मुंबई: बोरिवली दहिसर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कोकणकरांची वस्ती आहे. मात्र त्यांना कोकणात गावी जाण्यासाठी दादर गाठावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी बोरिवली येथून विशेष गाडी सोडण्यात येणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याबाबत आपण केंदीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली असल्याचेही ते बोलले. गुरुवारी कांदिवली येथील रघुलीला मॉलमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात पियुष गोयल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना केंदीय वाणिज्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गुरुवारी कांदिवली येथील रघुलीला मॉलमध्ये त्यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद कार्यक्रम झाला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार गोपाळ शेट्टी, विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर, आमदार अतुल भाटखळकर, विकास भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, उत्तर मुंबईचे निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी हे उपस्थित होते.
Konkan Railway: कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. या काळात रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरचा ताण मोठया प्रमाणात वाढतो. योग्य आणि वेळेत नियोजन केल्यास प्रवाशांची गैरसोय कमी होऊन त्यांचा प्रवास सुखकर बनू शकतो. यंदाच्या गणेशोत्सवात गणेश भाविकांचा त्रास कमी करण्यासाठी कोकण विकास समितीने अभ्यास करून काही बदल आणि उपाययोजना रेल्वे प्रशासनास सुचवल्या आहेत. त्या आशयाचे निवेदन त्यांनी रेल्वे बोर्ड तसेच इतर संबंधित आस्थापानांना पाठवले आहे.
निवेदनात कोणत्या गोष्टी सुचवल्या आहेत?
गणेशोत्सवात दिवा रोहा मेमू चिपळूणपर्यंत वाढवल्याने 2022, 2023 आणि 2024 मध्ये रोहा येथे प्रवासी आंदोलन, रेल रोको आणि प्रवाशांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामुळे दिवा रोहा मेमूचा विस्तार करण्याऐवजी किंवा पनवेल ते चिपळूण दरम्यान वेगळी स्पेशल ट्रेन चालविण्या ऐवजी मुंबई सीएसएमटी ते चिपळूण दरम्यान अनारक्षित गाड्या चालवाव्यात. या गाडयांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबे देण्यात यावेत. तसेच या गाडयांना द्वितीय श्रेणी (2S) आणि AC चेअर कार (CC) कोच सोयीचे पडतील. पनवेल स्थानक बहुतेक प्रवाशांना सोयीचे नाही. मुंबई शहर आणि उपनगरातील प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या किमान दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत चालवणे गरजेचे आहे.
चिपळूण – रत्नागिरी दरम्यानच्या दिवसा धावणाऱ्या गाड्यांसाठी सेकंड स्लीपर SL किंवा थ्री टायर एसी 3A डब्यांचे रूपांतर सेकंड सीटिंग 2S आणि एसी चेअर कार CC कोच मध्ये केल्यास जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. (See below table)
CLASS
LHB
IRS/ICF
Second Class Seating (2S)
120 (1.5 times of 80 berths in SL)
108 (1.5 times of 72 berths SL)
Sleeper used as 2S
100 (1.25 times of 80 berths in SL)
90 (1.25 times of 72 berths in SL)
AC Chair Car (CC)
78
74
3A used as CC
90 (1.25 times of 72 berths in 3A)
80 (1.25 times of 64 berths in 3A)
3E used as CC
100 (1.25 times of 80 berths in 3E)
–
अतिरिक्त रेकचा वापर: दिवा पेण मेमूच्या अतिरिक्त रेकचा उपयोग शनिवार व रविवार रोजी मुंबई/ठाणे ते खेड दरम्यान विशेष ट्रेन चालवण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच, 10101/10102 रत्नागिरी मडगाव एक्स्प्रेस, 17613/17614 नांदेड पनवेल एक्स्प्रेसचा रेक मुंबई ते वीर/खेड/चिपळूण/रत्नागिरी दरम्यान विशेष गाड्या चालविण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
पनवेल ऐवजी दिवा किंवा एलटीटी वरून विशेष गाड्या चालवणे: मुंबई विभागातील एकाच बोर्डिंग/डिबोर्डिंग स्टेशनमुळे पनवेल येथून सुटणाऱ्या गाडयांना प्रतिसाद कमी मिळतो (low occupancy ). तसेच, पनवेल हे बहुतांश मुंबई विभागासाठी सोयीचे नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने दिवा किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस येथून या विशेष गाड्या चालवण्याचा विचार करावा.
या स्थानकांवर थांबे द्या: पेण, करंजाडी, सापे वामणे, विन्हेरे, दिवाणखावटी, रावली, खारेपाटण रोड, आचिर्णे, सौंदळ, झाराप, मडुरे, पेरणेम, इ. या स्थानकांवर नियमित प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त, दररोज किमान दोन विशेष गाड्या (एक मध्य रेल्वे आणि एक पश्चिम रेल्वे) साठी थांबे द्या.
मालवाहतूक आणि रोरो सेवांना स्थगिती: प्रवासी गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी सणासुदीच्या काळात माल आणि RORO (रोल-ऑन रोल-ऑफ) वाहतूक तात्पुरती स्थगित ठेवण्याचा विचार करावा.
पश्चिम रेल्वेचे योगदान: सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, वलसाड, वडोदरा, उधना, सुरत, विश्वामित्री, अहमदाबाद, पुणे, मनमाड, भुवावळ, नागपूर, अशा विविध टर्मिनल्सवरून गाड्या चालवणे आवश्यक आहे. ठाणे, कल्याण आणि वसई रोडसारख्या महत्त्वाच्या मध्यवर्ती स्थानकांवर दररोज पुरेशा गाड्या उपलब्ध करून देणे. वसई रोडवर लोको रिव्हर्सल टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई प्रदेशातून कोकण रेल्वेपर्यंत अमृत भारत, मेमू किंवा वंदे भारत गाड्या चालविल्यास फायदा होईल.
FTR सेवेस वेळेचे बंधन देण्यात यावेत: FTR स्पेशल सेवेमुळे सामान्य तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे UTS आणि PRS द्वारे बुकिंगसाठी खुल्या असलेल्या सामान्य विशेष गाड्यांसाठी प्राइम स्लॉट आरक्षित केले जावेत आणि FTR स्पेशल सेवा फक्त 11:00 ते 16:00 या वेळेत मुंबईपासून चालवल्या जाव्यात.
पूर्णत: अनारक्षित स्पेशल गाड्या फक्त जास्त मागणी असलेल्या दिवसांपुरती मर्यादित ठेवा: पूर्णत: अनारक्षित स्पेशल फक्त गर्दीच्या दिवसांमध्ये चालवल्या जाव्यात किंवा त्या गाड्यांमध्ये काही आरक्षित डबे दिले जावेत.
12 कोच मेमूऐवजी 22/24 कोच ट्रेन चालवा: 12 कोच MEMU चालवल्याने मार्ग ब्लॉक होतो परंतु कमी प्रवासीक्षमता प्रदान करते. त्यामुळे, मार्गाच्या जास्तीत जास्त वापरासाठी 22 LHB/24 IRS कोच असलेल्या गाड्या चालवणे आवश्यक आहे.
खालील टेबल मध्ये दर्शविलेल्या गाडयांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात किमान ३ स्थानकांवर अतिरिक्त तात्पुरते थांबे प्रदान करा उदा. माणगाव, वीर, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, झाराप आणि मडुरे.
पणजी:कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दक्षिण गोव्यात सुरू असलेल्या दुहेरी मार्गाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या गाड्या उशिराने धावत असल्याची अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) उपमहाव्यवस्थापक बबन घाटगे यांनी सांगितले की, दक्षिण पश्चिम रेल्वेने दक्षिण गोव्यातील माजोर्डा Majorda आणि कासावली Cansualim स्थानकांदरम्यानच्या मार्गाचा दुहेरी ट्रॅकच्याकामामुळे रविवारपासून कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या किमान तीन ते चार तास उशिराने धावत असून मंगळवार दिनांक ११ जून पर्यंत ही वाहतूक सूरळीत होणार आहे.
दरम्यान उन्हाळी सुट्ट्या लवकरच संपत असल्याने चाकरमानी वर्ग मुंबईला परतीचा प्रवासाला लागला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाडयांना मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यात बहुतेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Konkan Railway News: उद्या सोमवारपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्ग धोकादायक होत असल्याने पावसाळ्यात या मार्गावर गाड्या धीम्या गतीने चालविण्यात येतात. त्यामुळे सर्व गाड्यांसाठी पावसाळयात वेगळे वेळापत्रक लागू केले जाते. त्याचप्रमाणे या मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या काही गाड्यांच्या फेऱ्यात कपातही केली जाते.
रेक च्या मर्यादेमुळे कपात
वेळापत्रक बदलल्या मुळे रेक अभावी काही गाड्यांच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. जसे की सकाळी सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तोच रेक दुपारी मडगाव वरून सीएसएमटी साठी वापरला जातो. मात्र पावसाळी हंगामात गाड्यांचा वेग धीमा होत असल्याने तोच रेक समान दिवशी वापरता येत नाही. साहजिकच दुसऱ्या दिवशी मडगाव वरून सीएसएमटी साठी तो रेक वापरला जातो. या कारणामुळे आठवड्यातून ६ दिवस धावणारी ही गाडी पावसाळी हंगामात फक्त तीनच दिवस चालविण्यात येणार आहे. या कारणाने अजून काही गाड्यांच्या फेऱ्यात कपात केली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.
या सर्व गाड्यांचे वेळापत्रकही बदलून पावसाळी वेळापत्रकानुसार या गाड्या चावलेण्यात येणार आहेत.
टीप: सदर माहिती अंतिम स्वरूपाची नसून रेल्वे प्रशासनातर्फे काही बदल केला जाऊ शकतो. आपल्या प्रवासाची योजना आखताना कृपया रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशीच्या इतर पर्यायाचा वापर करावा ही विनंती
मुंबई : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दि 7 जुलै 2024 पर्यंत त्यांच्या निर्धारित सीएसएमटी जंक्शन ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 4 फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने येथून सुटणार्या काही गाड्यांचा प्रवास दादर स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आला आहे. यात कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील 10, 11, 12, 13 या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे दिनांक 07 जुलै पर्यंत म्हणजे पुढील महिनाभरासाठी काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.
या कामामुळे मंगळुरू जंक्शन ते सीएसएमटी (12134), मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी (22120) तेजस एक्सप्रेस तसेच मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी दरम्यान रोज धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस(12052) या तिन्ही सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दिनांक 07 जुलै 2024 पर्यंत त्यांचा मुंबई दिशेने होणारा प्रवास दादरलाच संपणार आहे
कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सोमवार दिनांक १० जून नंतर कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
कोकण पट्टयात मुसळधार पडणारा पाऊस आणि डोंगराळ भाग यामुळे येथून जाणारा रेल्वेमार्ग खूप धोक्याचा बनतो. मुसळधार पावसामुळे मार्गावरील दऱ्या कोसळून मोठ्या अपघाताची शक्यता असते. यापूर्वी या कारणाने असे अपघात येथे घडले आहेत. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यादरम्यान येथील रेल्वे वाहतुकीवर काही प्रमाणात बंधने घातली जातात. त्याचाच एक भाग म्हणजे या मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांच्या वेगावर मर्यादा घातल्या जातात. साहजिकच गाड्या प्रवासास जास्त वेळ घेत असल्याने पावसाळ्यात या गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार चालवल्या जातात. यावर्षी दिनांक १० जून २०२४ ते ३० ओक्टोम्बर २०२४ पर्यंत या पावसाळी वेळापत्रकानुसार या मार्गावरील गाड्या चालविण्यात येतील.
या मार्गावरील काही नियमित धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
KONKAN KANYA EXP (20111)
Station Name
Non-Mansoon
Mansoon
Station Name
Non-Mansoon
Mansoon
C SHIVAJI MAH T
23:00
23:00
DADAR
23:16
23:16
THANE
23:46
23:46
PANVEL
00:25
00:25
KHED
03:06
03:22
CHIPLUN
03:32
03:58
SANGMESHWAR
04:04
04:50
RATNAGIRI
05:00
06:05
VILAVADE
05:40
06:50
RAJAPUR ROAD
06:00
07:06
VAIBHAVWADI RD
06:20
07:22
KANKAVALI
06:44
07:56
SINDHUDURG
07:02
08:12
KUDAL
07:14
08:26
SAWANTWADI ROAD
07:34
08:48
PERNEM
07:58
09:38
THIVIM
08:12
10:08
KARMALI
08:34
10:30
MADGAON
09:45
11:40
KONKAN KANYA EXP (20112)
Station Name
Non Mansoon
Mansoon
MADGAON
19:00
18:00
KARMALI
19:40
18:32
THIVIM
20:02
18:54
PERNEM
20:14
19:08
SAWANTWADI ROAD
20:38
19:32
KUDAL
21:00
19:54
SINDHUDURG
21:14
20:06
KANKAVALI
21:30
20:26
VAIBHAVWADI RD
21:56
20:58
RAJAPUR ROAD
22:16
21:18
VILAVADE
22:30
21:38
RATNAGIRI
23:35
23:00
SANGMESHWAR
00:07
23:36
CHIPLUN
00:52
00:18
KHED
01:14
00:46
PANVEL
04:00
04:00
THANE
04:45
04:45
DADAR
05:15
05:15
C SHIVAJI MAH T
05:40
05:40
TUTARI EXPRESS (11003)
Station Name
Non Mansoon
Mansoon
Station Name
Non Mansoon
Mansoon
DADAR
00:05
00:05
THANE
00:32
00:32
PANVEL
01:10
01:10
MANGAON
03:10
03:02
VEER
03:24
03:20
KHED
04:36
04:22
CHIPLUN
05:06
05:18
SAVARDA
05:20
05:40
ARAVALI ROAD
05:32
05:52
SANGMESHWAR
05:50
06:14
RATNAGIRI
06:55
08:00
ADAVALI
07:28
08:40
VILAVADE
07:50
09:00
RAJAPUR ROAD
08:04
09:18
VAIBHAVWADI RD
08:20
09:38
NANDGAON ROAD
08:36
09:56
KANKAVALI
08:50
10:14
SINDHUDURG
09:06
10:36
KUDAL
09:28
10:50
SAWANTWADI ROAD
10:25
12:30
TUTARI EXPRESS (11004)
Station Name
Non Mansoon
Mansoon
Station Name
Non Mansoon
Mansoon
SAWANTWADI ROAD
20:00
17:55
KUDAL
20:14
18:14
SINDHUDURG
20:28
18:26
KANKAVALI
20:45
18:46
NANDGAON ROAD
20:58
19:04
VAIBHAVWADI RD
21:12
19:20
RAJAPUR ROAD
21:40
19:40
VILAVADE
21:56
20:08
ADAVALI
22:12
20:30
RATNAGIRI
23:05
21:30
SANGMESHWAR
23:38
22:18
ARAVALI ROAD
23:50
22:36
SAVARDA
00:02
22:50
CHIPLUN
00:22
23:10
KHED
00:40
23:40
VEER
01:38
01:16
MANGAON
01:56
01:36
PANVEL
04:45
04:45
THANE
05:48
05:48
DADAR
06:40
06:40
MANDOVI EXPRESS (10103)
Station Name
Non Mansoon
Mansoon
Station Name
Non Mansoon
Mansoon
C SHIVAJI MAH T
07:10
07:10
DADAR
07:22
07:22
THANE
07:51
07:51
PANVEL
08:30
08:30
MANGAON
10:22
10:18
KHED
11:18
11:48
CHIPLUN
11:46
12:28
SANGMESHWAR
12:22
13:30
RATNAGIRI
13:30
14:35
ADAVALI
14:06
15:20
RAJAPUR ROAD
14:40
16:30
VAIBHAVWADI RD
14:56
16:56
KANKAVALI
15:30
17:30
SINDHUDURG
15:50
18:00
KUDAL
16:04
18:14
SAWANTWADI ROAD
16:28
19:00
PERNEM
17:15
19:32
THIVIM
17:30
19:46
KARMALI
17:54
20:20
MADGAON
19:10
21:45
MANDOVI EXPRESS (10104)
Station Name
Non Mansoon
Mansoon
Station Name
Non Mansoon
Mansoon
MADGAON
9:15
8:30
KARMALI
9:44
9:00
THIVIM
10:06
9:20
PERNEM
10:20
9:32
SAWANTWADI ROAD
10:40
10:02
KUDAL
11:02
10:22
SINDHUDURG
11:15
10:38
KANKAVALI
11:30
11:00
VAIBHAVWADI RD
11:56
11:30
RAJAPUR ROAD
12:20
11:48
ADAVALI
13:20
12:40
RATNAGIRI
14:10
14:00
SANGMESHWAR
14:54
14:45
CHIPLUN
15:34
15:30
KHED
16:06
16:02
MANGAON
17:06
17:08
PANVEL
19:10
19:10
THANE
20:37
20:37
DADAR
21:07
21:07
C SHIVAJI MAH T
21:45
21:45
MAO JANSHATABDI (12051)
Station Name
Non-Mansoon
Mansoon
Station Name
Non-Mansoon
Mansoon
C SHIVAJI MAH T
05:10
05:10
DADAR
05:18
05:18
THANE
05:43
05:43
PANVEL
06:23
06:23
CHIPLUN
09:00
10:00
RATNAGIRI
10:40
11:20
KANKAVALI
12:10
13:26
KUDAL
12:30
14:00
SAWANTWADI ROAD
12:50
14:20
THIVIM
13:20
15:00
MADGAON
14:30
16:30
MAO JANSHATABDI (12052)
Station Name
Non Mansoon
12052 Mansoon
Station Name
Non Mansoon
12052 Mansoon
MADGAON
15:05
12:00
THIVIM
15:50
12:42
SAWANTWADI ROAD
16:22
13:16
KUDAL
16:40
13:30
KANKAVALI
17:02
14:30
RATNAGIRI
18:35
17:15
CHIPLUN
19:46
18:40
PANVEL
21:58
21:58
THANE
22:43
22:43
DADAR
23:08
23:08
C SHIVAJI MAH T
23:55
23:55
MAO TEJAS EXP (22119)
Station Name
Non-Mansoon
Mansoon
C SHIVAJI MAH T
05:50
05:50
DADAR
06:00
06:00
THANE
06:23
06:23
PANVEL
06:58
06:58
CHIPLUN
10:00
10:38
RATNAGIRI
11:10
12:00
KUDAL
13:10
14:30
KARMALI
14:10
15:48
MADGAON
15:00
17:00
CSMT TEJAS EXP (22120)
Station Name
Non Mansoon
Mansoon
MADGAON
15:35
12:50
KARMALI
16:05
13:32
KUDAL
17:02
14:44
RATNAGIRI
18:55
18:00
CHIPLUN
20:10
19:22
PANVEL
22:25
22:25
THANE
23:05
23:05
DADAR
23:30
23:30
C SHIVAJI MAH T
00:20
00:20
DIVA SWV EXPRESS (10105)
Station Name
Non Mansoon
Mansoon
DIVA
06:25
06:25
KALAMBOLI
06:39
06:39
PANVEL
06:53
06:53
APTA
07:17
07:17
JITE
07:27
07:27
ROHA
09:00
09:00
MANGAON
09:41
09:27
GOREGAON ROAD
09:51
09:38
VEER
10:01
09:46
SAPE WAMNE
10:10
10:00
KARANJADI
10:21
10:15
VINHERE
10:32
10:30
KHED
11:00
11:04
CHIPLUN
11:30
11:35
SAVARDA
11:54
12:01
ARAVALI ROAD
12:10
12:14
SANGMESHWAR
12:39
12:37
RATNAGIRI
14:25
14:00
NIVASAR
14:50
14:22
ADAVALI
15:01
14:43
VERAVALI (H)
15:12
14:58
VILAVADE
15:23
15:09
SAUNDAL
15:33
15:22
RAJAPUR ROAD
15:44
15:35
KHAREPATAN ROAD
15:55
15:45
VAIBHAVWADI RD
16:06
15:54
ACHIRNE
16:17
16:06
NANDGAON ROAD
16:28
16:16
KANKAVALI
16:40
16:33
SINDHUDURG
16:53
16:50
KUDAL
17:10
17:10
ZARAP
17:30
17:31
SAWANTWADI ROAD
18:30
18:30
SWV DIVA EXPRESS (10106)
Station Name
Non Mansoon
Mansoon
SAWANTWADI ROAD
08:40
08:15
ZARAP
08:50
08:26
KUDAL
09:01
08:38
SINDHUDURG
09:12
08:50
KANKAVALI
09:27
09:10
NANDGAON ROAD
09:39
09:32
ACHIRNE
09:49
09:43
VAIBHAVWADI RD
09:59
09:55
KHAREPATAN ROAD
10:09
10:06
RAJAPUR ROAD
10:21
10:18
SAUNDAL
10:29
10:31
VILAVADE
10:39
10:42
VERAVALI (H)
10:47
10:58
ADAVALI
10:57
11:18
NIVASAR
11:11
11:39
RATNAGIRI
12:20
12:05
SANGMESHWAR
13:00
12:50
ARAVALI ROAD
13:12
13:10
SAVARDA
13:24
13:24
CHIPLUN
13:42
13:45
KHED
14:10
14:21
VINHERE
14:34
14:50
KARANJADI
14:46
15:05
SAPE WAMNE
14:57
15:17
VEER
15:30
15:30
GOREGAON ROAD
15:40
15:56
MANGAON
16:00
16:07
ROHA
17:20
17:20
JITE
18:14
18:14
APTA
18:28
18:28
PANVEL
18:52
19:20
KALAMBOLI
19:09
19:29
DIVA
20:10
20:10
LTT MADGAON EXP (11099)
Station Name
Non Mansoon
Mansson
LOKMANYATILAK T
00:45
00:45
THANE
01:05
01:05
PANVEL
01:50
01:50
KHED
04:24
04:36
CHIPLUN
04:48
05:08
RATNAGIRI
06:00
07:30
KANKAVALI
07:54
10:00
SAWANTWADI ROAD
08:38
11:00
THIVIM
09:24
11:40
KARMALI
09:46
12:00
MADGAON
11:30
14:00
MADGAON LTT EXP (11100)
Station Name
Non Mansoon
Mansoon
MADGAON
12:30
11:30
KARMALI
13:02
12:00
THIVIM
13:36
12:20
SAWANTWADI ROAD
14:30
12:50
KANKAVALI
15:15
13:48
RATNAGIRI
17:10
16:30
CHIPLUN
18:22
17:56
KHED
18:42
18:28
PANVEL
21:45
21:45
THANE
22:23
22:23
LOKMANYATILAK T
23:35
23:35
NETRAVATI EXP (16345)
Station Name
Non Mansoon
mansoon
LOKMANYATILAK T
11:40
11:40
THANE
12:02
12:02
PANVEL
12:45
12:45
ROHA
14:00
14:10
KHED
15:25
15:38
CHIPLUN
15:50
16:20
SANGMESHWAR
16:50
17:10
RATNAGIRI
18:35
18:30
KUDAL
20:30
20:56
THIVIM
21:30
21:40
KARMALI
21:52
22:05
MADGAON
23:00
23:30
CANCONA
23:40
00:10
KARWAR
23:56
00:40
KUMTA
00:54
01:34
MURDESHWAR
01:26
02:12
BHATKAL
01:46
02:32
MOOKAMBIKA ROAD
02:02
02:52
KUNDAPURA
02:36
03:22
UDUPI
03:00
03:46
SURATHKAL
03:40
05:02
MANGALURU JN
04:15
05:45
KASARAGOD
05:03
06:34
KANHANGAD
05:23
06:54
NILESHWAR
05:35
07:04
CHARVATTUR
05:39
07:12
PAYYANUR
05:54
07:24
KANNAPURAM
06:09
07:41
KANNUR
06:32
08:07
THALASSERY
06:53
08:28
VADAKARA
07:18
08:59
KOZHIKKODE
08:07
09:42
PARPANANGADI
08:34
10:09
TIRUR
08:48
10:28
KUTTIPPURAM
09:09
10:49
SHORANUR JN
10:15
12:00
THRISUR
10:57
12:50
DIVINE NAGAR
11:31
13:27
ALUVA
11:58
13:48
ERNAKULAM JN
12:30
14:15
CHERTHALA
13:09
14:59
ALLEPPEY
14:00
15:32
AMBALAPPUZHA
14:24
15:45
HARIPPAD
14:44
16:04
KAYANKULAM JN
15:03
16:38
KARUNAGAPALLI
15:20
16:59
KOLLAM JN
16:02
17:37
VARKALASIVAGIRI
16:45
18:02
TRIVANDRUM CNTL
18:05
19:35
NETHRAVATHI EXP (16346)
Station Name
Non Mansoon
Mansoon
TRIVANDRUM CNTL
09:15
09:15
VARKALASIVAGIRI
09:54
09:54
KOLLAM JN
10:22
10:22
KARUNAGAPALLI
10:50
10:50
KAYANKULAM JN
11:08
11:08
HARIPPAD
11:24
11:24
AMBALAPPUZHA
11:44
11:44
ALLEPPEY
12:22
11:54
CHERTHALA
12:49
12:17
ERNAKULAM JN
13:45
13:10
ALUVA
14:13
13:38
DIVINE NAGAR
14:34
14:00
THRISUR
15:12
14:30
SHORANUR JN
16:20
15:40
KUTTIPPURAM
16:54
16:04
TIRUR
17:13
16:18
PARPANANGADI
17:29
16:34
KOZHIKKODE
18:00
17:07
VADAKARA
18:38
17:48
THALASSERY
18:58
18:08
KANNUR
19:32
18:37
KANNAPURAM
19:49
18:52
PAYYANUR
20:04
18:59
CHARVATTUR
20:24
19:19
NILESHWAR
20:32
19:27
KANHANGAD
20:43
19:43
KASARAGOD
21:08
20:03
MANGALURU JN
22:45
21:30
SURATHKAL
23:56
22:35
UDUPI
00:38
23:20
KUNDAPURA
01:02
23:48
MOOKAMBIKA ROAD
01:26
00:28
BHATKAL
01:40
00:44
MURDESHWAR
01:54
00:58
KUMTA
02:24
01:34
KARWAR
03:20
02:28
CANCONA
03:52
03:00
MADGAON
04:35
03:50
KARMALI
05:16
04:32
THIVIM
05:38
04:54
KUDAL
07:12
05:50
RATNAGIRI
09:25
09:05
SANGMESHWAR
10:24
09:50
CHIPLUN
11:38
10:40
KHED
12:10
11:20
ROHA
13:35
14:00
PANVEL
14:52
14:52
THANE
15:47
15:47
LOKMANYATILAK T
17:05
17:05
MATSYAGANDHA EXP (12619)
Station Name
Non Mansoon
Mansoon
LOKMANYATILAK T
15:20
15:20
THANE
15:42
15:42
PANVEL
16:22
16:22
MANGAON
18:00
18:00
KHED
19:00
19:20
CHIPLUN
19:46
20:00
RATNAGIRI
21:15
21:35
KUDAL
23:10
23:48
MADGAON
01:05
02:25
KARWAR
02:10
03:36
ANKOLA
02:30
04:04
GOKARNA ROAD
02:42
04:20
KUMTA
03:04
04:40
HONNAVAR
03:18
05:00
MURDESHWAR
03:48
05:34
BHATKAL
04:04
05:50
MOOKAMBIKA ROAD
04:20
06:10
KUNDAPURA
04:48
07:00
BARKUR
05:02
07:16
UDUPI
05:18
07:30
MULKI
06:10
08:18
SURATHKAL
06:23
08:32
MANGALURU CNTL
07:40
10:10
MATSYAGANDA EXP (12620)
Station Name
Non Mansoon
Mansoon
MANGALURU CNTL
14:20
12:45
SURATHKAL
15:10
13:32
MULKI
15:22
13:42
UDUPI
15:48
14:10
BARKUR
16:02
14:24
KUNDAPURA
16:14
14:40
MOOKAMBIKA ROAD
16:40
15:12
BHATKAL
16:56
15:26
MURDESHWAR
17:10
15:46
HONNAVAR
17:32
16:08
KUMTA
17:46
16:26
GOKARNA ROAD
18:04
16:46
ANKOLA
18:16
17:00
KARWAR
18:46
17:30
MADGAON
20:00
19:30
KUDAL
21:38
21:10
RATNAGIRI
23:45
23:30
CHIPLUN
1:03
01:00
PANVEL
5:01
05:01
THANE
5:57
05:57
LOKMANYATILAK T
6:35
06:35
MANGALURU EXP (12133)
Station Name
Pre - Mansoon
Mansoon
C SHIVAJI MAH T
21:54
21:54
THANE
22:36
22:36
PANVEL
23:15
23:15
RATNAGIRI
03:25
04:15
KANKAVALI
05:06
06:28
KARMALI
06:28
08:20
MADGAON
07:20
09:10
KARWAR
08:36
10:18
KUMTA
09:28
11:12
BHATKAL
10:12
12:10
MOOKAMBIKA ROAD
10:28
12:22
KUNDAPURA
10:56
12:50
UDUPI
11:26
13:20
SURATHKAL
12:02
14:20
MANGALURU JN
13:05
15:40
MAJN CSMT EXP (12134)
Station Name
Non Mansoon
Mansoon
MANGALURU JN
14:00
16:35
SURATHKAL
14:42
17:06
UDUPI
15:16
17:50
KUNDAPURA
15:40
18:18
MOOKAMBIKA ROAD
16:08
18:56
BHATKAL
16:26
19:10
KUMTA
17:00
20:00
KARWAR
17:48
20:56
MADGAON
18:55
22:00
KARMALI
19:30
22:40
KANKAVALI
20:50
23:54
RATNAGIRI
22:30
02:15
PANVEL
03:07
08:27
THANE
03:48
09:43
C SHIVAJI MAH T
04:35
10:35
पावसाळी वेळापत्रक बदलाची माहिती नसल्याने बऱ्याच प्रवाशांच्या गाड्या चुकल्याच्या घटना घडल्या आहेत. हे बदलेले वेळापत्रक मोठ्या प्रमाणात शेअर करून कित्येक प्रवाशांचा त्रास वाचवता येईल.
टीप: हे वेळापत्रक फक्त प्रवाशांच्या माहितीसाठी असून त्यात कदाचित रेल्वेतर्फे काहीसा बदलही अपेक्षित आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळांवर/अँपवर माहिती तपासावी.
Konkan Railway News: या वर्षी उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी एका गाडीची सेवा जून अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक ३० जून २०२४ पर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. या गाडीची सेवा दिनांक ०६ जून २०२४ ला समाप्त होणार होती. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या गाडीचा जून अखेरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती 2024 :कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ( KRCL ) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता + प्रकल्प अभियंता (निविदा आणि प्रस्ताव), CAD/ड्राफ्ट्समन आणि सहाय्यक अभियंता/कंत्राटी या पदांसाठी उमेदवार भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार दिलेल्या पदांसाठी 11 रिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत. निवडलेल्या उमेदवारांना पदांनुसार रु.35400 ते रु.56100 पर्यंत मासिक मानधन मिळणार आहे. तसेच अर्ज करण्याची उच्च वयोमर्यादा ही पदांनुसार ४५ वर्षांपर्यंत आहे
कोकण रेल्वेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, लागू उमेदवारांची निवड समितीने घेतलेल्या वॉक-इन मुलाखतीच्या आधारे केली जाईल . पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार समितीने घेतलेल्या वॉक-इन मुलाखतीसाठी थेट उपस्थित राहू शकतात.ही नियुक्ती 01-वर्षाच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर असेल आणि उमेदवारांच्या कामगिरीनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. मुलाखतीच्या ठिकाणी सर्व संबंधित कागदपत्रे आणि रीतसर भरलेला अर्ज सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
पदांनुसार रिक्त जागा खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:
किमान /कमाल वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि ईतर सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात वाचा
रत्नागिरी,आवाज कोकणचा: चिपळूण, खेड, महाड, माणगाव विभागातील प्रवाशांना स्वतंत्र गाडी नसल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये गर्दी होऊन सर्वांनाच अडचणीचा सामना करावा लागतो. तर गावातून मुंबईला येताना आतील प्रवाशांनी दरवाजे आतून बंद केल्यामुळे खेड व त्यापुढील प्रवाशांना गाडीत चढताच येत नाही. काही वेळेस आरक्षण असलेल्या प्रवाशांची गाडीही चुकते. गणेशोत्सवात तर हा त्रास आणखी वाढतो. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून दादर व चिपळूण दरम्यान स्वतंत्र गाडी सोडण्याची मागणी होत आहे. तिकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासन केवळ गणेशोत्सव व होळीच्या काळात पनवेलवरून चिपळूण गाडी सोडत आहे. परंतु खेड/चिपळूणचे मुंबईपासूनचे अंतर रत्नागिरी/सावंतवाडीच्या तुलनेत कमी असल्यामुळे व पनवेल किंवा दिव्याला पोहोचणे त्रासदायक असल्यामुळे अति गर्दीचे दिवस वगळता प्रवासी त्या गाडीने प्रवास करण्यास उत्सुक नसतात.
हेच लक्षात घेता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातून रत्नागिरी, सावंतवाडी, मडगाव, मंगळुरुप्रमाणेच चिपळूणसाठीही स्वतंत्र गणपती विशेष गाडी सोडावी अशी मागणी जल फाउंडेशनने रेल्वे मंत्री, मध्य रेल्वे व कोंकण रेल्वेकडे केली आहे.
मागील काही वर्षांत खेड, माणगाव, रोहा येथे अति गर्दीमुळे प्रवाशांमध्ये झालेले वाद, गाडीवर दगडफेक यांसारखे प्रकार लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे जल फौंडेशच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या नवीन गाड्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवून दक्षिणेकडील राज्यांसाठी नवीन गाडी चालविण्याची कोकण रेल्वेची तयारी
Follow us on
Railway Updates: कोकण रेल्वेमार्गावर पनवेल – कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेने ही गाडी चालवण्याची संमती दिली असल्याची माहिती आहे. मात्र ही सेवा कधी सुरू होणार हे स्पष्ट नाही असा खुलासा मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
सध्या नेत्रावती एक्स्प्रेस ही मुंबईहून केरळला जाणारी एकमेव दैनिक गाडी आहे. कोकण रेल्वे मार्ग सुरु झाल्यावर तीन गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्या गाड्या दैनिक स्वरूपाच्या नसून आठवड्यातून २ दिवस धावणाऱ्या आहेत. मुंबई-कन्याकुमारी डेली ट्रेन जयंती जनता एक्स्प्रेस चे रूपांतर पुणे-कन्याकुमारी झाल्यामुळे, केरळातील मल्याळीं जनतेने मुंबईसाठीची एक दैनंदिन ट्रेन गमावली आहे.
या स्थितीत मुंबई-केरळ दैनिक गाडी सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेने गेल्या वेळापत्रक समितीच्या बैठकीत केली होती. या बैठकीत दैनिक ट्रेनचे वेळापत्रक काढण्यात अडचणी येत असल्याने दररोजच्या ऐवजी साप्ताहिक सेवेच्या विनंतीवर विचार करण्याचे कोकण रेल्वेने सुचवले होते. त्यानुसार ही गाडी आठवड्यातून एकदाच धावणार असल्याचे मान्य करण्यात आले आहे.
ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा मुंबईतील इतर ठिकाणाहून सोडावी, अशी शिफारस दक्षिण रेल्वेने केली आहे. तथापि, मध्य रेल्वेने सांगितले की शहरातील सर्व टर्मिनस जास्तीत जास्त क्षमतेने कार्यरत आहेत, त्यामुळे ट्रेन पनवेलहून निघू सोडण्यात येईल. या निर्णयानंतर आता लवकरच पनवेल – कोचुवेली या नवीन साप्ताहिक गाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रवासी संघटनांची नाराजी.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी वसई- सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी अशा गाड्या सोडण्यात याव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन मागण्या केल्या आहेत. मात्र कोकण रेल्वे पूर्ण क्षमतेने चालत असून या मार्गावर नवीन गाडी चालविणे शक्य नाही हे कारण देऊन या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. मात्र आता दक्षिणेकडील राज्यासाठी नवीन गाडी कशी काय मंजूर केली गेली हा प्रश्न विचारला जात आहे.