Category Archives: कोकण रेल्वे
रत्नागिरी : मंगळुरू ते मडगाव मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याने मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराचा घाट घातला जात आहे. या हालचालींना मुंबईपासून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गसह गोव्यातूनही मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. कोकण विकास समितीने या हालचालींच्या विरोधात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्रव्यवहार करून तीव्र विरोध दर्शवत चांगली चालत असलेली गाडी विस्तारित करण्याऐवजी काही चांगले पर्याय देखील सुचवले आहेत.
अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मंगळूर मडगाव (२०६४५/२०६४६) वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याच्या कारणामुळे सुरुवातीपासूनच ९८ ते १००% प्रवासी भारमान मिळत असलेली मुंबई सीएसएमटी ते मडगाव ही वंदे भारत एक्सप्रेस(२२२२९/२२२३०) मंगळूरपर्यंत विस्तारित करण्याची मागणी दक्षिण कन्नडाचे खासदार नलीन कुमार कातिल यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयस्तरावर देखील या दृष्टीने विचार होऊ लागला आहे. मात्र, याला कोकणसह गोव्यातून प्रचंड प्रमाणात विरोध होऊ लागला आहे.
मुंबई ते गोवा दरम्यान चालणाऱ्या (२२२२९/२२२३०) वंदे भारत एक्सप्रेसला सध्या मिळणारा प्रतिसाद पाहता ही गाडी आठ कोच ऐवजी सोळा कोच सहित चालविण्याची आवश्यकता आहे. मात्र हीच गाडी पुढे मंगळूरूपर्यंत चालविल्यास अनेक समस्या निर्माण होतील. त्यापेक्षा मंगळूर मडगाव (२०६४५/२०६४६) वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार मुंबई पर्यंत करून तिला कोकणातील चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या स्थानकांवर थांबा देण्यात यावा असा पर्याय कोकण विकास समितीने सुचवला आहे.
- कोकणावरच नेहमी अन्याय का? कोकणवासियांना न्याय मिळणार का?
- कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेतील विलीनीकरण करण्यात यावे.
- “अमृत भारत योजनेत” कोकण रेल्वेवरील फायद्याचे आणि महत्त्वाचे स्थानकांत पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास समावेश करण्यात यावा.
- सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास रेल्वे टर्मिनल्स चा दर्जा मिळण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार आदरणीय प्रा. मधू दंडवते साहेबांचे, ‘प्रा. मधू दंडवते सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनल्स’ असे नामांतरण करण्यात यावे.
- कोकणातील महत्त्वाच्या सर्व स्थानकात पत्रा शेड, दिवा, पंखा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रतिक्षालय, फलाटांची उंची, आसनव्यवस्था यांची पुरेपूर सोय करणे.
- महत्वांच्या रेल्वे स्थानकात प्रवाश्याच्या गर्दीचे प्रमाण पाहता बहूतेक जलद, मेल/एक्सप्रेस गाड्यांस वेळेच्या सोयीने थांबे देण्यात यावेत. (जनशताब्दि, वंदेभारत, तेजस आदि)
- कोकणातील सर्व स्थानकांत प्रवासी आरक्षण तिकिटांचा कोटा काही अंशी वाढविण्यात याव्यात.शारीरिक व्यंग असलेल्या तसेच वय वर्षे ७५ आणि अधिक असणाऱ्या महीला/पुरुष वर्ग प्रवाशांस रेल्वे तिकिटावर सूट देण्यात यावी.
- मुंबई – चिपळूण इंटरसिटी एक्सप्रेस दैनंदिन गाडी सुरू करावी.
- मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रकारचा प्रकल्प चिपळूण येथेही सुरू करण्यात यावा.
- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामा मार्गस्थ करण्यात यावे.
Konkan Railway News :कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एलटीटी – मडगाव – एलटीटी एक्सप्रेस क्रमांक 11099/11100 या गाडीच्या आजच्या सेवेत काहीसा बदल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मडगाव येथून लोकमान्य टिळक टर्मिनससाठी आज दिनांक 02 सुटणार्या 11100 मडगाव- एलटीटी एक्सप्रेस या गाडीची सेवा आज पनवेल पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आज मधरात्री दिनांक 03 रोजी सुटणारी 11099 एलटीटी-मडगाव ही गाडी पनवेल या स्थानकावरून पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी मडगावसाठी रवाना होणार आहे.
सिंधुदुर्ग, ०२ फेब्रु. : मालवण तालुक्यातील आंगणेवाडीची प्रसिद्ध भराडी देवीची जत्रा चालू झाली आहे. संपूर्ण देशातून भक्त आंगणेवाडी येथे येण्यास सुरवातही झाली आहे. भाविकांचा वाढणारा प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील चालणार्या तुतारी एक्सप्रेस या गाडीला एक अतिरिक्त स्लीपर डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज मध्यरात्री म्हणजे दिनांक 03 मार्च रोजी सुटणार्या 11003 दादर – सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस या गाडीला एक स्लीपर अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.
परतीच्या प्रवासात दिनांक 04 मार्च रोजी सुटणार्या 11004 सावंतवाडी- दादर या गाडीला एक स्लीपर अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.
या अतिरिक्त कोचममुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना फायदा होणार आहे.
मुंबई:जलद प्रवास आणि अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळावा यासाठी प्रवासी तेजस आणि वंदे भारत एक्सप्रेसंना प्राधान्य देतात. या गाड्यांचा जवळपास 90% मार्ग Route महाराष्ट्र राज्यात असल्याने या दोन्ही गाड्यांतून मोठ्या प्रमाणावर मराठी भाषक प्रवास करीत असतात. परंतु प्रवाशांना मराठीऐवजी इंग्रजीच वृत्तपत्र उपलब्ध करण्यात येते. याबद्दल प्रवासी खंत व्यक्त करू लागले आहेत.
मनसेचे नेते नितीन सरदेसाई दादरवरून बुधवारी तेजस एक्स्प्रेसने रत्नागिरीला जात होते. यावेळी त्यांना मराठी वृत्तपत्र वाचण्यास हवा होता. मात्र तेजस एक्स्प्रेसमध्ये फक्त इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध होते. मराठी वृत्तपत्र उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मंगळवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला आणि बुधवारी मराठी भाषेची कशाप्रकारे गळचेपी होते, त्याचा अनुभव आला. आपल्याच राज्यातून सुरू होणार्या तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र नसणे. फक्त इंग्रजी वर्तमानपत्र असणे ही नक्कीच गौरवाची बाब नाही. यापुढे रेल्वेगाड्यांमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळेल याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना खात्री करेलच. परंतु प्रवाशांनी सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता सगळीकडेच मराठीचा आग्रह धरावा, असे मत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले. त्यांनी या आवाहनाचा एक विडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.
मुंबई दि. २४ फेब्रु. : कोकण रेल्वे मार्गावरील मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सर्व प्रवासी संघटना व संस्था एकत्र येत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची स्थापना करण्यात आली.सर्व सलग्न प्रवासी संघटनांच्या मागण्या एकत्र करून त्याच्या मागण्या कोकण रेल्वेकडे करण्यात आली. त्यात प्रामूख्याने
१) कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करण करावे.
२) सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे.
३) पश्चिम रेल्वेवरुन कोकण रेल्वेमार्गावर नेहमीसाठी वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा मधू दंडवते एक्सप्रेस व मध्य रेल्वेवरून कल्याण सावंतवाडी पॅसेंजर तसेच दादर-चिपळूण मेमू व मुंबई-रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस तर रोहा ते मडगाव दरम्यान दिवसाच्या वेळेत मेमू रेल्वे सुरू करावी.
४) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेस व ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी दिवा फास्ट पॅसेंजर दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुरू करून सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान पुर्वीची १०१०१ / १०१०२ रत्नागिरी मडगाव एक्सप्रेस सुरू करावी.
५) कोकण रेल्वेचे बेलापूर येथील भाडयाच्या जागेत असलेले मुख्यालय कोकण रेल्वेच्या हद्दीत स्वतःच्या जागेत स्थलांतरित करावे.
६) कोकणातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचा आरक्षण कोटा वाढवावा.
७) दिघी – रोहा – चिंचवड, गुहागर – चिपळूण – कराड व विजयदुर्ग – वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावेत.
८) भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देऊन स्टेशनवरील सर्व स्टॉल व कॅटरिंग त्यांनाच मिळावेत.
९) कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर पूर्ण उंचीचा फलाट, संपूर्ण शेड, पिण्याचे पाणी व चांगले शौचालय याची व्यवस्था करावी.
१०) रेल्वेने पुर्वीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सर्व सवलती व सेवासुविधा पूर्ववत कराव्यात. कोकण रेल्वेचे संकेतस्थळ मराठी, कोंकणी व कन्नड या स्थानिक भाषांतही उलपब्ध करून द्यावे.
११) मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या सर्व एक्सप्रेसना (Up & Down) दिवा जंक्शन येथे थांबे मिळावेत.
१२) ११००३ / ११००४ तुतारी एक्सप्रेस, १२१३३ / १२१३४ मुंबई मंगळुरु सुपरफास्ट एक्सप्रेस, १२६१९ / १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस २४ आयसीएफ किंवा २२ एलएचबी डब्यांनी तर १२०५१ / १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, २२११९ / २२१२० तेजस एक्सप्रेस, १०१०५ / १०१०६ सिंधुदुर्ग एक्सप्रेस, ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आवश्यकत त्या पायाभूत सुविधा उभारून २२ एलएचबी डब्यांनी चालवाव्यात. २२२२९ / २२२३० वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्यांची करावी.
१३) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला पेण, नागोठणे व पुढे रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व ठिकाणी कोरोनापूर्वी असणारे थांबे पूर्ववत करावेत.अंजनी रेल्वे स्टेशन येथे ओव्हर ब्रीज किंवा भूयारी मार्ग बनवावा.
१४) वीर, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड आणि पेडणे येथे पूर्णवेळ PRS सुविधा मिळावी.
१५) कोरोना काळात ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत करणे.
१६) कोकण रेल्वे मार्गावर अमृत भारत स्थानक योजना आणि One Station One Product योजना लागू करणे.
१७) सागरमाला अंतर्गत सावंतवाडी ते रेडी बंदर रेल्वे मार्ग मंजूर, तसेच २०१८ साली सावंतवाडी ते बेळगाव रेल्वे मार्गाचा फिसिबीलिटी रिपोर्ट तयार त्याला चालना देणे.
१८) Tourist / toy Train – कोकणातील पर्यटनासाठी टॉय ट्रेन १) सिंधुदुर्ग जिल्हा : कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड,मालवण व वेंगुर्ला. २) रत्नागिरी जिल्हा : राजापूर जैतापूर, पावस, जयगड, खेड,दापोली,गुहागर. ३) रायगड जिल्हा: पेण, अलिबाग, मुरुड, दिघी, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, महाड, रायगड.
१९) पुणे कर्जत करून पनवेलला जाणाऱ्या सर्व रेल्वे कल्याण पनवेल मार्गे कोकण रेल्वे मार्गावर चालवाव्यात.
२०) रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत माणगाव,विर,खेड,चिपळूण,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड,कणकवली,कुडाळ व सावंतवाडी येथे वाढीव मिळावेत.
२१) सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन,गोवा संपर्कक्रांती,जामनगर तिरूनेवल्ली,गांधीधाम तिरुनेवल्ली, एटीटी कोचिवल्ली,केरळा संपर्कक्रांती,पोरबंदर कोचिवल्ली, एर्नाकुलम दुरांतो ह्या फक्त चिपळूण किंवा रत्नागिरी करून मडगावला जातात त्या मिरज मार्गे वळवाव्यात किंवा महाराष्ट्रात कोंकण रेल्वे मार्गावर जास्तीचे थांबे द्यावेत.
२२) रत्नागिरी येथील पिट लाईन जुनी झाल्यामुळे नव्याने बांधण्यासाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. परंतु अद्याप त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. लवकरात लवकर पिटलाईनचे काम पूर्ण करून रत्नागिरी येथून मुंबई व सावंतवाडी/मडगाव/कारवारच्या दिशेने वाढीव गाड्या सुरु कराव्यात.
अशा अनेक महत्वाच्या मागण्या समितीने रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागण्या केल्या असून त्याची अमंलबजावणी लवकरात लवकर करावी असेही सुचवण्यात आले आहे.
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर दि. 24 ते 29 फेब्रुवारी 2024 असा तब्बल सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. कर्नाटकमध्ये नंदिकुर रेल्वे स्टेशन येथे मार्गावरील पॉईंट बदलण्याच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात असल्याची माहिती कोकणरेल्वे प्रशासनाने दिली आहे.
या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या खालील सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 12978 Ajmer – Ernakulam Jn. Express
दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरू करणारी ही गाडी उडुपी स्थानकावर वीस मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
२) Train no. 16337 Okha – Ernakulam Jn. Express
दिनांक 24 फेब्रुवारीला प्रवास सुरू करणार्या या गाडीला मडगाव ते उडपी दरम्यान 45 मिनिटे थांबवून ठेवले जाणार आहे.
३) Train no. 22114 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express
दिनांक 26 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरू करणारी ही गाडी मंगळुरू ते मुलकी या विभागात 100 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
वरील तीन गाड्या व्यतिरिक्त मडगावच्या पुढे धावणाऱ्या इतर तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.