Category Archives: महाराष्ट्र

पवनार-पत्रादेवी द्रुतगती महामार्गाला कोल्हापुरच्या पाच तालुक्यातील शेतकर्‍यांचा ‘सशर्त’ पाठींबा

   Follow us on        

Shaktipeeth Expressway Updates:राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या पवनार पत्रादेवी (नागपूर – गोवा) महामार्गा संबधित एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, राधानगरी, आजरा, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील शेतकर्‍यांनी सशर्त पाठिंबा दर्शविला आहे. येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या 5 पट बाजारभाव मोबदल्याच्या बदल्यात पवनार पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाला पाठिंबा दर्शवला आहे.

प्रत्यक्षात भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी यापूर्वीच अधिकाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र दिले असून त्यांनी या तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी विशेष विकास पॅकेजची मागणी केली आहे.

पवनार – पत्रादेवी एक्स्प्रेस वे ८०२ किलोमीटर लांबीचा आहे. या द्रुतगती मार्गाला सहा लेन कॉरिडॉर आहेत. नागपूर आणि गोवा यांना जोडणारा नवीन द्रुतगती मार्ग हा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे.

Mumbai Local: दिवा-मुंब्रा-कळवा दरम्यान रेल्वे मार्गावर असलेली वळणे ठरत आहेत ‘मृत्यूचे सापळे’

   Follow us on        

ठाणे: दिवा मुंब्रा कळवा दरम्यान नव्याने टाकण्यात आलेल्या नवीन पाचव्या आणि सहाव्या अप आणि डाऊन जलद उपनगरीय रेल्वे मार्गावर असलेल्या वळणांमुळे या मार्गावरून जाणार्‍या लोकल गाड्या मोठे हेलकावे खात असल्याने अपघात होण्याच्या शक्यता कित्येक पटीने वाढली असून याबाबत अनेक प्रवाशांनी आवाज उठविला आहे.

दिवा मुंब्रा कळवा हा भाग अत्यंत गर्दीचा मानला जातो. सकाळी आणि संध्याकाळी पीक अवर्स मध्ये येथून जाणार्‍या गाड्यांत तर जीवघेणी गर्दी असते. दिवा मुंब्रा कळवा या नव्याने टाकलेल्या रूळांवर जलद गाड्या चालविल्या जात आहेत. या मार्गावर काही वळणे असून येथून जाताना गाड्या मोठ्या प्रमाणात हेलकावे खातात आणि एका बाजूने झुकत असतात. त्यामुळे गर्दीमुळे गाड्यांच्या दरवाजात उभे असलेले प्रवाशांवर भार येवून ते बाहेर फेकले जात आहेत. या कारणाने बरेच प्रवासी खाली पडून जखमी झाले आहेत तर काहींनी आपला जीवही गमावला आहे. गेल्या वर्षी ठाणे रेल्वे पोलीस स्थानकात एकूण ठाणे विभागात ६८ प्रवाशांनी अपघातात जीव गमावल्याची नोंद आहे. ठाणे रेल्वे पोलीस विभागात ठाणे, कळवा, दिवा, मुंब्रा आणि ऐरोली ही स्थानके समाविष्ट आहेत. कळवा, दिवा, मुंब्रा या स्थानकांदरम्यान जास्त अपघात झाल्याची नोंद आहे.

प्रवाशांनी याबाबत आवाज उठविला असून या मार्गाची पुन्हा तपासणी करावी आणि अपघाताला कारणीभूत असलेली वळणे काढून टाकावी अशी मागणी केली आहे.

प्रवासी काय म्हणतात?

मी अंबरनाथ ते दादर असा प्रवास नेहमी जलद गाडीने करतो. गाडी अंबरनाथवरुन सुटत असल्याने मला दरवाजात उभे राहण्याचा प्रश्न येत नाही. मात्र दिवा ते ठाणे दरम्यान गाडी खूप हेलकावे घेते. हे हेलकावे एवढे मोठे असतात की आधार न घेता प्रवासी नीट उभा राहू शकत नाही. यावरून दरवाजावर उभे असलेल्या प्रवाशांच्या स्थितीचा अंदाज येतो. – श्री. चिन्मय राणे, अंबरनाथ

प्रवासी संघटनेचे सदस्य सुभाष गुप्ता म्हणाले, “रेल्वे अपघात मॉनिटरिंग समितीने या समस्येवर चर्चा केली पाहिजे, ज्याने या प्रकरणाची चौकशी करून योग्य सुरक्षा व्यवस्था केली पाहिजे. पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या जोडणीनंतर ट्रॅक अपग्रेड केल्यापासून तक्रारी आहेत. ट्रॅक वळवल्यामुळे समस्या वाढली आहे. रेल्वेने संरेखनाची पुन्हा तपासणी करावी आणि काही अडचण आल्यास वेग मर्यादा घालावी.”

रेल्वे प्रशासन काय म्हणते?

रेल्वेला उपलब्ध झालेल्या जमिनीनुसार या मार्गाची रचना केलेली आहे. त्यामुळे काही ठिकाणी रेल्वे मार्गावर वळणे घ्यावी लागली आहेत. ही वळणे पूर्णपणे काढणे सध्या तरी शक्य नाही असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

 

 

 

 

संतापजनक! कर्नाटकात महाराष्ट्रातील एसटी बस चालकाच्या तोंडाला काळे फासत मारहाण

   Follow us on        

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पुणे- बेंगलोर महामार्गावरील चित्रदुर्ग इथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे . याठिकाणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसटीवर हल्ला करून चालकाला मारहाण केल्याची तसेच काळेही फासल्याची बातमी समोर आली आहे.

कर्नाटकमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे- बेंगलोर महामार्गावरील चित्रदुर्ग इथे हा धक्कादायक प्रकार घडला. याठिकाणी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रातील एसटीवर हल्ला केला, तसेच काळेही फासले.

कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येथे का अशी विचारणा करत मारहाणही केली. एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याने त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाने कोल्हापूरमध्ये आंदोलन सुरु केले आहे. तसेच राज्य सरकारनेही याप्रकरणाची दखल घेत कर्नाटकला जाणाऱ्या बसेस तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.

धक्कादायक! तारकर्ली समुद्र किनार्‍यावर पुण्याचे ३ युवक बुडाले; दोघांचा मृत्यू, एक अत्यवस्थ

   Follow us on        
सिंधुदुर्ग : तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या पुणे येथील दोन युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, तर गंभीर असलेल्या एका युवकावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज सकाळी ११.२० वाजण्याच्या दरम्यान तारकर्ली एमटीडीसी जवळील समुद्रात घडली.
याबाबतची माहिती अशी हवेली तालुक्यातील कुश संतोष गदरे (वय- २१), रोहन रामदास डोंबाळे (वय २०), आँकार अशोक भोसले (वय- २६), रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) शुभम सुनील सोनवणे (वय २२) सर्व रा. उरुळी देवाची पोलीस चौकीच्या मागे हडपसर ता. हवेली, जि. पुणे हे युवक तारकर्ली येथे पर्यटनासाठी आले होते. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळ लगतच्या समुद्रात हे युवक समुद्र स्नानासाठी पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. पर्यटक बुडत असल्याचे निदर्शनास येताच किनाऱ्यावरील स्थानिक आणि तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तत्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध घेण्यात आला. अखेर स्थानिकांकडून समुद्रात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. त्यांना तत्काळ किनाऱ्यावर आणल्यावर रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यात ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून अधिक उपचार करण्यासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचाव कार्यात समीर गोवेकर वैभव सावंत दत्तराज चव्हाण महेंद्र चव्हाण राजेश्वर वॉटर स्पोर्ट्स चे कर्मचारी सहभागी झाले होते या घटनेची माहिती येथील पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

”चुकीचा इतिहास दाखवला” | राजेशिर्के घराण्याचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा

   Follow us on        

पुणे: छावा सिनेमा पुन्हा एका वादात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चुकीचा इतिहास दाखवून आपल्या घराण्याची बदनामी केल्याचा आरोप राजेशिर्के घराण्याने या सिनेमाच्या दिग्दर्शकावर केला आहे.

छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कान्होजी आणि गणोजी राजेशिर्के यांना खलनायक केलं. त्यामुळे राजेशिर्के घराण्याची बदनामी झाली. ही बदनामी खपवून घेतली जाणार नाही. या चित्रपटातील हा मजकूर काढून टाकवा आणि पुन्हा प्रदर्शित करावा अन्यथा आम्ही सगळ्या शहरातून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करूअसा इशारा राजेशिर्के घराण्याने दिला आहे.

पुण्यात शिर्केंच्या वंशजांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा कादंबरीच्या प्रकाशकांना पुरावे दाखवण्याची नोटीस बजावली आहे. चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती. याबाबत आमचं मत विचारायला हवं होतं. पण, त्यांनी आमचा सल्ला घेतला नाही. दिग्दर्शक उतेकर यांनी उत्तर द्यावं अन्यथा महाराष्ट्रात त्यांना फिरु देणार नाही, असा इशारा दीपक शिर्के यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर या विषयावर राज्यभर आंदोलन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.

छावा सिनेमात संभाजी महाराज संगमेश्वर येथे असल्याची माहिती गणोजी आणि कान्होजी शिर्के औंरगजेबाला देतात. त्यानंतर संभाजी महाराजांना मोजक्या सैन्यसह मुघलांचं सैन्य संगमेश्वर येथे गाठतं. त्यानंतर संभाजी महाराजांना कैद करण्यात येतं आणि 40 दिवस अन्ववित अत्याचार करुन त्यांची हत्या करण्यात येते. दरम्यान, संभाजी महाराज मुघलांना सापडतात, याचा संपूर्ण कट गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून रचण्यात आला, असं छावा सिनेमात दाखवण्यात आलं आहे. याच प्रसंगावर राजेशिर्के घराण्याने आक्षेप नोंदवले असून त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मोठी बातमी! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या महिन्याचा हप्ता उद्यापासून येणार;अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

   Follow us on        

Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील फेब्रुवारीचा हप्ता उद्यापासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून (Finance Department) 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता

डिसेंबर अखेर 2 कोटी 46 लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर 2 कोटी 41 लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, ती साधारणपणे 4 लाख असेल अशी माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या 9 लाख होणार आहे. या कपातीमुळे राज्य सरकारच्या 945 कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे.

नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या 5 लाख महिला आहेत. या महिलांना लाडकी बहिण योजनेतील फक्त 500 रुपये मिळणार तर नमो शेतकरी योजनेतून 1000 रुपये मिळणार आहेत. दिव्यांग विभागातून लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून त्यांना वगळलं जाणार आहे. वाहनं असलेल्या अडीच लाख महिला आहेत त्यांना ही यातून वगळण्यात आलं आहे. सोबतच निकषात न बसणा-या अनेक महिला आहेत त्यांनी ही पैसे परत करायला सुरुवात केली आहे.

 

मालवणात उद्या छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ; असा असेल नवीन पुतळा

   Follow us on        

सिंधुदुर्ग: मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीचा पायाभरणी समारंभ शिवजयंती दिनी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री आणि रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे, माजी मंत्रीआ णि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांनी दिली आहे.

राजकोट किल्ल्यावर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा योद्ध्याच्या वेषभूषेतील ६० फुटी पुतळा येथे उभा करण्यात येत आहे. शिवरायांच्याहा तातील तलवार २३ फुटांची असून चबुतऱ्याची उंची ३ मीटर असेल. पुतळा मजबूत करण्यासाठी ३.७० मीटरचा पाया तयार करण्यात येत आहे. या पुतळ्याच्या कामासाठी ३१ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून असून पुतळ्याची जमिनीपासून एकूण उंची ९३ फुट असेल. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टील मध्ये बनवण्यात येत आहे. तर चबुतरा अन् पायाच्या कामासाठी एम ५० हे हायग्रीड काँक्रीट वापरण्यात येत असून, आयआयटी मुंबईकडून

पुतळ्याचे डिझाईन बनवण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची क्षमता तपासणी करण्यात येणार आहे. ताशी २०० किमी वाऱ्याच्या वेगातही पुतळ्याला हानी पोहोचणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांच्या नोयडा येथील कारखान्यात ब्रान्झ धातू मधील हा पुतळा बनवला जात असून राजकोट मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी यांच्या देखरेखीखाली पुतळ्याचा पाया आणि चबुतरा बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे.

 

…. शेवटी ‘तो’ चुकीच्या मराठीत लिहिलेला बॅनर बदलण्यात आला..

   Follow us on        

डोंबिवली: समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून आपला आवाज योग्य ठिकाणी पोहोचवून प्रशासनाकडून झालेल्या चुका सुधारता येतात हे डोंबिवली मध्ये एका नागरिकाने सिद्ध केले आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर पादचारी पूल आणि सरकत्या जिन्यासाठी काम चालू असल्याच्या सुचनेचा बॅनर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लावण्यात आला होता. मात्र या बॅनर वर लिहिण्यात आलेली मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आली होती. त्यात बर्‍याच चुका होत्या.

ही गोष्ट अनुजा धाकरस नावाच्या महिलेने ‘एक्स’ माध्यमावर दिनांक १० फेब्रुवारी रोजीला पोस्ट करून मध्य रेल्वे आणि संबधित आस्थापनांना टॅग केले.

”हे कोणतं मराठी आहे??? रेल्वेमध्ये मराठी भाषिकांचा एवढा तुटवडा असावा का की २ ओळींची सूचना सुद्धा धड मराठीत लिहू शकत नाहीत?” अशा शब्दात ही पोस्ट करण्यात आली होती.

रेल्वे प्रशासनाने या प्रकारची दखल घेतली आणि दोन दिवसांतच या जागी चुका दुरुस्त केलेला बॅनर लावला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत महत्वाचे बदल.

   Follow us on        

Ladki bahin Yojna: महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या काही अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना फक्त गरजवंत महिलांना पोहोचावी यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा तपशील खालीलप्रमाणे

● नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे.

● दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई- केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच पुढील लाभ दिला जाणार.

● या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे ही अट असली तरी त्याचे उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून आयकर दाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यातून अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे.

● अन्य मार्गांनीही एखाद्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना अपात्र करण्यात येणार आहे. या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे.

● अशा लाभार्थ्यांची जिल्हास्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाकड्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येईल.

कोकण रेल्वेच्या रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेला २५ वर्षे पूर्ण; आता थेट सेवा मिळणार

RORO Service on Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) तर्फे देण्यात येत असलेल्या रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन १९९९ रोजी ही सेवा सुरु करण्यात आली  होती. कोलाड -वेर्णा-  सुरतकल दरम्यान ही सेवा देण्यात येत आहे. या सेवेच्या विपणन आणि संचालनासाठी मेसर्स अंजना ट्रेड आणि एजन्सीला दिलेला आऊटसोर्सिंग करार १४/०२/२०२५ रोजी संपुष्टात आला असल्याने आता ट्रक वाहतूक व्यायसायिकांनी  थेट कोकण रेल्वे च्या कोलाड आणि सुरथकल स्थानकांवरील बुकिंग कार्यालयांशी संपर्क साधावा असे आव्हान कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
 रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सुविधा म्हणजे दूसरे तिसरे कांही नसून रेल्वेच्या ओपन फ्लॕट वॕगन्सवर (ज्याला रेल्वेत BNR वॕगन्स म्हणतात) मालाने भरलेल्या ट्रक्सची रोड ऐवजी मालगाडीवरून एका गावापासून दूस-या गावी केलेली वाहतूक होय. या सेवा मुंबई(कोलाड)-गोवा(वेर्णा) अशी ४१७ किमी तर मुंबई(कोलाड)-सूरतकल(कर्नाटक) 721 किमी या मार्गावर सुरू आहे. वरील अंतर रोडमार्गे अनुक्रमे २४ तास व ४० तास घेते. पण RORO मुळे ते अंतर अनुक्रमे १२ ते २२ तासात कापले जाते.

रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेचे फायदे 

या योजनेमुळे केन्द्र सरकारच्या ‘Operation Green’ ला चांगलाच फायदा होत आहे. डिझेलची मोठ्या प्रमाणावर बचत होते  व सरकारचे इम्पोर्ट बिलही कमी होते  त्यामुळे देशातून डाॕलर्सचा बाहेर जाणारा प्रवाह थांबतो. जलद वाहतूक झाल्याने वेळेचा अपव्यय टळतो. रस्त्यावर होणारे ट्रॅफिक कमी होण्यास मदत होते आणि प्रदूषणही कमी  होते. ट्रक चालकांना लांबच्या ड्रायविंगचा त्रास व होणारा टोल, आदिचा खर्चही वाचतो. ट्रकच्या टायर व इंजनचा वापर कमी झाल्याने त्याचा घसारा कमी होतो .अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. या सेवेमुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात सुद्धा मोठी भर पडली आहे.

या सेवेचे दर खालीलप्रमाणे

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search