Category Archives: महाराष्ट्र

प्लेस्टोर वरून ‘हे’ ॲप चुकूनही डाउनलोड करू नका,होऊ शकते फसवणूक, मुंबई पोलिसांचे आवाहन

मुंबई :आपल्या मोबाईलवर कोणतेही ॲप डाउनलोड करताना सावधगिरी बाळगा असे आवाहन मुंबई पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे. खासकरून विश्वासार्ह स्रोत नसणारी ॲप डाउनलोड करू नयेत असे त्यांनी सांगितले आहे.
हि ॲप डाउनलोड केल्यास आपल्या मोबाईल मधील महत्वाच्या माहितीचा वापर केला जाऊन आपली फसवणूक होऊ शकते. त्याचबरोबर आपल्या मोबाईल मधील फोटो एडिट करून त्याद्वारे ब्लॅकमेल केले जाऊ शकते. 
‘इन्स्टंट लोन ॲप’ हे ऍप्लिकेशन डाऊनलोड  केल्यास आपल्या फोनमधील वैयक्तिक माहितीचा ताबा इतर कोणाला मिळू शकतो, त्यामुळे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू नये असे  सांगण्यात आलेले आहे. 
त्याचबरोबर इतर ॲप डाऊनलोड करताना स्त्रोताची विश्वासार्हता तपासा आवाहन करण्यात आलेले आहे. 

‘वेदांता फायरफॉक्स’, ‘टाटा-एअरबस’नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्र राज्याने गमावला? प्रशासनाकडून दिरंगाई.

नागपूर :वेदांता, ‘टाटा-एअरबस’ हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर  आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे.

सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये ११८५ कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक होता. विमान तसंच रॉकेट इंजिन बनवणाऱ्या या कंपनीने मात्र आता महाराष्ट्रातून माघार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. हा प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. जागा मिळण्यास उशीर झाल्याने प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्पामुळे ५०० ते ६०० कामगारांच्या हाताला रोजगार मिळणार होता.

Block "ad1" not found

राज्यातील नोव्हेंबर महिन्यात होणारी पोलीस भरती स्थगित ….

मुंबई: पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य तर्फे सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेली पदे भरण्यासाठी नोव्हेंबर मध्ये होणारी भरती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे.

हि पदे भरण्याबाबत राज्यातील जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांना एक आदेशपत्रक पाठवण्यात आले होते. ह्या आदेशपत्रकात सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात १४,९५६ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात यावी असे सांगण्यात आलेले होते. त्यानुसार सोबत दिलेल्या नमुन्यात दिनांक ०१.११.२०२२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते.


सदर भरती प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे अशा आशयाचे एक माहितीपत्रक पोलीस महासंचालकांच्या वतीने काढण्यात आलेले आहे.

 

Related : महाराष्ट्र पोलीस दलातील १४,९५६ रिक्त पदांसाठी भरती…पहा जिल्ह्यानुसार पदांची संख्या 

महाराष्ट्र पोलीस दलातील १४,९५६ रिक्त पदांसाठी भरती…पहा जिल्ह्यानुसार पदांची संख्या 

मुंबई : पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य तर्फे सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात रिक्त झालेली पदे भरण्याबाबत राज्यातील जिल्ह्यातील पोलीस आयुक्त आणि अधिक्षक यांना एक आदेशपत्रक पाठवण्यात आले आहे.
ह्या आदेशपत्रकात सन २०२१ साली पोलीस शिपाई संवर्गात १४,९५६ रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात देण्यात यावी असे सांगण्यात आलेले आहे. त्यानुसार सोबत दिलेल्या नमुन्यात दिनांक ०१.११.२०२२ ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी व तसे कार्यालयास ई-मेल द्वारे कळविण्यात यावे असे आदेश देण्यात आले  आहेत.
जिल्ह्यानुसार खालील प्रवर्गात पदे भरण्यात येतील असे जाहीर करण्यात आलेले आहे. 
j

राज ठाकरेंचे शिंदे सरकारला पत्र, म्हणाले “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा”

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. अशा आशयाचे पत्र आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 
काय लिहिले आहे या पत्रात?
“ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
“या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा”, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.
“सरकारने पंचनाप्याचे आदेश दिले आहेत, पण पूर्वानुभवानुसार प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत. गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील, हे पहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नाही तिचादेखील पुनर्विचार करावा”, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
“दिवाळी हा आनंदाचा सण आहे. खरंतर लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं”, असेही ते म्हणाले.

दिवाळीसाठी MSRTC च्या १४९४ ज्यादा बसेस.. जाणून घ्या कोणत्या विभागात किती बसेस.

मुंबई :यंदा एसटी महामंडळाने दिवाळी सुट्ट्यांमध्ये एसटीच्या जादा फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यंदा राज्यभरात दिवाळीनिमित्त १४९४ जादा बसेस सोडणार आहे.

 

एसटी बसेसच्या या अधिकच्या फेऱ्या २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान म्हणजे ११ दिवस चालवण्यात येणार आहेत. ही माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. राज्यातील सर्व आगारांना जादा गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या असून प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

 

कोणत्या विभागातून किती बस? 

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद विभागातून ३६८,मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. 

 

बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असे आवाहन एसटी प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

5G सिम फ्रॉड संबंधी मुंबई पोलिसांचा Risk Alert जारी.. फसवणूक होऊ नये म्हणून ‘ही’ काळजी घ्या..

मुंबई : देशात 5G सुरुवात होताच सायबर गुन्हेगार कार्यरत झाले आहेत. ५जी वरून मुंबई सायबर पोलिसांनी एक अलर्ट जारी केला आहे. यासंबंधी  यात म्हटले की, लोकांनी ५जी नेटवर्क संबंधी काही सूचना पाळणे गरजेच्या आहेत.

सायबर पोलिसांनी जी अधिसूचना जारी केली आहे, त्यात म्हटले की, अनेक सायबर गुन्हेगार आता सक्रीय झाले आहेत. त्यांनी ५जी सेवा मिळवणाऱ्या यूजर्सला सिम कार्ड अपग्रेड करण्यासाठी मेसेज करण्याचे काम सुरू केले आहे. मेसेज करून ते यूजर्सकडे ओटीपीची मागणी सुद्धा करीत आहेत. त्यामुळे अनेक जणांच्या बँक खात्यातून पैसे काढले जाण्याची शक्यता आहे.

फ्रॉड करणाऱ्या यूजर्सला एक लिंक पाठवली जाते. ज्यात सिमला अपग्रेड करण्यासाठी यूजर्सला क्लिक करण्यास सांगितले जाते. एकदा लिंक क्लिक केल्यानंतर हॅकर्स पर्सनल माहिती चोरी करण्यासोबतच बँकिंग डिटेल्सला हॅक केले जाते. नंतर पुन्हा मोबाइलला हॅक केले जाते. अनेक यूजर्सला या प्रकारची लिंक पाठवून त्या क्लिक करण्यास भाग पाडले जाते. लिंकला क्लिक केल्यानंतर हॅकिंगचे बळी व्हावे लागते.

5G सिम फ्रॉड पासून सुरक्षित राहण्यासाठी यूजर्संनी कंपनीचे कस्टमर केअर वर कॉल करावे. किंवा एअरटेलच्या अॅपमधून ५जी कनेक्टिविटी चेक करण्याची प्रोसेस दिली आहे. ती करावी. असे जर केले तर सायबर फ्रॉड पासून सुरक्षित राहता येईल. रिलायन्स जिओ आणि एअरटेलने भारतात ५जीची सुरुवात केली आहे. त्यानंतर देशातील अनेक शहरात सायबर क्रिमिन्लस याचा गैरफायदा घेत आहेत.

Block "ad1" not found

शिवसेनेतर्फे निवडणूक चिन्हाचे प्राथमिक स्वरुप प्रसिद्ध… असे असेल हे स्वरूप…

मुंबई :निवडणुक आयोगाने ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव दिले आहे तर मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. 

शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’हे नाव मिळालं तर चिन्हासाठी तीन नवे पर्याय द्यायला सांगितले आहे.

उद्धव ठाकरे गटाने 3 चिन्हे दिली होती. शेवटी मशाल हे निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या पदरी पडले आहे. 

 

निवडणूक आयोगाचा निकाल

  •  त्रिशूल नाकारलं- कारण ते धार्मिक आहे, दोन्ही गटांचा दावाही
  • उगवता सूर्य नाकारलं- कारण ते डीएमके पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. दोन्ही गटांचा दावाही
  •  मशाल मिळाली कारण- समता पक्षाचे चिन्ह होतं, 2004 नंतर समता पक्ष नोंदणी रद्द, त्यामुळे फ्री सिम्बॉल

 

Block "ad1" not found

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ‘वाघ’ ह्या निवडणूक चिन्हासाठी आग्रही

मुंबई :अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेकडून वाघ किंवा वाघाचा चेहरा हे चिन्ह निशाणी म्हणून निवडणूक आयोगाकडे मागण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्हावरून न्यायालयीन लढाई सुरू असताना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाणं हे चिन्ह फ्रिज केलं अंधेरीच्या पोट निवडणुकीसाठी कोणते चिन्ह वापरायचे हा मोठा प्रश्न शिवसेनेसमोर उभा ठाकला आहे. 

 

वाघ ह्या चिन्हासाठी शिवसेना का आग्रही? 

धनुष्यबाण हे जरी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असले तरी वाघाचा चेहरा आजपर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक जाहिरातीत, बॅनर वर राहिला आहे. त्यामुळे हे चिन्ह शिवसेनेचे नवीन निवडणूक चिन्ह झाल्यास त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो. 

निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नाही 

निवडणूक आयोगाकडे वाघ हे चिन्ह नसल्याची माहिती मिळत आहे. निवडणुक आयोगाकडे हत्ती किंवा सिंह ही चिन्हे उपलब्ध आहे, त्यामुळे शिवसेनेला वाघ चिन्ह मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

 

Block "ad1" not found

 

नाशिकमध्ये बसला आग… 12 जणांचा बळी

नाशिक : नाशिकमध्ये  एका खाजगी बसने अपघातानंतर पेट घेतला. या बसने पेट घेतल्यामुळे एकूण 12 प्रवाशांचा बळी गेल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद रोडवरील कैलास नगर भागात ही धक्कादायक घटना घडलीये. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहेय

मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळवरून मुंबईला येत होती. पहाटे साडे पाच वाजता या बसला अपघात झाला. बसने पेट घेतल्याने एकूण 12 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. या 12 जणांमध्ये एका चिमुरड्याचाही समावेश आहे.

अग्निशमक दलाकडून बसला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला आणि बस जळून खाक झाली. बसमध्ये आणखी काही प्रवाशी असण्याची भीती आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search