Category Archives: कोकण रेल्वे

स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन निमित्त कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या जाहीर करण्याची मागणी

   Follow us on        

Special Train Request for Independence day: स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधननिमित्त १५ ते १९ ऑगस्ट पर्यंत मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्यांना भलीमोठी प्रतीक्षा यादी लागलेली आहे. १४ ऑगस्ट, २०२४ च्या रात्रीपासूनच्या गाड्यांना लागलेला रिग्रेट संदेश हा अनावर गर्दीचा निदर्शक आहे. तसेच, शुक्रवार, शनिवार, रविवार अशा लागून आलेल्या सुट्टीमुळे गाड्यांमध्ये गर्दी होणार यात शंका नाही.२६ जानेवारीला लागून आलेल्या सुट्टीच्यावेळी जादा गाड्या न सोडल्यामुळे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांनी एसी डब्यांतही गर्दी केलेली आपण पहिली आहे. हा मागील अनुभव पाहता त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधननिमित्त विशेष गाड्या सोडाव्यात असे विनंतीवजा निवेदन कोकण विकास समिती तर्फे संस्थापक सदस्य जयवंत दरेकर यांनी ईमेलद्वारे सबंधित रेल्वे प्रशासनाला केले आहे.

Loading

Konkan Railway | जनरल डब्यांत होणाऱ्या गर्दीवर रेल्वेचा उपाय; कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल

    Follow us on        
Konkan Railway News: भारतीय रेल्वेने अलीकडे सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करण्यास सुरु केला असून त्यांच्यासाठी काही हिताचे निर्णय घेत आहे. जनरल डब्यांत होणारी गर्दी विचारात घेऊन रेल्वेने काही गर्दीच्या मार्गावरील इतर श्रेणीच्या डब्यांचे रूपांतर जनरल डब्यांत करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच भाग म्हणून कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात येणार आहे.
1) गाडी क्रमांक ११०९९ / १११००  लोकमान्य टिळक (T) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (T) एक्सप्रेस
सध्याची रचना: फर्स्ट एसी – ०१, टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, जनरल – ०२, पॅन्ट्री कार – ०१,एसएलआर  – ०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: फर्स्ट एसी – ०१, टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, स्लीपर – ०६, जनरल – ०४, पॅन्ट्री कार – ०१,एसएलआर  – ०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या दोन स्लीपर कोचचे रूपांतर जनरल डब्यांत केले गेले आहे. दिनांक ०१ डिसेंबर पासून हा बदल अंमलात आणला जाईल.
2) गाडी क्रमांक. २२११३ /२२११४  लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस
सध्याची रचना: टू टियर एसी – ०१, थ्री टियर एसी – ०७, स्लीपर – ०९, जनरल – ०३ जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
सुधारित रचना: टू टियर एसी – ०२, थ्री टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, जनरल – ०४, जनरेटर कार – ०१ आणि एसएलआर – ०१  असे मिळून एकूण २२ LHB कोच
या गाडीच्या एका स्लीपर कोचचे रूपांतर जनरल डब्यात केले गेले आहे, टू टियर एसीचा एक डबा वाढविण्यात आला आहे. तर  थ्री टियर एसीचा एक डबा कमी करण्यात आला आहे.  दिनांक ३० नोव्हेंबर पासून हा बदल अंमलात आणला जाईल

Loading

दोन लोकनेते, एकाला भारतरत्न तर दुसर्‍याच्या पदरी सरकारकडून उपेक्षाच..

कोकण    Follow us on        
वाचकांचे व्यासपीठ: खरेतर देशाला आपले सर्वस्व समर्पित केलेल्या महान नेत्यांची तुलना करणे चुकीचे आहे. मात्र जेव्हा एखाद्या नेत्याच्या कर्तृत्वाचा सन्मान होत नाही, त्याची अवहेलना केली जाते तेव्हा नाईलाजाने त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचे महत्व पटवून देण्यासाठी ही तुलना होतेच.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर या दोन्ही कालखंडात प्रा. मधु दंडवते यांचे देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. १९४२ च्या चळवळीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते यांनी आंदोलनात भाग घेऊन स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आणि करावासही भोगला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा सत्याग्रहामध्येसुद्धा त्यांनी भाग घेतला होता त्यादरम्यान त्यांना पोर्तुगीज पोलिसांकडून एवढी मारहाण झाली की त्यांच्या शरीरातली हाडे मोडली होती व त्या जागी स्टीलच्या पट्या घातल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये दोघा पती पत्नीने आपले योगदान देऊन कारावास भोगला होता. देशात जेव्हा आणीबाणी जाहीर झाली होती तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना अटक झाली होती. त्यात अटकेत प्रा. मधु दंडवते
आणि त्यांच्या पत्नींचाही समावेश होता.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या त्यागासाठी आणि देशसेवेसाठी भारतरत्न देऊन गौरवण्यात आले. त्यांनी केलेली देशसेवेबद्दल तिळमात्र शंका नाही. मात्र त्यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच देशसेवा केलेल्या मधू  महानेत्याच्या त्यागाचा, कार्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी फक्त आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगला परंतु प्रा. मधु दंडवते यांनी स्वातंत्र्य चळवळीसह गोवा सत्याग्रह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन यामध्ये तुरुंगवास भोगला मग प्रा. मधु दंडवते यांना भारतरत्न का दिला जाऊ नये?
केंदीय रेल्वे मंत्री असताना त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल केलेत. ६ डब्याच्या ऐवजी २२ डब्याच्या मेल एक्सप्रेस सुरू करून तिकिटांचा होणारा काळाबाजार त्यांनी रोखला. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक गाडीला वेगळे नाव देण्याची सुरवात त्यांनीच केली. त्याची सुरुवात पहिली कलकत्त्या वरून मुंबईला येणाऱ्या ” गीतांजली” एक्सप्रेस या नावाने सुरुवात झाली. विशेष म्हणजे, त्यांनी दुय्यम दर्जाच्या स्लीपर कोचच्या प्रवाशांसाठी, अधिक आरामदायी प्रवासासाठी विद्यमान लाकडी बर्थ बदलून, उशी असलेले बर्थ सुरू केले. सुरुवातीला प्रमुख ट्रंक लाईन्समध्ये लागू केले जात असताना, 1980 च्या दशकाच्या अखेरीस सर्व गाड्यांमध्ये त्यांच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यांमध्ये हे पॅड बर्थ होते. कोकण रेल्वे प्रत्यक्षात येण्यासाठी प्रा. मधु दंडवतेंनी रेल्वेमंत्री म्हणून सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पातच तरतूद केली. कोकण रेल्वे प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांचे योगदानही सर्वश्रुत आहे.
एवढं मोठे भारताला योगदान देणाऱ्या या तपस्वी देशभक्ताला त्याच्या मृत्युपश्चात जर भारतरत्न देता येत नसेल तर किमान सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे टर्मिनस म्हणून तात्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेल्या या टर्मिनस चे काम पूर्ण करून त्याला मधु दंडवते टर्मिनस असे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील ३ वर्षांपासून मोठ्याप्रमाणात होत आहे. मात्र या मागणीला वेळोवेळी केराची टोपली दाखवली जात आहे. भारतरत्न पदासाठी योग्य असलेल्या एका महानेत्याची मरणोत्तर अशी अवहेलना होत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?
स्वातंत्र्य चळवळीसह गोवा सत्याग्रह आणीबाणी मध्ये सहभाग घेणाऱ्या प्रमिला दंडवते यांनी महिला आयोगाची स्थापना करून संपूर्ण भारतातील महिलावर खूप मोठे उपकार केले आहे त्यांच्याही यथोचित सन्मान व्हावा असे मी जाहीर पत्रकाद्वारे मागणी करीत आहे विलंबित सावंतवाडी टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्या टर्मिनसला मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे. हे वर्ष प्रा. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे तरी येत्या २१ जानेवारी २०२५  रोजी मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आहे तरी लवकरात लवकर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करून २१ जानेवारी २०२५ पुर्वी मधु दंडवते टर्मिनस असे नामांतर करून या थोर विभूतीला आदरांजली अर्पण करावी
श्री. सुरेंद्र हरिश्चन्द्र नेमळेकर
संस्थापक सदस्य – कोकण रेल्वे,
सल्लागार- सखांड कोकण रेल्वे सेवा समिती

Loading

महत्वाचे: मध्य रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यातील गणपती स्पेशल गाड्यांच्या तिकीट आरक्षणाची तारीख जाहीर

   Follow us on        
Konkan Railway Updates: कोकणकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने दुसऱ्या टप्प्यात सोडलेल्या गणपती स्पेशल गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार गाडी क्रमांक ०१०३२, ०१४४८ , ०१४४४ , ०१४४६  आणि ०१४४२ साठी बुधवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC संकेतस्थळावर चालू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
या गाड्यांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील बातमी वाचावी

Loading

Ganesh Chaturthi 2024: गणपती विशेष गाड्यांना पेण आणि झाराप येथे थांबा मंजूर

   Follow us on        

Changes in Ganpati special trains: गणपती उत्सवासाठी सोडण्यात आलेल्या काही विशेष गाड्यांना पेण आणि झाराप येथे अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी विशेष गाड्यांना या स्थानकांवर थांबे न दिल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती व या स्थानकांवर थांबे देण्यात यावे अशी मागणी केली गेली होती. सुबक गणेशमूर्ती साठी प्रसिद्ध असलेल्या पेण स्थानकावर गणपती विशेष गाड्यांना थांबा न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावे लागेल. दुसरीकडे फक्त एका नियमित गाडीला थांबा असलेल्या झाराप स्थानकावर किमान विशेष गाड्यांना तरी थांबे मिळावेत अशी मागणी झाली आहे. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने खालील गाड्यांना येथे थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे

गाडी क्रमांक ०११५३/०११५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११६७/०११६८ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११८५/०११८६ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११६५/०११६६ लोकमान्य टिळक (टी)- कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११७१/०११७२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे

गाडी क्रमांक ०९००९/ ०९०१० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल या विशेष गाडीला झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे खालील दोन विशेष गाड्यांच्या सेवेच्या कालावधीत काही बदल करण्यात आले आहेत.

गाडी क्र. ०११५४ रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी आणि गाडी क्र. ०११६८ कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या दोन्ही गाड्यांचा कालावधी ०२/०९/२०२४ ते १९/०९/२०२४ असा सुधारित करण्यात आला आहे. याआधी तो ०१/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ असा होता.

प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Loading

खुशखबर! मध्यरेल्वेतर्फे अजून पाच गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा

Additional Trains for Ganesha Festival: गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने एक खुशखबर दिली आहे. मध्य रेल्वे तर्फे या आधी घोषणा केलेल्या गाड्या व्यतिरिक्त अजुन पाच गाड्यांची घोषणा केली आहे. पुणे /पनवेल /मुंबई एलटीटी ते रत्नागिरी दरम्यान या गाड्या धावणार असून त्याचा फायदा गणेशोत्सवा दरम्यान होणारी गर्दी कमी होण्यासाठी होणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने या गाड्यांना हिरवा कंदील दिल्यानंतर या गाडय़ाचे आरक्षण आणि ईतर माहिती जाहीर करण्यात येईल. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या विशेष गाड्या म्हणुन चालविण्यात येणार आहेत.

१) ०१४४५/०१४४६ पुणे – रत्नागिरी – पुणे विशेष (एकूण २ फेर्‍या)
गाडी क्रमांक ०१४४५ विशेष पुणे येथून मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४६ विशेष रत्नागिरी येथून बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी १७:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५ , जनरेटर व्हॅन – ०१, आणि एसएलआर- ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे

२) ०१४४१/०१४४२ पनवेल -रत्नागिरी – पनवेल विशेष
गाडी क्रमांक ०१४४१ विशेष पनवेल येथून बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४२ विशेष रत्नागिरी येथून मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी १७:५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०१:३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५ , जनरेटर व्हॅन – ०१, आणि एसएलआर- ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे

३) ०१४४७/०१४४८ पुणे – रत्नागिरी – पुणे विशेष (एकूण ४ फेर्‍या)
गाडी क्रमांक ०१४४७ विशेष पुणे येथून शनिवार दिनांक ०७ आणि १४ सप्टेंबर आणि रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४८ विशेष रत्नागिरी येथून रविवार दिनांक ०८ आणि १६ सप्टेंबर रोजी १७:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४ , सेकंड स्लीपर – ११ जनरल – ०४, आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २२ डबे

४) ०१४४३/०१४४४ पनवेल -रत्नागिरी – पनवेल विशेष (एकूण ४ फेर्‍या) 
गाडी क्रमांक ०१४४३ विशेष पनवेल येथून रविवार दिनांक ८ आणि १५ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४४ विशेष रत्नागिरी येथून शनिवार दिनांक ७ आणि १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी १७:५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०१:३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४ , सेकंड स्लीपर – ११ जनरल – ०४, आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २२ डबे

५) ०१०३१/०१०३२ एलटीटी – रत्नागिरी – एलटीटी विशेष (एकूण ८ फेर्‍या)
गाडी क्रमांक ०१०३१ विशेष एलटीटी येथून दिनांक ६,७,१३,१४ सप्टेंबर रोजी रात्री २०:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०३२ विशेष रत्नागिरी येथून दिनांक ७,८,१४,१५ सप्टेंबर रोजी सकाळी ०८:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:१५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०२, थ्री टायर एसी – ०६ , सेकंड स्लीपर – ०८ जनरल – ०३, आणि एसएलआर- ०१, जनरेटर व्हॅन – ०१ असे मिळून एकूण २१ LBH डबे

Loading

Konkan Railway | सावंतवाडी टर्मिनससंबधी दीपक केसरकर यांनी केल्यात महत्त्वाच्या घोषणा

सिंधुदुर्ग, दि. २९ जुलै: कोकणात समस्त कोकणकरांचे हक्काचे रेल्वे टर्मिनस असावे असे स्वप्न असणार्‍या कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडी टर्मिनस संबधी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनससाठी लागणाऱ्या पाण्यासाठी रत्नसिंधू योजनेतून ४ कोटी तर जल जीवन मिशन अंतर्गत १.५ कोटी मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबरोबरच त्यांच्याकडून टर्मिनस बिल्डिंग आणि पर्यटन हॉटेल साठी निधीची तरतूद केली गेली आहे.
सावंतवाडी टर्मिनसच्या लढ्याला यश मिळण्यास सुरवात 
सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले होते. दीपक केसरकर यांच्या या घोषणेवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अलीकडेच संघटनेतर्फे राबवलेल्या सावंतवाडीच्या ईमेल मोहिमेला आणि ईतर स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश मिळण्यास सुरवात झाली असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलेत.

Loading

अखेर प्रतीक्षा संपली! पश्चिम रेल्वेतर्फे चालविण्यात येणाऱ्या गणपती विशेष गाड्यांची अंतिम यादी जाहीर; आरक्षण या तारखेला सुरु होणार

WR Ganpati Specials Trains: मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याने कोकणकर आता पश्चिम रेल्वेतर्फे विशेष गाड्या जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. त्यांची ही प्रतीक्षा संपली असून रेल्वे प्रशासनाने या गाड्या जाहीर केल्या आहेत. पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, आणि दक्षिण रेल्वेकडे या मार्गावर चविण्यात येणाऱ्या गणपती विशेष गाड्यांची यादी मंजुरीसाठी पाठवली होती. या यादीमध्ये गाड्यांच्या वेळेत, थांब्यात काहीसा बदल करून कोकण रेल्वे प्रशासनाने अंतिम घोषणा केली आहे. या गाड्यांचे आरक्षण दिनांक २८ जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर तसेच अधिकृत संकेतस्थळांवर सुरू होणार आहे.
खालील सहा गाड्या पश्चिम रेल्वे तर्फे चालविण्यात येणार आहेत. 
१) ०९००१/०९००२ मुंबई सेंट्रल – ठोकूर – मुंबई सेंट्रल साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
गाडी क्रमांक ०९००१ विशेष मुंबई सेंट्रल येथून मंगळवार दिनांक ०३,१० आणि १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८.५०  वाजता ठोकूर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९००२ विशेष ठोकूर येथून बुधवार दिनांक ०४,११ आणि १८ सप्टेंबर रोजी सकाळी  ११.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०७.०५ वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचेल. (सावंतवाडी स्थानकावरील वेळ – १७.४०)
या गाडीचे मडगावपर्यंतचे थांबे: बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड,कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी आणि मडगाव
डब्यांची रचना: थ्री टायर एसी – ०२ , सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २० डबे
२) ०९००९/०९०१० मुंबई सेंट्रल-सावंतवाडी-मुंबई सेंट्रल (आठवड्याचे ६ दिवस) विशेष (एकूण २६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९००९ विशेष मुंबई सेंट्रल येथून दिनांक ०२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत मंगळवार वगळता दररोज दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०२:३० वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०१० विशेष सावंतवाडी  येथून दिनांक ०३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबरपर्यंत बुधवार वगळता दररोज पहाटे ०४.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २०:१० वाजता मुंबई सेन्ट्रल येथे पोहोचेल.
थांबे: बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा,आरवली रोड,  संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ
डब्यांची रचना: थ्री टायर एसी – ०२ , सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २० डबे
 ३) ०९०१५ /०९०१६  वांद्रे (T) – कुडाळ – वांद्रे (T) साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
गाडी क्रमांक ०९०१५ विशेष  वांद्रे टर्मिनस Bandra येथून गुरुवार दिनांक ०५ ,१२ आणि १९ सप्टेंबर रोजी दुपारी १४.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९०१६ विशेष कुडाळ येथून शुक्रवार दिनांक ०६,१३ आणि २० सप्टेंबर रोजी पहाटे ०४.३०   वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी  १८.१५ वाजता वांद्रे टर्मिनस येथे पोहोचेल.
थांबे: बोरिवली, वसई रोड,पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना: सेकंड सीटिंग – १६, जनरल – ०४, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ LHB कोच
४) ०९४१२/०९४११ अहमदाबाद – कुडाळ – अहमदाबाद (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९४१२ विशेष अहमदाबाद येथून मंगळवार दिनांक ०३,१०,१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – १७.२०)
गाडी क्रमांक ०९४११ विशेष कुडाळ येथून बुधवार दिनांक ०४,११,१८ सप्टेंबर रोजी पहाटे ०४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३.४५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
थांबे:  वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी,  खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे,राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
डब्यांची रचना: थ्री टायर एसी – ०२ , सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २० डबे
५) ०९१५०/०९१४९ विश्वामित्री – कुडाळ – विश्वामित्री (साप्ताहिक) विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
गाडी क्रमांक ०९१५० विशेष विश्वामित्री येथून सोमवार दिनांक ०२,०९,१६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – १७:५०)
गाडी क्रमांक ०९१४९ विशेष कुडाळ येथून मंगळवार दिनांक ०३,१०,१७ सप्टेंबर रोजी सकाळी ०४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:०० वाजता विश्वामित्री येथे पोहोचेल.
थांबे: भारूच, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग
डब्यांची रचना: थ्री टायर एसी – ०२ , सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २० डबे
६) ०९४२४/०९४२३ अहमदाबाद – मंगुळुरु -अहमदाबाद साप्ताहिक विशेष (एकूण ६ फेऱ्या) 
गाडी क्रमांक ०९४२४ विशेष अहमदाबाद येथून शुक्रवार दिनांक ०६,१३,२० सप्टेंबर रोजी संध्याकाळी १६.००  वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९.४५ वाजता मंगुळुरु येथे पोहोचेल. (पनवेल स्थानकावरील वेळ – ००:४५)
गाडी क्रमांक ०९४२३ विशेष मंगुळुरु येथून शनिवार दिनांक ०७,१४,२१ सप्टेंबर रोजी रात्री २२.१० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०२:१५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल. (सावंतवाडी स्थानकावरील वेळ – पहाटे ०६.००)
थांबे: गुजराथ राज्यातील थांबे, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम, करमाळी आणि दक्षिणेकडील राज्यातील थांबे.
डब्यांची रचना: थ्री टायर एसी – ०२ , सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४ आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २० डबे
 

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील ३ गाड्या महिन्याभरासाठी ठाणे- दादर पर्यंत ‘शॉर्ट टर्मिनेट’

   Follow us on        
Konkan Railway News: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस वरील प्लॅटफॉर्म लांबीच्या विस्ताराच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ३ गाड्या दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत ‘शॉर्ट टर्मिनेट’ करण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांचा प्रवास दादर आणि ठाणे या स्थानकांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.
गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा ३०/०८/२०२४ पर्यंतचा प्रवास ठाणे स्थानकावर मर्यादित ‘Short Terminate’ करण्यात येणार आहे.
गाडी क्र. २२१२०  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा ३०/०८/२०२४ पर्यंतचा प्रवास दादर स्थानकावर मर्यादित ‘Short Terminate’ करण्यात येणार आहे.
गाडी क्र. १२०५२  मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा ३०/०८/२०२४ पर्यंतचा प्रवास दादर स्थानकावर ‘Short Terminate’ करण्यात येणार आहे.

Loading

Konkan Railway: संगमेश्वर स्थानकावर ३ गाडय़ांना थांबे मिळण्याची शक्यता

समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ 

   Follow us on        

चिपळूण दि. २४ जुलै: निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या सदस्यांनी संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाचे आमदार श्री शेखर निकम यांच्यासोबत आज कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची विविध मागण्यांसाठी आज भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून संतोष कुमार झा यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांसाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे वचन दिले असल्याचे पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.

संगमेश्वर स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पाहता येथे काही 9 गाड्यांना थांबा मिळावा अशी आमची मागणी होती. आमदार निकाम सर यांच्यामुळे या बैठकीचा योग जुळून आला असून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या वतीने मी त्यांचे तसेच श्री झा साहेबांचे आभार मानतो. संगमेश्वरला लवकरच किमान 9 पैकी 3 गाडयांना थांबा मिळेल अशी आशा आज निर्माण झाली आहे. या प्रसंगी आमदार आदरणीय शेखर सर, ग्रुपच्या वतीने श्री दीपक पवार, संतोष पाटणे, समीर सप्रे, अशोक मुंडेकर, सुशांत फेपडे आदी उपस्थित होते अशी माहिती पत्रकार संदेश जिमन यांनी दिली.

संगमेश्वर मध्येच या तीन गाड्याना थांबा मिळण्याची दाट शक्यता

▪️1) 110099/11000 LTT मडगांव LTT

▪️2) 19577/19578 जामनगर तिरुनलवेली एक्सप्रेस

▪️3)20909/20910 कोचिंवेल्ली पोरबंदर एक्सप्रेस

समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ

पत्रकार संदेश जिमन यांनी समाज माध्यमातून नेहेमीच संगमेश्वर, चिपळूण येथील रेल्वे प्रवाशांसाठी आवाज उठवला आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मागच्या वर्षी नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर येथे थांबा मिळवून दिला होता. त्यांच्या कार्याचे त्यावेळी मोठे कौतुक झाले होते आणि प्रवासी संघटनेंकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. सामान्य जनतेचा आवाज प्रशासनाकडे पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा उत्तम वापर कसा करता येईल याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी दिले आहे. आपल्या मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी आणि सोयींसाठी आमदार शेखर निकम नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. रेल्वे प्रश्नासंबंधी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांच्या रूपाने या मतदारसंघात एक उत्तम नेतृत्व लाभले असल्याची जनतेची भावना आहे.

 

 

 

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search