Notice: Function _load_textdomain_just_in_time was called incorrectly. Translation loading for the wordpress-seo domain was triggered too early. This is usually an indicator for some code in the plugin or theme running too early. Translations should be loaded at the init action or later. Please see Debugging in WordPress for more information. (This message was added in version 6.7.0.) in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-includes/functions.php on line 6114 कोकण Archives - Page 18 of 119 - KokanaiSkip to content
कोकणातील ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवणारे डिजिटल बातमीपत्र - Kokanai Live News
रत्नागिरी: या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसाठी तब्बल 21 कोटी 17 लाख 80 हजार 741 रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेले काही काळ कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासणीसांनी उत्कृष्ट कामगिरी करत 78,115 कारवाया केल्या. यातून 21 कोटी 17 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासणीसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसांनी केल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनिवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला. मात्र, नारायण राणेंची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाते नेते विनायक राऊत यांनी केली आहे. याबाबत, अॅड. असीम सरोदे, अॅड. किशोर वरक ,अॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत कायदेशीर नोटिसही विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे.
निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली, त्याचाही उल्लेख या नोटिसमध्ये करण्यात आलेला आहे.
निवडणूक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगने चौकशी करावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिसमधून केलेली आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने 07 दिवसात या नोटिसवर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल, असेही माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणुक निर्णय अधिकार्यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे अॅड. असीम सरोदे यांनी म्हटले म्हणाले.
मालवण: तालुक्यातील बांदिवडे ते त्रिंबक रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पाऊस अजून सुरू झाला नसताना रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील दोन महिन्यांत रस्ता खूपच धोकादायक बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्याची विनंती बांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे.
बांदिवडे गावातील शाळेतील मुलांना तसेच ग्रामस्थांना रस्ता खराब असल्याने त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तिंना आचरा किंवा मालवण येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व लोक नेत्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती येथील बांदिवडे, पालयेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत घाडीगावकर यांनी केली आहे.
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या जबलपूर – कोईमतूर ०२१९७/०२१९८ या गाडीचा यावर्षीच्या डिसेंबर अखेरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे. या बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या जूनच्या पहिल्या आठवड्यात संपविण्यात येणार होती मात्र आता तिची सेवा २७/१२/२०२४ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर शुक्रवारी जबलपूर येथून रात्री २३:५० सुटून कोईम्बतूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:१० वाजता पोहोचेल. तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर शुक्रवारी जबलपूर येथून रात्री २३:५० सुटून कोईम्बतूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १४:४० वाजता पोहोचेल.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या जूनच्या पहिल्या आठवड्यात संपविण्यात येणार होती पण आता तिची सेवा दिनांक २७/१२/२०२४ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर सोमवारी कोईम्बतूर येथून रात्री १५:१० सुटून जबलपूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ०८:४५ वाजता पोहोचेल. तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर सोमवारी कोईम्बतूर येथून रात्री १७:०५ वाजता सुटून जबलपूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ०८:४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ट्रेन नरसिंगपूर, गादरवारा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खांडवा, भुसावळ जंक्शन येथे थांबेल. , नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव जं., कारवार, कुमटा, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरु जं., कासारगोड, कन्नूर, वडकोडे, तिरूर, शोरानूर जं. आणि पालघाट या स्थानकांवर थांबेल.
Megablock on Konkan Raiway: कोकण रेल्वेच्या पलक्कड विभागातील नेत्रावती – मंगळुरु जंक्शन दरम्यान लाईन ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय दक्षिण रेल्वेने घेतला आहे. या ब्लॉक मुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर खालील परिणाम होणार आहे.
गाडी क्र. 22633 तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास 19/06/2024 रोजी सुरू होणारा पलक्कड विभागात 280 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. 12224 एर्नाकुलम – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेसचा प्रवास 19/06/2024 रोजी सुरू होणारा पलक्कड विभागात 180 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. 16338 एर्नाकुलम – ओखा एक्स्प्रेसचा प्रवास 19/06/2024 रोजी सुरू होणारा पलक्कड विभागात 200 मिनिटांसाठीथांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. 20932 इंदूर जं. – 18/06/2024 रोजी सुरू होणारा कोचुवेली एक्स्प्रेसचा प्रवास कोकण रेल्वेवर 90 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक (टी) – 19/06/2024 रोजी सुरू होणारा तिरुवनंतपुरम मध्य नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास कोकण रेल्वेवर 20 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. 16312 कोचुवेली – श्री गंगानगर एक्स्प्रेसचा प्रवास 22/06/2024 रोजी सुरू होणारा तिरुअनंतपुरम मध्य आणि पलक्कड विभागातून 180 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
16 व 17 जून या दोन दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व 11,500 रुपयांचा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला.
Follow us on
सावंतवाडी: आंबोली धबधबा व घाट परिसरातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभागाने आंबोली घाट व धबधबा परिसर या राखीव संवर्धन क्षेत्रात कचरा करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे आशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांना दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये कचरा करणे-1000 रु. दंड, वन्यप्राणी माकड यांना खाऊ घालणे/छेडछाड करणे-1000 रु. दंड, मद्यपान करणे/मद्य बाळगणे-1000 रु. दंड, धूम्रपान करणे-500 रु दंड, दुसऱ्यावेळ वरील मनाई कृत्यांची आवृत्ती करणे-वनगुन्हा नोंदविणे अशा तरतुदी आहेत.
या अंतर्गत दिनांक-16 व 17 जून या दोन दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व 11,500 रुपयांचा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. यामध्ये कचरा टाकनारे- 2 व्यक्ती, धूम्रपान करणारे 3 व्यक्ती, मद्यपान करणारे 2 व्यक्ती तर माकडांना खाऊ घालणारे- 6 व्यक्ती शा प्रकारे मनाई कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी (IFS) यांचेकडून सर्व सुजाण नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी आपल्या आंबोली घाटातील निसर्ग व जैवविविधतेल टिकविण्यासाठी वरील प्रकारे मनाई करण्यात आलेले कृत्य कुणी करत असेल तर त्याला प्रतिबंधित करुन तिथे उपस्थित असलेल्या वन अधिकारी/कर्मचारी यांच्या निदर्शनास सदरची बाबा आणून द्यावी व कोकणाचे वैभव असलेल्या आपल्या आंबोली घाटाचे संवर्धन व संरक्षण करणे कमी आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे
मुंबई :काल रविवार दिनांक १६ जून रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कार्यकारिणीची बैठक श्री. शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडली. या बैठकीत समितीच्या कार्यकारिणीच्या पदांसाठी नेमणुका/फेरनेमणुका करण्यात आल्या. त्याचप्रमाणे समितीच्या पुढील कार्यक्रमाचा आराखडा ठरविण्यात आला. येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत प्रयत्न करण्याबाबत चर्चाही यावेळी करण्यात आली. याव्यतिरिक्त पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
१. श्री. यशवंत जड्यार यांच्याऐवजी श्री. अक्षय महापदी यांची सचिव पदावर निवड करण्यात आली.
२. ॲड. योगिता सावंत यांची उपाध्यक्ष पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
३. श्री. अभिजित धुरत यांची विशेष मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.
४. नवनियुक्त सचिव अक्षय महापदी यांना संघटनेचा पत्रव्यवहार व कार्यालयीन कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.
५. तसेच या सभेस उपस्थित नवीन संघटनांना या समितीमध्ये प्रवेश देण्याबाबत संमती देण्यात आली.
६. श्री. प्रमोद वासुदेव सावंत यांची सल्लागार पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
७. तसेच खजिनदार कु. मिहीर मठकर यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला व त्याच पदावर त्यांना कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.
८. १४ जानेवारी, २०२४ जन्मशताब्दी कार्यक्रमाचा जमाखर्च ताळेबंद मंजूर करण्यात आले व उर्वरित रक्कम श्री. राजाराम कुंडेकर यांच्याकडे ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
९. तसेच येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत त्वरित पत्रव्यवहार करण्यात यावा.
१०. तसेच परब मराठा समाज यांनी आपले कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानत ही सभा संपन्न झाली.
या सभेला ॲड. योगिता सावंत, श्री. श्रीकांत विठ्ठल सावंत, श्री. शांताराम शंकर नाईक, श्री.सुनिल सीताराम उतेकर, श्री. दीपक चव्हाण,श्री. विशाल तळावडेकर, श्री. अक्षय मधुकर महापदी, श्री. राजू सुदाम कांबळे, श्री. तानाजी बा. परब, श्री. रमेश सावंत, श्री. राजाराम बा. कुंडेकर, श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, श्री. अभिषेक अनंत शिंदे, श्री. प्रमोद वासुदेव सावंत, श्री. आशिष अशोक सावंत, श्री. मनोज परशुराम सावंत, श्री. सुधीर लवू वेंगुर्लेकर, श्री. सागर कृष्णा तळवडेकर, श्री. संजय धर्माजी सावंत, श्री. अभिजित धुरत हे प्रतिनिधी उपस्थित होते.
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने कोकण रेल्वे मार्गावरती जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडण्याची केली मागणी : श्री.यशवंत जडयार
परतीच्या प्रवासात चतुर्थी पुर्वी ३ दिवस सर्व जादा रेल्वे मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवून सर्व सुपरफास्ट एक्सप्रेसना कोकणात जादा थांबे मिळावेत
Follow us on
मुंबई: दरवर्षी गणेश उत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात चार महिन्यापूर्वी कोकणात जाणार्या नेहमीच्या सर्व ट्रेनचे पहिल्या दोन मिनिटांमध्येच बुकिंग फुल झाल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे अनेक चाकरमनी नवीन रेल्वेबुकिंग च्या प्रतीक्षेत आहेत, म्हणूनच कोकणाला गणपतीसाठी साधारणता जादा ८०० फेऱ्यांची आवश्यकता आहे,गणेश चतुर्थी शनिवार दि.७ सप्टेंबर २०२४ रोजी असल्याने ३० ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर दरम्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रत्येक दिवसाला किमान १५ अप आणि १५ डाऊन अशा नवीन जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडाव्यात तर दरम्यानच्या काळात कोकण रेल्वे वरील कंटेनर वाहतूक ( मालगाडया ) पूर्णतः बंद करावी.
यामध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी,दादर,कुर्ला,ठाणे,दिवा, कल्याण व पनवेल येथून तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,वांद्रे,वसई,वलसाड,उधना,अहमदाबाद,सुरत येथून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी,कुडाळ,सावंतवाडी,पेडणे, थिमिव,करमळी,मडगाव दरम्यान आरक्षित जादा गणपती स्पेशल रेल्वे चालवाव्यात.तर गर्दी कमी करण्यासाठी डहाणू ते पनवेल, पनवेल ते खेड,वसई ते चिपळूण,दिवा ते चिपळूण,दादर ते रत्नागिरी व पनवेल ते रत्नागिरी दरम्याने अनारक्षित मेमू रेल्वे चालवाव्यात.11003/04 तुतारी एक्सप्रेस २४ कोचची चालवावी किंवा दादर ते रत्नागिरी दरम्याने अनारक्षित डब्बलडेकर चालवाव्यात.
शनिवार दि.७ सप्टेबर ला चतुर्थी असल्याने ४ / ५ आणि ६ सप्टे.ला मुंबईतून कोकणाच्या दिशेने जास्त जादा रेल्वे सोडाव्यात,तर सिंगल ट्रकवर क्रासिंगला वेळ लागत असल्याने मुंबई ते मडूरा दरम्याने चाकरमन्यांचा प्रवास साधारण १८ ते २० तासाचा होतो म्हणून याच ३ दिवसामध्ये परतीच्या प्रवासातील सर्व जादा रेल्वे मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवाव्यात.तसेच नियमित सर्व सुपारफास्ट एक्सप्रेसना गणपतीच्या कालावधीमध्ये रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जादाचे थांबे दयावेत.तर गुरूवार दि.१२ सप्टे.ला गौरी गणपती विसर्जन असल्याने १३/१४ आणि १५ सप्टे.ला प्रत्येक दिवसाला कोकणातून मुंबईच्या दिशेने जास्त जादा रेल्वे सोडव्यात.
या निवेदनाच्या प्रती रेल्वेमंत्री मा.श्री.अश्विनी वैष्णव साहेब,जनरल मॅनेजर पश्चिम रेल्वे,जनरल मॅनेजर मध्य रेल्वे,रत्नागिरी व सिंधुदुर्गचे खासदार मा.श्री.नारायण राणे साहेब,माझी रेल्वेमंत्री मा.श्री.सुरेश प्रभू साहेब,पालघर चे खासदार मा.डॉ.हेमंत सावरा साहेब,रायगडचे खासदार मा.श्री. सुनील तटकरे साहेब व बोरिवली चे खासदार मा.श्री.पियुष गोयल साहेब यांना दिल्या असून या निवेदन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री.शांताराम नाईक व प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी पाठवलेले आहे.
मुंबई:यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील ४८३ गावांतील दरडींची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून तेथे कुणाला हानी पोहचणार नाही, याची काळजी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना दरडी कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे.
डझनभर जिल्हयातील ४८३ गावांवर धोकादायक दरडींचे संकट आहे. त्यामध्ये रायगड जिल्ह्यात खालापूर, कर्जत, महाड, म्हसळा, पनवेल, पोलादपूर या तालु्क्यातील सर्वाधिक १५७ गावांचा समावेश असून त्याखालोखाल रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, राजापूर, रत्नागिरी संगमेश्वर या तालुक्यातील १३८ तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, हवेली, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी या तालुक्यातील ९३ गावांना धोकादायक दरडींपासूनच्या आपत्तीचा धोका आहे.
साताऱ्यात जावळी, महाबळेश्वर, पाटण, सातारा, वाई या तालुक्यातील ८८, कोल्हापूरमधील भुदरगड, चंदगड, गगनबावडा, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यातील ५८, नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यील ८ , सिंधुदुर्गातील सावंतवाडी, वैभववाडी या दोन तालुक्यातील १६,नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, सुगरणा आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ५ गावांना पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे अहवालात म्हटले आहे.
पावसाळ्यात राज्यातील काही जिल्ह्यात विशेषत: कोकण, मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागात दरडी कोसण्याच्या घटना वारंवार घडत असतात, त्यामुळे काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई: पनवेल आणि इंदापूर दरम्यानच्या मुंबई गोवा महामार्गाच्या (NH 66) 84.6 किलोमीटरच्या भागावर सुमारे 490 कोटी रुपये एवढी रक्कम खर्च केली असल्याची माहिती ‘माहिती अधिकारातून’ (RTI) समोर आली आहे. संतापाची गोष्ट म्हणजे इतकी रक्कम खर्च करूनही रस्त्याचे काम अपूर्ण आहे तर पूर्ण झालेल्या रस्त्यातही खड्डे पडले आहेत.
माहितीचा अधिकार (RTI) कायद्याचा वापर करून केरळमधील कार्यकर्ते के गोविंदन नामपूथीरी यांनी मिळवलेल्या माहितीनुसार, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पनवेल आणि इंदापूर दरम्यानच्या नवीन रस्ता तयार करण्यासाठी 316.35 कोटी खर्च केले आहेत आणि दुरुस्ती आणि देखभालीवर 173 रुपये कोटी एवढे असे एकूण 490 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.
7 एप्रिल रोजी जेव्हा त्याने त्याच्या मित्रांसह महामार्गावर गाडी चालवली तेव्हा या महामार्गाच्या स्थितीमुळे नामपूथीरी हैराण झाले होते आणि तेव्हाच त्यांनी या समस्येच्या मुळावर जायचा विचार केला.
“मी महामार्गाच्या या अवस्थेसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) संपर्क साधला, रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्तीची कामे, सुरक्षा उपाय, पथदिवे इ.ची बसवण्याची विनंती केली,” असे नामपूथीरी म्हणाले
NHRC ला लिहिलेल्या पत्रात, नामपूथीरीनी महामार्गावरील सुरक्षिततेच्या समस्यांवर प्रकाश टाकला, ज्यात योग्य पथदिवे नसल्याचा समावेश आहे. अपघात टाळण्यासाठी लवकरात लवकर गतिरोधक आणि रेलिंग बसवण्याची सूचनाही त्यांनी केली. माहिती अधिकारात त्यांनी या प्रश्नांची उत्तरे मागितली, परंतु एनएचएआयने केवळ डिसेंबर 2024 पर्यंत सर्व काम पूर्ण होईल असे तोडके उत्तर दिले आहे.