Category Archives: कोकण
Konkan Railway: यंदा उन्हाळी सुट्टीत कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या एका विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे.
०११०३/ ०११०४ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष गाडीला मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
गाडी क्रमांक ०११०४ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०४/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २५/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही दर रविवारी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक (टी) -मडगाव साप्ताहिक विशेष एक्सप्रेस या गाडीची मुदत दिनांक ०५/०५/२०२५ रोजी संपणार होती तिला २६/०५/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी दर सोमवारी एलटीटी वरुन ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २१:४० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुरा रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०३ कोच, थ्री टायर इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.
| सध्याची संरचना | सुधारित संरचना |
| २ टियर एसी – ०१ |
२ टियर एसी – ०२
|
| ३ टियर एसी – ०४ |
३ टियर एसी – ०४
|
| स्लीपर – ११ | स्लीपर – ०७ |
| जनरल – ०३ | जनरल – ०४ |
| पॅन्ट्री कार – ०१ | पॅन्ट्री कार – ०१ |
| एसएलआर – ०२ | एसएलआर – ०२ |
| एकूण – २२ आयसीएफ कोच |
एकूण – २० एलएचबी कोच
|
Follow us on रत्नागिरी: पावसाची वर्दी घेऊन येणारा पक्षी म्हणून ओळख असलेला नवरंग म्हणजेच ‘इंडियन पिट्टा’ कोकणात दाखल झाला आहे (indian pitta migration). पावसाची जशी चाहूल लागते तशी कोकणामध्ये नवरंग पक्षाचं आगमन होत. हा अतिशय दुर्मिळ पक्षी असून वर्षभरातील फक्त चारच महिने आपल्याला पाहायला मिळतो. पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं की नवरंग पक्षी कोकणात दाखल होतो. हवामान विभागानेदेखील यंदा पाऊस लवकर असल्याची माहिती दिली आहे. त्यातच आता नवरंग पक्षाच्या आगमनाने पावसाच्या आगमनाची चाहूल दिली आहे. नवरंग पक्षी हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधला जातो. पावसाच्या आगमनाची चाहूल लागताच आपल्या विशिष्ट आवाजाने शेतकऱ्यांना हा पक्षी जणू पावसाला लवकर सुरू होणार असल्याची वर्दी0 देतो. नवरंग पक्षाच्या आगमनाने पक्षी प्रेमींही सुखावले असून त्याची छबी टिपण्याचा मोह आवरत नाही.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी या पक्ष्याची मधुर शीळ कानी पडू लागली आहे (indian pitta migration). पावसाळ्याच्या तोंडावर हा पक्षी स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करत असला तरी, कोकणात या पक्ष्याची काही संख्या घरटी देखील बांधते. (indian pitta migration)
भारतीय पिट्टा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी भारतात स्थानिक स्वरुपाचे स्थलांतर करतो. ‘पिट्टा’ हा शब्द तेलुगू भाषेतून आला आहे. ज्याचा अर्थ ‘लहान पक्षी’ असा होतो. याला मराठीत स्थानिक भाषेत नवरंग, बहिरा पाखर, बंदी, पाऊसपेव असेही म्हटले जाते. हा पक्षी हिवाळ्यात दक्षिण भारत आणि श्रीलंकेत स्थलांतर करतो, तर पावसाळ्याच्या तोंंडावर अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रजननाकरिता जातो. एप्रिल महिन्यात श्रीलंका आणि दक्षिण भारतात स्थलांतर केलेले नवरंग पक्षी पश्चिम घाटाच्या धारेला धरुनच उत्तरेकडे सरकू लागतात. सध्या या पक्ष्यांचे आगमन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यातील पक्षीनिरीक्षक या पक्ष्यांची छायाचित्र टिपत आहेत.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात नवरंग पक्षी मुंबई आणि रायगड जिल्ह्यात सरकेल आणि तिथून गुजरातमध्ये जाऊन प्रजनन करेल. पश्चिम घाटामार्गे स्थलांतर करणारे ९० टक्के नवरंग पक्षी हे गुजरात किंवा त्यावरील भागात जाऊन प्रजनन करत असले तरी, काही पक्षी हे कोकणात देखील घरटी बांधतात. लहान आकाराचा हा पक्षी आपल्या रंगासाठी ओळखला जातो. त्याचे पाय लाब आणि मजबूत असतात. चोच जाड असते. हा पक्षी सहसा दाट झाडी असलेल्या जंगलात जमिनीवर खाद्य शोधताना दिसतो. पालापाचोळ्यामधील कीटक शोधताना दिसतो. सकाळी आणि सायंकाळी हा पक्षी आवाज देताना दिसतो. यामधील नर आणि मादी हे एकसारखेच दिसतात.
Ratnagiri: रत्नागिरीतील एका शेताच्या जवळील जंगलात एका मादी बिबट्याने एका पांढर्या रंगाच्या पिल्लाला जन्म दिल्याची अजब घटना घडली आहे. मात्र या पिल्ला सोबत जन्म घेतलेली ईतर पिल्ले मात्र सामान्य रंगाची आहेत.
“चार दिवसांपूर्वी, शेताच्या मालकाने आम्हाला एका पांढऱ्या रंगाच्या बिबट्याच्या पिल्लाबद्दल माहिती दिली, जी दुर्मिळ आहे. मात्र मादी बिबट्याची ईतर पिल्ले सामान्य रंगांची आहेत.” या पिल्लाची आई शेतात पिल्लांसह आहे, परंतु ती तिच्या सध्याच्या ठिकाणी किती काळ राहील हे आम्हाला माहित नाही. अल्बिनिझम किंवा ल्युसिझम – दोन्ही अनुवांशिक स्थितींमुळे – हे पिल्लू पांढरे जन्माला आले आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही.असे रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई म्हणाल्यात. वन्यजीव प्रेमी आणि जनतेला शेतात येण्यापासून रोखण्यासाठी देसाई यांनी स्थान उघड केले नाही.
“त्वचा, केस आणि डोळ्यांना रंग देणारे रंगद्रव्य मेलेनिनच्या पूर्ण अनुपस्थितीमुळे अल्बिनिझम होतो. जास्त मेलेनिनमुळे त्वचा गडद आणि काळी होते. ब्लॅक पेंथरचे मूळ हेच आहे. या स्थितीला मेलेनिझम म्हणतात. तर मेलेनिनच नव्हे तर सर्व रंगद्रव्ये कमी झाल्यामुळे किंवा आंशिकपणे नष्ट झाल्यामुळे ल्युसिझम होतो आणि त्यामुळे प्राण्याचा रंग फिकट असू शकतो.” असे महाराष्ट्राचे माजी मुख्य वन्यजीव वॉर्डन सुनील लिमये याबद्दल अधिक माहिती देताना म्हणालेत.











