![]()
Category Archives: महाराष्ट्र
सावंतवाडी : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या शनिवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी आपल्या मतदारसंघात जाहीर मेळावा घेण्याचे जाहीर केले आहे. मेळाव्याचे ठिकाण आणि वेळ ह्याबद्दल त्यांनी आजून काही सांगितले नाही आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून चालत आलेल्या महाराष्ट्र राज्यातील सत्ता राज्य नाट्यामध्ये दीपक केसरकर यांचा रोल महत्वाचा राहिला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी ह्या गटाची एक महत्त्वाची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिली आहे.
दीपक केसरकर हे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून दोन वेळा मतदारसंघात येवून गेले होते. त्यावेळी त्यांनी कोणतीही सभा किंवा शक्तिप्रदर्शन केले नव्हते. ह्याच दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी येथे सभा झाली होती. ह्या सर्व गोष्टींमुळे दीपक केसरकर यांना त्यांच्या मतदारसंघातील शक्ति कमी झाल्याची विधाने त्यांच्या विरोधकांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणुन हा जाहीर मेळावा म्हणजे एक प्रकारचे शक्ति प्रदर्शन असेल असे बोलण्यात येत आहे.
शिंदेगट सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्ण करण्यासाठी निर्देश दिले होते. आता दीपक केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद पण मिळाले आहे. ह्या सर्वाचा फायदा मतदारसंघात विकास कामांसाठी होईल अशी आशा आहे असे बोलले जात आहे.
Related news – सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच उभे राहणार – मुख्यमंत्री
![]()
ठाणे:भाजप मित्रपक्षांना कधी संपवण्याच्या प्रयत्न करत नाही. महाराष्ट्रचे उदाहरण पाहता आमचे संख्याबळ जास्त असताना आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले. कालच्या मंत्रिमंडळात दोन्ही पक्षांच्या 9/9 नेत्यांनी मंत्रीपदाच्या शपथा घेतल्या. बिहारचे उदाहरण द्यायचे म्हंटले तर आमचे संख्याबळ जास्त असताना JDU ह्या आमच्या मित्रपक्षाला मुख्यमंत्रीपद दिले. असे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ”भाजप मित्रपक्षांना संपवते” ह्या विधानावर उत्तर दिले आहे. लोकमत च्या ठाण्यातील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार असेही बोलले होते की आपण जेव्हा कॉंग्रेस सोडली आणि नवीन पक्ष स्थापन केला तेव्हा त्यांनी नवीन नाव आणि नवीन निवडणूक चिन्ह घेतले, पण शिंदे गट ह्या विरुद्ध करत आहे.
ह्या विधानाबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की शरद पवारांनी कॉंग्रेस सोडली तेव्हा कायदे आज आहेत तसे नाही होते. पक्षांतरबंदी कायद्या मध्ये बदल करण्यात आला आहे, त्यामुळे शिवसेनेला ही कायदेशीर लढाई लढावी लागत आहे. शरद पवारांनी ह्या दोन्ही घटनेचे एका तराजूत तुलना करू नये.
शरद पवारांचे दुखणे जरा वेगळे आहे ते सर्वाना माहीत आहे असा खोचक टोला पण त्यांनी मारला.
![]()
![]()
बच्चू कडू हा मंत्रीपदापेक्षा मोठा आहे. आमचा उद्देश मंत्रिपदासाठी नाही होता.मंत्रिपद दिले तरी चांगले, नाही दिले तरी चांगले, पण आशा करतो कि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मंत्रिपदासाठी दिलेला शब्द पाळतील.
आज सकाळी मंत्रिमंडळात समाविष्ट केलेल्या मंत्र्यांच्या नावाची यादी खालील प्रमाणे
शिंदे गटातील मंत्री
शंभूराज देसाई
अब्दुल सत्तार
दादा भुसे
दीपक केसरकर
उदय सामंत
गुलाबराव पाटील
संदीपान भुमरे
तानाजी सावंत
संजय राठोड
भाजपकडून मंत्री
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
राधाकृष्ण विखे पाटील
सुरेश खाडे
रविंद्र चव्हाण
विजयकुमार गावित
अतुल सावे
![]()
![]()
देशात व्यसनाच्या वाढत्या प्रभावामुळे राज्याच्या आणि राष्ट्राच्या युवा शक्तीचा ऱ्हास होत आहे. यामुळे सदर व्यसनाला आळा घालणे हे राज्याचे सामाजिक दायित्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या व्यसनमुक्ती धोरणाच्या अंमलबजावणीसाठी तसेच नशायुक्त औषधे व अन्य नशायुक्त पदार्थ सेवना पासून समाज दूर राहावा याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि नमू डायनॅमिक आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १५ जुलै ते ३० जुलै २०२२ ह्या कालावधीत नमु डायनॅमिक आर्ट संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आंगणे आणि त्यांचे सहकारी आर्यन देसाई, संदीप सावंत रवी लोहार राजू मोरे अनंत अंकुश रामदास तांबे सुनील देवळेकर संजय चाचे व दिलीप परळकर आणि मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील पथनाट्य सादर करणारे चाळीस कलावंत मिळून कोकण विभागातील मुंबई शहर,मुंबई उपनगर,ठाणे,पालघर,रायगड, रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्हा मधील एकावन्न तालुक्यामध्ये मध्ये व्यसनमुक्ती अभियान राबविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.

![]()
प्रलंबित राहिलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या करण्याचे निश्चित झाले असून त्यासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाल्याचे समजते.
मुख्यमंत्र्याच्या ”नंदनवन” ह्या निवासस्थानी ह्या बाबत सुमारे 1 तास 45 मिनिटे ही बैठक संपन्न पडली आहे. विस्ताराच्या कार्यक्रमासाठी राजभवनातील दरबार हे सभागृह उद्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
उद्या पाहिल्या टप्प्यात सुमारे 17 ते 18 आमदारांचा शपथविधी होणार आहे. ह्या टप्प्यात महत्त्वाच्या खात्याचे वाटप होणार असून शिवसेनेच्या 6 ते 7 शिवसेनेचे मंत्री आणि 10 ते 11 भाजपचे मंत्री शपथ घेतील अशी चर्चा आहे.
ह्या बैठकीत ह्या नावांवर शिक्कामोर्तब झाली असून नक्की कोणा कोणाची वर्णी लागणार हे अधिकृत रीत्या जाहीर करण्यात आलेले नाही आहे. तरीपण शिंदे गटातील आधीच्या सरकारातील मंत्री असलेले आमदारांना उद्या मंत्री पदे भेटतील असे सांगण्यात येत आहे. भाजपने मंत्री वाटप करताना प्रादेशिक समतोल साधेल ह्याची दक्षता घेतली आहे असे सांगितले जात आहे. ज्येष्ठ नेते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील आणि रविन्द्र चव्हाण यांची नावे नक्की केली गेली आहेत.
खात्यांबाबत बोलायचे म्हंटले तर महत्त्वाची खाती म्हणजे अर्थ आणि गृह खाते भाजपकडे जाणार आहे. महसूल खात्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यांच्या गटाला ते भेटले की नाही हे आजून समजले नाही आहे. उच्चशिक्षण, जलसंपदा ही खाती पण भाजपा कडे तर पाणीपुरवठा आणि कृषी ही खाती एकनाथ शिंदे गटाकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गृहमंत्री पद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या कडे ठेवतील आणि अर्थमंत्री पदासाठी सुधीर मुनगंटीवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे असे सांगितले जात आहे.
आज रात्री उशिरापर्यंत ही सर्व नाही जाहीर करण्यात येतील अशी शक्यता आहे.
![]()
![]()
![]()











