Category Archives: कोकण रेल्वे

नववर्ष स्वागतासाठी उत्तर रेल्वे चालविणार विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस; कोकण विभागात या स्थानकांवर थांबे

   Follow us on        

Special Trains: नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी उत्तर रेल्वेने एका सुपरफास्ट विशेष गाडीची घोषणा केली आहे. ही गाडी हजरत निजामुद्दीन आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल या दरम्यान चालविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक ०४०८२/०४०८१ हजरत निजामुद्दीन -तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल:

गाडी क्रमांक ०४०८२ हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस २८ डिसेंबर २०२४ (शनिवार) रोजी हजरत निजामुद्दीन येथून १९.२० वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे तिसऱ्या दिवशी १९.४५ वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०४०८१ तिरुवनंतपुरम सेंट्रल हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस तिरुअनंतपुरम सेंट्रलवरून ३१ डिसेंबर २०२४ (मंगळवार) रोजी ०७.५० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल.

डब्यांची रचना: एसी टू टायर कोच -०५ , एसी थ्री टायर कोच- १० , जनरल सेकंड क्लास कोच-०२ , सेकंड क्लास कोच (दिव्यांगजन) -०१ आणि लगेज कम ब्रेक व्हॅन- ०१

या गाडीला कोकणात पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि थिवी या मोजक्याच स्थानकांवर थांबे देण्यात आले आहे.

या गाडीच्या वेळा आणि थांब्याचे तपशील खालीलप्रमाणे आहेत

या विशेष गाडीचे आरक्षण दिनांक २५ डिसेंबर रोजी सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

Loading

मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ठाण्यावरून कल्याणला वळवली.. कारण काय?

   Follow us on        

मुंबई: आजची मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस तांत्रिक बिघाडामुळे ठाणे ते पनवेल दरम्यान तिच्या नियमित मार्गावरून वळविण्यात आली. या कारणाने पुढे तिचा गोव्याला जाणारा प्रवास ९० मिनिटे उशिराने झाला.

कोकणात जाणारी ही गाडी दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर पनवेल स्थानकाकडे जाण्याऐवजी सकाळी ६:१० वाजता कल्याण मार्गावरून निघाली.

या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील मुंबई लोकल सेवेवरही परिमाण झाला आणि या दरम्यानच्या लोकल गाड्यांनी लेटमार्क लावला.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, दिवा जंक्शनवरील कोकणात जाणार्‍या गाड्यांचा मार्गावर म्हणजे डाऊन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये बिघाड झाल्यामुळे ही घटना घडली.

ट्रेनने नियोजित मार्गावरून मार्ग बदलल्यानंतर, ती कल्याण स्टेशनला रवाना झाली आणि दिवा जंक्शनवर परत फिरविण्यात आली आणि दिवा-पनवेल मार्गावर मडगावकडे परत प्रवास सुरू केला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नीला म्हणाले की, सकाळी ६:१० ते ६:४५ पर्यंत कल्याणकडे जाण्यापूर्वी ही गाडी दिवा जंक्शनवर सुमारे ३५ मिनिटे थांबली होती.

जून २०२३ मध्ये सुरू झालेली प्रीमियम सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबईतील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून सकाळी ५:२५ वाजता निघते आणि त्याच दिवशी दुपारी १:१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते.

 

 

 

 

Loading

कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे केंद्राला ५ हजार कोटींचे साकडे

   Follow us on        

पणजी: जैसलमेर येथे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यासाठी ९ हजार ७०० कोटी रुपयांच्या अर्थसाहाय्याची मागणी नोंदविली आहे. कोकण रेल्वेचे दुपदरीकरण, पश्चिम घाटाचे संवर्धन आणि राज्याचा विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या घटकांसाठी त्यांनी सहाय्याची मागणी केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पासाठी गोवा राज्यातर्फे त्यांनी निवेदन सादर केले आहे.
रेल्वेसाठी ५ हजार कोटींचे साकडे
कोकण रेल्वे पश्चिम किनाऱ्यावरील बंदरांना (मंगळूर ते मुंबई) जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गाचे दुहेरीकरण काही भागांतच पूर्ण झाले असून उर्वरित प्रकल्प निधीअभावी प्रलंबित आहे. या प्रकल्पासाठी ५ हजार कोटी रुपयांचे विशेष साहाय्य मंजूर करावे. जुने गोवे तसेच पेडणे येथे १९९२-१९९७ दरम्यान बांधलेल्या जुन्या बोगद्यांची स्थिती धोकादायक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सलग संपर्कासाठी नवीन बोगद्यांच्या बांधणीसाठी दीड हजार कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करणे अत्यावश्यक बनले आहे. सध्या वीर ते मडगाव दरम्यान एकपदरी मार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात मागणी असूनही गाड्या वाढविणे शक्य होत नाही. याचा परिमाण कोकण आणि गोवा राज्याच्या विकासावर पर्यटनावर होत आहे. या मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. मात्र अजूनपर्यंत सादर केलेल्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वेला नेहमीच डावलले गेले आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे विलीनीकरण करण्याची मागणी आता लोकप्रतिनिधींकडून आणि प्रवासी संघटनांकडून होत आहे. केंद्राची आणि चार राज्याची भागीदारी असलेल्या कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला गोवा राज्याने या आधीच आपली संमत्ती दर्शवली आहे.

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार रेवा-मडगाव विशेष एक्सप्रेस

   Follow us on        
Konkan Railway:नाताळाच्या सुट्टीत गोवा आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर रेवा – मडगाव साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे
गाडी क्र. ०१७०३/०१७०४ रेवा – मडगाव जं. रेवा साप्ताहिक एक्सप्रेस विशेष:
गाडी क्र. ०१७०३ रेवा – मडगाव जं. साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल रविवार दिनांक २२/१२/२०२४ आणि २९/१२/२०२४ रोजी रेवा  येथून १२:०० वाजता सुटेल आणि  दुसऱ्या दिवशी २१:२५ वाजता मडगावला पोहोचेल.
गाडी क्र. ०१७०४  मडगाव जं. – रेवा साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी सोमवार दिनांक २३/१२/२०२४ आणि ३० /१२/२०२४ रोजी २२.२५ वाजता मडगाव येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी 08:20 वाजता रेवाला पोहोचेल.
ही गाडी सतना, मैहर, कटनी, जबलपूर जंक्शन, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खांडवा जंक्शन, भुसावळ, जळगाव, मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी,कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे थांबेल
डब्यांची रचना : एकूण २४ डबे = संमिश्र (प्रथम एसी + २ टायर एसी) – ०१ कोच, २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – ११ डबे, सामान्य – ०४ कोच, एसएलआर – ०२.
गाडी क्र. ०१७०४ साठीचे  बुकिंग २१/१२/२०२४  रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर उघडेल. प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या जबलपूर – कोईमतूर ०२१९७/०२१९८ या गाडीला जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या  संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे. या बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या येत्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपविण्यात येणार होती मात्र आता तिला पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही गाडी दर शुक्रवारी जबलपूर येथून रात्री २३:५०  सुटून कोईम्बतूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १४:४०  वाजता पोहोचेल.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast  Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संपविण्यात येणार होती पण आता तिला पुढील सूचना मिळेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही गाडी दर सोमवारी कोईम्बतूर येथून रात्री १७:०५  वाजता  सुटून जबलपूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ०८:४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ट्रेन नरसिंगपूर, गादरवारा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खांडवा, भुसावळ जंक्शन ,नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव जं., कारवार, कुमटा, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरु जं., कासारगोड, कन्नूर, वडकोडे, तिरूर, शोरानूर जं. आणि पालघाट या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 24 कोच = फर्स्ट एसी – 01 कोच, टू टायर एसी – 02 कोच, 3 टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.

Loading

सावंतवाडी: आता रेल रोको शिवाय पर्याय शिल्लक नाही..!!  – रेल्वे प्रवासी संघटनेचा एकमुखी निर्धार.

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची बैठक दिनांक १४/१२/२०२४ रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पार पडली.बैठकीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या अपूर्ण कामासंदर्भात सखोल चिंतन केले गेले. संघटनेने आतापर्यंत घेतलेल्या मोहिमा त्यात मेल मोहीम, राष्ट्रपतींना पत्र मोहीम आदींचा आढावा घेण्यात आला त्याच बरोबर काही महत्त्वाचे ठराव या बैठकीत पारित केले गेले. त्यात प्रामुख्याने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करावा असा एकमुखी ठराव घेण्यात आला, त्यानंतर सावंतवाडी येथील अपूर्ण टर्मिनस साठी जर कोकण रेल्वे महामंडळ आणि राज्य शासन निधीची तरतूद करण्यास असमर्थ असल्यास हे अपूर्ण काम केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेतून करावा त्यासाठी येथील खासदार आणि आमदारांनी योग्य तो पाठपुरावा करावा त्यासाठी संघटनेकडून त्याबद्दल संबंधित लोकप्रतिनिधींना सखोल,अभ्यासपूर्ण निवेदन देण्या संदर्भात चर्चा झाली, सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, नागपूर – मडगाव एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस आदी गाड्यांना येत्या १५ दिवसात थांबा मिळावा, तसेच आजच्या घडीला कोल्हापूर – संकेश्वर – बेळगाव असा रेल्वे मार्गासाठी सर्वे सुरू आहे, काही महिन्यात त्या रेल्वे मार्गाचे काम देखील सुरू होईल त्यामुळे सावंतवाडी ते संकेश्र्वर असा रेल्वे मार्ग होण्यासाठी योग्य तो प्रयत्न करावा जेणे करून कोकणातून बेळगाव आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळेल,

आदी ठराव घेण्यात आले. या मागण्या येत्या ३० दिवसात पूर्ण नाही झाल्या तर २६ जानेवारी २०२५ ला रेल रोको करण्यात येईल असे एकमुखी ठरवण्यात आले. त्याच बरोबर गाडी क्रमांक ०११५१/५२ मुंबई – करमळी विशेष गाडीचा सावंतवाडी थांब्यासाठी प्रयत्न करणारे आमदार श्री नितेश राणे आणि कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री शैलेश बापट यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.

महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात मेल मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सचिव मिहिर मठकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, संघटनेचे मुंबई अध्यक्ष श्री विनोद नाईक, सौ सायली दुभाषी, नंदू तारी,सुभाष शिरसाट , तेजस पोयेकर,स्वप्नील नाईक, रामकृष्ण मुंज, विहंग, भूषण, सागर आदी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रवासी जनता उपस्थित होते.

Loading

कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास कर्नाटक राज्याची संमती

   Follow us on        
बेळगाव: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यास कर्नाटक राज्य सरकारने पूर्ण संमती दर्शविली आहे आणि या संदर्भात पत्रव्यवहार सुरू केला आहे.
बेळगाव येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या आणि मध्यम उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास मंत्र्यांच्या वतीने उत्तर देताना ऊर्जा मंत्री के.जे. जॉर्ज यांनी हे सांगितले.
“कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये यापूर्वीच विलीनीकरण व्हायला हवे होते. तथापि, ऑपरेशनल तोट्यामुळे, या प्रदेशातील रेल्वे स्थानकांवर कोणताही महत्त्वपूर्ण विकास झालेला नाही. कर्नाटकच्या २७० कोटी रुपयांच्या इक्विटी योगदानाच्या समायोजनाबाबत पत्रव्यवहार सुरू आहे. भारतीय रेल्वेमध्ये विलीन झाल्यानंतर, नवीन गाड्या सुरू केल्या जातील आणि विद्यमान रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा दिसून येतील,” असे जॉर्ज यांनी गुरुवारी विधानसभेत आमदार किरण कुमार कोडगी आणि व्ही. सुनील कुमार यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रस्तावाला संबोधित करताना सांगितले.
ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खरगे यांनी जोडले की, राज्य सरकारने विलीनीकरणाबाबत कोकण रेल्वेला आधीच पत्र लिहिले आहे आणि त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहे.
एकूण चार राज्याची भागीदारी असलेली कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला आतापर्यंत दोन राज्यांनी संमती दर्शवली आहे. अलीकडेच गोवा राज्याने कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाला आपली संमती दर्शवली  आहे.

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या डब्यांत कपात

   Follow us on        

Konkan Railway Updates:एकीकडे कोकणरेल्वे मार्गावर होणाऱ्या गर्दी कमी करण्यासाठी या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी त्यांच्या डब्यांत वाढ करण्यात यावी अशी मागणी होत असताना रेल्वे प्रशासन मात्र गाड्यांचे सध्या असलेले डबे कमी करताना दिसत आहे. कोकण रेल्वे प्रशासनने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धपत्रकानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करून डबे कमी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तपशील खालीलप्रमाणे

१) ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस

एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी  १ डबा कमी  करण्यात आला आहे.

सध्याची संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०२, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१

सुधारित संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१

दिनांक १२ जानेवारी २०२४ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.

२) २२११३ /२२११४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस

एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी  १ डबा कमी  करण्यात आला आहे.

सध्याची संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०७, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०२

सुधारित संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०१ ,एसएलआर – ०१

दिनांक १४ जानेवारी २०२५ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.

 

 

 

 

 

Loading

कोकण रेल्वेवर धावणाऱ्या हिवाळी विशेष गाडीसाठी अतिरिक्त थांब्यांची घोषणा

   Follow us on        
Konkan Railway Updates: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरुन करमळी पर्यंत धावणाऱ्या ०११५१/५२ विशेष गाडीला  वीर, वैभववाडी आणि सावंतवाडी या रेल्वे स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात थांबे देण्यात आले आहेत. यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे अक्षय महापदी यांनी  इमेलद्वारे निवेदन दिले होते. या निवेदनात महाड, लांजा, राजापूर, वैभववाडी आणि सावंतवाडी तालुक्यांतील स्थानकांत थांबा देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली होती.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, (सावंतवाडी) ने या गाडीला मिळालेल्या अपुऱ्या थांब्यांबाबत ‘एक्स’ माध्यमातून नाराजी व्यक्त केली होती. हिवाळी विशेष गाड्यांना वीर, विलवडे किंवा आडवली, राजापूर आणि सावंतवाडी या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशा विनंतीचे निवेदन या संघटनेतर्फे कोकणरेल्वेच्या बेलापूर कार्यालयाला पाठविण्यात आले होते. याचबरोबर कोकण रेल्वेचे क्षेत्रिय रेल्वे प्रबंधक शैलेश बापट यांच्याशी संपर्क साधून हे थांबे देण्याची विनंती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती.
कोकण रेल्वे प्रशासनाने या निवेदनांची दखल घेऊन हे अतिरिक्त थांबे दिल्याबद्दल संघटनांनी आभार व्यक्त केले आहेत.
गाडी क्र. ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल या गाडीची वीर या स्थानकावर आगमनाची  वेळ 0४.१४,  वैभववाडी  स्थानकावर सकाळी ९.०० तर  सावंतवाडी स्थानकावर १०.३६ अशी असणार आहे.
तर परतीच्या प्रवासात गाडी क्र. ०११५२  करमाळी – मुंबई सीएसएमटी स्पेशल या गाडीची सावंतवाडी या स्थानकावर आगमनाची वेळ १५.४०,  वैभववाडी स्थानकावर सकाळी १७.०८  तर वीर स्थानकावर २३.००   अशी असणार आहे.

Loading

Winter Special Trains: महाराष्ट्रातील स्थानकांवर थांबे देताना रेल्वेचा आखडता हात – अक्षय महापदी

   Follow us on        

Konkan Railway: मध्य रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या हिवाळी विशेष गाड्यांचे थांबे पाहून महाराष्ट्रात थांबे देताना हात आखडता घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. नाताळ आणि नववर्ष गोव्याची मक्तेदारी असली तरीही त्या काळात महाराष्ट्रातही पर्यटकांचे प्रमाण वाढते. तसेच शालेय सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिकही आपापल्या मूळ गावी जाण्याच्या प्रयत्नात असतात. तळकोकणात जत्रांचा हंगामही सुरू होत असल्याने चाकरमानी गावी जात असतात. सर्व नियमित गाड्यांचे आरक्षण याआधीच भरल्यामुळे प्रवाशांची मदार विशेष गाड्यांवर होती. परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच तालुक्यांत थांबे न दिल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. याबाबत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्रचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांनी समितीतर्फे नाराजी व्यक्त केली असून या गाड्यांना महाड, लांजा, राजापूर, वैभववाडी आणि सावंतवाडी या तालुक्यांतील रेल्वे स्थानकांवर थांबे देण्याची मागणी निवेदना द्वारे मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे.

हिवाळी पर्यटन आणि सणांच्या काळात धावणाऱ्या ०११५१/०११५२ मुंबई-करमळी, ०१४६३/०१४६४ लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली, आणि ०१४०७/०१४०८ पुणे-करमळी या हिवाळी विशेष गाड्यांना महाड, लांजा, राजापूर आणि वैभववाडी या तालुक्यांत थांबा न दिल्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. या गाड्या या भागातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात.

रत्नागिरी ते कणकवली या १११ किलोमीटरच्या भागात कोणत्याही गाडीला एकही थांबा न दिल्यामुळे या गाड्या नक्की कोणासाठी सोडल्या जातात हा प्रश्न उभा राहिला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली विशेष गाडी सावंतवाडीच्या पुढे दर १५ ते २० किलोमीटरवर थांबणार आहे. परंतु, महाराष्ट्रात थांबे देण्यास आपले प्रशासन तयार नाही. कोकण रेल्वेत २२% आर्थिक सहभाग उचलून महाराष्ट्राला काहीही मिळाले नाही या आमच्या मतावर या प्रकारांमुळे मोहोर उमटते.

कोकण रेल्वे मार्गावरील वरील सर्व तालुके हे कोकणातील आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. सणासुदीचा कालावधी तसेच पर्यटन हंगामामुळे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत या स्थानकांना थांबे न दिल्याने स्थानिक रहिवाशांची अनावश्यक गैरसोय होणार आहे.

वरील गाड्यांना वरील स्थानकांवर थांबा दिल्यास स्थानिक नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटेल,पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल व प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल.

आपण या भागातील प्रवाशांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वरील गाड्यांना आरक्षण सुरु होण्यापूर्वी महाड तालुक्यातील वीर, लांजा तालुक्यातील विलवडे, राजापूर तालुक्यातील राजापूर रोड आणि वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी रोड तसेच ०११५१/०११५२ मुंबई-करमळी गाडीला सावंतवाडी रोड स्थानकांवर तातडीने थांबे देण्याची व्यवस्था करावी, अशी आम्ही नम्र विनंती करतो.

आपण लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search