SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागले होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे) जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटलाअसताना दहावीचा निकाल वाढणार की घटणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे
उद्या दिनांक 13 मे रोजी दुपारी ठीक 1 वाजता खालील संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.
12th Result date: यंदा १२ वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांचा पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये झालेल्या इ. १२ वीच्या परीक्षेचा निकाल ५ मे २०२५ रोजी दुपारी १ वाजता जाहीर करणार आहे. विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर (website) निकाल पाहू शकतील. तसेच, Digilocker ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका (marksheet) उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इ. १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची तयारी पूर्ण केली आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहे.
निकाल पाहण्यासाठी मंडळाने काही अधिकृत संकेतस्थळे (official websites) जाहीर केली आहेत. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना विषयवार गुण पाहता येतील. तसेच, निकालाची प्रिंट (print out) काढण्याची सोय देखील उपलब्ध आहे. कनिष्ठ महाविद्यालयांना त्यांचा एकत्रित निकाल (overall result) कॉलेज लॉगिनमध्ये पाहता येईल.
मुंबई: दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख केल्याने समाजातील सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर आता महामंडळाने ही प्रवेशपत्रे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जातीचा उल्लेख काढून नवीन प्रवेशपत्रे दिली जाणार आहेत. राज्य शिक्षण मंडळाने दिलगिरीदेखील व्यक्त केली आहे.
दहावी, बारावी परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर त्यांच्या जातीचा प्रवर्ग नमूद करण्यात आला होता. त्यानंतर विविध घटकांतून महामंडळावर टीका करण्यात आली होती. हा निर्णय विद्यार्थी हिताचा असल्याचं सांगत बोर्डाकडून त्याच समर्थन करण्यात आलं होतं. मात्र जनभावना लक्षात घेता हा निर्णय रद्द करण्यात आल्याचं राज्य शिक्षण मंडळाने म्हटलं आहे.
बारावीसाठी नव्याने प्रवेश पत्र देण्यात येणार असून त्यासाठी 23 जानेवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा प्रवेश पत्रे उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. तर दहावीसाठी 20 जानेवारीपासून प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. असे मंडळाने स्पष्ट केले आहे.
बोर्डाचे म्हणणे काय होते?
दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्याना समाजकल्याण तसंच, अन्य विभागांकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी माहिती द्यावी लागले. दहावी-बारावीनंतर विद्यार्थ्यांचे नाव, अडनाव, पालकांचे नाव, जन्मतारिख, जात याबाबत शाळेच्या रजिस्टरमध्ये बदल करता येत नसल्याने मंडळाने प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख केला असल्याचे मंडळाने म्हटलं होतं.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे दिलेल्या वेळापत्रकावर विभागीय मंडळाचे नाव, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, आईचे नाव, विद्याशाखा, अपंगत्व, बैठक क्रमांक, केंद्राचे नाव यासह प्रथमच जात प्रवर्ग नमूद केला होता. दहावी, बारावीच्या प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख ही अयोग्य बाबा असल्याचे मन अनेकांनी नोंदवलं होतं. समाजमाध्यमांवरुनही अनेकांनी टीका केली होती.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आता पाचवी आणि आठवीच्या वर्गातही मुलांना नापास केलं जाऊ शकतं. इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाईल. त्यातही ते नापास झाले तर नापास होतील आणि पुन्हा त्याच वर्गात शिकावे लागेल.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. आता नो डिटेंशन पॉलिसीला समाप्त करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात थेट ढकलणे बंद केले जाणार आहे. या नापास विद्यार्थ्यांना आता पुन्हा दुसऱ्यांदा परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे. मात्र ते जर दुसऱ्यांदाही नापास झाले तर त्यांना वरच्या वर्गात जाण्याची द्वार बंद केले जाणार आहे. मात्र तरीही आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढणार नाही असेही सरकारने म्हटले आहे.
नापास मुलांकडे विशेष लक्ष दिले जाईल
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. जर एखादा विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला 2 महिन्यांत पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळेल, मात्र त्यातही तो अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात पदोन्नती दिली जाणार नाही, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. मात्र या काळात पुन्हा नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुधारण्याची संधी दिली जाईल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्याकडे शिक्षक विशेष लक्ष देतील आणि पालकांना वेळोवेळी मार्गदर्शनही करतील.
नो डिटेन्शन पॉलिसी ही शिक्षण हक्क कायदा 2009 चे महत्त्वाचे धोरण होते. या धोरणांतर्गत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या मुलांना वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण करण्यात आले नाही. या धोरणांतर्गत पारंपारिक परीक्षांना सामोरे न जाता सर्व विद्यार्थ्यांना आपोआप पुढील वर्गात बढती देण्यात आली. या धोरणात मुलांचे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यमापन करण्यावर भर देण्यात आला होता.
SSC & HSC Exam Schedule: महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून १० वी आणि १२ बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांतर्गत दहावी-बारावीची अंतिम परीक्षा घेण्यात येते. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे.
महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत असून पहिले सत्र सकाळी ११:०० ते दुपारी २:०० आणि दुसरे सत्र दुपारी ३:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत असणार आहे. दहावीची परीक्षा पहिल्या दिवशी मराठी भाषेच्या पेपरने सुरू होईल आणि बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जाऊन विद्यार्थी वेळापत्रक डाउनलोड करू शकतात. तसेच, दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे प्रवेशपत्र जानेवारी २०२५ मध्ये जारी करण्यात येणार असून महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हॉल तिकीट प्रसिद्ध केले जाईल.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आगाऊ नियोजन करता यावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून जुलै किंवा ऑगस्टमध्येच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार यंदा ऑगस्ट महिन्यात दहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. तसेच वेळापत्रका संदर्भात काही हरकती सूचना असतील तर त्या २३ ऑगस्टपर्यंत राज्य मंडळाने मागविल्या होत्या. प्राप्त सूचनांवर विचार करून राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रकच अंतिम करण्यात आल्याचे आता दिसून येत आहे.
बारावी लेखी परीक्षा – 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025
बारावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025
दहावी लेखी परीक्षा – 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025
दहावी – प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा – 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी
सीबीएसई परिक्षांचे वेळापत्रक जाहीर
सीबीएसईने आपली वेबसाईट cbse.gov.in वर दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा २०२५ चे वेळापत्रक जारी केले आहे. वेळपत्रकानुसार, दोन्ही परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरु होतील. दहावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. तर १२ वीचा १५ फेब्रुवारीला एंटरप्रेन्योरशिपची परीक्षा असेल, तसेच १७ फेब्रुवारीला फिजिकल एज्युकेशनची परीक्षा असेल. तर ४ एप्रिलला मानसशास्त्र विषयाचा पेपर असेल.
मुंबई:सोशल मीडियावर इयत्ता पहिलीच्या बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या ‘जंगलात ठरली मैफल’ या कवितेवरून सध्या वाद होतोय. या कवितेवरून बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या दर्जावर, निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या कवितेत अस्वल, हत्ती, कोल्हा, वाघ, लांडगा, मुंगी, ससा, अशा प्राण्यांचा उल्लेख आहे. पण, या कवितेत काही हिंदी आणि इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये बात, शोर असे हिंदी शब्द, तर माउस, वन्समोअर अशा इंग्रजी शब्दांचा वापर झालाय. त्यामुळे या कवितेवर आक्षेप घेतला जातोय. ही कविता कोणत्या निकषांवर बालभारतीच्या पुस्तकात निवडण्यात आली? असा सवाल सोशल मीडियावरून विचारला जातोय. ‘मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजे’ या नावानं फेसबुकवर ग्रुप आहे. या ग्रुपचे सदस्य संदीप जोशी यांनी सोमवारी सकाळी या कवितेचा फोटो या ग्रुपमध्ये शेअर केला होता
दीपक केकसरकर यांचे समर्थन
समाज माध्यमांवर मराठी भाषा प्रेमींनी मोठ्या यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मात्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसकर यांनी मात्र या कवितेचे समर्थन केले आहे. “वन्स मोअर” या शब्दाला पर्यायी मराठी शब्द आहे का? यमक जुळवण्यासाठी इंग्रजी शब्द वापरला तर त्याचा बाऊ करण्याचे कारण नाही. आपण ‘टेबल’ हा इंग्रजी शब्द मराठीत सर्रास वापरतोय” अशा शब्दात त्यांनी या कवितेचं समर्थन केले आहे.
10th Result 2024:दोन दिवसांपूर्वीच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 10 वीचा निकाल जाहीर करण्यात आला. मागच्या या वर्षी या परीक्षेचा एकूण निकाल 95.81% इतका लागला आहे. मागच्यावर्षी पेक्षा साधारण 1.98 % ने यामध्ये वाढ झाली असली तरीही या निकालात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे मराठीमध्ये नापास झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.
महाराष्ट्राची राज्यभाषा असलेल्या मातृभाषेच्या विषयातच हजारो विद्यार्थ्यांनी गटांगळ्या खाल्ल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर अधिक भर देण्याचं धोरण राबवलं जात असताना अशी स्थिती आहे.
प्रथम भाषा इंग्रजी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी याच इंग्रजीमध्ये नापास होण्याचं प्रमाण हे मराठी प्रथम भाषा निवडून नापास होणाऱ्यांपेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 10 लाख 94 हजार 152 विद्यार्थ्यांनी मराठी या विषयाची परीक्षा दिली. त्यापैकी 10 लाख 55 हजार 715 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजेच राज्यामध्ये 38 हजार 437 विद्यार्थी मराठीत नापास झाले आहेत.
वाचकांच्या प्रतिक्रिया
“एक काळ होता जेव्हा परकीयांची इंग्रजी भाषा दहावी बारावी परीक्षा पास होण्याकरता सर्वात मोठा अडथळा ठरत होती. आता मात्र चित्र उलट दिसत आहे. मराठी भाषा परकी होत चाललेली दिसत आहे.”
श्री. दिगंबर गणपत राणे, माहीम
“राज्य शिक्षण मंडळाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना मराठी विषय अवघड का जात आहे याबाबत सविस्तर विश्लेषण केले पाहिजे आणि त्यानुसार शिक्षणपद्धतीत बदल केला गेला पाहिजे.”
CBSE Board 12th Result Update :केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने यंदाच्या वर्षातील इयत्ता आज बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये बारावीच्या परीक्षेत एकूण 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या या परीक्षेत सुमारे 17 लाख विद्यार्थी बसले होते.या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 91% मुलीं या परीक्षेत पास झाल्या आहेत. तर मुलांचा निकाल 85.12% एवढा लागला आहे.
HSC and SSC result 2024 : दहावी आणि बारावीच्या निकालाच्या तारखेबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 6 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात देण्यात आली आहे.
उत्तर पत्रिका तपासण्याचे काम जोरात चालू असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच निकालाची नेमकी तारीख जाहीर करणार असून बारावीचा निकाल 25 मे पर्यंत तर दहावी चा निकाल दिनांक 06 जून पर्यंत जाहीर करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात.
दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. बारावीच्या परीक्षा तब्बल 3 हजार 320 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आल्या. दुसरीकडे दहावीची परीक्षा 5 हजार 86 केंद्रावर घेण्यात आली. मंडळाकडून या परीक्षेची जोरदार तयारी करण्यात आली. काॅपीमुक्त परीक्षा करण्यासाठी मंडळाने अगोदरच कंबर कसल्याचे देखील यंदा बघायला मिळाले.
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भागात येतो. शाळांच्या सुधारित संचमान्यतेत हा उल्लेख चुकून राहिला होता. या संदर्भात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सुधारित संच मान्यतेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगराळ भागाची सवलत मिळेल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे स्पष्ट केले.
सध्या शाळांच्या सुधारित सुधारित संच मान्यतेमुळे सिंधुदुर्गातील शाळा अडचणीत येणार असल्याची भीती शिक्षणतज्ञ व्यक्त करत आहेत. या संदर्भात केसरकर यांना विचारले असता, सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भाग आहे. दुर्गम भागातील शाळांना वीसच काय, त्याखालील पटसंख्या भरणे मुश्कील आहे. मान्यतेत या जिल्ह्याला पूर्वी सवलत देण्यात आली होती. डोंगराळ भागाचा उल्लेख सुधारित संचमान्यतेत करण्यात आला नव्हता. ती सुधारणा आता करण्यात येईल. अल्पसंख्याक शाळांबाबतही अशी सुधारणा करण्यात येणार आहे. या शाळांनाही पटसंख्येचा प्रश्न भेडसावत असतो. त्यांनाही पूर्वीची सवलत राहणार आहे. सध्याच्या शाळांचे मुख्याध्यापकपद सुधारित संचमान्यतेमुळे निष्कासित होणार नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.