Category Archives: लोकसभा निवडणूक २०२४

‘चाकरमानी’ निघालेत गावाला; चैन पडेना ‘राजकारण्यांना’

   Follow us on        

मुंबई दि.१५ एप्रिल :लोकसभा निवडणूक ऐन उन्हाळी सुट्टीत आली़ असल्याने मुंबई पुण्यातील राजकारण्यांची चिंता वाढली आहे. मुंबई पुण्यातून लाखो चाकरमानी निवडणुकीच्या काळात गावी जाणार असल्यामुळे नेते, कार्यकर्ते यांची धास्ती  वाढली आहे.

आतापासूनच पुढे मे अखेरपर्यंत मेल-एक्स्प्रेस आणि खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेच्या अतिरिक्त गाड्याही फुल्ल झाल्या आहेत.

मुंबईत दिनांक 20 मे रोजी मतदान आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापुर तसेच वसई विरार येथे मोठया प्रमाणात कोकणातील चाकरमानी वास्तव्यास आहे. कोकणातील आंबे फणस चाखण्यासाठी तसेच उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. यंदा लोकसभा निवडणुक असल्याने चाकरमानी गावी जाणार नाहीत आणि येथेच राहून आपले कर्तव्य पार पाडणार असे वाटत होते. रेल्वे, एसटी खाजगी वाहनांच्या आरक्षणाची स्थिती पाहता यंदाही मोठ्या प्रमाणात चाकरमानी उन्हाळी सुट्टीत गावीच जाणार असल्याचे दिसत आहे.  20 मेपर्यंत तरी चाकरमानी परततील की नाही या या विचाराने राजकारण्यांना चैन पडेनाशी झाली आहे.

कोकणात जाणाऱ्या खासगी बसगाड्यांचा प्रवाशाचा ओघ पाहता १,२०० रुपयाच्या तिकीटदरात ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ मे या महिनाभराच्या काळात किमान ५ लाखांहून अधिक चाकरमानी गावाकडे जाणार असल्याचा अंदाज वाहतूक एजन्सीकडून व्यक्त करण्यात आला आहे यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार हे निश्चित आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ४० आणि ४५ टक्क्यांवर अडकलेली लोकसभा मतदानाची टक्केवारी यंदाही तशीच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

 

Loading

ब्रेकिंग: किरण सामंत उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला नागपूरला रवाना 

   Follow us on        
रत्नागिरी, दि. १४ एप्रिल :रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा जागेबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत नागपूरला रवाना झाले आहेत. नागपूरला ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची  भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मंतरसंघाच्या आगामी निवडणुकीच्या उमेदवाराचा तिढा अजून सुटला नाही आहे. मात्र भाजप तर्फे नारायण राणे यांनी आपल्या नावाने प्रचार करण्यास सुरवात केलेली आहे. एवढेच  नव्हे तर त्यांनी चार उमेदवारी अर्ज खरेदी केले असल्याचीही चर्चा होत आहे. याच पार्श्ववभूमीवर किरण सामंत हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला निघाले आहेत.
भाजप या मतदारसंघावर आपला दावा सोडायला तयार दिसत नाही आहे. तर शिवसेना शिंदे गट सुद्धा पण येथे आपला दावा सांगत आहि. तिसरी शक्यता अशीही वर्तविण्यात येत आहे कि किरण सामंत यांना कदाचित   भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यासाठी  सांगितले जाऊ शकते. काहीही असो महायुतीचा उमेदवार जाहीर होत नसल्याने त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या विनायक राऊत यांना होत आहे.

Loading

सावंतवाडी टर्मिनसला उघड पाठिंबा देणार तोच आमचा उमेदवार- सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना

लोकसभा निवडणुकीचा जो उमेदवार प्रवासी संघटनेच्या मागण्यांना आपल्या जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल असे सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

   Follow us on        
सावंतवाडी दि. ०७ एप्रिल: कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, रेल्वे गाड्यांना थांबे मिळावेत, टर्मिनस व्हावे, टर्मिनस ला प्रा मधू दंडवते यांचे नाव द्यावे अशा प्रवासी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत त्यासाठी लोकसभा निवडणुकीतील जो उमेदवार जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल. आतापर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी दुतोंडी भुमिका मांडली आहे यापुढे तशी भूमिका चालणार नाही असा इशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर व सचिव मिहीर मठकर यांनी दिला आहे.
आता लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनस ला उघड पाठिंबा देणार्‍या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी सावंतवाडी टर्मिनस बाबतीत जाहीर बोलावं, जाहीरनाम्यात रेल्वे स्थानक टर्मिनस विषय घ्यावा. टर्मिनस साठी आंदोलन छेडले गेले, टर्मिनस भूमिपूजन झाले आणि नऊ वर्ष रखडले आहे. टर्मिनस ला विरोध आणि बाजू घेणारे आज एकत्र आहेत. रेल्वेमंत्री यांना भेटल्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आश्वासन दिले होते. मात्र प्रवाशांची गैरसोय होत आहे याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे..
कोणतीही निवडणूक असली तर कोकणातून राजकारणी लोकांना चाकरमान्यांची आठवण येते. मग काय गावातून फोनवर फोन जातात कि तुझे नाव येथील वोटिंग लिस्ट वर आहे, मतदानाला येऊन आम्हाला सहकार्य कर. मात्र त्याच चाकरमान्यांच्या कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी होणाऱ्या खडतर प्रवासाशी राजकारणी लोकांना देणे घेणे नाही. अशा वेळी निवडणुकीतच आपल्या मागण्या पूर्ण करण्याची संधी चाकरमान्यांनी सोडू नये,

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search