Category Archives: कोकण रेल्वे

Kokanai Exclusive | कोकण रेल्वेचा ईथेही ‘लेटमार्क’

   Follow us on        
Kokan Railway News :सध्या कोकण रेल्वेमार्गावर काही गाड्या नेहमीच उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सिंगल ट्रॅक आणि देखभालीच्या कामांसाठी हा लेटमार्क लागत असल्याची उत्तरे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. मात्र अजून एका गोष्टीत कोकण रेल्वे नेहेमीच ‘लेट’ होताना दिसते. कोकण रेल्वे आपल्या मार्गावर चालविण्यात येणार्‍या विशेष गाड्यांची माहिती खूपच उशिराने प्रसिध्द करत आहे.

भारतीय रेल्वे माहिती किंवा सुचना प्रसिद्धसाठी सोशल मीडिया चा मोठ्या प्रमाणात वापर करते. त्यात फेसबुक, ट्विटर ही माध्यमे वापरली जातात. त्याचबरोबर रेल्वेचा प्रत्येक विभाग स्वतःचे अधिकृत संकेतस्थळ याकरिता वापरते. या माध्यमातून रेल्वे संबधित माहिती उदा. मेगाब्लॉक, विशेष गाड्यांची घोषणा आणि ईतर माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवते. कोकण रेल्वे सुध्दा या माध्यमातून ही माहिती आपल्या प्रवाशांना देते. मात्र कोकणरेल्वे वर विशेष गाड्यां संबधित होणार्‍या घोषणा उशिराने होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. कोकण रेल्वे माहिती प्रसिद्ध करेपर्यंत विशेष गाड्यांचे आरक्षणही चालू होऊन फुल्ल झालेले असते.

अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर काल कोकण रेल्वेने आपल्या संकेतस्थळावर आणि समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या वास्को द गामा – मुझफ्फरपूर 07309/07310 विशेष गाडीच्या प्रसिद्धी पत्रकाचे (Press Note) चे देता येईल. या विशेष गाडीच्या फेर्‍या दिनांक 17 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने या गाडीचे प्रसिद्धीपत्रक अगदी एक दिवस आधी म्हणजे 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले आहे. तोपर्यंत या गाडीचे आरक्षण फुल होऊन प्रतीक्षायादी खूपच वर पर्यंत जावून पोचली आहे. कोकणच्या प्रवाशांना या गाडीची कल्पना नसल्याने या गाडीचा फायदा उत्तरप्रदेश तसेच पाश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना झाला आहे.

ही गोष्ट पहिल्यांदाच झाले असे नाही. असे प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. पाश्चिम आणि मध्य रेल्वे ज्या विशेष गाड्या चालवते त्या गाड्यांची माहिती कोकण रेल्वे योग्य वेळेत आपल्या प्रवाशांपर्यत का पोहोचवत नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाला या गाड्यांची कल्पना नसते असे होऊच शकत नाही. कारण कोणतीही विशेष गाडी चालविण्यासाठी त्या योजनेत संबधित विभागाला सामील करून घेऊनच विशेष गाडी सोडण्यात येते. तर मग यामागचे कारण काय? प्रवाशांच्या सेवेपेक्षा आर्थिक फायदा बघून रेल्वे असे जाणूनबुजून तर करत नाही ना? अशी शंका प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.

अर्धवट माहिती का? 

कित्येकदा रेल्वे प्रशासन विशेष गाड्यांची घोषणा तर करते मात्र आरक्षणाची तारीख जाहीर करत नाही. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होतो. विशेष गाड्यांची माहिती प्रसिद्ध करताना त्यासोबत आरक्षणाची तारीख ही जाहीर करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे.

 

Loading

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी हंगामात धावणार वास्को द गामा – मुझफ्फरपूर विशेष गाडी

Konkan Railway News: कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. २०२४ च्या उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी अजून एक विशेष साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
ट्रेन क्र. 07309 / 07310  वास्को दा गामा – मुझफ्फरपूर जं. – वास्को द गामा विशेष (साप्ताहिक):
गाडी क्र. 07309 वास्को द गामा – मुझफ्फरपूर जं. विशेष (साप्ताहिक) वास्को द गामा येथून 17/04/2024 ते 08/05/2024 पर्यंत दर बुधवारी संध्याकाळी 16:00 वाजता सुटेल ती  मुझफ्फरपूर जंक्शनला तिसऱ्या दिवशी सकाळी 09:45 वाजता पोहोचेल.
गाडी क्र. 07310 मुझफ्फरपूर जं. – वास्को द गामा स्पेशल (साप्ताहिक) मुझफ्फरपूर जंक्शन येथून 20/04/2024 ते 11/05/2024 पर्यंत दर शनिवारी दुपारी 13:00 वाजता निघेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 06:30 वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छोकी, पं. . दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण 20 एलएचबी कोच = 2 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी – 01 कोच, 3 टायर एसी इकॉनॉमी – 02 कोच, स्लीपर – 10 डबे, जनरल – 04 कोच, जनरेटर कार – 01, एसएलआर – 01.
वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

Loading

Voice Of Konkan | ‘या’ १५ एक्सप्रेस गाडयांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा का नाही?

   Follow us on        
सिंधुदुर्ग: कोकण रेल्वेच्या स्थापनेवेळी रेल्वे सेवा फक्त सावंतवाडी पर्यंत देण्यात येणार होती. परंतु नंतर ती ठोकूर पर्यंत नेवून दक्षिण रेल्वेला नेवून पोहोचवली.  त्यामुळे केरळ तामिळनाडू आणि कर्नाटक कारवार पासून पुढचा  आठ तासाचा प्रवासाचा वेळ वाचला. दक्षिणेकडील राज्यांपेक्षा महाराष्ट्राने कोकण रेल्वेच्या स्थापनेत मोठा वाटा उचलला होता. कित्येक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी यासाठी दिल्यात. मात्र ही वस्तुस्तिथी असताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला किती लाभ मिळाला याबाबत नेहमीच प्रश्न उठवले जात आहेत. त्याची कारणेही आहेत.
उदाहरण द्यायचे झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हयाचे देता येईल. राज्यातील पहिला आणि एकमेव पर्यटन जिल्हा जाहीर झालेल्या या जिल्ह्यातून एक दोन नाही  तर तब्बल १५ गाड्या (दोन्ही बाजूने विचार केल्यास एकूण ३० गाड्या) येथे थांबत नाहीत. वेळोवेळी मागणी करूनही येथे थांबे देण्यात येत नाहीत. मुंबई ते सिंधुदुर्ग अंतर ४५०/५०० किलोमीटर आहे. येथे सुपरफास्ट गाडयांना थांबे देणे गरजेचे असूनही वारंवार या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसणाऱ्या गाड्या
१) १२२०१/०२ – कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
२) १२४३१ /१२४३२ त्रिवंद्रम राजधानी एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
३) १२२२४/२३ एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
४) १२२८३/८४  – हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
५) १२४४९/५०  गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
६) १२२१७/१८ – केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
७) १२९७७/७८  – मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – वीर
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
८) १९५७७/७८ जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस
रायगड जिल्हा  – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा – थांबा नाही
९) १२४८३/८४ अमृतसर कोचुवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा – थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा – चिपळूण, रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१०) २२६५९/६० ऋषिकेश कोचुवली सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
११ २२४७५/७६ कोईमतूर हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- चिपळूण, रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१२) २०९२३/२४  गांधीधाम तिरुनवेली हमसफर एक्स्प्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१३) २०९०९/१० कोचुवेली पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१४) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
१५) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम  सुपरफास्ट एक्सप्रेस
रायगड जिल्हा- थांबा नाही
रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी
सिंधुदुर्ग जिल्हा- थांबा नाही
 सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर 
संस्थापक सदस्य, कोकण रेल्वे

Loading

महत्वाचे: उन्हाळी हंगाम विशेष गाड्यांचे आरक्षण उद्यापासून; अनारक्षित गाडीचे काही डबे आरक्षणासाठी उपलब्ध

   Follow us on        

Konkan Railway News: कोकणवासियांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या दोन गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 13 एप्रिल पासून सुरू होणार आहे.

एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११८७/०११८८ आणि एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११२९/०११३०   या दोन्ही गाड्यांचे आरक्षण उद्या सकाळी रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आहे.

अनारक्षित गाडीचे काही डबे आरक्षणासाठी उपलब्ध 

एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११२९/०११३०  ही गाडी पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची चालविण्यात येणार होती. मात्र रेल्वे प्रशासनाने या गाडीचे काही डबे (सेकंड सिटींग) आरक्षणासाठी उपलब्ध करून दिले असल्याचे जाहीर केले आहे.

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वेचा प्रवास भारतीय रेल्वेच्या ईतर विभागांपेक्षा महाग; कारण काय?

   Follow us on        
रत्नागिरी :मुंबई मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या चेअर कार श्रेणीचे खेड ते मडगाव (341 किमी) चे एकूण प्रवासी भाडे ११८५ रुपये इतके आहे, तर मुंबई – गांधीनगर या वंदे भारत एक्सप्रेसच्या त्याच श्रेणीचे बोरिवली ते वडोदरा दरम्यानचे, जवळपास तेवढ्याच अंतराचे (३६२ किमी)  भाडे ९९५ रुपये एवढे आहे. म्हणजे जवळपास २०० रुपयाचा फरक आहे. एकाच देशातील दोन समान गाड्यांच्या समान श्रेणीच्या प्रवासी भाड्यात एवढा फरक का हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबतीतच नाही तर इतरही गाड्यांच्या प्रवासीभाड्यात हा फरक येतो. असे का? कोकण रेल्वेचा प्रवास महाग आहे का? हे प्रश्न सहाजिकच पडतात. चला मग याचे उत्तर शोधूया.
रोहा ते ठोकूर हा विभाग कोकण रेल्वे म्हणजे कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड KRCL या कंपनीच्या अखत्यारीत येतो. कोकण रेल्वे मार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात खर्च आला होता. मोठं मोठी पूल, बोगदे आणि इतर गोष्टीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. या खर्चाचा आकडा 3,555 कोटी रुपये एवढा आहे.  हा खर्च वसूल करण्यासाठी कोकण रेल्वेला रेल्वे मंत्रालयाने अतिरिक्त भाडे आकारण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार रोहा ते ठोकूर दरम्यानचे अंतर प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी ४०% वाढवून दाखवून त्याप्रमाणात प्रवास भाडे आकारले जाऊ लागले. प्रवासी तिकिटांवर पण हेच अंतर छापले जाऊ लागले. उदाहरणार्थ रेल्वेने मुंबई सीएसएमटी ते मडगाव हे खरे अंतर ५८१ किलोमीटर एवढे आहे. मात्र प्रवाशांकडून हे अंतर ७६५ किलोमीटर असे दाखवून त्याचप्रमाणे भाडे आकारले जात आहे. यात रोहा ते मडगाव हे अंतर ४४० किलोमीटर एवढे आहे मात्र तिकीट आकारताना हे अंतर ६१६ एवढे दाखवून भाडे आकारण्यात येते.
खरे तर एकदा प्रकल्प निर्मितीचा खर्च वसूल झाला की अशा प्रकारची अतिरिक्त भाडे आकारणी बंद करून प्रचलित दराने भाडे आकारणी सुरु करण्याची गरज होती. कोकण रेल्वे गेली २५ वर्षे हे अतिरिक्त भाडे आकारत आहे. साहजिकच कोकण रेल्वे निर्मितीचा खर्च वसूल झालाच असेल मात्र KRCL ने ही वाढीव भाडे आकारणी चालूच ठेवली आहे.  कठीण भौगोलिक स्थितीमुळे मोठा देखभाल खर्च होत असल्याने ही वाढीव आकारणी चालू ठेवली असल्याचे कोकण रेल्वेचे म्हणणे आहे.
सर्व गाड्यांना लागू
या कारणामुळे कोकण रेल्वे नेटवर्कमधून जाणाऱ्या सर्व गाड्यांचे भाडे वाढलेल्या अंतरावर मोजले गेले. उदाहरणार्थ, मंगळुरु सेंट्रल ते मुंबई एलटीटी अशी मत्स्यगंधा एक्सप्रेस एकूण 882 किमी अंतर पार करते, ज्यापैकी ठोकूर आणि रोहा दरम्यानच्या 760 किमी प्रवासासाठी वाढीव भाडे आकारले जाते. जर तुम्हाला मुंबई सीएसएमटी ते कणकवली पर्यंत प्रवास करायचा असेल तर त्यासाठी मडगाव पर्यंतचे प्रवास भाडे रेल्वे ला द्यावे लागते यावरून कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास इतर विभागातील रेल्वेच्या प्रवाशांशी तुलना करता महागाच म्हणावा लागेल.

Loading

Konkan Railway | उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेमार्गावर अजून २ गाड्या; एकूण ३२ फेऱ्या

मुंबई,दि. ११ एप्रिल:उन्हाळी हंगामासाठी प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मध्यरेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर अजून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक ०८ एप्रिल ते ०९ जून पर्यंत या मार्गावर २ विशेष साप्ताहिक गाड्यांच्या जात येत एकूण ३२ फेऱ्या होणार आहेत.
१) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११८७/०११८८
गाडी क्र. ०११८७ एलटीटी – थिवी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)
ही गाडी दिनांक १८ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर गुरुवारी  मुंबई एलटीटी या स्थानकावरून रात्री १०.१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११८८  थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)  
परतीच्या प्रवासात दिनांक १९ एप्रिल ते ७  जूनपर्यंत थिविवरून दर शुक्रवारी सायं.४.३५ वाजता सुटेल ती एलटीटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी  पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल
थांबे:
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २२  एलएचबी कोच: फर्स्ट एसी -०१, टू टायर एसी – ०३ , थ्री टायर एसी – १५, पॅन्टरी कार – ०१, जनरेटर कार – ०२

२) एलटीटी – थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष  ०११२९/०११३० 

गाडी क्र. ०११२९  एलटीटी – थिवी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)
ही गाडी दिनांक २० एप्रिल ते ८ जूनपर्यंत दर शनिवारी मुंबई एलटीटी या स्थानकावरून रात्री १०.१५ वाजता सुटेल ती थिवी स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ९:५० वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०११३०  थिवी – एलटीटी साप्ताहिक विशेष (एकूण ८ फेऱ्या)  
परतीच्या प्रवासात दिनांक २१ एप्रिल ते ९ जूनपर्यंत थिविवरून दर शुक्रवारी सायं.४.३५ वाजता सुटेल ती एलटीटी स्थानकावर दुसऱ्या दिवशी  पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल
थांबे
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या स्थानकावर थांबेल.
डब्यांची संरचना
एकूण २२ आयसीएफ  कोच: सेकंड सीटिंग (जनरल) – २०, एसएलआर – ०२

 

Loading

कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगाब्लॉक; २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

   Follow us on        

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 7 ते 9:30 वाजेपर्यंत आरवली रोड ते रत्नागिरी विभागांदरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

1) Train no. 12617 Ernakulam – H. Nijamuddin Express 

या गाडीचा दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव ज.  – रत्नागिरी विभागादरम्यान 1 तास 45  मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.

2) Train no. 20923 Tirunelveli – Gandhidham Express

या गाडीचा दिनांक 11 एप्रिल रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव  ज. – रत्नागिरी विभागादरम्यान १ तास १० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणार्‍या तसदीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे

Loading

सावंतवाडी टर्मिनसला उघड पाठिंबा देणार तोच आमचा उमेदवार- सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना

लोकसभा निवडणुकीचा जो उमेदवार प्रवासी संघटनेच्या मागण्यांना आपल्या जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल असे सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

   Follow us on        
सावंतवाडी दि. ०७ एप्रिल: कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, रेल्वे गाड्यांना थांबे मिळावेत, टर्मिनस व्हावे, टर्मिनस ला प्रा मधू दंडवते यांचे नाव द्यावे अशा प्रवासी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत त्यासाठी लोकसभा निवडणुकीतील जो उमेदवार जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल. आतापर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी दुतोंडी भुमिका मांडली आहे यापुढे तशी भूमिका चालणार नाही असा इशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर व सचिव मिहीर मठकर यांनी दिला आहे.
आता लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनस ला उघड पाठिंबा देणार्‍या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी सावंतवाडी टर्मिनस बाबतीत जाहीर बोलावं, जाहीरनाम्यात रेल्वे स्थानक टर्मिनस विषय घ्यावा. टर्मिनस साठी आंदोलन छेडले गेले, टर्मिनस भूमिपूजन झाले आणि नऊ वर्ष रखडले आहे. टर्मिनस ला विरोध आणि बाजू घेणारे आज एकत्र आहेत. रेल्वेमंत्री यांना भेटल्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आश्वासन दिले होते. मात्र प्रवाशांची गैरसोय होत आहे याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे..
कोणतीही निवडणूक असली तर कोकणातून राजकारणी लोकांना चाकरमान्यांची आठवण येते. मग काय गावातून फोनवर फोन जातात कि तुझे नाव येथील वोटिंग लिस्ट वर आहे, मतदानाला येऊन आम्हाला सहकार्य कर. मात्र त्याच चाकरमान्यांच्या कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी होणाऱ्या खडतर प्रवासाशी राजकारणी लोकांना देणे घेणे नाही. अशा वेळी निवडणुकीतच आपल्या मागण्या पूर्ण करण्याची संधी चाकरमान्यांनी सोडू नये,

Loading

कोकण रेल्वे मार्गावर धावणार मध्यरेल्वेची समर स्पेशल ट्रेन, एकूण २४ फेऱ्या; आरक्षण ‘या’ तारखेपासून

   Follow us on        
Konkan Railway News: उन्हाळी हंगामात प्रवाशांची गर्दी लक्षात घेतून मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर एक लांब पल्ल्याची विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण २४ फेऱ्या होणार आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे
01463/01464 एलटीटी-कोचुवेली साप्ताहिक विशेष (एकूण 24फेऱ्या)
01463 साप्ताहिक विशेष गाडी दिनांक 11.04.2024 ते 27.06.2024 पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरून संध्याकाळी 4:00 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 08:45 वाजता कोचुवेली येथे पोहोचेल.
01464 साप्ताहिक विशेष 13.04.2024 ते 29.06.2024 पर्यंत दर शनिवारी कोचुवेली  येथून दुपारी  4:20  वाजता सुटून आणि दुसऱ्या दिवशी रात्री  09.50 वाजता एलटीटी मुंबईला पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासारगोड, कन्नूर, कोझिकोड, तिरूर, शोरानूर, त्रिसूर, कोट्टानम, कोट्टानम तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम आणि कोल्लम जं.
डब्यांची रचना: 1 फर्स्ट एसी, 1 फर्स्ट एसी कम थ्री टियर एसी , 2 टियर एसी , 6 थ्री टियर एसी, 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 8 जनरल सेकंड क्लास डबे.
आरक्षण: उन्हाळी विशेष गाड्यांसाठी  विशेष शुल्कावर बुकिंग 08.04.2024 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल अशी मध्य रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

Loading

Konkan Railway | उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी

   Follow us on        
Konkan Railway News:या वर्षी उन्हाळी सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या वर्षंहीच्या उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक  विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष प्रवासी भाड्यावर:
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक  ०७/०४ /२०२४  ते ०५/०६/२०२४ पर्यंत दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती  मंगळुरू जंक्शनला  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून दिनांक  ०८/०४/२०२४ ते ०६/०६/२०२४ पर्यंत गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search