Category Archives: कोकण रेल्वे

रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर तात्पुरत्या कालावधीसाठी रद्द.

दुपारी दादर येथून सुटणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे  रत्नागिरी येथे तासभराच्या थांब्यांने रत्नागिरी मडगाव म्हणुन चालविण्यात येत होती,त्यामुळे तळकोकणात जाणार्‍या प्रवाशांना ह्या दोन्ही गाड्या सोयीच्या होत्या. आता ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे. 
KONKAN RAILWAY NEWS:रत्नागिरी ते मडगाव ह्या दरम्यान चालविण्यात येणाऱ्या 10101 रत्नागिरी-मडगाव आणि 10102 मडगाव-रत्नागिरी ह्या दोन गाड्या तात्पुरत्या काळापुरती रद्द केल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
ह्या आधी एका दिनांक 22/10/2022 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे ह्या गाड्या दिनांक 31/12/2022 पर्यन्त रद्द असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ती मुदत दिनांक 31/03/2023 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. रत्नागिरी ते मडगाव या स्थानकांदरम्यान रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने अभियांत्रिकी कारणासाठी हि गाडी रद्द ठेवण्यात येणार आहे असे कोंकण रेल्वेने जाहीर केले आहे.
दुपारी येथून सुटणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे  रत्नागिरी येथे तासभराच्या थांब्यांने रत्नागिरी मडगाव म्हणुन चालविण्यात येत होती,त्यामुळे तळकोकणात जाणार्‍या प्रवाशांना ह्या दोन्ही गाड्या सोयीच्या होत्या. आता ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे.

Loading

कोकण रेल्वेचे विस्कटलेले वेळापत्रक पूर्वपदावर

Konkan Railway News : कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सकाळी आठच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेस (Konkan Kanya Express) मुंबईहून गोव्याकडे जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली होती. त्यानंतर राजापूर स्टेशनवरुन नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले असून इंजिन बदलण्यात आले होते.

आताच्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक पूर्वपदावर आली आहे. काही गाड्या वगळता सर्व गाड्या काही मिनिटांच्या फरकाने धावत आहेत.

Source – Where is my train. Time – 03.07 PM

 

Loading

खुशखबर! कोकण रेल्वेमार्गावरील “ह्या” विशेष गाडीचा मार्च-२०२३ पर्यंत विस्तार…..

KONKAN RAILWAY NEWS : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. ह्या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा मार्च-२०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. हि गाडी ह्या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या  संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी ३०/१२/२०२२ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०३ मार्च २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ०२/०१/२०२३  पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०४  एप्रिल २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
ह्या गाड्यांचे मडगावपर्यंत कोकणातील थांबे 
पनवेल,रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली,कुडाळ, थिवीम, मडगाव

Loading

ठाणे स्थानकावरून कोकणरेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खास सुचना ! ०१ डिसेंबर पासून झाला आहे “हा” बदल

 

Konkan Railway News :ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे स्थानकावरून पुढे जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत काही बदल केले गेले आहेत. दिनांक 01 डिसेंबर 2022 पासून हे बदल अंमलात आणले गेले आहेत अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे यांच्या मार्फत देण्यात आली आहे.

कोकणात जाणार्‍या सर्व गाड्यांसाठी खालील बदल करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा >आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली….

जनरल डब्यांच्या स्थानात बदल

कोकणात जाणार्‍या सर्व गाड्यांचे ठाण्याला उघडणारे जनरल डबे शेवटी म्हणजे (दादर दिशेने) केले आहेत. त्यामुळे ह्या डब्यांसाठी लागणारी रांग आता मागे लागत आहे.

गाड्यांच्या प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल

हेही वाचा > कोकणरेल्वे मार्गावर धावणार हिवाळी विशेष गाड्या! उद्यापासून आरक्षण चालू..

मुंबई वरून कोकणात जाणार्‍या तुतारी व मांडवी एक्सप्रेस ठाणे स्टेशनला प्लॅटफॉर्म नं. 5 वर तर कोकण कन्या आणि मंगलोर एक़्सप्रेस या गाड्या प्लॅटफॉर्म नं 7 वर येत आहेत.

   Follow us on        

ठाणे स्थानकावरून कोकणरेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे मार्फत करण्यात आले आहे.

Loading

कोकणरेल्वे मार्गावर धावणार हिवाळी विशेष गाड्या! उद्यापासून आरक्षण चालू..

   Follow us on        

Konkan Railway News :प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेने कोंकण रेल्वे मार्गावर चार हिवाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोकणात पर्यटनाचा हंगाम चालू आहे, तसेच येत्या ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठी गोवा राज्याला येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ह्या गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक ०४.१२.२०२२ रोजी सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर चालू होणार आहे.

खालील गाड्या अतिरिक्त शुल्कासह चालविण्यात येणार आहेत.
1) Train No 01453/01454 LTT – MANGALURU – LTT Special Weekly 
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळरू जंक्शन ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01453
S.N. Station Name TIME Day
1 LOKMANYATILAK T 22:15 1
2 THANE 22:38 1
3 PANVEL 23:40 1
4 ROHA 01:10 2
5 KHED 02:30 2
6 CHIPLUN 02:54 2
7 SANGMESHWAR 03:22 2
8 RATNAGIRI 03:55 2
9 KANKAVALI 05:40 2
10 SINDHUDURG 05:54 2
11 KUDAL 06:06 2
12 SAWANTWADI ROAD 06:28 2
13 THIVIM 07:02 2
14 KARMALI 07:24 2
15 MADGAON 08:45 2
16 KARWAR 09:38 2
17 GOKARNA ROAD 10:12 2
18 KUMTA 10:34 2
19 MURDESHWAR 11:12 2
20 BHATKAL 11:28 2
21 MOOKAMBIKA ROAD 11:42 2
22 KUNDAPURA 13:02 2
23 UDUPI 13:40 2
24 MULKI 14:32 2
25 SURATHKAL 15:02 2
26 MANGALURU JN 17:05 2
ही गाडी 09 डिसेंबर 2022 ते 6 जानेवारी 2023 दरम्यान दर शुक्रवारी चालविण्यात येणार आहे.
Train No 01454
S.N. Station Name Time Day
1 MANGALURU JN 18:45 1
2 SURATHKAL 19:40 1
3 MULKI 19:52 1
4 UDUPI 20:14 1
5 KUNDAPURA 21:02 1
6 MOOKAMBIKA ROAD 21:26 1
7 BHATKAL 21:44 1
8 MURDESHWAR 22:00 1
9 KUMTA 22:30 1
10 GOKARNA ROAD 22:52 1
11 KARWAR 23:22 1
12 MADGAON 00:30 2
13 KARMALI 01:02 2
14 THIVIM 01:24 2
15 SAWANTWADI ROAD 01:52 2
16 KUDAL 02:24 2
17 SINDHUDURG 02:36 2
18 KANKAVALI 02:52 2
19 RATNAGIRI 05:55 2
20 SANGMESHWAR 06:52 2
21 CHIPLUN 07:42 2
22 KHED 08:12 2
23 ROHA 12:00 2
24 PANVEL 13:10 2
25 THANE 13:50 2
26 LOKMANYATILAK T 14:25 2
ही गाडी 10 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान दर शनिवारी चालविण्यात येणार आहे.
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०3 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 +असे मिळून एकूण  17 डबे
2) Train No 01455/01456 LTT – MADGAON Jn – LTT Special Weekly 
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01455
S.N. Station Name  Time Day
1 LOKMANYATILAK T 22:15 1
2 THANE 22:38 1
3 PANVEL 23:40 1
4 ROHA 01:10 2
5 MANGAON 01:38 2
6 KHED 02:40 2
7 CHIPLUN 03:04 2
8 SANGMESHWAR 03:40 2
9 RATNAGIRI 04:20 2
10 RAJAPUR ROAD 05:14 2
11 VAIBHAVWADI RD 05:30 2
12 KANKAVALI 06:06 2
13 SINDHUDURG 06:24 2
14 KUDAL 06:38 2
15 SAWANTWADI ROAD 07:02 2
16 THIVIM 07:42 2
17 KARMALI 08:06 2
18 MADGAON 10:30 2
ही गाडी 1 जानेवारी 2023 रोजी रविवारी चालविण्यात येणार आहे.
Train No 01456
S.N. Station Name Time
1 MADGAON 11:30
2 KARMALI 12:02
3 THIVIM 12:24
4 SAWANTWADI ROAD 13:12
5 KUDAL 13:36
6 SINDHUDURG 13:50
7 KANKAVALI 14:12
8 VAIBHAVWADI RD 14:38
9 RAJAPUR ROAD 14:54
10 RATNAGIRI 16:30
11 SANGMESHWAR 17:02
12 CHIPLUN 17:52
13 KHED 18:22
14 MANGAON 20:02
15 ROHA 21:20
16 PANVEL 22:30
17 THANE 23:03
18 LOKMANYATILAK T 23:45
ही गाडी 2 जानेवारी 2023 रोजी सोमवारी चालविण्यात येणार आहे.
ह्या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची संरचना
एसलआर – 02 + सेकंड सीटिंग – ०3 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 +असे मिळून एकूण  17 डबे

Loading

कोंकण रेल्वेमार्गावर अजून एक गाडी LHB कोचसहित धावणार

   Follow us on        
konkan Railway News :कोंकण रेल्वेमार्गावर धावणारी अजून एक गाडी आता आरामदायक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) सहित धावणार आहे. १९२६०/१९२५९ भावनगर- कोचुवेल्ली- भावनगर हि गाडी २० डिसेंबर पासून नव्या लाल, पांढऱ्या रूपासह रुळावर धावताना दिसणार आहे. सध्या हि गाडी IRS डब्यांसहित चालवली जात आहे.
ह्या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत पण खालीलप्रमाणे बदल केला आहे.
जनरेटर कार  – ०१ + एसलआर  –  ०१ + सेकंड सीटिंग – ०३  + स्लीपर – ०८ + थ्री टायर एसी – ०६ + टू टायर एसी – २ + पॅन्टरी कार – ०१  असे मिळून एकूण २२ डबे
ह्या गाडीचे मडगाव पर्यंतचे कोकणातील थांबे 
वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, थिवीम आणि मडगाव
एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) कोच ची वैशिष्ट्ये 
LHB Coach
  • एलएचबी कोच प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित व प्रशस्त असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित असतात.
  • मजबूत आणि वजनाने हलके असल्यामुळे गाडीचा वेगही वाढतो.
  • इतर कोचच्या तुलनेत एलएचबी कोचची लांबी ही १.५ मी. जास्त असल्याने त्यात स्लीपर आणि थ्री टायर एसी डब्यात  ८ बर्थ जास्त बसतात तर टू टायर एसी डब्यात ४ बर्थ जास्त बसतात. त्यामुळे अधिक प्रवासी क्षमता.
  • अधिक सुरक्षित- अपघात झाल्यास डबे एकमेकांवर चढत नाही त्यामुळे कमी हानी होते.
  • बोगींना डिस्कब्रेक असल्याने सुरक्षितता वाढते.
  • आधुनिक स्वरूपाची प्रसाधने.

Loading

मुंबई ते मडगाव विशेष शुल्कासह एकेरीमार्गी विशेष ट्रेन

संग्रहित फोटो
   Follow us on        
Konkan Railway News: डिसेंबर महिन्यातील पर्यटन हंगाम, कोकणातील जत्रेला जाणाऱ्या कोकणवासीयांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वेने एक एकेरी मार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01427 एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.
ह्या गाडीचे थांबे 
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमळी.
डब्यांची रचना
१५ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण
विशेष शुल्कासह बुकिंग दि. २.१२.२०२२ रोजी सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

Loading

पर्यटनाचा हंगाम…कोंकणरेल्वे मार्गावरील ८ गाड्या अतिरिक्त डब्यांसहित धावणार

   Follow us on        
Konkan Railway News : पर्यटनाचा हंगाम, तळकोंकणातील जत्रेचा हंगाम तसेच कोकण मार्गावरील गाडयांना गर्दी होत असल्याने कोंकण रेल्वेने ह्यावर उपाय म्हणून कोंकण मार्गावरील काही गाडयांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा : कोकण रेल्वेचा दिलासा….कोकणातील उद्योजकांसाठी नवीन सुविधा….

खालील गाड्या ह्या अतिरिक्त डब्यांसहित धावणार आहेत. 

अ. क्र.ट्रेनचे नाव
अतिरिक्त डबे दिनांककोकणातील थांबे
319260 Bhavnagar - Kochuveli ExpressOne Sleeper CoachOn 29/11/2022Vasai Road,
Panvel Jn, Roha, Chiplun,
Ratnagiri, Sindhudurg, Thivim
419259 Kochuveli - Bhavnagar ExpressOne Sleeper CoachOn 01/12/2022Vasai Road,
Panvel Jn, Roha, Chiplun,
Ratnagiri, Sindhudurg, Thivim
722908 Hapa - Madgaon Jn. ExpressOne Sleeper CoachFrom 30/11/2022 to 28/12/2022Vasai Road
Panvel Jn, Khed, ,
Ratnagiri, Kudal, Thivim
120924 Gandhidham - Tirunelveli ExpressOne Sleeper CoachFrom 28/11/2022 to 26/12/2022Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
619577 Tirunelveli - Jamnagar ExpressOne Sleeper CoachFrom 05/12/2022 to 27/12/2022Boisar, Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
822907 Madgaon Jn. - Hapa ExpressOne Sleeper CoachFrom 02/12/2022 to 30/12/2022Vasai Road
Panvel Jn, Khed, ,
Ratnagiri, Kudal, Thivim
519578 Jamnagar - Tirunelveli ExpressOne Sleeper CoachFrom 02/12/2022 to 24/12/2022Boisar, Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
220923 Tirunelveli - Gandhidham ExpressOne Sleeper CoachFrom 01/12/2022 to 29/12/2022Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri

अधिक माहितीसाठी ww.enquiry.indianrail.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्यात यावी. प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.

हेही वाचा : पेण येथे रेल रोको आंदोलन…”ह्या” आहेत मागण्या…

 

Loading

कोकण रेल्वेचा दिलासा….कोकणातील उद्योजकांसाठी नवीन सुविधा….

   Follow us on        
Konkan Railway News :मुंबई गोवा महामार्ग गेल्या १२ वर्षांपासून रखडला आहे, अनेक ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने ह्या महामार्गाने वाहतूक करणे खूपच गैरसोयीचे झाले आहे. ह्या सर्वात कोकणातील उद्योजकांना कोकण रेल्वेने  एक दिलासादायक बातमी दिली आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदरापासून रत्नागिरीपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून कंटेनर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
सुरक्षित प्रवास आणि वेळेची बचत असा दृष्‍टिकोन रेल्वेने ठेवला असून पहिली कंटेनर ट्रेन २९ नोव्हेंबर २०२२ रोजी रत्नागिरी स्थानकातून सोडण्यात येणार आहे.  या सुविधेचा व्यापाऱ्यांकडून लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून केले गेले आहे. ह्या सुविधेंचा लाभ कोकणातील स्थानिक उद्योजकांना होणार आहे. मालाची  वाहतूक अधिक वेगवान आणि कमी खर्चात करण्यासाठी ह्या सेवेचा लाभ घेता येईल. कोकणात उत्पादित उत्पादने मुंबईतील जेएनपीटी बंदरातून जगाच्या विविध भागात निर्यात केली जातात. येथील उत्पादनेही त्यांच्या गुणांसाठी ओळखले जातात. त्यामुळेच जगभरात प्रचंड मागणी असते. मुंबई गोवा हायवे वाहतुकीस योग्य नाही आहे. त्यावरुन वाहतूक करताना दमछाक होते आणि वेळही अधिक लागतो. रस्ते अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जेएनपीटी आणि रत्नागिरी दरम्यानचा हा प्रवास सुरळीत करण्यासाठी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागाने कंटेनर ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनमध्ये चाळीस फूट आणि वीस फूट लांबीचे कंटेनर मालाच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. निर्यातीसाठी वातानुकूलीत आणि कोरडे कंटेनरही यामध्ये वापरले जाणार आहेत. मालाची वाहतूक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी कोकण रेल्वेची ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. कोकणातून होणाऱ्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. 






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

पेण येथे रेल रोको आंदोलन…”ह्या” आहेत मागण्या…

   Follow us on        
पेण: आपल्या विविध मागण्याकरिता आणि पेण रेल्वे स्थानकात सध्याच्या गैरसोयी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून आणून देण्यासाठी माझं पेण आणि रेल्वे प्रवासी सन्मान समिती तर्फे पुढील महिन्यात ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे. 
ह्या मागण्यांमध्ये मुख्य मागणी म्हणजे ह्या स्थानकाला काही गाड्यांचे थांबे मिळवणे हि असली तरी अजून काही मागण्या आहेत. पेण तालुका हा जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून त्याची लोकसंख्या सुमारे २ लाखापेक्षा जास्त आहे. पेण तालुक्यातून मुंबई,नवी मुंबई, पनवेल, माणगाव, रोहा आणि इतर ठिकाणी नोकरी, शिक्षण तसेच व्यापाराच्या कारणासाठी नियमित प्रवास करतात. त्याचप्रमाणे काही मोठ्या कंपन्या पण तालुक्यात आहेत. सुबक मूर्तीसाठी पेण तालुका पूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. हे रेल्वे स्थानक मुंबई गोवा हायवे च्या जवळ आहे. ह्या सर्व गोष्टी अनुकूल असताना पेण ह्या रेल्वे स्थानकाला रेल्वे प्रशासनाकडून योग्य सन्मान भेटत नाही आहे अशी ह्या समितीची तक्रार आहे. 
काय आहेत मागण्या ?
१. कोरोना पूर्व काळात पेण स्थानकात थांबणारी दिवा-सावंतवाडी-दिवा (१०१०५/१०१०६) ह्या गाडीला पेण, कासू, नागोठणे, रोहा येथे पूर्ववत थांबा मिळावा. 
२. कोरोना काळात सामान्य Passenger गाडयांना लावलेले अधिक तिकीट दर पूर्ववत करण्यात यावेत.
३. रोहा – पनवेल – रोहा या मार्गावर मेमू गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि त्या नियमित वेळापत्रकानुसार असाव्यात. 
४. पेण दिवा पेण मेमू शनिवार आणि रविवार देखील सुरु राहावी.
५ यादीतील किमान ५ एक्सप्रेस गाडयांना पेण येथे थांबा देण्यात यावा.
याचप्रमाणे स्थानकावर अतिरिक्त तिकीट खिडकी, तिकीट तपासणीस नेमण्यात यावा असे रेल्वेच्या हितासाठी काही मागण्या पण आहेत.
ह्या सर्व मागण्या दिनांक १०.१२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात नाहीतर दिनांक ११.१२.२०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा  “माझं पेण” आणि “रेल्वे प्रवासी सन्मान समिती” ने दिला आहे. 
   

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search