Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: तब्बल १५ स्लीपर कोच असलेल्या विशेष गाडीला जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    Follow us on        
Konkan Railway News: या वर्षी  कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी एका गाडीची सेवा जानेवारी २०२५ अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १५ स्लीपर कोच असलेल्या या गाडीला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात आलेला प्रतिसाद पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक ०९ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक  दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती  मंगळुरू जंक्शनला  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५  वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.गुरुवार आणि सोमवारी रात्री २२:१०  वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३ :०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Loading

मध्यरेल्वेच्या २२ विशेष गाड्यांचा डिसेंबरपर्यंत विस्तार; कोकण रेल्वे मार्गावरील एका गाडीचा समावेश

   Follow us on        
Railway News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी  मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची कालावधी डिसेंबरपर्यंत विस्तारित  करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २२ विशेष गाड्यांचा अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणार्‍या  ०११३९/०११४० नागपूर-मडगाव- नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीची सेवा या वर्षाच्या सप्टेंबर अखेरीस संपणार होती. मात्र तिची सेवा डिसेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूने प्रत्येकी  २६  प्रमाणे या गाडीच्या एकूण ५२ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव ही विशेष गाडी दिनांक २८ डिसेंबर २०२४ पर्यंत चालविण्यात येणार असून गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर ही गाडी दिनांक २९ डिसेंबर २०२४ पर्यंत या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे, डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी

 

Loading

Konkan: रेल्वेच्या ‘या’ कहाण्या अधुऱ्याच….

   Follow us on        

वाचकांचे व्यासपीठ: कोकण रेल्वे २५ वर्षापूर्वी कोकणात आली. कोकण रेल्वे मार्ग साकारणे हे अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक कार्य KRCL कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने आणि त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींनी अगदी लीलया पेलले. मात्र त्यानंतर आतापर्यंत पाहिजे तसा विकास कोकण रेल्वेचा झाला नाही. असे नाही की प्रयत्न झालेच नाही. कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक योजना, प्रस्ताव पुढे आलेत, मात्र त्यांना मूर्त स्वरूप देण्यात अपयश आले. कोणत्या आहेत या योजना आणि प्रस्ताव हे थोडक्यात पाहू.

राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना चिपळूण कराड रेल्वे मार्ग होणार असे जाहीर केले गेले होते. या प्रस्तावाला ७ मार्च २०१२ रोजी मंत्रिमंडळात मान्यताही दिली गेली होती. मात्र त्यानंतर यासाठी प्रयत्न झाले नाहीत. मात्र कोकण आणि पाश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रेल्वे मार्ग मृगजळच ठरला आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू रेल्वे यांच्या प्रयत्नाने कोल्हापूर वैभववाडी मार्ग याबाबत सर्वेक्षण झाले होते. मात्र पुढे यासाठी म्हणावे तसे प्रयत्न न झाल्याने हाही मार्ग रखडला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा मार्ग होणे काळाची गरज आहे त्यामुळे गणपती मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ज्यादा गाड्याअप किंवा डाउन कोल्हापूर मार्गे वळवता येतील व गाड्यांचा होणारा खोळंबा रोखता येईल.

विद्यमान खासदार नारायण राणे काँग्रेसच्या सत्तेत मंत्री असताना सावंतवाडी ते रेडी रेल्वे मार्ग टाकण्याचे सुतवाच झाले होते त्याचे पुढे काय झाले? कणकवली ते रेडी पर्यंत स्वतंत्र टॉय ट्रेन सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरणार अशी रेवडी त्याच वेळेला उडवली होती त्या रेवडीचे पुढे काय झाले? हे देखील प्रश्नच आहेत.

सावंतवाडी आंबोलीमार्गे बेळगाव जोडण्याची एक रेवडी मध्यंतरी उडवली केली होती त्यामध्ये सीमा वरती भागातील काही आमदार खासदार सक्रिय झाले होते त्याचे पुढे काय झाले ?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस याचा कोनशिला समारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला होता. खरं म्हणजे सावंतवाडी टर्मिनस काळाची गरज आहे. मे महिन्यामध्ये आणि गणपती मध्ये सावंतवाडी टर्मिनस जर पूर्ण झाले तर जादा गाड्या सोडता येतील तसेच वसई सावंतवाडी कल्याण सावंतवाडी पुणे सावंतवाडी अशा गाड्या सोडता येतील

सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न येत्या दिवाळीपूर्वी सोडवून निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्या टर्मिनसचे उद्घाटन करा आणि त्याला मधु दंडवते यांचे नाव द्या कारण कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे आणण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मधू दंडवते जॉर्ज फर्नांडिस यांना जाते. 2024 साल हे मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे तरी या वर्षात टर्मिनसला त्यांचे नाव देऊन सावंतवाडी टर्मिनस वरून स्पेशल गाडी वसई किंवा कल्याण पर्यंत सोडण्यात यावी हीच मधु दंडवते यांना आदरांजली ठरेल. पाणी भरण्याची आणि पाण्याची सोय आता दीपक केसरकर यांनी पूर्णत्वास नेलेली आहे तिलारी प्रकल्पातून पाणी देण्याची योजना त्यांनी मंजूर केलेली आहे तरी लवकरात लवकर सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करून मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे.

 

श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर 

संस्थापक सदस्य कोकणरेल्वे

सल्लागार :अखंड कोकण रेल्वे सेवा समिती

Loading

मागितले एक; दिले भलतेच.. वांद्रे-मडगाव एक्सप्रेसबाबत कोकणकरांची नाराजी

   Follow us on         मुंबई: वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने पश्चिम रेल्वेवरून नेहमीसाठी व रात्रीची वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा स्लो मधू दंडवते एक्सप्रेस सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.यासाठी कोकण रेल्वे,मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे प्रशासन,रेल्वे बोर्ड व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला होता . मात्र आत्ताच नव्याने सुरू करण्यात आलेल्या वांद्रे मडगाव एक्सप्रेसच्या थांब्या बाबत, वेळापत्रकाबाबत संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

आम्ही कोकणासाठी पॅसेजर मागतोय तुम्ही सुपरफास्ट देताय,आम्ही रात्रीसाठी रेल्वे मागतोय तुम्ही दिवसाला देताय,आम्ही कोकणासाठी रेल्वे मागतोय तर तुम्ही गोव्यासाठी देताय? कोकणातील फक्त सात रेल्वे स्थानकावर थांबणारी सुपरफास्ट एक्सप्रेस देऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकणी माणसाच्या जखमेवर मिठ चोळलेय अशा शब्दात संघटनेने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

कोकण रेल्वेच्या प्रकल्पात ज्या महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक २२% गुंतवणूक केली त्याच्या वाटयाला मध्यरेल्वेच्या फक्त तीनच रेल्वे आल्या,त्यामुळे पश्चिम रेल्वेवरून चालू झालेली नवीन रेल्वेही वांद्रे ते वसईमार्गे सावंतवाडीपर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस चालवावी म्हणजे किमान कोकणातील प्रत्येक तालुक्याला एकतरी हॉल्ट मिळेल अशी मागणी करणाऱ्या प्रवासी संघटनेची धारणा होती.मात्र कोकण रेल्वेने बोरीवली मार्गे सुटणारी स्लो रेल्वे न देता बोरीवली ते मडगाव दरम्याने धावपारी सुपरफास्ट एक्सप्रेस १०११५/१६ देऊन काय साध्य केले?

कोकणातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हातील तब्बल ३४ रेल्वे स्थानकांवर हया पश्चिम रेल्वेवरून सुरू झालेल्या नवीन रेल्वेला हॉल्टच दिला नाही.यामध्ये १)आपटे २) जिते ३) पेण ४) कासू ५) नागोठणे ६) कोलाड ७) इंदापूर ८) माणगाव ९) गोरेगाव रोड ८) सापे वामने ९) करंजडी १०) विन्हेरे ११) दिवाणखवटी १२) कलंबनी बु. १३) खेड १४) अंजनी १५) कामथे १६) सावर्डा १७) आरवली रोड १८) कडवई १९) संगमेश्वर रोड २०) उक्षी २१) भोके २२) निवसर २३) आडवली २४ ) वेरवली २५) विलवडे २६) सौंदळ २७) राजापूर रोड २८) खारेपाटण रोड २९) वैभववाडी रोड ३०) आचरणे ३१) नांदगाव रोड ३२) सिंधुदुर्ग ३३) कुडाळ ३४) झाराप ह्या स्टेशनवरील चाकरमनी मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये राहत नाहीत का?असा संतप्त सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.

लोकसभा प्रचाराच्या वेळी मंत्री पियुष गोयल यांनी मला मतदान करा मी कोकणाला नेहमीसाठी रेल्वे सुरू करून देतो असे आश्वासन दिले होते स्वाभिमानी कोकणी माणसाने गोयल यांना भरभरून मतदानही केले पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पियुष गोयल हे सर्वाधिक मताधिक्याने निवडूनही आले, कोकणी माणसामुळे साहेब पुढे कॅबिनेट मंत्रीही झाले व पुढे जाऊन द्विसाप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस कोकणा ऐवजी गोव्यासाठी सोडण्याचे प्रयोजन मंत्री महोदयांनी केले त्यामुळे ही सुपरफास्ट एक्सप्रेस नेमकी कोकणासाठी की गोव्यासाठी असा सवाल श्री.यशवंत जडयार यांनी विचारला आहे.

पश्चिम रेल्वेवरून नवीन सुरू होणाऱ्या बांद्रे ते मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेसला फक्त बोरीवली,वसई,पनवेल,रोहा,विर,चिपळूण,रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग,सावंतवाडी,थिवीम,करमळी हे थांबे देण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवासी संघटना ह्या रेल्वेची रात्रीसाठी मागणी करीत आहे तरीही ती दिवसाची दिल्याने ती तळकोकणात रात्री १०.३५ च्या दरम्याने पोहोचतेय.म्हणजे कोकणातील लोकांनी मुंबईतून ३०० रू.मध्ये रेल्वेने जायचे आणि तेथे उतरल्यावर १५०० रू.ची रिक्षा करून घरी जायचे.

प्रवासी संघटनेच्या वतीने पश्चिम रेल्वेवरून वसईमार्गे कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी मागील १o वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे यासाठी वसई विरारमध्ये फक्त एका महिन्यामध्ये १८ हजार सहयांचे क्याम्पीयनही राबवले,कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कार्यालयासमोर उपोषण,वसई रोड येथे रेल्वे आंदोलन,सावंतवाडी रोड येथे लाक्षणिक उपोषण केले तर माजी खासदार श्री.विनायक राऊत,श्री.राजेद्र गावीत,श्री.गोपाळ शेट्टी तर विद्यमान खासदार श्री.नारायण राणे,श्री.पियुष गोयल,श्री.अरविंद सावंत,श्रीम.सुप्रिया सुळे व रेल्वे प्रशासन यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला आहे.त्यामुळे फक्त कोकणासाठी स्वतंत्र्य रेल्वे मिळणे अपेक्षित होते,मात्र प्रवासी संघटनेने पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष ही नवीन रेल्वे सोडताना कोकण रेल्वे प्रशासनाने ह्या प्रवासी संघटनांशी संपर्क न साधता वेळापत्रक परस्परच जाहिर केले.

पश्चिम उपनगरातील कोकणातील प्रवाशांनी मागील १० वर्षे ही रेल्वे मिळवण्यासाठी संघर्ष केला आत्ता पुढील १० वर्ष त्याचे हॉल्ट मिळवण्यासाठी कोकणकरांनी आंदोलने / उपोषण करत राहायची का? असा सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.

वांद्रे मडगाव एक्सप्रेस नेहमीसाठी सुरू करून त्यातील एक जनरल कोच वसई रोड स्टेशनला राखीव ठेवावा व किमान माणगाव,खेड,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड व कुडाळ ह्या तालुक्याच्या ठिकाणी जादाचे हॉल्ट मिळावेत अन्यथा प्रवासी संघटना आपल्या मूळच्या वसई सावंतवाडी पॅसेंजरच्या मागणीवर ठाम असल्याचे प्रवासी संघटनेने सांगितले.

आज पश्चिम रेल्वेच्या वसईमार्गे दक्षिणेतील राज्यामध्ये दिवसाला साधारण ५ सुपरफास्ट एक्सप्रेस जात आहेत,त्यामुळे कोकणाला सुपर फास्ट एक्सप्रेसची आवश्यकताच नाही आहे. दिव्यावरून सावंतवाडी पर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस जाऊ शकते तर वांद्रे ते सावंतवाडी पॅसेंजर का शक्य नाही? नवीन सुपर फास्ट एक्सप्रेस कोकणाच्या नावाखाली गोव्याला देण्यापेक्षा कोकण रेल्वे प्रशासनाने ती उरलेल्या ३४ स्टेशनवर थांबवावी असे श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.

Loading

Konkan Railway: धक्कादायक: कन्फर्म तिकिटांच्या सीटच गायब; रेल्वेचा भोंगळ कारभार समोर

   Follow us on        
कोकणात गणेश चतुर्थीस गावी जाण्यासाठी सर्वात सोयीचा आणि परवडणारा पर्याय म्हणून मुंबईचा चाकरमानी कोकण रेल्वेला प्राधान्य देतो. जायची आणि यायची कन्फर्म आरक्षित तिकिटे भेटली की तो निर्धास्त होतो. तीही न भेटल्यास दलालांकडून दुप्पट रक्कमेनेही ती विकत घेतो. मात्र गाडी पकडल्यावर याच कन्फर्म तिकिटांवर असलेला सीट नंबरच त्या डब्यातून गायब असल्यास?
हो, असे प्रकार रेल्वे प्रशासनाकडून घडत आहेत. खासकरून कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या प्रवाशांसोबत हे प्रकार घडत आहेत. कणकवली ते मुंबई १४ सप्टेंबर रोजी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसोबत हा प्रकार घडला आहे. या प्रवाशांकडे १२०५२ जनशताब्दी एक्सपेसची D5 या डब्याची कणकवली ते दादर सहा कन्फर्म तिकिटे होती. मात्र जेव्हा ते गाडीत चढले तेव्हा त्यांच्या सीटच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडील तिकिटावर ११४,११५,११६,११७,११८ आणि ११९ असे सीट नंबर होते. मात्र या डब्यात शेवटचा सीट नंबर १०६ होता. पीएनआर चेक केले असता या तिकिट्स रद्द दाखवत होत्या. या प्रकारामुळे या  प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.
आरक्षण करताना कन्फर्म असणारी तिकिटे चार्ट तयार होताना रद्द होत आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जनशताब्दी एक्सपेस गाडीच्या सेकंड चेअर क्लासचे आरक्षण करतेवेळी डब्यांमधील १२० सीटप्रमाणे तिकिटे उपलब्ध करून दिली जातात. मात्र काही वेळा १२० सीटचा डबा उपलब्ध नसल्याने त्याजागी १०६ सीट असलेला डबा जोडला जातो आणि १४ तिकिटे रद्द केली जातात. त्यामुळे हे सीट नंबर आलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Loading

महत्वाचे: कोकण रेल्वेतील विविध पदांच्या भरतीसाठी आजपासून अर्ज स्विकारणी सुरू




KRCL Recruitment:   कोकण रेल्वेने KRCL विविध स्तरावरील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने विविध पदांसाठी आणि  एकूण १९० जागांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत या पदांसाठी स्थानिकांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. जाहीर केलेल्या पदांसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ ते ०६ ओक्टोम्बर २०२४ अशी अर्ज करण्याची मुदत असणार आहे.
लेवल १ ते ७ पदांसाठी ही भरती असणार असून वेतन श्रेणी १८००० ते ४४९०० प्रति महिना असणार आहे. तर वयोमर्यादा १८ ते ३६ अशी आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून वयाच्या अटी नियमाप्रमाणे शिथिल केल्या आहेत.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच स्थानिकांसाठी प्राधान्य 
 या भरतीत प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. पहिले प्राधान्य महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात येईल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्ग या तिन्ही राज्यातून ज्या भागातून गेला त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात येईल. तिसरे प्राधान्य महाराष्ट्र, गोवा आणि  कर्नाटक या तिन्ही राज्यातील उमेदवारांना तर त्यानंतर सध्या कोकण रेल्वेच्या सेवेत असलेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे
.
अधिक माहितीकरिता खालील जाहिरात वाचावी



Loading

….मग वंदेभारत एक्सप्रेसला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन थांबे देण्यास अडचण कोणती?

जर कोल्हापूर वंदे भारत ही ०७, ३२.७ आणि ३५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते तर मडगाव वंदे भारत सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही? असा प्रश्न कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या वतीने विचारला जात आहे. 

   Follow us on        

सिंधुदुर्ग: कोल्हापूर -पुणे आणि पुणे – हुबळी मार्गावर नवीन वंदे भारत येत्या १६ तारीख पासून सुरू होत आहे, वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ही वंदे भारत ट्रेन कोल्हापूरकरांचा दबावानंतर कोल्हापूरकरांना पुण्यासाठी स्वतंत्र वंदे भारत मिळाली.

पुण्याहून कोल्हापूर साठी सुरू झालेली ही वंदे भारत मिरज, सांगली,किर्लोस्करवाडी, कराड, सातारा येथे थांबेल, तसेच हुबळी साठी सुरू झालेली वंदे भारत सातारा,सांगली,मिरज,बेळगाव,धारवाड येथे थांबेल

या दोन्ही वंदे भारत ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाड्या सांगली जिल्ह्यातील सांगली आणि मिरज या दोन्ही स्थानकांवर थांबणार आहेत आणि या स्थानकातील अंतर आहे अवघे ७ किलोमीटर, तसेच कोल्हापूर वंदे भारत ही कराड आणि किर्लोस्करवाडी येथे देखील थांबेल,कराड ते किर्लोस्करवाडी स्थानकादरम्यान अंतर हे ३५ किलोमीटर आणि किर्लोस्करवाडी ते सांगली हे अंतर ३२.७ किलोमीटर आहे.म्हणजेच एकूण ३२६ किलोमीटरच्या या पूर्ण प्रवासात या गाडीला मध्ये ५ थांबे देण्यात आले.

परंतु कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेली मडगाव – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ कणकवली येथे थांबते. या गाडीला सावंतवाडी थांबा मिळावा म्हणून स्थानिकांनी आणि प्रवासी संघटनांनी आपल्या परीने प्रयत्न केले आहेत. तसे बघता कणकवली ते सावंतवाडी रेल्वे स्थानक हे अंतर ४९ किलोमीटर आहे आणि सावंतवाडी ते थिवी (गोवा) हे अंतर ३२.५ किलोमीटर आहे. जर कोल्हापूर वंदे भारत ही ०७, ३२.७ आणि ३५ किलोमीटर दरम्यानच्या अंतरावर थांबू शकते तर मडगाव वंदे भारत सावंतवाडी स्थानकावर का थांबू शकत नाही असा सवाल सावंतवाडी येथील जनता करत आहे. या व्यतिरिक्त मुंबई ते मडगाव या ७६५ किलोमीटर ( कोल्हापूर – पुणे स्थानकाच्या अंतरापेक्षा दुप्पट )अंतरात केवळ ७ थांबे देण्यात आले आहेत.

त्यामुळे प्रत्येक वेळी सावंतवाडी साठी वेगळा न्याय का, सावत्र वागणूक का ? आणि सावंतवाडी हे ऐतिहासिक, पर्यटन शहर असूनही या ठिकाणी वंदे भारत का थांबत नाही असे मत कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे सचिव मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांनी व्यक्त केले.

 

 

Loading

चाकरमान्यांसाठी खुशखबर! परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी ३ गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway Updates, दि.१२ सप्टें:  यावर्षी कोकणात गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे काही अनारक्षित गाड्यांची घोषणा आज करण्यात आली आहे. या गाड्यांमुळे जनरल डब्यांतील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.  सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.

१) गाडी क्र. ०१०६९ / ०१०७० मुंबई सीएसएमटी – खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित):

गाडी क्रमांक ०१०६९ मुंबई सीएसएमटी – खेड स्पेशल (अनारिक्षित) मुंबई सीएसएमटी येथून १२/०९/२०२४ रोजी रात्री २३:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:१५ वाजता खेडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०७० खेड – मुंबई सीएसएमटी स्पेशल (अनारक्षित) खेड येथून १६/०९/२०२४ रोजी पहाटे  ०६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 13.30 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी आणि कळंबणी बुद्रुक स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण 20 डबे  = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर  – ०२ .

 

२) गाडी क्र. ०१०७४ / ०१०७१  खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष:

गाडी क्रमांक ०१०७४ खेड – पनवेल अनारक्षित विशेष खेड येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी पहाटे ०६:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १० वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०७१ पनवेल – खेड अनारक्षित विशेष पनवेलहून  १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी सकाळी १ वाजता सुटेल आणि खेडला त्याच दिवशी दुपारी १४.४५ वाजता पोहोचेल.

ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर गाडी थांबेल.

डब्यांची रचना : एकूण 20 डबे  = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर  – ०२ .

3) ट्रेन क्र. ०१०७२ / ०१०७३ खेड – पनवेल – खेड अनारक्षित विशेष :

गाडी क्रमांक ०१०७२ खेड – पनवेल अनारक्षित विशेष खेड येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी दुपारी १५:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०.३० वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०७३ पनवेल – खेड अनारक्षित स्पेशल पनवेल येथून १३/०९/२०२४, १४/०९/२०२४ आणि १५/०९/२०२४ रोजी रात्री २१:१० वाजता सुटेल आणि  दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०१:०० वाजता खेडला पोहोचेल.

ही गाडी कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण या स्थानकांवर गाडी थांबेल.

डब्यांची रचना : एकूण 20 डबे  = सामान्य – १४, (अनारक्षित) स्लीपर – ०४, एसएलआर  – ०२ .

 

Loading

चाकरमान्यांसाठी खुशखबर! परतीच्या प्रवासासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        
Konkan Railway Update: कोकणात यावर्षी गणेश चतुर्थीला गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी एक खुशखबर आहे. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पनवेल ते मडगाव जंक्शन दरम्यान धावणार असून तिचा तपशील खालील प्रमाणे.
गाडी क्र. ०१४२८ / ०१४२७ मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. विशेष:
गाडी क्रमांक ०१४२८ दिनांक १५/०९/.२०२४ रोजी मडगाव जंक्शन येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल.ती त्याच दिवशी रात्री २२:१५  वाजता पनवेल येथे पोहचेल.
गाडी क्रमांक ०१४२७ दिनांक १५/०९/.२०२४ रोजी पनवेल जंक्शन येथून रात्री २२.४५ वाजता सुटेल.ती दुसऱ्या दिवशी दिवशी सकाळी  ११.०० वाजता मडगाव  येथे पोहचेल.
या गाडीचे थांबे: गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव येथे थांबेल. रोहा आणि पेण
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०३ कोच, ३ टायर एसी इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ डबे, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Loading

खुशखबर! जनरल तिकिटासोबत स्लीपर डब्यांतून प्रवास करा; चाकरमान्यांसाठी उद्यासाठी रेल्वेची अजून एक विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway Updates: कोकणात गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची पहिली पसंदी असलेल्या रेल्वेने यावर्षी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी खूप चांगली दक्षता घेतली आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने यावर्षी चांगल्या संख्येत अतिरिक्त गाड्या चालविण्यात आल्या आहेत. मात्र या गाड्यांचेही आरक्षण फुल्ल झाल्याने ज्या प्रवाशांना आर्कषित तिकिटे भेटली नाहीत अशा प्रवाशांच्या सोयीकरिता अनारक्षित गाड्या चालविण्यात आल्या आहेत. या अनारक्षित गाड्यांत अजून एका गाडीची भर आहे. या गाडीची माहिती खालीलप्रमाणे
०११८३ / ०११८४  सिएसएमटी – कुडाळ – सिएसएमटी अनारक्षित विशेष
गाडी क्रमांक ०११८३ विशेष गाडी दिनांक ०६ सप्टेंबर (शुक्रवारी) रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या स्थानकावरून रात्री २२.३० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी सकाळी ९.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११८४ विशेष गाडी दिनांक ०७ सप्टेंबर (शनिवार) रोजी कुडाळ या स्थानकावरून सकाळी  १०.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली,  राजापूर, वैभववाडी,कणकवली आणि सिंधुदुर्ग
डब्यांची संरचना: जनरल – ०२, स्लीपर (अनारक्षित) – १४, एसएलआर – ०२ एकूण १८ डबे
विशेष म्हणजे या गाडीला १४ स्लीपर डबे जोडण्यात येणार असून ते पूर्णपणे अनारक्षित असणार आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना जनरल च्या तिकिटामध्ये स्लीपर कोच मधून प्रवास करता येणार आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search