

मुंबई :यंदा एसटी महामंडळाने दिवाळी सुट्ट्यांमध्ये एसटीच्या जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त १४९४ जादा बसेस सोडणार आहे.
एसटी बसेसच्या या अधिकच्या फेऱ्या २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान म्हणजे ११ दिवस चालवण्यात येणार आहेत. ही माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. राज्यातील सर्व आगारांना जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या असून प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.
कोणत्या विभागातून किती बस?
प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद विभागातून ३६८,मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.
बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असे आवाहन एसटी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
मुंबई : देशात 5G सुरुवात होताच सायबर गुन्हेगार कार्यरत झाले आहेत. ५जी वरून मुंबई सायबर पोलिसांनी एक अलर्ट जारी केला आहे. यासंबंधी यात म्हटले की, लोकांनी ५जी नेटवर्क संबंधी काही सूचना पाळणे गरजेच्या आहेत.
सायबर पोलिसांनी जी अधिसूचना जारी केली आहे, त्यात म्हटले की, अनेक सायबर गुन्हेगार आता सक्रीय झाले आहेत. त्यांनी ५जी सेवा मिळवणाऱ्या यूजर्सला सिम कार्ड अपग्रेड करण्यासाठी मेसेज करण्याचे काम सुरू केले आहे. मेसेज करून ते यूजर्सकडे ओटीपीची मागणी सुद्धा करीत आहेत. त्यामुळे अनेक जणांच्या बँक खात्यातून पैसे काढले जाण्याची शक्यता आहे.
फ्रॉड करणाऱ्या यूजर्सला एक लिंक पाठवली जाते. ज्यात सिमला अपग्रेड करण्यासाठी यूजर्सला क्लिक करण्यास सांगितले जाते. एकदा लिंक क्लिक केल्यानंतर हॅकर्स पर्सनल माहिती चोरी करण्यासोबतच बँकिंग डिटेल्सला हॅक केले जाते. नंतर पुन्हा मोबाइलला हॅक केले जाते. अनेक यूजर्सला या प्रकारची लिंक पाठवून त्या क्लिक करण्यास भाग पाडले जाते. लिंकला क्लिक केल्यानंतर हॅकिंगचे बळी व्हावे लागते.
5G सिम फ्रॉड पासून सुरक्षित राहण्यासाठी यूजर्संनी कंपनीचे कस्टमर केअर वर कॉल करावे. किंवा एअरटेलच्या अॅपमधून ५जी कनेक्टिविटी चेक करण्याची प्रोसेस दिली आहे. ती करावी. असे जर केले तर सायबर फ्रॉड पासून सुरक्षित राहता येईल. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने भारतात ५जीची सुरुवात केली आहे. त्यानंतर देशातील अनेक शहरात सायबर क्रिमिन्लस याचा गैरफायदा घेत आहेत.
Risk Alert!
Upgradation in tech brings about a new wave of scammers waiting to pounce. The most recent one is fraudsters offering to guide you to convert to 5G.
Do not share your personal/banking information or click on any unknown links.#Scam2022 #5GScam #CyberSafe pic.twitter.com/9S0XphLM9Q— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) October 12, 2022
Vision Abroad
मुंबई :निवडणुक आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिले आहे तर मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे.
शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’हे नाव मिळालं तर चिन्हासाठी तीन नवे पर्याय द्यायला सांगितले आहे.
उद्धव ठाकरे गटाने 3 चिन्हे दिली होती. शेवटी मशाल हे निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या पदरी पडले आहे.
निवडणूक आयोगाचा निकाल
Vision Abroad
मुंबई :अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेकडून वाघ किंवा वाघाचा चेहरा हे चिन्ह निशाणी म्हणून निवडणूक आयोगाकडे मागण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हावरून न्यायालयीन लढाई सुरू असताना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणं हे चिन्ह फ्रिज केलं अंधेरीच्या पोट निवडणुकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे हा मोठा प्रश्न शिवसेनेसमोर उभा ठाकला आहे.
वाघ ह्या चिन्हासाठी शिवसेना का आग्रही?
धनुष्यबाण हे जरी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असले तरी वाघाचा चेहरा आजपर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक जाहिरातीत, बॅनर वर राहिला आहे. त्यामुळे हे चिन्ह शिवसेनेचे नवीन निवडणूक चिन्ह झाल्यास त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो.
निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नाही
निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नसल्याची माहिती मिळत आहे. निवडणुक आयोगाकडे हत्ती किंवा सिंह ही चिन्हे उपलब्ध आहे, त्यामुळे शिवसेनेला वाघ चिन्ह मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
Vision Abroad
नाशिक : नाशिकमध्ये एका खाजगी बसने अपघातानंतर पेट घेतला. या बसने पेट घेतल्यामुळे एकूण 12 प्रवाशांचा बळी गेल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद रोडवरील कैलास नगर भागात ही धक्कादायक घटना घडलीये. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहेय
मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळवरून मुंबईला येत होती. पहाटे साडे पाच वाजता या बसला अपघात झाला. बसने पेट घेतल्याने एकूण 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या 12 जणांमध्ये एका चिमुरड्याचाही समावेश आहे.
अग्निशमक दलाकडून बसला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि बस जळून खाक झाली. बसमध्ये आणखी काही प्रवाशी असण्याची भीती आहे.
मुंबई :राज्यभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी पावसाने मुंबईसह राज्याला झोडपले आहे. हाच परतीचा पाऊस पुढचे काही दिवस थैमान घालण्याची शक्यता आहे. दरम्यान मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यभरात होत असलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे दिसून आले. याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल मुंबई शहर, उपनगर आणि आजूबाजूच्या भागात पावसाच्या विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. तर आज 8 ऑक्टोबर रोजी विजांच्या कडकडाटांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईला आज यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या माहितीनुसार पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रतील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तर विदर्भात बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
8/10, 1 am night: Mod to intense spells will continue at most places over Mumbai Thane NM, Palghar & parts of N Raigad for next 3,4 hrs as seen from latest radar observation.
It been raining since morning and many places, it has already crossed over 100 mm rainfall till now.
TC pic.twitter.com/OzJoj7F7Xb— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 7, 2022
Vision Abroad
महाराष्ट्र : गोव्यातून विनापरवाना दारु आणली तर त्यावर गंभीर कारवाई होणार असल्याचं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी सांगितलं आहे. एकच व्यक्ती तीन वेळा अशा प्रकारच्या गुन्ह्यात सापडल्यास मोक्का लावणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे. गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भात कारवाईच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
तीन वेळा जर एकाच व्यक्तीकडून अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर मोक्का लावता येईल का हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावला जाईल, असं देसाई म्हणाले. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. आमच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी दारु घ्यायची आहे त्यांनी गोव्यात ती घ्यावी, असंही देसाई यावेळी म्हणाले.
शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणाऱ्या छोट्या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपॉइंट्स उभारण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यामध्ये खूप स्वस्तात दारु मिळते. दरामध्ये असलेल्या फरकामुळं मोठ्या प्रमाणात गोव्यातून इतर राज्यात तस्करी होत असते.
Vision Abroad
Vande Mataram News : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथून राज्यभरात ‘हॅलो नव्हे – वंदे मातरम्’ या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ केला जाईल . यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज प्रसिद्ध केले आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच “वंदे मातरम्” नी शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावी, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आला असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार असे म्हणाले.
आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास ‘हॅलो’ या शब्दाने सुरुवात होते. हा शब्द म्हणजे फक्त पाश्चात्यांचे अनुकरण आहे. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर “वंदे मातरम्” हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकते, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साहाय्याने हे अभियान यशस्वी करू असा निर्धार केला आहे असे ते पुढे म्हणाले.
Content Protected! Please Share it instead.