Maharashtra Assembly Election:महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. पक्षाकडून तब्बल १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतरदेखील एकही जागा जिंकता न आल्याने मनसेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्या मतांचा टक्का अवघ्या १.५५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण २.२५ टक्के इतके होते.
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय जनता पक्षापाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकूण १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या रिंगणात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उत्तरविण्यात आल्याने पक्षासाठी आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. मात्र या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मनसेला आपला दबदबा कायम ठेवता आला नाही. गेल्या निवडणुकीत एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांनाही कल्याण ग्रामीण
मतदारसंघामधून यंदा पराभवाचा फटका बसला.
मनसेच्या मतांचा टक्का घसरला
मनसेला २००९ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ५.७१ टक्के मते मिळाली होती. सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत हा टक्का ३.१५ टक्क्यांवर घसरला. सन २०१९च्या निवडणुकीत हाच टक्का अवघा २.२५ टक्के राहिला. यंदा त्यात आणखी घट झाली असून मनसेचा जनाधार आता अवघ्या १.५५ टक्के इतका तुटपुंजा आहे.
Maharashtra Assembly Election:विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र विरोधी पक्षातील कोणत्याही पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नसल्याने यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेते पदच नसणार आहे. या अगोदर लोकसभेत २०१४ आणि २०१९ निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेते पद नव्हते. आता राज्यात हे पद नसणार आहे.
राज्य विधीमंडळाच्या नियमानुसार विरोधी पक्षनेते पदासाठी एकूण जागांच्या दहा टक्के जागा मिळणे हे क्रमप्राप्त आहे. मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता महाविकास आघाडीतील विरोधी पक्षातील कोणत्याही पक्षाकडे तेवढे संख्याबळ नाही, काँग्रेसकडे सध्या १९, शिवसेना उबाठाकडे १९ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे १३ जागा आहेत.
यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय नोंदविला आहे. एकूण १३२ जागा जिंकून तो राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तर त्यानंतर जागा जिंकण्यात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी बाजी मारली आहे.
मात्र पक्षनिहाय मतदान टक्केवारीत चित्र काहीसे वेगळे आहे.
पक्षनिहाय मतदान टक्केवारीतही भाजप राज्याच्या मतांच्या २६.७७% मते घेऊन क्रमांक १ वर आहे. तर १२.४२% टक्क्यानिशी दुसऱ्या क्रमांकावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे. शिवसेना शिंदे गट एकूण मतांच्या १२.३८% मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकूण मतांच्या १.५५% वाटा भेटला असला तरी तिला त्याचे रूपांतर एकाही विजयी जागेत करता आले नाही.
पक्षनिहाय मतदानाची टक्केवारी
क्र.
पक्ष
टक्केवारी
1
भारतीय जनता पार्टी – भाजपा
26.77%
2
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
12.42%
3
शिवसेना
12.38%
4
राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार
11.28%
5
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
9.96%
6
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
9.01%
7
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
1.55%
8
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
0.85%
9
नोटा
0.72%
10
बहुजन समाज पार्टी
0.48%
11
समाजवादी पक्ष – सपा
0.38%
12
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम)
Maharashtra Assembly Election Statistics: सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
क्र.
पक्ष
विजयी आमदार
1
भारतीय जनता पार्टी – भाजपा
132
2
शिवसेना
57
3
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
41
4
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
20
5
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
16
6
राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार
10
7
समाजवादी पक्ष – सपा
2
8
जन सुराज्य शक्ती
2
9
राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष
1
10
राष्ट्रीय समाज पक्ष
1
11
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन
1
12
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम)
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक -2024 मध्ये मतदानाचे प्रमाण वाढले असून, सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील 61.1% वरुन यावेळी अंदाजे 66% पर्यंत मतदानाचे प्रमाण पोहोचले आहे. (पोस्टल मतांचा समावेश वगळता). मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील भारत निवडणूक आयोगाने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियांचे सखोल विश्लेषण करण्यात आलेले आहे. यानुसार अनेक उपक्रम राबविण्यात आले, ज्यांची काटेकोर अंमलबजावणी राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदानाच्या दिवशी दिसून आली.
मतदार यादी पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत दुसरी विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरिक्षण मोहीम राबविण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीनंतर मतदार यादी सतत अद्ययावत करत असताना या पुनरिक्षणामुळे 40 लाख नवीन मतदारांची भर पडली, ज्यामध्ये 18-19 वयोगटातील मतदारांचे प्रमाण 50% पेक्षा जास्त होते. तृतीयपंथीय, विशेषत: असुरक्षित आदिवासी जमाती समूह (PVTGs) आणि दिव्यांग मतदारांना मतदार यादीत समाविष्ट करण्यावर विशेष लक्ष दिले गेले.
मतदारांना सुविधा मिळाव्यात यासाठी मतदान केंद्रांवर विशेष भर देण्यात आला. मतदान केंद्रांचे पुनर्रचना, गटातील केंद्रीकरण कमी करणे, तात्पुरत्या ठिकाणांवरून कायमस्वरूपी इमारतींमध्ये मतदान केंद्र हलविणे, गरजेनुसार नवीन मतदान केंद्र स्थापन करणे, तसेच उंच इमारतींमध्ये, गृहसंकुलांमध्ये आणि झोपडपट्टीत मतदान केंद्र उभारणे यासारखे उपक्रम राबविण्यात आले.
मतदान केंद्रातील मतदारांची संख्या मर्यादित ठेवण्याच्या उद्देशाने मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करुन नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आली. 5800 हून अधिक ठिकाणी गटातील केंद्रीकरण कमी करण्यात आले; 1100 हून अधिक मतदान केंद्र उंच इमारती आणि गृहसंकुलांमध्ये उभारण्यात आली; तर 200 हून अधिक मतदान केंद्र झोपडपट्ट्यांमध्ये स्थापन करण्यात आली.
प्रत्येक मतदाराला आपले मतदान केंद्र ओळखणे सोपे जावे यासाठी ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या’ मोहिम राबविण्यात आली. तसेच, जवळजवळ सर्व मतदारांना मतदार माहिती चिठ्ठया वितरित करण्यात आल्या. मुंबईत, एकाच ठिकाणी अनेक मतदान केंद्र असल्यास त्यांना वेगळ्या रंगाच्या कोड देण्यात आला, आणि हा रंग कोड मतदार माहिती चिठ्ठीतही छापण्यात आले, ज्यामुळे मतदारांना आपले मतदान केंद्र ओळखणे सुलभ झाले.
प्रत्येक मतदान केंद्रावर किमान आश्वासित सुविधा जसे पिण्याचे पाणी, रॅम्प, रांगेत बसण्याची सोय, पार्किंग सुविधा आदींवर निवडणूक आयोगाने विशेष लक्ष दिले. ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांनी या सुविधा पुरविण्यात यश मिळवले, ज्याचे सर्व मतदारांनी राज्यभर कौतुक केले.
मतदारांसोबत योग्य वर्तन ठेवण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. लोकसभा निवडणुकीत एका वेळी एका व्यक्तीला मतदान केंद्रात सोडण्याच्या नियमाऐवजी, या वेळी एकाच वेळी चार व्यक्तींना प्रवेश देण्यात आला. मतदार ओळख, शाई लावणे आणि मतदान हे तीनही टप्पे एकाच वेळी विविध मतदारांकरिता पूर्ण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक (NSS) व एन.सी.सी. कॅडेट्सनी (NCC) रांगा व वाहतूक व्यवस्थापनात मदत केली, तसेच वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींनाही सहाय्य केले.
मुंबई ही राज्याचे राजधानी शहर असल्याने, तसेच जागतिक स्तरावर मोठे व महत्त्वाचे शहरी केंद्र असल्याने, लोकसभा निवडणुकीत दिसलेल्या काही आव्हानांचा अभ्यास करून आणि सध्याच्या प्रशासकीय परिस्थितीचा सखोल आढावा घेतल्यानंतर, निवडणूक आयोगाने मुंबई शहर व उपनगर या दोन्ही जिल्ह्यांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. याशिवाय, अतिरिक्त महापालिका आयुक्तांना सहायक जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आले आणि प्रत्येक अधिकाऱ्याला एका संसदीय मतदारसंघाची (सहा विधानसभा मतदारसंघ) जबाबदारी देण्यात आली. उपक्रम यशस्वी झाला व त्याचा फायदाही लगेच दिसून आलेला आहे.
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी महसूल, पोलीस आणि इतर निवडणुकीशी संबंधित विभागातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित आव्हाने हाताळताना क्षेत्रीय यंत्रणा नेहमीच सतर्क राहिली.
मतमोजणी व्यवस्था
288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी केंद्रे आणि 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 01 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी निरीक्षक आणि 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 02 मतमोजणी निरीक्षक नेमले गेले आहेत.
23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल. या प्रक्रियेदरम्यान, पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी 8:00 वाजता सुरू होईल, त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होईल.
मतमोजणी केंद्रांच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली असून सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी यांनी याबाबत व्यापक प्रसिद्धी दिली आहे. निवडणूक लढविणारा उमेदवार/राजकीय पक्षांना मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणाबाबत लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे. निरीक्षक व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर सीलबंद स्ट्राँग रूम्स उघडण्यात येतील व ईव्हीएम मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सी.सी. टीव्हीद्वारे चित्रित केली जाईल. तीन- स्तरीय सुरक्षा व्यवस्था निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात आली आहे.
सध्याच्या निवडणुकीत प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एनआयसी (NIC) च्या मदतीने फॉर्म 12 आणि 12-डी त्वरित हस्तांतरित करण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्यात आली. मंजूर फॉर्मसाठी रिकाम्या पोस्टल मतपत्रिकांची देवाण-घेवाण तसेच मतदान केलेल्या मतपत्रिकांच्या विनिमयासाठी जिल्हा, विभागीय, आणि राज्य स्तरावर समन्वय केंद्रे कार्यरत करण्यात आली. 85+ वयाच्या 68,000 हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि 12,000 पेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींनी गृह मतदानाचा लाभ घेतला. 36,000 हून अधिक अत्यावश्यक सेवा मतदारांनी पोस्टल मतपत्रिकांद्वारे मतदान केले आणि 4,66,823 पोस्टल मतपत्रिका निवडणूक कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या.
सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये टपाल मतपत्रिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे 288 मतमोजणी केंद्रांवर 1732 टेबल्स टपाल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी आणि 592 टेबल्स इटीपीबीएमएस (ETPBMS) स्कॅनिंगसाठी (पूर्व-मोजणीसाठी) उभारण्यात आले आहेत.
मतमोजणी प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सतत माध्यमांसमोर माहिती सादर करण्यात आली आहे आणि महत्त्वाचे आकडेवारी व घडामोडी ऑनलाइन व पारंपरिक माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली आहे.
SSC & HSC Exam Schedule: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून १० वी आणि १२ बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत असून पहिले सत्र सकाळी ११:०० ते दुपारी २:०० आणि दुसरे सत्र दुपारी ३:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत असणार आहे. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी २०२५ मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार यंदा ऑगस्ट महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तसेच वेळापत्रका संदर्भात काही हरकती सूचना असतील तर त्या २३ ऑगस्टपर्यंत राज्य मंडळाने मागविल्या होत्या. प्राप्त सूचनांवर विचार करून राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आल्याचे आता दिसून येत आहे.
बारावी लेखी परीक्षा – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
बारावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025
दहावी लेखी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025
दहावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी
सीबीएसई परिक्षांचे वेळापत्रक जाहीर
सीबीएसईने आपली वेबसाईट cbse.gov.in वर दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा २०२५ चे वेळापत्रक जारी केले आहे. वेळपत्रकानुसार, दोन्ही परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरु होतील. दहावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. तर १२ वीचा १५ फेब्रुवारीला एंटरप्रेन्योरशिपची परीक्षा असेल, तसेच १७ फेब्रुवारीला फिजिकल एज्युकेशनची परीक्षा असेल. तर ४ एप्रिलला मानसशास्त्र विषयाचा पेपर असेल.
Mumbai Local: मुंबईकरांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक खुशखबर देण्यात आली आहे.पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात आणखी एक एसी लोकल दाखल होणार आहे. तर,मध्य रेल्वेला एक सामान्य लोकल मिळाली आहे. चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पश्चिम आणि मध्य या दोन्ही मार्गांसाठी नवीन उपनगरीय ट्रेन मिळाल्या आहेत. या दोन लोकलमुळं नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे.
मंगळवारी रात्री विरार यार्डात नवीन एसी लोकल दाखल झाली आहे. आठवडाभर या लोकलची टेस्टिंग होणार आहे. त्यानंतर ही लोकल प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. या नव्या लोकलमुळं पश्चिम रेल्वेच्या 10 ते 12 एसी सेवांमध्ये वाढ होणार आहे.मात्र ही गाडी जलद किंवा धिम्या मार्गावर चालवण्याचा निर्णय अद्याप झाला नाहीये. सध्या पश्चिम रेल्वेवर लोकलच्या एकूण 1406 फेऱ्या धावतात. मात्र यात आणखी वाढ झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेवरही नवीन लोकल
पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेवरही एक लोकल मिळाली आहे. मध्य रेल्वेला सामान्य लोकल मिळाली आहे. चौथा कॉरिडॉर असलेल्या बेलापूर-उरण मार्गिकेवर सुरू असलेल्या जुन्या लोकलच्या जागेवर धावणार आहे. 12 डब्यांची ही लोकल आहे. सध्या बेलापूर-उरण विभागात तीन रेट्रोफिटेड लोकल गाड्यांचा वापर केला जातो. या तीन लोकलपैकी एक गाडी बदलून त्या जागी नवी लोकल चालवली जाणार आहे.
मुंबई, दि. 18 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू झाला आहे. मतदान संपेपर्यंतच्या 48 तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत. निवडणूक कालावधीत मुद्रित माध्यमांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने किंवा विरोधात कोणतीही जाहिरात/ निवडणूकविषयक आशय- मजकूर दिला गेला असल्यास त्याबाबत संबंधित प्रकाशकाचे नाव आणि पत्ता, तसेच संबंधित आशय – मजकूर / जाहिरातीवर नमूद करावा. या निर्देशांसोबतच आयोगाने भारतीय दंड संहितेच्या कलम 171 एच विचारात घेण्याबाबतही निर्देशित केले आहे. या कलमाअंतर्गत उमेदवाराच्या अधिकृत परवानगीशिवाय संबंधित उमेदवाराच्या निवडणुकीचा प्रचार किंवा निवडणुकीसाठी खर्च करण्याच्या हेतूने इतर सर्व गोष्टींसह जाहिराती, प्रचार किंवा प्रकाशनासाठी खर्च करण्यास मनाई केली गेली आहे.
निवडणूक प्रचाराच्या शांतता काळामध्ये मुद्रीत माध्यमांमध्ये छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीस जाहिरात पूर्व प्रमाणिकरण समितीची मान्यता असल्याशिवाय या जाहिराती वृत्तपत्रामध्ये छापू नये, अशा आयोगाच्या सूचना आहेत. दृकश्राव्ये माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया) यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहीरातींना मनाई आहे.
राजकीय जाहिरातीसाठी पूर्व-प्रमाणीकरणाबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाच्या दि.24 ऑगस्ट, 2023 च्या आदेशान्वये देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रचाराच्या शांतता कालावधीतील मुद्रित माध्यमे आणि त्यापूर्वीच्या कालावधीसाठी दृकश्राव्य माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया) ह्यावरील राजकीय जाहिरातींचा समावेश आहे.
पूर्व प्रमाणीकरणासाठीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत स्पष्ट तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने किंवा केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा, 1995 मधील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झाल्यास, असे उल्लंघन करणाऱ्याने आपली उल्लंघन करणारी कृती तात्काळ थांबवावी. निवडणूक आयोगामार्फत असे उल्लंघन करणाऱ्याच्या उपकरणांची थेट जप्तीही केली जाऊ शकते. यासंदर्भात दिल्या गेलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन न केल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरतो व तसे न्यायालयीन प्रकरण दाखल होऊ शकते.
सर्व केबल नेटवर्क, टी.व्ही. चॅनल, रेडिओ, सोशल मीडिया याद्वारे राजकीय जाहिरातीचे प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातीचे प्रमाणीकरण असल्याचे खातरजमा करणे आवश्यक आहे. जाहिरातीचे प्रमाणिकरण असल्याशिवाय राजकीय जाहिराती प्रसारीत करण्यात येवू नये. तसेच कोणत्याही केबल नेटवर्क, टी.व्ही. चॅनल यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष किंवा छुप्या पद्धतीने राजकीय पक्षांच्या जाहिरातीचे प्रमाणिकरण नसल्यास या जाहिराती प्रसारित न करण्याची दक्षता घेण्यात यावी या निर्देशांचे उल्लंघन केल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ग्राह्य धरून कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
Konkan Railway: पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाण्यासाठी एक गाडी सोडण्यात यावी या कोकणकरांच्या मागणीची दखल घेऊन या मार्गावर एक गाडी सुरु करण्यात आली. बांद्रा – मडगाव -बांद्रा द्विसाप्ताहिक एक्सप्रेस ही पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणासाठी धावणारी ही एकमेव गाडी असल्याने तिला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभणे अपेक्षित होते. दिनांक २९ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या ट्रेनमधून सुरुवातीला क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते; परंतु आता मात्र प्रवासीसंख्या घटली आहे. गणेशोत्सवात या ट्रेनमधून तिच्या क्षमतेपेक्षा १० ते १५ टक्के अधिक प्रवासी प्रवास करत होते; मात्र आता प्रवासी संख्या कमी झाली आहे. आता प्रवासी संख्या ७० ते ७८ टक्के एवढ्यावर आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईहून निघताना ही गाडी बांद्रा या स्थानकावरून सकाळी ६:५० वाजता निघते ती तब्बल १२ तास १० मिनटे इतका अवधी घेऊन संध्याकाळी ७ वाजता सावंतवाडी टर्मिनस येथे पोहोचते. तर जवळपास एवढ्याच अंतराच्या प्रवासासाठी सकाळी ७:१० वाजता मुंबई सीएसएमटी वरून सुटणाऱ्या मांडवी एक्सप्रेसचा सावंतवाडी टर्मिनस येथील वेळ संध्याकाळी ४ वाजून २८ मिनिटे असा आहे. म्हणजे या प्रवासाला मांडवी एक्सप्रेस ९ तास १८ मिनिटे इतका अवधी घेते.
या गाडीला काही मोजकेच थांबे देण्यात आले आहेत. वसईमधून या गाडीला मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर वळवावे लागत असल्याने अधिकची लागणारी ३० ते ४५ मिनिटे सोडली तरी ही गाडी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तरी सावंतवाडी स्थानकावर पोहोचणे अपेक्षित आहे. तळकोकणात ही गाडी उशिरा पोचत असल्याने पुढील प्रवासासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने येथील प्रवासी या गाडीला पसंदी देताना दिसत नाहीत.
ती आशाही ठरली फोल
यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सुरु झालेल्या या गाडीला एखाद्या पॅसेंजर गाडीचे वेळापत्रक दिल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र सध्या कोकण रेल्वेचे ‘मान्सून वेळापत्रक’ चालू असल्याने या गाडीला असे वेळापत्रक देण्यात आले असून ‘बिगर मान्सून’ वेळापत्रकात बदल करण्यात येऊन या गाडीचा प्रवास अवधी कमी करण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. मात्र कोकण रेल्वेने दिनांक ०१ नोव्हेंबर पासून अंगिकारलेल्या ‘बिगर मान्सून’ वेळापत्रकात या गाडीच्या वेळेत काहीही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.
सावंतवाडी:उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणारा छटपूजा उत्सव शहरातील सावंतवाडी येथे उत्साहात साजरा झाला. मात्र सावंतवाडीत मोती तलावाच्या काठाला या निम्मित लावलेल्या एका बॅनरमुळे येथील स्थानिक नाराज झाले असून विविध माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
या बँनरमुळे ‘एक्स’ या सोशल माध्यमावर सुद्धा यूझर्सनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाला परवानगी कोणी दिली असा प्रश्न थेट येथील स्थानिक आमदार आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना विचारण्यात आला आहे.
सावंतवाडी परप्रांतीयांचा टक्का दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील जमिनीही त्यांच्याकडून खरेदी केल्या जात आहेत. याला सर्वस्वी जबाबदार येथील जमीन विकणारा स्थानिकच असल्याचा आरोप होत आहे.
तर काहींच्या मते थेट युपी – बिहार ला कनेक्टिव्हिटी असलेल्या रेल्वे गाड्यांमुळे सावंतवाडीत उत्तर भारतीयांची संख्या वाढत आहे. तर काहींनी यासाठी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींना दोषींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. याचबरोबर काही उपरोधिक तसेच नाराजी व्यक्त कंमेंट सुद्धा यूझर्सनी दिल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे
कोकणचा कॅलिफोर्निया बनवता बनवता कोकणचा यूपी बिहार कधी बनवला?? – विवेक
आता कोकणचा सुद्धा युपी बिहार करून सोडणार का ? स्थानिक प्रतिनिधी कधी लक्ष घालणार या गोष्टीकडे ? उद्या कोकणचा सण छटपूजा जाहीर व्हायच्या अगोदरच आवर घालावे. – हेमंत! मराठी एकीकरण समिती
स्थानिक माणसांना जमिनी विकताना काहीच वाटत नाही? पालघर ला सुद्धा असेच सातबारे पाहिल्यास दिसून येते की मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व इतरधर्मीयांती जमिनी घेतल्या आहेत. Visa