Category Archives: कोकण रेल्वे
समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ
Follow us on



चिपळूण दि. २४ जुलै: निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या सदस्यांनी संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाचे आमदार श्री शेखर निकम यांच्यासोबत आज कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची विविध मागण्यांसाठी आज भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून संतोष कुमार झा यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांसाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे वचन दिले असल्याचे पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.
संगमेश्वर स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पाहता येथे काही 9 गाड्यांना थांबा मिळावा अशी आमची मागणी होती. आमदार निकाम सर यांच्यामुळे या बैठकीचा योग जुळून आला असून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या वतीने मी त्यांचे तसेच श्री झा साहेबांचे आभार मानतो. संगमेश्वरला लवकरच किमान 9 पैकी 3 गाडयांना थांबा मिळेल अशी आशा आज निर्माण झाली आहे. या प्रसंगी आमदार आदरणीय शेखर सर, ग्रुपच्या वतीने श्री दीपक पवार, संतोष पाटणे, समीर सप्रे, अशोक मुंडेकर, सुशांत फेपडे आदी उपस्थित होते अशी माहिती पत्रकार संदेश जिमन यांनी दिली.
संगमेश्वर मध्येच या तीन गाड्याना थांबा मिळण्याची दाट शक्यता
▪️1) 110099/11000 LTT मडगांव LTT
▪️2) 19577/19578 जामनगर तिरुनलवेली एक्सप्रेस
▪️3)20909/20910 कोचिंवेल्ली पोरबंदर एक्सप्रेस
समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ
पत्रकार संदेश जिमन यांनी समाज माध्यमातून नेहेमीच संगमेश्वर, चिपळूण येथील रेल्वे प्रवाशांसाठी आवाज उठवला आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मागच्या वर्षी नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर येथे थांबा मिळवून दिला होता. त्यांच्या कार्याचे त्यावेळी मोठे कौतुक झाले होते आणि प्रवासी संघटनेंकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. सामान्य जनतेचा आवाज प्रशासनाकडे पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा उत्तम वापर कसा करता येईल याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी दिले आहे. आपल्या मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी आणि सोयींसाठी आमदार शेखर निकम नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. रेल्वे प्रश्नासंबंधी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांच्या रूपाने या मतदारसंघात एक उत्तम नेतृत्व लाभले असल्याची जनतेची भावना आहे.


Proposal for Special Trains:कोकणातील गणेशभक्तांसाठी पश्चिम रेल्वेकडून एक खुशखबर आहे. मध्यरेल्वेने गणपती विशेष गाड्यांची यादी जाहीर केल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही आपली गणपती विशेष गाड्यांची यादी तयार केली असून ती कोकण रेल्वे, मध्यरेल्वे आणि दक्षिण रेल्वेला मंजुरीसाठी पाठवली आहे. या यादीला या विभागांकडून हिरवा कंदील भेटल्यानंतर ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याआधी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अवघे काही मिनिटातच फुल झाल्याने तिकिटे न मिळालेल्या प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळवण्याची अजून एक संधी भेटणार आहे.
चिपळूण: जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचालित सुमन विद्यालय टेरव या प्रशालेमध्ये शुक्रवार दिनांक १९ जुलै २०२४ रोजी बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट सांताक्रुझ, मुंबई यांच्यावतीने इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना एकूण ७०८ वह्यांचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे संचालक तसेच सरस्वती कोचिंग क्लासेस, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट, सरस्वती फाउंडेशन मुंबईचे विश्वस्त व महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी श्री.सुधाकरराव कदम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रशालाचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर यांनी श्री. सुधाकरराव कदम यांचा विशेष सन्मान केला. त्याचप्रमाणे बेस्ट हनुमान मंदिर ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष श्री.नंदकुमार राणे साहेब आणि न्यासाचे चिटणीस व काडवली गावचे सुपुत्र श्री.नारायण चव्हाण साहेब यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटी आणि सुमन विद्यालय टेरव यांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. त्यानंतर इयत्ता ८ वी ते इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गवार वह्यांचे वितरण करण्यात आले. सदर शैक्षणिक मदत विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सरस्वती कोचिंग क्लासेस मुंबईचे संस्थापक तसेच जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार श्री.अजितराव कदम त्याचप्रमाणे श्री.सुधाकरराव कदम यांनी विशेष प्रयत्न केले. सदर मोफत वह्या वाटप कार्यक्रम प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मंदार सुर्वे सर तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अमोल टाकळे सर यांनी केले.
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व रखडलेले सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावा : श्री.यशवंत जडयार*
Follow us on



मुंबई दि. २० जुलै:अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईची एल्गार सभा रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी सकाळी १० वा. सोशल सरव्हिसलिग हायस्कूल दामोदर हॉलच्या बाजूला परळ मुंबई येथे समिती अध्यक्ष श्री.शेखर बागवे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
समितीच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांपासून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे, रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावणे व त्याला प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देणे,नियोजित वसई सावंतवाडी पॅसेंजर व कल्याण सावंतवाडी पॅसेंजर सुरू करणे,दादर रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस व दिवा चिपळूण मेमू रेल्वे नेहमीसाठी सुरू करणे अशा महत्वाच्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार मागण्या करूनही त्या मिळत नसल्याने यापुर्वीही परळ येथील प्रा.मधू दंडवते जन्मशताब्दी उत्सव व सावंतवाडी रोड स्टेशन येथील टर्मिनससाठी केलेले उपोषणातून समितीने मोठे शक्ती प्रदर्शन केलेले आहे,यासाठी ही एल्गार सभा खूप महत्वाची आहे.
गणेशउत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण,याला मुंबईतून लाखो चाकरमनी कोकणातील आपल्या गावी जातात, त्यासाठी त्यांना पुरेशा कोकण रेल्वेच्या रेल्वे मिळवून देण्यासाठी ही सभा समस्त कोकणवासियांच्या दृष्टीने खूप महत्वाची असल्याचे अध्यक्ष श्री.शेखर बागवे यांनी सांगितले.
कित्येकदा कोकण रेल्वेमार्गावरून गणेशउत्सवासाठी सोडलेल्या जादा गणपती स्पेशल एक्सप्रेसचे तिकीट बुकींग पहिल्या तीन मिनीटामध्येच फुल होते,याच्याने खरा लाभार्थी असलेला कोकणी माणूस तिकीटापासून वंचितच राहतो,चाकरमन्यांचा रेल्वे प्रशासनाला प्रश्न आहे की,रेल्वेच्या दलालांचे बुकींग कसे होते?मग सर्वसामान्य कोकणी माणसाला गणपतीचे तिकीट का मिळत नाही?
लोकसभेची निवडणूक समोर ठेवून कोकणातील अनेक नेत्यांनी समितीला आश्वासने दिली होती त्याचे पुढे काय झाले? यासाठी ही एल्गार सभा निर्णायक ठरणार आहे,अन्यथा विधानसभेची निवडणूक फक्त पुढील तीनच महिन्यांवर आलेली आहे.
समितीच्या ह्या एल्गार सभेला मुंबई,नवी मुंबई,लालबाग परळ,बोरीवली,मिरा भाईदर,वसई विरार,बोईसर पालघर,भांडूप,ठाणे दिवा,कल्याण डोंबीवली,बदलापूर परिसरातील कोकण वासियांनी मोठया संस्थेने सहभागी व्हावे असे आवाहन सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी केले आहे.




Special Train for Ganesh Chaturthi: कोकणात गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना मध्यरेल्वेने एक खुशखबर दिली आहे. मध्य रेल्वेने दरवर्षीप्रमाणे कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. मुंबई- रत्नागिरी, मुंबई-कुडाळ, मुंबई – सावंतवाडी तसेच दिवा – चिपळूण या विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण दिनांक २१ जुलै रोजी सकाळी आठ वाजता रेल्वे च्या आरक्षण खिडक्यांवर तसेच सर्व अधिकृत संकेतस्थळांवर सुरू होणार आहे.
१) मुंबई सीएसएमटी -सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-
०११५१ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १४:२० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
०११५२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) दररोज १५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.३५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
२) मुंबई सीएसएमटी -रत्नागिरी डेली स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या)
०११५३ स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ११:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
०११५४ स्पेशल रत्नागिरीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) दररोज पहाटे ४ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
३) एलटीटी -कुडाळ डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-
०११६७ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
०११६८ स्पेशल कुडाळवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) दररोज दुपारी १२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
४) एलटीटी -सावंतवाडी डेली स्पेशल (३६ फेऱ्या)-
०११७१ स्पेशल एलटीटी मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:०० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
०११७२ स्पेशल सावंतवाडीवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज रात्री २२:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४० वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
5) दिवा- चिपळूण मेमू स्पेशल (एकूण ३६ फेऱ्या)
०११५५ मेमू स्पेशल दिवा येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज सकाळी ०७:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
०११५६ मेमू स्पेशल चिपळूणवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) पर्यंत दररोज दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:५० वाजता दिवा येथे पोहोचेल.
थांबे: दिवा, निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, कळंबणी, खेड, अंजनी
रचना: १२ मेमू डबे
6) एलटीटी -कुडाळ स्पेशल (१६सेवा)-
०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (८ फेऱ्या) पर्यंत सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
०११८६ स्पेशल कुडाळवरून ०२.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (१८ फेऱ्या ) सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
रचना: १२ स्लीपर क्लास, ०४ जनरल, २ थ्री टायर एसी आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २० डबे
७) एलटीटी -कुडाळ स्पेशल (६सेवा)-
०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी रात्री ००:४५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी १२:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
०११६६ स्पेशल कुडाळवरून ०३.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी संध्याकाळी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ०४:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
डब्यांची रचना: १२ थ्री टायर एसी , ०५ टू टायर एसी, १ फर्स्ट एसी, १ पॅन्ट्रीकार, २ ब्रेक वॅन असे मिळून एकूण २० डबे

Follow us on




सावंतवाडी, दि. १५ जुलै :काल नातुवाडी (खेड) बोगद्याजवळ दरड कोसळल्याने पूर्ण कोकण रेल्वे ठप्प झाल्याने या मार्गावरील रेल्वे गाड्या ह्या विविध स्थानकावर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांत कित्येक प्रवासी अडकून पडले होते. १२२०२ गरीब रथ एक्स्प्रेस ही सावंतवाडी स्थानकात थांबवली होती. त्या गाडी ने प्रवास करणारे प्रवासी (एकूण प्रवासी ७०० पेक्षा अधिक) हे स्थानकावर असलेल्या अपुऱ्या खान -पानाच्या सुविधेमुळे त्रस्त झालेले होते, ट्रेन मधले पाणी देखील संपले होते, अशातच कोकण रेल्वे प्रवासी संघटना त्यांच्या मदतीला आली.
कोकण रेल्वे संघटना, सावंतवाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सावंतवाडी स्थानकावर पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. लगेचच त्यांनी कोकण रेल्वेच्या जन संपर्क अधिकाऱ्याला फोन करून गरीब रथ एक्स्प्रेस मधे पाणी भरायला लावले. लगेच अँब्युलन्सची देखील व्यवस्था संघटनेने केली. आणि सर्व लोकांना या प्रवाशांचा मदतीसाठी धावून या असे आवाहन देखील केले, त्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद देऊन जेमतेम रक्कम १०,००० रुपये जमा झाले.या रक्कमेतून गरीबरथ एक्स्प्रेस मधील प्रवाशांसाठी ६०० पेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल्स (१ लिटर), बिस्किटे, आदी असे सुमारे ७०० लोकांना पुरणारे समान स्थानकावर जाऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी च्या पदाधिकाऱ्यांनी वाटप केले, त्यावेळी प्रवाशांना धीर देण्यात आला, संघटनेच्या कामाबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, खजिनदार विहंग गोठोसकर,राज पवार आदी उपस्थित होते.