” महागला; सुधारित दर असे असतील

   Follow us on        
MSRTC: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नुकतीच एसटी बस दरात १५ टक्क्यांची वाढ केली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असतानाच आता एसटी महामंडळाच्या “आवडेल तेथे कोठेही प्रवास” या सवलत योजनेच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने आवडेल त्या ठिकाणी कोठेही प्रवास करण्यासाठी “आवडेल तेथे कोठेही प्रवास” ही सवलत योजना प्रवाशांसाठी MSRTC मार्फत राबविली जाते. या योजनेअंतर्गत 7 दिवस व 4 दिवस याप्रमाणे बसेच्या प्रकारानुसार तसेच आंतरराज्यांसह प्रवास सुविधा उपलब्ध करुन दिली जाते. या योजने अंतर्गत येणाऱ्या बससेवांचे प्रतिटप्पा दरात वाढ करण्यात आली आहे. नवीन टप्पा दरपत्रकाप्रमाणे देण्यात येणाऱ्या पासचे सुधारीत दर, अटी व शर्ती लागू करण्यास सक्षम प्राधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. हे दर १ फेब्रुवारी २०२५ पासून अंमलात येणार आहे.

पासचे सुधारित दर खालीलप्रमाणे

४ दिवसाच्या पासाचे मुल्य

वाहतूक सेवेचा प्रकार प्रौढ  मुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह 1814 910
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह 2533 1269
  १२ मीटर ई-बस ( ई-शिवाई ) 2861 1433

७ दिवसाच्या पासाचे मुल्य

वाहतूक सेवेचा प्रकार प्रौढ  मुले
साधी(साधी,जलद,रात्रसेवा,शहरी,व यशवंती(मिडी) आंतरराज्यसह 3171 1588
शिवशाही (आसनी) आंतरराज्यसह 4429 2217
  १२ मीटर ई-बस ( ई-शिवाई ) 5003 2504

दहावी बारावी परीक्षांना बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी; मंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्रालयाला पत्र

   Follow us on        

मुंबई – पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या बुरखा बंदीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. फडणवीस सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी परीक्षेला बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. राणेंनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून ज्या मुली बुरखा घालून परीक्षेला येतील त्यांना केंद्रावर प्रवेश देऊ नये असं म्हटलं आहे. राज्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना नितेश राणेंनी केलेल्या मागणीवर सरकार काय निर्णय घेते हे पाहणे गरजेचे आहे.

दहावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. त्याआधी मंत्री नितेश राणेंनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात म्हटलंय की, १० वी आणि १२ वी परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षा आहेत. या परीक्षेवर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. जर या परीक्षेत बुरखा घालून कुणी परीक्षा देत असेल तर संबंधित युवती इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा वापर करून परीक्षेत हेराफेरी आणि कॉपीचीही शक्यता नाकारता येत नाही. जर अशा घटना घडल्या तर अनेक समस्या निर्माण होतील म्हणुन परीक्षेला बुरखा घालून येणाऱ्यांवर बंदी आणावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

धक्कादायक! ठाण्यात तब्बल ८१ शाळा बेकायदेशीर; यादी ईथे वाचा

(File Photo)

   Follow us on        

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा सुरू असलेल्या ८१ शाळांची यादी पालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. यात एक मराठी, दोन हिंदी तर, ७८ इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दिवा परिसरात सर्वाधिक म्हणजे ५५ शाळा बेकायदा सुरू असल्याची बाब यादीतून समोर आली आहे. या शाळा तात्काळ बंद केल्या नाहीतर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई सुरू केलेली आहे.

ठाणे महापालिकेची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. वाढत्या नागरिकरणाबरोबरच शहरात बेकायदा शाळा सुरू करण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात सुरू झाले आहेत. अशा बेकायदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊन त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी पालिका प्रशासन गेल्या काही वर्षांपासून बेकायदा शाळांची यादी जाहीर करत आहे. यंदाही पालिकेने शहरातील बेकायदा शाळांची यादी जाहीर केली असून त्यानुसार संपुर्ण पालिका क्षेत्रात ८१ शाळा बेकायदा सुरू असल्याचे उघड झाले आहे.दिवा परिसरात ५५ बेकायदा शाळा असल्याचे समोर आले,या शाळा तात्काळ बंद करण्याचा आदेश. नाहीतर प्रशासकीय तसेच फौजदारी कारवाई सुरू केलेली आहे.

बेकायदेशीर शाळांची यादी

आरंभ इंग्लीश स्कूल, आगापे इंग्लिश स्कूल, नालंदा हिंदी विद्यालय, रेन्बो इंग्लिस स्कूल, सिम्बाॅयसेस हायस्कूल, जीवन इंग्लिश स्कूल, एम.एस इंग्लिश स्कूल, कुबेरेश्वर महादेव इंग्लिश स्कूल, आर.एल.पी हायस्कूल, आदर्श हायस्कूल, श्री. दत्तात्रय कृपा इंग्लिश स्कूल, एम.आर.पी इंग्लिश स्कूल, एस.एस. मेमोरियल इंग्लिश स्कूल, ओम साई इंग्लिश स्कूल, स्टार इंग्लिश हायस्कूल, श्री. विद्या ज्योती इंग्लिश स्कुल, केंब्रिज इंग्लिश स्कुल, पब्लिक इंग्लिश स्कूल, पब्लिक मराठी स्कूल, टिवकल स्टार इंग्लिश स्कूल, होली एंजल इंग्लिश स्कूल, आर्या गुरूकुल इंग्लिश स्कूल, सेंट सायमन हायस्कूल, शिवदिक्षा इंग्लिश स्कूल, श्री. राम कृष्णा इंग्लिश स्कूल, केंट व्हॅलो इंटरनॅशनल स्कूल, ब्रायटन इंटर नॅशनल इंग्लिश स्कूल, अक्षर इंग्लिश स्कूल, स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूल, यंग मास्टर्स इंग्लिश स्कूल, स्मार्ट इंटरनॅशनल स्कूल, एस.एम. ब्रिल्ऐट इंग्लिश स्कूल, न्यु माॅर्डन स्कूल, एस.डी.के इंग्लिश स्कूल, डाॅन बाॅस्को स्कूल, मदर टच, लिटील विंगस, आर.म. फाॅउंडेशन, कुबेरेश्वर महादेव, जिनियस, ऑरबिट इंग्लिश स्कूल, जागृती विद्यालय सेमी इंग्लिश स्कूल, नंदछाया विद्यानिकेतन, सेंट सिमाॅन हायस्कूल, अलाहादी मक्तब ॲँड पब्लिक स्कूल (इंग्रजी माध्यम), होलो ट्रोनेटो हायइंग्लिश स्कूल, एस.जी. इंग्लिश स्कूल, अलहिदाया पब्लिक स्कूल, ड्रिम वर्ल्ड इंग्लिश स्कूल, प्रभावती इंग्लिश स्कूल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, बुरहानी स्मार्ट चॅम्प, लिटील एंजल्स प्रायमरी स्कुल, आयेशा इंग्लिश प्रायमरी स्कूल, द कॅम्पेनियन हायस्कुल, इव्हा वर्ल्ड स्कूल, गुरूकूल ब्राईट ब्लर्ड स्कूल, खैबर इंग्लिश स्कूल, गौतम सिंघानिया स्कूल (घोडबंदर), झोरेज इंग्लिश ॲँड इस्लामिक स्कूल, अशरफी स्कूल, अल-हमद इंग्रजी स्कूल, ह्युमिनीटी पब्लिक स्कुल, आइशा इंग्लिश स्कूल, एम.एम. पब्लिक स्कूल, हसरा इंग्रजी ॲकेडमी अशी बेकायदा शाळाची यादी आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानकात प्रवासी संघटनेचे ‘रेल रोको’ आंदोलन पोलिसांनी रोखले…सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित…

बेलापूरच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या एकञित बैठकीत लवकरचं सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी पञ दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित…

… अन्यथा गनिमी काव्याने ‘रेल रोको’ करु ; प्रवासी संघटनेचा कोकण रेल्वे प्रशासनाला निर्वाणीचा इशारा…

   Follow us on        

सावंतवाडी: ९ वर्षे होऊन अपूर्ण अवस्थेत असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनससाठी आज प्रजासत्ताक दिनी कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी यांच्याकडून रेल रोको चे लक्षवेधी आंदोलन हाती घेण्यात आले होते, या आंदोलनासाठी सकाळी रेल्वे स्थानकात आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते, आंदोलनाची पार्श्वभूमी बघता रेल्वे सुरक्षा दल, पोलीस यांनी स्टेशन परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता,

यावेळी स्थानकाबाहेर बसलेल्या प्रवासी संघटनेच्या आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी कोकण रेल्वे चे क्षेत्रीय वाहतूक नियंत्रक श्री.शैलेश आंबर्डेकर आले असता, त्यांच्यावर संतप्त आंदोलकांनी प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी उपस्थित आंदोलकांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस मंजूर आहे की नाही ते सांगा, जर झाले असेल ते अद्याप अपुर्ण अवस्थेत का आहे..? वेळोवेळी आंदोलने, उपोषण करुनही का दखल घेतली जात नाही असे अनेक प्रश्न अधिकाऱ्यांना विचारण्यात आले.

 यावर ठोस लेखी लिहून देण्यात यावे अशी मागणी आंदोलकांनी केली, त्यानंतर श्री.आंबर्डेकर यांनी आंदोलकांना बेलापूर येथील उच्च स्तरीय अधिकारी व प्रवासी संघटना पदाधिकारी यांची बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्याचे लेखी पञ आंदोलकांना दिली, त्यानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करीत आहोत असे जाहीर केले.

यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी स्थानकाचे रखडलेल्या कामासाठी कोकण रेल्वेने निधीची तरतूद याच आर्थिक वर्षात करावी. नवीन प्लॅटफॉर्म किंवा टर्मिनस लूप लाईन चिपळूण स्थानकाचा धर्तीवर सावंतवाडी स्थानकात उभारावे. या स्थानकाचा समावेश केंद्राचा अमृत भारत स्थानक योजनेत करावा. या ठिकाणी शून्य आधारित काढून घेण्यात आलेल्या राजधानी, गरीब रथ एक्स्प्रेसचे थांबे पूर्ववत करावे. नव्याने मंगलोर एक्सप्रेस या गाडीला थांबा देण्यात यावा, रेल्वे स्थानकात ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस’ असा बोर्ड लावण्यात यावा अश्या मागण्या करण्यात आल्या.

अध्यक्ष ऍड.संदीप निंबाळकर, सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, मिलिंद देसाई, सुधीर राऊळ, रेल्वे प्रवासी संघटना सचिव मिहिर मठकर, जगदीश मांजरेकर, बाळासाहेब बोर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग राऊळ, पांडुरंग नाटेकर, संजय नाटेकर, गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघ मुंबईचे गणेश चव्हाण, शांताराम गावडे, उमाकांत वारंग, निरवडे सरपंच सुहानी गावडे, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, तेजस पोयेकर, सुभाष शिरसाट, उमेश कोरगावकर, रवी जाधव, विलास जाधव, उमाकांत वारंग, साईल नाईक, केतन गावडे, मेहुल रेडिझ, सचिन गावडे, अजित सातार्डेकर, सुहास पेडणेकर, भुषण मांजरेकर, संदीप राऊळ, सुदेश राऊळ, मनोहर पारकर, रिक्षा व्यावसायिक, रेल्वे प्रवासी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 

कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्ग विरोधात 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

   Follow us on        

कोल्हापूर: कोल्हापुरातील शक्तीपीठ महामार्गाबद्दल 15 ऑक्टोबर रोजी शासन आदेशाने येथील सहा तालुक्यातील महामार्गाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे संघर्ष समितीने कोल्हापुरामध्ये थांबा व पहा ही भूमिका घेतली.पण आमच्या शांत बसण्यामुळे आता शक्तिपीठ महामार्गाच्या बाजूने कंत्राटदारांच्याकडून सुपार्‍या फोडत व अफवा पसरवली जात आहे. महायुतीला मिळालेल्या पाचवी बहुमतानंतर तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आपले शब्द फिरवत आता महामार्ग भेटण्याचे आदेश दिले आहेत. प्रसंगी पोलिसांचेही सहकार्य घेत दंडुकशाही वापरण्याचा जणू फतवाच काढला आहे. पर्यावरण विभागाकडे मान्यतेसाठी प्रस्ताव दिला असला तरी पर्यावरण विभाग कोणताही ग्राम सर्वे न करता महामार्गास मंजुरी देत आहे. मागील आठवड्यात दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन मीटिंगमध्ये ठरलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर सहित इतर महामार्ग बाधित जिल्ह्यांमध्ये 24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. कोल्हापुरात देखील इतर जिल्ह्यांच्या आंदोलनाला समर्थन देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते २ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील महामार्ग रद्द अधिसूचनेमध्ये काही पळवाटा आहेत यावर जिल्हा प्रशासन व मंत्र्यांना जाब विचारला जाईल.

कोल्हापूर मधून जरी महामार्ग भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा आदेश काढला असला तरी नेमका महामार्ग कोठून व कसा नेणार याचे लेखी काही पुरावे मंत्रांच्याकडे नाहीत. त्यामुळे यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा प्रश्न कोल्हापुरातील शेतकऱ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे या आंदोलनातून अधिसूचना कोल्हापुरातील रद्द झाली आहे तर महामार्ग कसा जाणार आहे हे लेखी दाखवा याचा जाब विचारणार आहोत.

Jalgaon Railway Accident: आगीच्या अफवेने घेतला सात ते आठ जणांचा बळी

   Follow us on        

Jalgaon Railway Accident : नुसत्या एका आगीच्या अफवेने सात ते आठ प्रवाशांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज जळगावला घडला. मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीनं काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसनं त्यांना चिरडलं. या अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जळगावातील परांडा स्टेशनजवळ हा अपघात झाला.

मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसनं अचानक ब्रेक लावल्यानं त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे तिथे आग लागल्याचा काही प्रवाशांचा समज झाला. आग लागल्याच्या भीतीनं प्रवासी घाबरले. त्यांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन बंगळुरु एक्स्प्रेस येत होती. उड्या मारणारे प्रवासी बंगळरु एक्स्प्रेसच्या खाली चिरडले गेले. अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे प्रशासनाकडून मदत घेतली जात असून जखमींवर उपचार केले जात आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.

दावोसमध्ये महाराष्ट्र ‘Unstoppable’. आतापर्यंत झालेत 4 लाख 99 हजार 321 कोटींचे 20 सामंजस्य करार; यादी ईथे वाचा

   Follow us on        

Davos Parishad 2025: दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिल्झर्लंड दौऱ्यावर गेलेत. या परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक होत असून काल एकाच दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे एकूण 20 सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. गडचिरोली, पुणे, रत्नागिरी, नागपूर या भागांमध्ये विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. उद्या आणखी कंपन्यांमध्ये करार होण्याची शक्यता आहे.

आता पर्यंत झालेले सामंजस्य करार 

1) कल्याणी समूह:

क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही

गुंतवणूक : 5200 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : गडचिरोली

 

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 16,500 कोटी

रोजगार : 2450

कोणत्या भागात : रत्नागिरी

 

3) बालासोर अलॉय लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 17,000 कोटी

रोजगार : 3200

 

 

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 12,000 कोटी

रोजगार : 3500

कोणत्या भागात : पालघर

 

5) एबी इनबेव

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 750 कोटी

रोजगार : 35

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

6) जेएसडब्ल्यू समूह

क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स

गुंतवणूक : 3,00,000 कोटी

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : गडचिरोली

 

7) वारी एनर्जी

क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे

गुंतवणूक : 30,000 कोटी

रोजगार : 7500

कोणत्या भागात : नागपूर

 

8) टेम्बो

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 1000 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : रायगड

 

9) एल माँट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 2000 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : पुणे

 

10) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : एमएमआर

 

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी

क्षेत्र : डेटा सेंटर्स

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर

 

12) अवनी पॉवर बॅटरिज

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 10,521 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

13) जेन्सोल

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 4000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

14) बिसलरी इंटरनॅशनल

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 250 कोटी

रोजगार : 600

कोणत्या भागात : एमएमआर

 

15) एच टू ई पॉवर

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 10,750 कोटी

रोजगार : 1850

कोणत्या भागात : पुणे

 

16) झेड आर टू समूह

क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स

गुंतवणूक : 17,500 कोटी

रोजगार : 23,000

 

17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स

क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही

गुंतवणूक : 3500 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : पुणे

 

18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 8000 कोटी

रोजगार : 2000

 

19) बुक माय शो

क्षेत्र : करमणूक

गुंतवणूक : 1700 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर

 

20) वेल्स्पून

क्षेत्र : लॉजिस्टीक

गुंतवणूक : 8500 कोटी

रोजगार : 17,300

 

 

महत्वाचे: मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग उद्यापासून ‘या’ वेळे दरम्यान तीन दिवस बंद रहाणार

   Follow us on        

मुंबई: मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर डोंगरगाव/ कुसगांव येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बांधण्यात येणाऱ्या पुलाचे गर्डर्स बसविण्याचे काम सुरू आहे. या कारणाने दि. 22, 23 आणि 24 जानेवारी असे तीन दिवस दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक ण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान या महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे

या कालावधीत मुंबईकडून पुण्याकडे जाणारी पुणे वाहिनीवरील वाहतूक द्रुतगती मार्गाच्या किमी क्रमांक 54/700 वळवण ते वरसोली टोल नाका (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) येथून देहूरोड मार्गे पुण्याकडे वळविण्यात येणार आहे. वरील तिन्ही दिवस दुपारी 3 वाजल्यानंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीवरुन सोडण्यात येईल. तसेच या कालावधीत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरुन सुरू राहणार आहे. (Mumbai Pune Expressway)

द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. या कालावधीदरम्यान वाहनचालकांना काही अडचण असल्यास मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. 9822498224 या किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या अधिकार्‍यां तर्फे करण्यात आले आहे.

 

पालकमंत्री पद एवढे महत्वाचे कां?

   Follow us on        

विश्लेषण: महाराष्ट्र राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची नुकतीच घोषणा झाली. यादी निघाल्या नंतर काही मंत्र्यांकडून नाराजीचा सूर निघायला सुरुवात झाला. यावरून महायुतीतील सुद्धा घमासान सुरू झाले. हा वाद एवढा टोकाला गेला की दोन जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा निर्णय विद्यमान सरकारला स्थगित करावा लागला. पालकमंत्री पदासाठी एवढी मारामारी कशाला हा प्रश्न साहजिकच पडतो.

महाराष्ट्रातील राजकारणात पालकमंत्री पद अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे कारण या पदाच्या माध्यमातून राज्य सरकार स्थानिक प्रशासनावर थेट नियंत्रण ठेवते. पालकमंत्री हा जिल्ह्याचा मुख्य शासकीय प्रतिनिधी असतो आणि त्याला त्या जिल्ह्याच्या विकासाबाबत जबाबदारी असते.

प्रशासनिक नियंत्रण:
पालकमंत्री जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यकाळासाठी एक प्रमुख प्रशासनिक व्यक्ती म्हणून कार्य करतो.तो जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा अधिकारी,आणि इतर सरकारी विभागांच्या कामकाजावर देखरेख ठेवतो.

विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणी:
जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि योजनांच्या अंमलबजावणीला चालना देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे. यात ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, शिक्षण इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो.

राजकीय प्रभाव:
स्थानिक राजकारणात मोठा प्रभाव असलेला पालकमंत्री त्या जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर नियंत्रण ठेवतो, त्यामुळे त्याच्या समर्थनाच्या आधारावर शासकीय कामे व इतर निर्णय होतात.

कायदा व सुव्यवस्था:
पालकमंत्री हा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारीही घेतो. त्याच्या अधीन असलेल्या जिल्ह्यातील भागात शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याला विशेष अधिकार मिळतात.

जिल्ह्याच्या सर्व विकासात्मक आणि प्रशासकीय निर्णयांसाठी महत्त्वपूर्ण भूमिका:

कोणत्याही जिल्ह्यातील सरकारी योजनांचे निर्णय घेण्यास आणि त्या क्षेत्रातील आवश्यक निर्णय घेण्यास पालकमंत्री प्रमुख भूमिका निभावतो.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search