ही गाडी दिनांक २६/०२/०२२३ , ०५/०३/२०२३ आणि १२/०३/२०२३ या दिवशी (रविवारी) ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री २२:१५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी दिनांक २७/०२/०२२३ , ०६/०३/२०२३ आणि १३/०३/२०२३ या दिवशी (सोमवारी) ही गाडी मडगाव या स्थानकावरुन सकाळी ११:३० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 03 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 17 डबे
2) Train no. 01445 / 01446 Pune Jn – Karmali – Pune Jn Special (Weekly):
Train no. 01445 Pune Jn – Karmali Special (Weekly)
ही गाडी दिनांक २४/०२/०२२३ , ०३/०३/२०२३, १०/०३/२०२३ आणि १७/०३/२०२३ या दिवशी (शुक्रवारी) ही गाडी पुणे या स्थानकावरुन संध्याकाळी १७:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01446 Karmali – Pune Jn Special (Weekly)
ही गाडी दिनांक २६/०२/०२२३ ,०५/०३/२०२३, १२/०३/२०२३ आणि १९/०३/२०२३ या दिवशी (रविवारी ) ही गाडी करमाळी या स्थानकावरुन सकाळी ०९:२० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २३:३५ वाजता पुणे या स्थानकावर पोहोचेल.
ही गाडी दिनांक २५/०२/०२२३ , ०४/०३/२०२३, ११/०३/२०२३ आणि १८/०३/२०२३ या दिवशी (शनिवारी) ही गाडी करमाळी या स्थानकावरुन संध्याकाळी ०९:२० वाजता सुटेल व ती त्याच दिवशी रात्री २०:१५ वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01447 panvel – Karmali Special (Weekly)
ही गाडी दिनांक २५/०२/०२२३ , ०४/०३/२०२३, ११/०३/२०२३ आणि १८/०३/२०२३ या दिवशी (शनिवारी) ही गाडी पनवेल या स्थानकावरुन रात्री २२:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:३० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग(जनरल) – 04 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 04 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 22 डबे
आरक्षण Train no. 01446 Karmali – Pune Jn या गाडीचे आरक्षण दिनांक २३/०२/२०२३ पासून, तर Train no. 01448 Karmali – Panvel आणि Train no. 01460 Madgaon Jn – Lokmanya Tilak (T) या गाड्यांचे आरक्षण २४/०२/२०२३ पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेत्स्थानवर उपलब्ध होईल अशी माहिती कोंकण रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या 741 किलोमीटर मार्गांवर विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. विद्युतीकरण झाल्यामुळे इंधनाची बचत होणार असून प्रवाशांना वेगवान आणि प्रदूषणमुक्त वातावरणात प्रवास करणे शक्य होणार आहे. नाण्याची दुसरी बाजू अशी की विद्युतीकरणामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या गाडयांचा आवाज येत नाही. त्यामुळे रेल्वे ट्रॅक ओलांडताना नागरिकांचा किंवा प्राण्यांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हे अपघात टाळण्यासाठी जे गाव रेल्वे ट्रॅकच्या लगत आहेत अशा गावांना रेल्वे प्रशानाने जाळी बसवावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.
या आधी गाड्या डिजेल इंजनवर चालायच्या. त्यामुळे त्याचा आवाज मोठा असायचा पण आता आवाज कमी येतो. रेल्वे चालक हॉर्न वाजवतात पण त्यावर पण काही मर्यादा येतात. रेल्वे पटरीवरून जाते वेळी व येते वेळी विजेवर चालणाऱ्या ट्रेनचा आवाज येत नसल्यामुळे नागरिक व गुरा घोरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. असे त्यांचे म्हणणे आहे.
Konkan Railway News:बयाणा येथे होणाऱ्या प्री-नॉनइंटरलॉक,नॉनइंटरलॉक कार्यसाठी मध्य रेल्वेने एक विशेष ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक साठी या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. या ब्लॉकमुळे कोंकणरेल्वे मार्गावरील खालील दर्शवलेल्या गाड्या दिलेल्या दिवशी रद्द करण्यात आलेल्या आहेत.
Konkan Railway News:प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत चालविण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला जुलै -२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
नियमित वेळापत्रक
01139/Nagpur – Madgaon Bi-weekly Special आठवड्यातून दर बुधवार आणि शनिवारी धावणारी हि गाडी २५/०२/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती ती ०७ जून २०२३ पर्यंत नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे.
01140/Madgaon – Nagpur Bi-weekly Special आठवड्यातून दर शुक्रवार आणि रविवारी धावणारी हि गाडी २६/०२/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती ती ०८ जून २०२३ पर्यंत नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे.
पावसाळी वेळापत्रक
या गाड्या १० जून २०२३ ते ०२ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहेत.
01139/Nagpur – Madgaon Bi-weekly Special ही गाडी १० जून २०२३ ते ०१ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार गाडी नागपूर स्थानकावरून दुपारी १५:०५ ला निघेल ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:४५ ला मडगाव स्थानकावर पोहोचेल.
01140/Madgaon – Nagpur Bi-weekly Special ही गाडी ११ जून २०२३ ते ०२ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार हि गाडी मडगाव स्थानकावरून संध्याकाळी १९:०० वाजता निघेल ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:३० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल.
नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, शेंगाव, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवीम तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
या गाडीला 2 Tier AC – 01, 3 Tier AC – 04, Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत.
अधिक माहितीसाठी या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनतर्फे करण्यात आलेले आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
KONKAN RAILWAY NEWS : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा जून -२०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी ३१/०३/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०२ जून २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ०३/०४/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०५ जुन २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
सिंधुदुर्ग | मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वे जोडणारा प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग मागील दहा वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली असून त्याचा समावेश 2011-12 च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आला होता. कोकण रेल्वे मंडळाने या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही सादर केला होता. प्रस्तावित सर्वेक्षणानुसार कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग व्यवहार्य असल्याची नोंद आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतेही काम झालेले नाही. हा रेल्वे मार्ग झाल्यास हा 107 किलोमीटरचा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे.
काय आहेत अडथळे?
या मार्गाचे काम कठीण असले तरी कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यास वेळ लागणार नाही. कारण असे कठीण कामे कोकण रेल्वे मंडळाने या आधी केली आहेत. पण हा प्रकल्प कोकण रेल्वेकडे न देता मध्य रेल्वेमार्फत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे निधीचा. या मार्गास रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्य शासनाकडून निधी मंजूर होत नाही आहे.२०१७ च्या प्रस्तावानुसार या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३४३८.४९ कोटी एवढा आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के निधी रेल्वे मंत्रालय आणि उर्वरित महाराष्ट्र सरकार देणार आहे. २०१६ च्या अर्थसंकल्पातील २५० कोटीची तरतूद वगळता अजूनपर्यंत कोणतीही तरतूद त्या पुढच्या अर्थसंकल्पात केली गेली नाही आहे. निधीअभावी फक्त सर्वेक्षण वगळता कोणतेही काम चालू झाले नाही आहे. या मार्गाकरिता 683 हेक्टर भूसंपादन गरजेचे आहे, पण अजूनपर्यंत काहीच भूसंपादन झाले नाही आहे. २०१८ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कामास गती देण्याचा प्रयत्न केला गेला होता. २०२२ पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल असे जाहीर करण्यात आले होते. पण त्यानंतर काहीच प्रगती झाली नाही. मिळाल्या फक्त पुढच्या तारखा!
कोल्हापूर आणि कोकणातील उद्योग, व्यापार वाढीच्यादृष्टीने हा रेल्वेमार्ग उपयुक्त आहे. 107 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील अतिशय मागास म्हणून ओळख असलेल्या या तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. कोल्हापुरातील शेती व इतर पूरक उत्पादने बाय रोड पाठवायची ठरवल्यास प्रचंड पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो. येथील कंटेनरना न्हावाशेवा बंदरामध्ये चार-चार दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्याचे भाडे भरावे लागते. मात्र हाच माल जयगडच्या बंदरापर्यंत रेल्वेने पोहचवला तर तो लवकर पाठवता येऊ शकेल. त्याचबरोबर या बंदराचा दुहेरी फायदाही होऊ शकतो. या बंदरावर कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. कोल्हापूर परिसरातील साखर कारखान्यांच्या को-जनरेशन प्लँटमध्ये १५ टक्के कोळसा वापरता येऊ शकतो. तसेच येथील इंडस्ट्रिजसाठीही हा कोळसा मिळू शकेल. सध्या कोल्हापुरात आणण्यात येणारा कोळसा ट्रक वाहतुकीने कारखान्यांपर्यंत आणणे प्रचंड खर्चिक आहे. रेल्वेचा हा नवीन मार्ग सुरु झाल्यास आयात व निर्यात व्यवसायासाठी मोठा फायदा होऊ शकतो. कमी खर्चामध्ये ही वाहतूक होऊ शकते.
मुंबई : लोकमान्य टिळक स्टेशन येथील ७ नंबरच्या रेल्वे वॉशिंग पिट लाईनच्या दुरुस्तीसाठी मध्यरेल्वे एक ट्रॅफिक ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ दरम्यान ३५ दिवसांसाठी असेल. या ब्लॉक मुळे कोंकणरेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या दोन गाड्या पनवेल पर्यंत चालविण्यात येतील अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे जाहीर करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
16346 – तिरुअनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस नेत्रावती एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १२/०२/२०२३ ते १८/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावर संपेल.
16345 – लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावरुन नियोजित वेळेत (१२:४५) सुरू होईल.
12620 – मंगळूरु सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १२/०२/२०२३ ते १८/०३/२०२३ पनवेल स्थानकावर संपेल.
12619 –लोकमान्य टिळक टर्मिनस – मंगळूरु सेंट्रल मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाडीचा प्रवास १३/०२/२०२३ ते १९/०३/२०२३ या दरम्यान पनवेल स्थानकावरुन नियोजित वेळेत (१६:२२) सुरू होईल.
KR News 12/02/23 2:45 PM : :दिवाणखवटी स्थानकानजीक मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्यामुळे कोकणरेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मंगला एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडून तिला मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे.
सध्या हातात आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.
KR News 12/02/23 1:10 PM : दिवाणखवटी स्थानकानजीक मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्यामुळे कोकण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगला एक्स्प्रेसचे इंजिन पडले बंद पडल्याने २ तासापासून गाडी उभी आहे त्यामुळे मार्गावर धावणाऱ्या अन्य गाड्याच्या वेळापत्रकावर परिमाण झाला आहे. नवीन इंजिन आणून वाहतुक पूर्ववत करण्यासाठी कोंकण रेल्वेचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.
सध्या हातात आलेल्या माहितीनुसार मडगावच्या दिशेने जाणाऱ्या खालील गाड्या उशिराने धावत आहेत… 10103 – मांडवी एक्सप्रेस – करंजाडी येथे आहे 10105 – सावंतवाडी दिवा एक्सप्रेस – अंजनी स्थानकावर उभी आहे
Konkan Railway News 10/02/2023 : होळी सणाकरिता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या साहाय्याने या मार्गावर एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Train no. 09193 Surat – Karmali Superfast / 09194 Karmali – Surat Special on Special Fare (Weekly):
ही गाडी सुरत आणि करमाळी ह्या स्थानकांदरम्यान विशेष शुल्कासह यामार्गावर चालविण्यात येणार आहे.
Train no. 09193 Surat – Karmali Superfast Special on Special Fare (Weekly):
दिनांक ०७/०३/२०२३ मंगळवारी ही गाडी सुरत या स्थानकावरुन संध्याकाळी १९:५० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी १०:२५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09194 Karmali – Surat Superfast Special on Special Fare ( Weekly)
दिनांक ०८/०३/२०२३ रोजी बुधवारी ही गाडी करमाळी या स्थानकावरुन संध्याकाळी १६:२० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता सुरत या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 14 + एसी चेअर कार – 01 असे मिळून एकूण 17 डबे
आरक्षण
गाडी क्र. 09194 या गाडीचे आरक्षण १४/०२/२०२३ पासून सर्व टिकेट्स खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
वेळापत्रक
Sr. No.
Station Name
Train. No.9193 ⇓
Train No.9194 ⇑
1
SURAT
19:50
08:00
2
VALSAD
20:50
07:05
3
VAPI
21:12
06:38
4
PALGHAR
22:19
04:58
5
VASAI ROAD
23:10
04:15
6
BHIWANDI ROAD
23:40
03:00
7
PANVEL
00:50 Next Day
02:15
8
ROHA
02:20
01:15
9
MANGAON
02:53
00:02 Next Day
10
KHED
04:00
22:40
11
CHIPLUN
04:20
21:38
12
SAVARDA
04:40
21:16
13
ARAVALI ROAD
04:52
21:04
14
SANGMESHWAR
05:06
20:46
15
RATNAGIRI
06:00
20:00
16
ADAVALI
06:34
19:20
17
VILAVADE
06:48
19:04
18
RAJAPUR ROAD
07:10
18:44
19
VAIBHAVWADI RD
07:24
18:30
20
NANDGAON ROAD
07:42
18:12
21
KANKAVALI
07:56
17:56
22
SINDHUDURG
08:12
17:42
23
KUDAL
08:26
17:30
24
SAWANTWADI ROAD
09:00
17:08
25
THIVIM
09:24
16:38
26
KARMALI
10:25
16:20
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.inga या संकेत स्थळास भेट द्यावी किंवा NTES अँप्लिकेशन डाउनलोड करावे असे आवाहन कोंकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.