Category Archives: कोकण रेल्वे




Konkan Railway 07:45 PM:
कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली स्थानका जवळ ओव्हरहेड सपोर्ट वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. परिणामी (पेअरींग गाड्या उशिराने धावत असल्याने) मुंबईहून गोव्यासाठी सुटणार्या दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक २२ मार्च रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस २३ मार्च रोजी पहाटे ४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.
एलटीटी मुंबई या स्थानकावरून दिनांक २३ मार्च रोजी ००:४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक ११०९९ एलटीटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी २३ मार्च रोजी सकाळी ०४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.
Konkan Railway 06:15 PM:
कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली जवळ ओव्हरहेड वायरला सपोर्ट करणारी वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ बंद झाली होती. वायर तुटल्याने मंगला एक्स्प्रेस व मांडवी व अन्य काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या.
आता ही वायर जोडण्यात आली असून रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. तरी देखील त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला असून कोकण रेल्वेच्या गाड्या अजूनही सुमारे दोन ते तीन उशिराने धावत आहेत.
कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सध्याची स्थिती.. (06:15 pm)
सीएसएमटी मडगाव मांडवी एक्सप्रेस वैभववाडी स्थानकावर पोहोचली असून ती सुमारे ४ तास उशिराने धावत आहे तर मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस आडवली स्थानकावरून नुकतीच निघाली असून ती सुमारे चार तास उशिराने धावत आहे. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आताच आडवली स्थानकावर आली असून ती सुमारे साडेतीन तास उशिराने धावत आहे. मडगाव एलटीटी सिंधुदुर्ग स्थानकावर असून ती तीन तास उशिराने धावत आहे.




Konkan Railway: कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे तसेच महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार वायकर यांनी काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेतील त्यांच्या दालनात भेट घेतली. रेल्वेशी निगडीत विविध विषयांचे त्यांना निवेदन दिले. यात जोगेश्वरी येथे नव्याने टर्मिनल बनवण्यात येत आहे, या टर्मिनलला हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टीमोडेल कनेक्टीविटीने जोडण्यात यावे. येथे पार्किंग, हॉटेल्स तसेच मॉल्सची सुविधा करण्यात यावी.
कोकण रेल्वेच्या दुपदरी कामासाठी बैठक घेण्यात येईल असे आश्वासन बजेट मध्ये देण्यात आले होते. पण हो बैठक अद्याप घेण्यात आली नसल्याकडे लक्ष वेधत कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे (३७० किलो मीटर) काम सुरु करण्यात यावे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरी गोवा व महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वे मध्ये विलीनिकरणास तयारी दर्शवली आहे अशी माहिती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांनी दिली.
माननीय मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात मांडलेल्या काही महत्त्वाच्या समस्या :
- जोगेश्वरीला जंक्शन हे हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीने जोडलेले असावे. तसेच तिथे कार पार्किंग, हॉटेल, मॉल आदी सुविधा उपलब्ध असाव्या .
- रेल्वे स्थानकांवरील, विशेषतः कल्याणच्या पुढच्या स्थानकांच्या, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. दुर्गंधी, पाण्याचा अभाव, स्तनपान कक्षांची अनुपलब्धता इत्यादी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
- मराठी भाषेला आता राजभाषेचा दर्जा मिळाला असल्याने महाराष्ट्रात सर्वच कारभारात, विशेषतः रेल्वेच्या कारभारात मराठी भाषा अनिवार्य असावी.
- एसी लोकलची फ्रिक्वेन्सी किंवा एसी गाड्यांची संख्या वाढवण्यात याव्या
- उपनगरीय रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डबा असूनही कित्येकदा इतर नागरिक त्या डब्यात प्रवास करत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या या गैरसोयींवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
कोकण रेल्वे
- प्रवाशांची वाढती गर्दी आणि कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक यामुळे होणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून कोकण रेल्वे डबल ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करून हा प्रकल्प पुढे नेण्यात यावा.
- अनेक स्थानकांची स्वच्छता अत्यंत निकृष्ट आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची स्थितीही समाधानकारक नाही. आजही अनेक स्थानकांवर छत नसल्याने प्रवाशांना नाहक ऊन, पावसाचा सामना करावा लागत आहे.
- कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर सोलर पॅनल बसवावेत.
- कोकण रेल्वे मार्गावरील सर्व जुने बोगदे व पुलांचे सर्वेक्षण करून वेळोवेळी आवश्यकतेनुसार दुरुस्तीचे काम करण्यात यावे.
- मालगाड्यांचे वेळापत्रक अशा प्रकारे ठरवावे की त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात अडथळा येणार नाही.




Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या उन्हाळी विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आहे या गाड्यांचे आरक्षण दिनांक २४ मार्च २०२५ रोजी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सकाळी ८ वाजल्यापासून उपलब्ध होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
१) गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी- करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटीहून ००:२० वाजता सुटेल आणि ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५२ करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत करमाळीहून दुपारी १:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ कोच : दोन टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १० कोच, जनरल – ०४ कोच , SLR – ०२
२) गाडी क्रमांक ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी) – करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक):
गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (टी) – करमाळी विशेष साप्ताहिक १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक (टी) येथून २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता करमाळीला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११३० करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ११/०४/२०२५ ते ०६/०६/२०२५ पर्यंत दर शुक्रवारी करमाळीहून दुपारी २:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण १९ एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरेटर कार – ०२
३) गाडी क्रमांक ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक:
गाडी क्रमांक ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक ही गाडी दर गुरुवारी, ०३/०४/२०२५ ते २९/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ही गाडी ०५/०४/२०२५ ते ३१/०५/२०२५ पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००:४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकुंदोब रोड, कुंडुरा रोड सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.




Konkan Railway: मुंबई मडगाव वंदेभारत एक्सप्रेसचा मंगळुरू स्थानकापर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी आता कर्नाटक राज्यातून होत आहे. मात्र या मागणीला महाराष्ट्र राज्यातील रेल्वे प्रवासी संघटनांनी आपला विरोध दर्शवला आहे. कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाला ईमेल पाठवून या प्रस्तावाला विरोध केला आहे.
सध्या कोकण रेल्वे मार्गावर दोन वंदे भारत एक्सप्रेस चालत आहेत. गाडी क्रमांक 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मुंबई मडगाव दरम्यान तर 20645/46 मडगाव – मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी मडगाव मंगळुरू दरम्यान चालविण्यात येत आहेत. मुंबई मडगाव दरम्यान धावणारी वंदेभारत एक्सप्रेस यशस्वी ठरत असताना मडगाव – मंगळुरू दरम्यान धावणारी वंदेभारत तितकीशी यशस्वी ठरलेली दिसत नाही आहे. त्यामुळे ती बंद करण्याची नामुष्की येणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र कर्नाटक राज्यातील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी ही गाडी बंद न करता तिचा रेक वापरून 22229/30 मुंबई सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी पुढे मंगळुरू स्थानकापर्यंत विस्तारित करण्याची मागणी केली आहे.
मात्र महाराष्ट्र राज्यातील प्रवासी संघटनांनी याला विरोध केला आहे. कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाला ईमेल पाठवून या प्रस्तावाला विरोध केला आहे. मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सध्या जवळपास आपल्या 98% क्षमतेने चालत आहे. ही गाडी पुढे दक्षिणेकडे विस्तारित केल्यास महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांना या गाडीच्या आसन उपलब्धतेच्या समस्येला तोंड देण्याची वेळ येईल. त्याच बरोबर स्थानकांना मिळालेल्या आसन कोट्यात परिणाम होऊन खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थीवी या स्थानकांच्या प्रवाशांना तिकीट मिळणे कठीण होईल. तसेच या गाडीचा लांब मार्ग असल्यास गाडीची देखभाल, दिरंगाई या सारख्या समस्या निर्माण होऊन ही गाडी आपली सध्याची लोकप्रियता गमावून बसेल.
दक्षिणेकडील राज्यातील आणि महाराष्ट्र राज्यातील प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाबद्दल अपेक्षा, मागण्या भिन्न आहेत. ही गाडी दक्षिणेकडे विस्तारित केल्यास भविष्यात दोन्ही प्रवासी गटांत या गाडीवरून वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यावर उपाय म्हणजे ही गाडी विस्तारित न करता कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून मंगळुरु पर्यंत नवीन वंदेभारत गाडी या मार्गावर चालवली जावी. मुंबई ते मंगळुरु अंतर पाहता (९०० किलोमीटर) दुसरा आणि उत्तम पर्याय म्हणजे या दोन्ही स्थानका दरम्यान नवीन स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस किंवा अमृत भारत एक्सप्रेस चालविण्यात यावी आणि तिला चिपळूण, कुडाळ आणि सावंतवाडी या वंदे भारत एक्सप्रेस सेवेपासून वगळण्यात आलेल्या महत्त्वाच्या स्थानकांवर प्राधान्याने थांबे देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात जयवंत दरेकर यांनी केली आहे.


Year of manufacture
|
Number of coaches |
2014 | 1 |
2015 | 3 |
2017 | 1 |
2018 | 8 |
2019 | 5 |
2020 | 4 |
2021 | 8 |
2022 | 8 |
2023 | 6 |
2024 | 44 |
Total | 88 |
थांबे मिळवून देण्यात खासदारांचे विशेष प्रयत्न
मागील २ महिन्यांची प्रवासी संख्या
मार्ग | जानेवारी | फेब्रुवारी | एकूण |
सीएसएमटी-मडगाव | १३,१९६ | ११,६१४ | २४,८१० |
मडगाव-सीएसएमटी | १३,२४५ | १२,६८४ | २५,९२९ |