Category Archives: स्थानिक बातम्या

दोडामार्ग भेडशी गावची सुकन्या साक्षी गावडेची गोवा रणजी क्रिकेट संघात निवड

 

मुंबई: दोडामार्ग तालुक्यातील भेडशी खानयाळ गावची सुकन्या आणि सद्यस्थितीत मुंबई-दहिसर येथे स्थायिक असलेल्या साक्षी बंड्या गावडे हिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवड झाली असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. साक्षी हिने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. इयत्ता सातवी पासून लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहे. तिचे वडील बंड्या गावडे यांना क्रिकेटची फार आवड. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिची यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये १६ आणि १९ वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिचा परफॉर्मन्स पाहून गोवा क्रिकेट अकॅडमीने तिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलराऊंडर म्हणून निवड केली आहे. सध्या ती गोवा येथे रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील अशोक नारायण परब (मांजरेकर) यांची ती नात असून रणजी संघामध्ये झालेल्या निवडीबद्दल तिच्या मामेगावी कलंबिस्त येथे तिचे कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, निलेश पास्ते, अशोक राऊळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल हॉटेल्स आणि विविध कामांसाठी ३९ कोटींचा आराखडा तयार – आ. दिपक केसरकर

   Follow us on        

सावंतवाडी, दि. १२ फेब्रु. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लागणार्‍या पाण्याची व्यवस्था, रेल हॉटेल व छोटे निवासी रूम तसेच नव्या प्लॅटफॉर्मसाठी जवळपास 39 कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आरा  खडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी लागणारा निधी रत्नसिंधू योजनेतून देण्यात येणार असल्याची माहिती रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सावंतवाडी स्थानकावर लवकरच ठिकाणी रेल हॉटेल्स व रूम उभारण्यात येणार असून तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याची निविदा प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे. सावंतवाडी- मळगाव रेल्वे टर्मिनस या ठिकाणी दर्जेदार असे रेल हॉटेल व तुतारी रेल्वे रुळाच्या बाजूला नवे प्लॅटफॉर्म आणि छोट्या निवासी रूमची व्यवस्था करण्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या जागेची पाहणी आज श्री केसरकर यांनी केली. यावेळी त्यांनी जवळपास दोन तास सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनसच्या जागेची पाहणी केली. आणि तुतारी एक्सप्रेसमध्ये बसून नवीन आराखड्याची चर्चा केली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, स्टेशन मास्टर कृष्णकांत परब , रेल्वेचे जे पी प्रकाश, श्री ए बी फुले, सुरज परब, सुनील परब ,श्री गाड , योगेश तेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वैभव सगरे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी: जि. प. शाळा टेरव क्रमांक १ येथे शैक्षणिक साहित्य वितरण

सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम

   Follow us on        

चिपळूण:- SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून व सेवा सहयोग फाउंडेशन या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या सहकार्याने जिल्हा परिषद शाळा टेरव क्रमांक १ या शाळेतील इयत्ता १ली ते ७ वीच्या १५१ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोटबुक व इतर शैक्षणिक साहित्याचे रविवार दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी दहा वाजता वितरण करण्यात आले.

तसेच श्री रुपेश श्याम कदम फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने वरील शाळेतील तसेच सुमन विद्यालय टेरव या शाळेतील मिळून २५८ विद्यार्थ्यां खाऊचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास मा.श्री. सुधाकर कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.रश्मी काणेकर, उपाध्यक्षा सौ. दिक्षिता मोहिते, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ.मानवी मेंगे, सौ.मानसी दाभोळकर, सौ. रूचीता हेमंत तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री.महेंद्र खांबे, टेरव वेतकोंड पोलीस पाटील सौ.वृषाली लाखण, तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री दिपक मोने, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. टेरव सारख्या ग्रामीण भागात SS &C – Globe Op या कंपनीच्या माध्यमातून सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल आभार व ऋण व्यक्त करण्यात आले.

रत्नागिरीत प्रथमच होणार क्षेत्रीय वैदिक संमेलन; १०० वैदिक पंडितांच्या उपस्थितीत होणार वेदमंत्रांचा जागर

   Follow us on        

रत्नागिरी:महर्षी हर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन दिनांक ७,८,९ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे.

महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक या ४ राज्यांतून प्रमुख मंदिरांचे पुजारी आणि विविध वेद पाठशाळांमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत असणारे शिवाय वेदातील क्रमांत, घनांत असे अध्ययन पूर्ण केलेले वैदिक मान्यवर येणार आहेत. या ३ दिवसांच्या संमेलनात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या ४ वेदांच्या विशिष्ट शाखांचे सामूहिक पठण होणार आहे.

हे संमेलन रत्नागिरी शहरातील माधवराव मुळ्ये भवन येथे संपन्न होणार असून संमेलनात वेद, वेदविज्ञान या संबंधी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि त्यांचे महत्व जनमानसापर्यंत पोहचावे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा संमेलनाला वेदप्रेमी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आलेले आहे

राजमाता जिजाबाई भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” ची “एकलव्य आश्रम शाळा” आदिवासी शाळेस सदिच्छा भेट

   Follow us on        

पालघर:- रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी स्वराज्य जननी, राजमाता जिजाबाई भोसले व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” च्या वतीने “एकलव्य आश्रम शाळा” हिरडपाडा, ता. जव्हार, जि. पालघर या आदिवासी शाळेस सदिच्छा भेट देण्यात आली. सदर प्रसंगी “बेस्ट शिव हनुमान मंदिर ट्रस्ट” कडून या शाळेस राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत तुकाराम महाराज, राजश्री शाहू महाराज, स्वामी विवेकानंद अशा अनेक थोर व्यक्तींचे फ्लेक्स फोटो व नकाशे वेगवेगळ्या वर्गात लावण्यासाठी भेट देण्यात आले. शिवाय शाळेतील सर्व मुलांना खाऊचे वाटप सुद्धा करण्यात आले….

सदर कार्यक्रमासाठी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे, सचिव श्री. नारायण चव्हाण, उपाध्यक्ष श्री. ओमप्रकाश सिंह, खजिनदार श्री. सूरज सिंह, तसेच विश्वस्त श्री. सतिश राणे व सुनिल सिंह उपस्थित होते. शाळेतर्फे शाळेचे संचालक श्री . दिलिप पटेकर, मुख्याध्यापक श्री. मेदगे, शिक्षक श्री. राजेश विंचूरकर, श्री. नागरगोजे, श्री.जरे, श्री. पाटील , श्री. इंगळे, श्री. बडगुजर उपस्थित होते.

ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार राणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ट्रस्ट तर्फे केली जाणारी मदत योग्य ठिकाणी पोहचत आहे याबद्दल समाधान व्यक्त केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शूभेच्छा दिल्या……

पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते श्री क्षेत्र टेरव देवस्थान दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

   Follow us on        
चिपळूण: श्री क्षेत्र टेरव, कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थान २०२५ दिनदर्शिकेचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा, कोकणचे लाडके सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते नुकताच दिमाखात संपन्न झाला. गेली १५ वर्षे भाविक व ग्रामस्थांना आकर्षक, दर्जेदार व परिपूर्ण  दिनदर्शिका भेट देण्यात येत आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही  दिनदर्शिकेला  वाढती  मागणी आहे.  टेरव गावातील सर्व ग्रामस्थांना तसेच मुंबई, पुणे, ठाणे, सुरत इ. शहरात वास्तव्यास असलेल्या  टेरव वासियांना सदर दिनदर्शिकेचे  वितरण करण्यात येणार आहे.
देवस्थानात तसेच टेरव गावात साजरे होणारे सार्वजनिक सण, उत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.

कुडाळ: शाळकरी मुलांकडून साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप

क्रिकेट व भजन मंडळाच्या माध्यमातून प्राप्त रक्कमेचा समाजोपयोगी विनियोग

   Follow us on        

साळगाव जांभरमळा येथील श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाने मे 2024 मध्ये क्रिकेट सामने आयोजित केले होते. जमा झालेल्या निधीतून या मंडळातील शाळकरी मुलांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेतला. साळगाव जांभरमळा प्राथमिक शाळेतील मुलांना वह्या वाटप करून या मंडळातील शाळकरी मुलांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. साळगाव पंचक्रोशी मध्ये या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या मंडळातील कु. चैतन्य हळदणकर, कु. स्वप्नील सामंत, कु. सर्वेश हळदणकर, कु. तुकाराम हळदणकर, कु. कुणाल पारकर, कु. अजिंक्य हळदणकर, कु. शंकर नागडे, कु. प्रथमेश डिचोलकर, कु. सोहम हळदणकर, कु. साहिल हळदणकर, कु. शुभम धुरी यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी पालकवर्गातून श्री. सुखानंद हळदणकर, श्री.निलेश सावंत, श्री.शुभम धुरी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. प्रशांत वेंगुर्लेकर सर, शिक्षक श्री. विनेश जाधव सर यांनी साळगाव जांभरमळा शाळेच्या वतीने श्री पाटेकर बालगोपाल भजन व क्रीडा मंडळाचे आभार व्यक्त केले

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search