Category Archives: कोकण रेल्वे
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती 2024 : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने ( KRCL ) वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, प्रकल्प अभियंता + प्रकल्प अभियंता (निविदा आणि प्रस्ताव), CAD/ड्राफ्ट्समन आणि सहाय्यक अभियंता/कंत्राटी या पदांसाठी उमेदवार भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार दिलेल्या पदांसाठी 11 रिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत. निवडलेल्या उमेदवारांना पदांनुसार रु.35400 ते रु.56100 पर्यंत मासिक मानधन मिळणार आहे. तसेच अर्ज करण्याची उच्च वयोमर्यादा ही पदांनुसार ४५ वर्षांपर्यंत आहे
कोकण रेल्वेच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, लागू उमेदवारांची निवड समितीने घेतलेल्या वॉक-इन मुलाखतीच्या आधारे केली जाईल . पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार समितीने घेतलेल्या वॉक-इन मुलाखतीसाठी थेट उपस्थित राहू शकतात.ही नियुक्ती 01-वर्षाच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी कराराच्या आधारावर असेल आणि उमेदवारांच्या कामगिरीनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. मुलाखतीच्या ठिकाणी सर्व संबंधित कागदपत्रे आणि रीतसर भरलेला अर्ज सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
पदांनुसार रिक्त जागा खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:

किमान /कमाल वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि ईतर सविस्तर माहितीसाठी खालील जाहिरात वाचा 👇🏻

Palghar Train Derailment : पश्चिम रेल्वेच्या पालघर येथे यार्डात मालगाडी घसरल्याने सुरत ते मुंबई अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. मालगाडीत मोठ्या प्रमाणावर लोखंडी प्लेटची वाहतूक केली जात होती. या घटनेनंतर मालगाडीचा डबे उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. या अपघातानंतर अनेक गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट केले आहे तर काही गाड्यांना वळविण्यात आले आहे. मात्र या मार्गावरील धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणार्या खालील दोन गाड्यांचा समावेश आहे.
आज दिनांक २८ मे या दिवशी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १२४३२ – हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस.
आज दिनांक २८ मे या दिवशी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १९२६०– कोचुवेली एक्सप्रेस.
पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर मालगाडीचे 7 डब्बे रुळावरून घसरले आहेत. डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येणारी सर्व रेल्वे वाहतूक सेवा त्यामुळे ठप्प झाली आहे. लोखंडी कॉइल घेऊन गुजरातवरून मुंबईच्या अप दिशेने येणाऱ्या मालगाडीचे डबे पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर घसरले आहेत. रुळावर मालगाडीचे डब्बे तीन डबे घसल्याने, दोन्ही रेल्वे रुळावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. पालघर रेल्वेस्थानाकात एकूण चार रेल्वे मार्ग आहेत. सध्या मुंबई, विरारहून डहाणू, गुजरातच्या दिशेला जाणारी रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे. मात्र गुजरातवरून मुंबई, विरारकडे येणारी सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासन, पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ सर्व यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली आहे. यंत्रसामुग्री आणून घसरलेले डब्बे बाजूला करून रेल्वे सेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल असे म्हटले जात आहे.








