Konkan Railway News : आंगणेवाडी जत्रेसाठी जाणार्या भाविकां साठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोकणरेल्वेतर्फे सोडण्यात आलेल्या विशेष Train no. 01454 Surathkal – Lokmanya Tilak (T) – Special (Weekly) या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 31 जानेवारीपासून सकाळी रेल्वे च्या सर्व आरक्षण तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
या गाडीच्या अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून त्यासंबंधी बातमी वाचा.
Konkan Railway News : कोकण रेल्वेने मध्यरेल्वेच्या सहकार्याने फेब्रुवारी आणि मार्च या २ महिन्यांसाठी कोकण रेल्वेमार्गावर एक आठवडी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पण तिच्या विचित्र वेळापत्रकामुळे तिचा फायदा कोकणवासीयांना होणार की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Train no. 01454 Surathkal – Lokmanya Tilak (T) – Special (Weekly) दर शनिवारी ही गाडी सुरतकल या स्थानकावरुन संध्याकाळी 7:40 वाजता सुटणार आहे. या गाडीची सावंतवाडी स्थानकावर येण्याची वेळ रात्री 01:52, कुडाळला 02:24 , सिंधुदुर्गला 02:36, कणकवलीला 02:52, रत्नागिरीला 05:55 तर संगमेश्वर या स्थानकावर पहाटेचा 06:50 असा आहे. या विचित्र वेळेला स्थानकावर पोहोचून गाडी पकडणे खूपच गैरसोईचे आहे. त्यामुळे तळकोकणातील प्रवाशांसाठी ती असून नसल्यासारखी आहे.
कोकणातील बहुतेक स्थानके मुख्य शहरापासून दूर आहेत. संध्याकाळी 7 नंतर एसटीची सेवा बंद होते. खाजगी वाहतुक दिवसा परवडत नाही तर रात्रीचे विचारूच नका. बहुतेक रस्ते निर्जन आणि जंगल भागातून जाणारे आहेत त्यामुळे अनेक समस्या येतात. रात्री जंगलातील प्राणी (खासकरून गवा रेडा) सर्रास रस्तावर येत असल्यामुळे या रस्त्यांतून रात्रीचा प्रवास करताना दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे.
याआधी असेच विचित्र वेळापत्रक आखून विशेष गाड्या चालविण्यात आल्या होत्या. त्यामुळे या विशेष गाड्या कोकणच्या प्रवाशांसाठी सोडल्या जात आहेत की दक्षिणेकडील प्रवाशांसाठी सोडल्या जात आहे असा प्रश्न कोकणातील प्रवाशांकडून विचारला जात आहे.
Konkan Railway News 27-01-23: पुढील महिन्यात ४ तारखेला होणाऱ्या मालवण येथील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आणि होळी सणाकरिता कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या साहाय्याने या मार्गावर एक आठवडी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाडी मध्यरेल्वेच्या सहकार्याने यामार्गावर चालविण्यात येणार आहे.
Train no. 01453 Lokmanya Tilak (T) – Surathkal Special (Weekly)
ही गाडी दिनांक 03/02/2023 ते 31/03/2023 या दरम्यान दर शुक्रवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री 22:15 वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी 15:30 वाजता सुरतकल या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी दिनांक 04/02/2023 ते 01/04/2023 या दरम्यान दर शनिवारी ही गाडी सुरतकल या स्थानकावरुन संध्याकाळी 19:40 वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी 14:25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 03 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 17 डबे
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेत स्थळास भेट द्यावी किंवा NTES अँप्लिकेशन डाउनलोड करावे असे आवाहन कोंकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
Konkan Railway News : या आठवड्यात जर तुमचा अचानक कोकणात जायचा प्लॅन बनला असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वेने पनवेल ते मडगाव दरम्यान एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाडी मध्यरेल्वेच्या सहकार्याने यामार्गावर चालविण्यात येणार आहे.
ही गाडी दिनांक 29/01/2023 रोजी रविवारी ही गाडी मडगाव या स्थानकावरुन सकाळी 08.30 वाजता सुटेल व संध्याकाळी 20 .10 वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01429 Panvel – Madgaon Jn. Special
ही गाडी दिनांक 29/01/2023 रोजी रविवारी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन संध्याकाळी 21:15 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी 08:30 वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
या दोन्ही गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 28/01/2023 रोजी रेल्वेच्या सर्व अधिकृत तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाइन पोर्टल वर उपलब्ध होईल अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
रत्नागिरी | प्रतिनिधी :कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी चार एक्सप्रेस गाड्या डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिन जोडून चालवण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या दूरपल्ल्याच्या आहेत.या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार पुढील गाड्या विद्युत इंजिन जोडून चालविण्यात येणार आहेत.
16338 /16337 – एर्नाकुलम – ओखा – एर्नाकुलम एक्सप्रेस हि गाडी एर्नाकुलम ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान दिनांक 20/01/2023 पासून
16333/16334 – तिरुवनंतपुरम सेन्ट्रल एक्सप्रेस- वेरावल – तिरुवनंतपुरम सेन्ट्रल एक्सप्रेस हि गाडी तिरुवनंतपुरम सेन्ट्रल ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान दिनांक 23/01/2023 पासून
16336/16335 – नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेस हि गाडी 24/01/2023 पासून नागरकोइल ते अहमदाबाद स्थानकादरम्यान.
22655/22656 – एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीला 25/01/2023 पासून संपूर्ण मार्गावर
कोंकण रेल्वेमार्गावरील आता जवळपास सर्वच रेल्वेगाड्या टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनावर येत आहेत. कोकण रेल्वेवरील सर्व गाड्या विद्युत इंजिनावर धावू लागल्यानंतर डिझेलपोटी येणाऱ्या वार्षिक १५० कोटी रुपये खर्चाची बचत होईल, असे कोकण रेल्वेने म्हटले आहे.
Konkan Railway News : प्रजासत्ताक दिन आणि माघी गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी कोंकण रेल्वेने या मार्गावर एक विशेष गाडी गाडी सोडायचा निर्णय घेतला आहे.
खालील गाडी पाश्चिम रेल्वेच्या सहकार्याने विशेष शुल्कासह यामार्गावर चालविण्यात येणार आहे.
Train no. 09470/ 09469 Ahmedabad Jn. – Karmali – Ahmedabad Jn. (Weekly) Special on Special Fare.
ह्या गाडी अहमदाबाद ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train no. 09470 Ahmedabad Jn. – Karmali
ही गाडी दिनांक 24/01/2023 रोजी मंगळवारी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 04.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09469 Karmali – Ahmedabad Jn
ही गाडी दिनांक 25/01/2023 रोजी बुधवारी ही गाडी करमाळी स्थानकावरुन सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 07.00 वाजता अहमदाबाद स्थानकावर पोहोचेल.
09469 या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 21/01/2023 रोजी रेल्वेच्या सर्व अधिकृत तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाइन पोर्टल वर उपलब्ध होईल अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वे सुरू होऊन अनेक वर्षे लोटली तरी राजापूरवासीयांच्या स्थानकावरील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. राजापूर रोड रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आलेले कोकण रेल्वे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांची पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भेट घेतली. त्यांच्याशी रेल्वेस्थानकावरील सुविधा आणि समस्यांबाबत संदर्भात चर्चा करून एक निवेदन सादर केले.
त्यांना दिलेल्या निवेदनात राजापूर रेल्वेस्थानकासाठी खालील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
स्थानकात लिफ्ट सुरू करणे
जनशताब्दी तसेच गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस किंवा इतर एक्स्प्रेस गाड्यांना राजापूरचा थांबा देणे फलाट क्रमांक २ चे काम करून सुसज्ज करावे,
कोविड काळात बंद करण्यात आलेला तिकिटांचा कोटा पूर्ववत सुरू करून त्यात वाढ करण्यात यावी
पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम सुरू करणे
राजापूर शहरात पोस्ट कार्यालयात तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन ते राजापूर शहर बस सेवा कायम सुरू ठेवावी,
स्टेशनबाहेर रिक्षा स्टँड सुरू करावा
या समस्यांबाबत यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनाही निवेदन देण्यात आले होते
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
Konkan Railway News 18/01/2022 :कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वे मध्यरेल्वेच्या साहाय्याने कोंकण रेल्वेमार्गावर मुंबई सीएसमटी ते मडगाव दरम्यान एक एकेरीमार्गी गाडी चालवणार आहे.
Train No. 01471 Mumbai CSMT – Madgaon Jn. Special
ही विशेष गाडी मुंबई सीएसमटी येथून शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल ती मडगाव जंक्शन येथे दिवशी दुपारी १२:१५ वाजता पोहोचेल.
Konkan Railway News : राज्यातील वाढणार्या थंडीचा परिमाण आता कोकण रेल्वे वर होऊ लागला आहे. कोकण रेल्वेमार्गावर मडगाव पेण नजीक काल सकाळी रेल्वे रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग थंडीमुळे तुटल्यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परीणाम झाला होता. रेल्वे कर्मचार्याच्या सतर्कतेमुळे सुदैवाने अपघात टळला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पेणवरून पनवेलला जाणार्या रेल्वे रुळाला जिते ते आपटा या दोन रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रुळाला तडे जाऊन रुळाचा काही भाग तुटला होता. शुक्रवारी पहाटे हा प्रकार निदर्शनास आला. या मार्गावर रेल्वे जाण्यापूर्वी रेल्वे कर्मचारी रुळाची पाहणी करीत असताना त्यांना सदर प्रकार सकाळी 6 वाजून 22 मिनिटांच्या दरम्यान आढळला. याबाबत रेल्वे कर्मचार्यानी रेल्वेच्या अधिकार्यांना तातडीने सूचित केले.
रेल्वे अधिकार्यांनी तातडीने सकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी दिवा स्थानकातून सुटणारी रोहा-दिवा या मेमु रेल्वेला जिते रेल्वे स्थानकानजीक थांबविले. यानंतर मडगाव-नागपूर स्पेशल रेल्वे, पेण येथून सकाळी 6.45 ला सुटणारी पेण-दिवा मेमु रेल्वे व मँगलोर-मुंबई रेल्वे या चार गाड्यांना रोखण्यात आले. त्याचप्रमाणे रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. सकाळी 7.30 वाजता रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. 10 ते 30 किलोमीटर प्रतितास या वेगाने सदर रुळावरून रेल्वे पुढे पाठविण्यात आल्या. थंडीमुळे रेल्वे रुळाला तडे जाण्याचे प्रकार घडत असतात, अशी माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाकडून कडून देण्यात आली.
Konkan Railway News | 12/01/2023: कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या एर्नाकुलम – निजामुद्दीन-एर्नाकुलम (२२६५५ / २२६५६) या गाडीला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. हि गाडी थ्री टायर एसी श्रेणीच्या दोन अतिरिक्त कोच सहित चालविण्यात येणार आहे. या अतिरिक्त डब्यांमुळे या गाडीच्या एकूण डब्यांची संख्या एकूण २२ झाली आहे.
खालील तारखेपासून हा बदल करण्यात येणार आहे.
२२६५५ – एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस
दिनांक : १८/०१/२०२३ बुधवारपासून
२२६५६ – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस