Category Archives: कोकण रेल्वे




Mumbai Goa Highway:गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता नवीन डेडलाईन मिळाली आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र महामार्गाची सध्याची स्थिती आणि चालू असलेल्या कामाची गती पाहता प्रशासन ही नवीन डेडलाईन पाळण्यास अपयशी ठरणार असल्याचा आरोप मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने केला आहे. एवढ्यावरच न थांबता समितीने या महामार्गावरील प्रत्येक किलोमीटरच्या कामाची सध्याची स्थिती लिखित स्वरूपात सादर केली आहे. समितीने बनविलेल्या यादीनुसार बरेच काम अपूर्ण असून कामाचा वेग पाहता दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
समितीने मांडलेली महामार्गाची सद्यस्तिस्थि
टप्पा-०१ पनवेल ते कास -००/०० किमी ४२ किमी (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर २८ मार्च २०२३ रोजी देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर २०२३ काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. सदर टप्प्यात ३८ किमी कॉन्क्रीट पूर्ण झालेली असून नित्कृष्ठ दर्जाचे काम करण्यात आलेले आहे. तर अद्यापही साईट पट्टी, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे, ड्रेनेज लाईन, सूचना फलक यांसारखी कामे अद्यापही अपूर्ण आहेत व सदर टप्प्यात ०६ महिन्याच्या आतमध्ये खड्डे महामार्गाला पडलेले आहेत. सदर टप्पा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती आम्हा कोकणवासीयांना नाही.
सदर टप्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२२ रोजी देण्यात आलेली असून ३१ मे २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. सदर टप्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. अद्यापही या टप्प्याची एक मार्गिका झालेली नाही. कासू ते वाकण महामार्ग नसून पायवाट झालेली आहे. महामार्गाला पेव्हर ब्लॉक दिसत आहेत. सदर टप्याचे काम दिवसाला १०० मीटर होत आहे यानुसार अंदाज लावल्यास हा महामार्ग पूर्ण होईल याची शाश्वती आम्हा कोकणकरांना नाही. तसेच या टप्यातील सर्व उड्डाणपुलाचे काम बाकी आहे, जनावरे, वहानांसाठीभुयारी मार्ग, साईटपट्टीचे काम बाकी आहे तर अद्यापही जमिनी ताब्यात घेतलेल्या नाहीत व अतिक्रमण हटावलेला नाही. या टप्प्यातील १२ किमी मध्ये ११ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम १५-२० टक्के झालेला आहे तर नागोठणे येथील पुलाचे काम २०-२५ टक्के पूर्ण करण्यात आलेला आहे. याठिकाणी पेव्हर ब्लॉक असून वर खाली झाल्याने अपघात वाढत आहेत. सदर टप्प्याचे काम २००५ साली बनविण्यात आलेल्या आराखड्यानुसार होत असून २००५ साली वाहनांची संख्या व लोकसंख्या कमी होती व त्याआधारे काम चालू असल्याने भुयारी मार्ग अडचण ठरत आहेत. तसेच महामार्गावर भराव टाकल्याने शेतकऱ्या ची जमीन नकसान होत आहे.
टप्पा-०३ इंदापूर ते वडपाले-८४ किमी ते ११० (२६.७५ किमी)-
सदर टप्प्यात इंदापूर व माणगाव हे दोन बायपास येत असून सदर बायपासचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे अधिकारी वर्गाकडून ०४ जुलै २०२३ रोजी माणगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान आश्वासन देण्यात आलेले होते परंतु अद्यापही या दोन्ही बायपासचीही अवस्था बिकट आहे. सर्व अडचणी सुटल्या असून काम धीम्या गतीने का चालू आहे याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. सदर ठिकाणी जनआक्रोश समितीच्यावतीने पाहणी केली असता अद्यापही सदर कामाला गती देण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत पूर्णता काम बंद असून नवीन ठेकेदार निवडन्यात येणार आहे. आपण स्वतः निरिक्षण केले असल्यास माणगांव शहरात दररोज वाहनांच्या ०४-०५ किलोमीटरच्या रांगा पहावयास मिळत असतील परिणामी सदर ठिकाणी कोकणकर व स्थानिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तर लोणेरे येथील ब्रिजचे काम अद्यापही बंद आहे.
एका बोगद्याचे काम झालेले असून पहिल्याच पावसात गळती पहायला मिळली तर दूसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही बोगदा व त्यापुढील ब्रिजचे काम बाकी आहे. टप्पा-०६ – कशेडी १६१ किमी ते परशुराम घाट २०५ किमी
सदर टप्प्यात खेड रेल्वे स्थानक येथील ब्रिजचे काम अपूर्ण असून परशुराम घाटातील परिस्थिती बिकट आहे, सदर घाट क्षेत्रात योग्यरित्या व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काम अपेक्षित आहे. टप्पा-०७ – परशुराम घाट २०५ किमी ते आरवली २४१ किमी-
सदर टप्प्यातील चिपळूण येथील ब्रिज दुर्घटना घडली व यानंतर सदर ब्रिज तोडण्यात आले व नव्याने सदर ब्रिजचे काम होणे अपेक्षित असताना अद्यापही कामाला सुरुवात नाही. टप्पा-०८ व ०९-आरवली ते वाकेड –
सदर टप्यातील ३५% काम झालेले असून उर्वरित सर्व काम रखडलेले आहे व सदर कामाची किलोमीटरनुसार परिस्थिती दर्शवीत आहोत. तरी सदर कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
या निवेदनात समिती म्हणते
”मुंबई आणि मंगळुरु ही दोन बंदरे जोडण्याच्या दृष्टीने रोहा ते मंगळुरु दरम्यान नवीन ब्रॉडगेज मार्ग बांधण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालय, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्य शासनांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना १९९० मध्ये करण्यात आली. १५ वर्षांनंतर किंवा सर्व देणी देऊन झाल्यावर यांपैकी जे आधी होईल तेव्हा हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन होणे अपेक्षित होते. त्यानुसार वर्ष २००८-०९ मध्ये विलीनीकरण होण्याची शक्यता असताना केंद्र शासनाने सर्व देणी देऊन झाल्यावरही हे महामंडळ स्वतंत्रच राहील असे प्रथम आर्थिक पुनर्रचना प्रस्तावात ठरवले (संदर्भ: रेल्वे बोर्डाचे दि. ०७.०१.२००९ चे पत्र क्र. 2007/PL/50/7). त्यानंतर सार्वजनिक उपक्रम विभाग (DPE)च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोकण रेल्वे महामंडळ Sick Company म्हणून गणले जाऊ नये याकरिता द्वितीय आर्थिक पुनर्रचना प्रस्तावात कोकण रेल्वेतील केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे ४०७९.५१ कोटींचे Non-Cumulative Redeemable Preference Shares (RPS) चे रूपांतर Compulsorily Convertible Non-Cumulative Preference Shares (CCPS) मध्ये करण्यात आले (संदर्भ: रेल्वे बोर्डाचे दि. २६.१२.२०१७ चे पत्र क्र. 2015/PL/50/9).
रोहा – वीर दुहेरीकरणानंतर दि. १६.०८.२०१६ ला रेल्वे बोर्डाने कोकण रेल्वेच्या १४७.६८ किमीच्या मार्गाच्या टप्पा दुहेरीकरणाच्या आणि २१ नवीन स्थानके बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता देऊन यासाठी लागणारा ४४६० कोटींचा निधी ५०% समभाग (Equity) आणि ५०% कर्जाच्या रूपात उभा करण्याचे ठरवले. दि. २६.०६.२०१८ ला रेल्वेच्या विस्तारित बोर्डाने (Expanded Board for Railways) या प्रकल्पाची किंमत ४९८० कोटी रुपयांपर्यंत वाढवली. नंतर हा प्रस्ताव कॅबिनेट समितीकडे व त्यांच्याकडून केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. दि. १८.०६.२०१९ ला त्याविभागाने प्रस्तावाला मान्यता दिली व संबंधित राज्य शासनांकडून (महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ) निधी देण्याबद्दल लेखी हमीची मागणी केली. त्यात महाराष्ट्र ४९६.४६९ कोटी, गोवा १३५.४०१ कोटी, कर्नाटक ३३८.५०२ कोटी आणि केरळ १३५.४०१ कोटी असा आर्थिक सहभाग अपेक्षित होता.
कोकण रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना पत्र पाठवून आर्थिक सहभागाची हमी देण्याबाबत विनंती केली (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. ३० ऑगस्ट, २०१९ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Equity Infusion). राज्यांकडून निधी मिळण्यास उशीर झाल्यास एकूणच प्रकल्पाच्या खर्चात वाढ होऊन त्याचा परिणाम एकूणच प्रगतीवर होऊ नये याकरिता राज्यांनी तो निधी प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच एकरकमी देण्यासंदर्भात लेखी हमी मागितली. पूर्वीच्या पत्राला उत्तर न आल्यामुळे व केंद्रीय कॅबिनेटच्या नवीन सूचनांनुसार महाराष्ट्राकडून अपेक्षित असलेला ४९६.४६९६ कोटींचा निधी एकरकमी देणेबाबत कोकण रेल्वेने महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना सूचित केले (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. १३ सप्टेंबर, २०१९ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Equity Infusion).
त्यानंतर रेल्वे बोर्डाने या प्रस्तावात काहीसा बदल करून १४७.६८ ऐवजी १४१ किलोमीटर टप्पा दुहेरीकरण व २१ ऐवजी १८ नवीन स्थानकांचा ४५१३ कोटींचा सुधारित प्रस्ताव केला. राज्यांवर एकरकमी निधी देण्याचा ताण येऊ नये याकरिता राज्य शासनांनी पहिल्या वर्षी २०%, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी प्रत्येकी ४०% अशा तीन हप्त्यांमध्ये निधी द्यावा परंतु त्याबद्दल लेखी हमी देण्याबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सूचित केले. त्यामुळे कोकण रेल्वेने पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन मुख्य सचिव (परिवहन आणि बंदरे) श्री. आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) यांना पत्र पाठवून निधीबाबत विचारणा केली (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. १६ एप्रिल, २०२१ चे पत्र क्र. CO/S/Bonds/State Correspondence).
वरीलपैकी एकही पत्राला महाराष्ट्र शासनाने किंवा परिवहन सचिवांनी उत्तर न दिल्यामुळे कोकण रेल्वेने महाराष्ट्राचे मुख्य सचिव श्री. मनू कुमार श्रीवास्तव (भा.प्र.से.) यांना महाराष्ट्राच्या ५७२.४४ कोटींच्या आर्थिक सहभागाबद्दल सहमती किंवा असहमती विचारण्याकरता पत्र पाठवले (संदर्भ: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे दि. २ डिसेंबर , २०२२ चे पत्र क्र. CO/S/Bonds/Rights Issue). त्याच्या प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्राच्या तत्कालीन गृह (परिवहन) विभागाचे सह सचिव श्री. सिद्धार्थ खरात यांनी महाराष्ट्राच्या कोकण रेल्वेमध्ये असलेल्या आतापर्यंतच्या भागभांडवलावर किती लाभांश (Dividend) मिळाला व तो जर रु. ५७२.४४ कोटी किंवा त्याहून अधिक असेल आणि पुढील उपयोगाकरिता राखून ठेवला असेल तर तो सदर क्षमतावृद्धीच्या खर्चासाठी वापरण्यात येऊ शकेल का याबाबत विचारणा केली (संदर्भ: दि. १८ जानेवारी, २०२३ चे पत्र क्र. आरएलवाय-०४२२/प्र.क्र.११२/परि-५
या सर्व प्रक्रियेत बराच कालावधी लोटल्यामुळे प्रकल्पाची किंमत ४३१९ कोटींवरून ५२०४ कोटींपर्यंत वाढली व यातून अपेक्षित परतावा १२.४३% वरून २.९५% पर्यंत कमी झाला. राज्य शासनांपैकी कर्नाटक राज्याने निधी देण्यास नकार दिला व इतर राज्यांनी वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही उत्तर न दिल्यामुळे संचालक (सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) यांनी कोकण रेल्वेचा हा १४१ किलोमीटर टप्पा दुहेरीकरणाचा प्रस्ताव रद्द केल्याचे कळवले (संदर्भ: दि. २७.०२.२०२३ चे पत्र क्र. 2022/P/50/10). याकाळात महाराष्ट्रात २०१४ ते २०१९ महायुती, २०१९ ते २०२२ महाविकास आघाडी व २०२२ ते २०२४ महायुतीचे शासन होते.
राज्य शासनांनी निधी देण्यास नकार दिल्यामुळे किंवा वेळेत उत्तर न दिल्यामुळे रेल्वेचा दुहेरीकरण प्रकल्प रद्द झाल्याचे देशातील हे एकमेव उदाहरण असावे. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ पासून भारतीय रेल्वेत आधुनिकीकरण व क्रांती सुरु असताना कोकण मात्र त्यापासून वंचित आहे. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेचा भाग नसून स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे हे घडते. केंद्रीय अर्थसंकल्पातून कोकण रेल्वेला निधी मिळत नाही. त्यांना पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी लागणाऱ्या निधीकरिता राज्य शासन व बाहेरील कर्जांवर अवलंबून राहावे लागते.
संपूर्ण देशात केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अर्थसंकल्पातून रेल्वे विकास प्रकल्प सुरु असताना केवळ स्वतंत्र महामंडळ असल्यामुळे कोकणाला त्याचा लाभ न देणे अन्यायकारक आहे. ६ ऑगस्ट, २०२३ ला आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी उदघाटन केलेल्या अमृत भारत स्थानक योजनेत कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागातील (म्हणजेच महाराष्ट्रातील) एकाही स्थानकाचा समावेश नाही.
महाराष्ट्रातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या सावंतवाडी टर्मिनसचे कामही तत्कालीन रेल्वे मंत्री श्री. सुरेश प्रभू व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये भूमिपूजन करूनही अपूर्णच आहे. यालाही कोकण रेल्वेचे स्वतंत्र अस्तित्वच कारणीभूत आहे. २००८ मध्ये होणारे विलीनीकरण आज २०२४ पर्यंतही न झाल्यामुळे रेल्वे सुधारणांच्या बाबतीत कोकण आधीच १५ वर्षे मागे पडला असून आणखी उशीर झाल्यास आणखी बऱ्याच संधी हुकतील.
देशातील व्यस्त व जास्त प्रवासी घनता असलेल्या मार्गांचे High Density Network (HDN) किंवा Highly Utilized Network (HUN) असे वर्गीकरण केले जाते. या मार्गांच्या क्षमतावृद्धीसाठी रेल्वे मंत्रालयाकडून विशेष प्रयत्न केले जातात. यात दुहेरीकरण, तिहेरीकरण, चौपदरीकरण, गाड्यांचा वेग वाढवण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधांचे काम व इतर अनेक कामे केली जातात. परंतु, केवळ स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे १६८% वापर असूनही कोकण रेल्वे मार्गाचा यात समावेश झालेला नाही.
याचकरिता महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील सर्व समाजघटक कोकण रेल्वेच्या भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची मागणी करत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांपैकी माजी खासदार श्री. विनायक राऊत, माजी खासदार श्री. गोपाळ शेट्टी, खासदार श्री. सुनील तटकरे, खासदार व माजी केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे, खासदार श्री. रविंद्र वायकर, खासदार श्री. धैर्यशील पाटील तर कर्नाटकातील खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी, खासदार कॅप्टन ब्रिजेश चोवटा यांनी व इतर बऱ्याच लोकप्रतिनिधींनीही ही मागणी लावून धरली आहे.
कोकण रेल्वेत सुरुवातीला केंद्र शासन ५१%, महाराष्ट्र २२%, कर्नाटक १५% तर गोवा व केरळ प्रत्येकी ६% आर्थिक भागीदार होते. आताच्या बदलांनुसार हे समभाग केंद्र शासन ६५.९७%, महाराष्ट्र १५.५७%, गोवा ३.५९%, कर्नाटक १०.६२% आणि केरळ ४.२५% या प्रमाणात आहेत. परंतु, सर्वात कमी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या दोन राज्यांनाच कोकण रेल्वेकडून सर्वाधिक गाड्या व सुविधा मिळाल्या आहेत. सर्वाधिक गुंतवणूक करून महाराष्ट्र व त्याखालोखाल कर्नाटक अजूनही पुरेशा रेल्वे सुविधांकरिता अजूनही संघर्ष करत आहेत.
कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याआधी ही कंपनी १००% मालकी हक्कांसहित केंद्र शासनाच्या अखत्यारित येणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित राज्य शासनांनी त्यांचे समभाग केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या स्वाधीन केले पाहिजेत असे खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी व खासदार श्री. धैर्यशील पाटील यांनी संसदेत विचारलेल्या प्रशांत उत्तर देताना केंद्रीय रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
म्हणून, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्राकडून मान्यता मिळण्याकरिता आपण प्रयत्न करावेत. त्यासाठी गरज पडल्यास महाराष्ट्राच्या ताब्यात आता असलेले ३९६.५४२५ कोटी रुपयांचे समभाग कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला सुपूर्द करावेत. ते केल्यानंतर कोकण रेल्वे केंद्र शासनाच्या ताब्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम न राहता ताबडतोब भारतीय रेल्वेत विलीन केले जाईल याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून लेखी हमी घ्यावी.
दोन शासकीय विभागांतील समन्वय कठीण असून दोन रेल्वे विभागांसंबंधित कोणताही निर्णय घेण्याआधी रेल्वे बोर्डाची मध्यस्थी आवश्यक ठरते. तर एकच विभाग असल्यास संबंधित महाव्यवस्थापक (General Manager) आपल्या अधिकार क्षेत्रात निर्णय घेऊ शकतात. कोणत्याही विभागातील नागरिकांना आपल्या राज्याच्या राजधानीकडेच जास्त प्रवास करावा लागतो. त्यानुसार कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग (रोहा ते मडुरे मार्ग) मध्य रेल्वेत व कारवार विभाग (पेडणे ते ठोकूर मार्ग) नैऋत्य (दक्षिण पश्चिम) रेल्वे विभागात विलीन झाल्यासच स्थानिकांच्या मागण्या व्यवस्थित पूर्ण होऊ शकतील.
मुंबई, पुणे, भुसावळ व सोलापूर विभागांच्या माध्यमातून ७०% महाराष्ट्र मध्य रेल्वेच्या अखत्यारित असल्यामुळे कोकणही त्याच विभागाकडे असावा हेच प्रवासी हिताचे आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे एकाच विभागा अंतर्गत येतील व राज्यांतर्गत वाहतूक सुरळीत होईल. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात सक्षम रेल्वे सुविधा पुरवणे मध्य रेल्वेला शक्य होईल. नांदेड विभाग मध्य रेल्वेकडे नसून दक्षिण मध्य रेल्वेकडे असल्यामुळे तेथून मुंबईला येणाऱ्या गाड्यांपेक्षा तेलंगणातील हैदराबादला जाण्यासाठी जास्त गाड्या आहेत.
कोकण रेल्वे स्वतंत्र झोन झाल्यास त्याचे मुख्यालय महाराष्ट्रातून बाहेर जाईल. हा महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा तोटा असेल. तसेच, स्वतंत्र झोनसाठी महाव्यवस्थापक आणि इतर प्रशासकीय पद निर्मिती तसेच नवीन मुख्यालयासाठी भूसंपादन व मुख्यालयाचे बांधकाम ही अत्यंत खर्चिक कामे आल्यामुळे विलीनीकरणास आणखी उशीर होईल. तसेच मुख्यालय महाराष्ट्राबाहेर गेल्यामुळे कोकण रेल्वेत आपला कोकण व महाराष्ट्र क्वचितच दिसेल. इतर सर्व रेल्वे झोन २००० ते ५००० किलोमीटर मार्गाचे असताना केवळ ७४१ किलोमीटरचा स्वतंत्र कोकण झोन तयार करणे व्यवहार्य नाही.
वरील सर्व बाबींचा व प्रवाशांच्या हिताचा विचार करता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून रत्नागिरी विभाग मध्य रेल्वेला व कारवार विभाग नैऋत्य रेल्वेला जोडण्यासाठी आपण आपल्या अधिकारात प्रयत्न करावेत, ही नम्र विनंती.
सध्याच्या विधानसभेच्या २०२४ ते २०२९ या कार्यकाळातच हा ऐतिहासिक निर्णय व्हावा अशी कोकणवासीयांची इच्छा आहे. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या स्थापनेकरिता आदरणीय श्री. मधू दंडवते, श्री. जॉर्ज फर्नांडिस व सर्व मुख्यमंत्र्यांची आजही आठवण काढली जाते त्याचप्रमाणे ज्यांच्या कार्यकाळात हे विलीनीकरण होईल त्यांचे नावही इतिहासात अजरामर होईल. आपण ही संधी गमावू नये, ही नम्र विनंती.”





सिंधुदुर्ग: १४४ वर्षातून येणारी पर्वणी म्हणजेच महाकुंभ मेळ्यासाठी कोकणातून सावंतवाडी येथून प्रयागराज साठी विशेष ट्रेन चालवण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां रेल्वेच्या सर्व संबंधितांकडे यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.
१४४ वर्षांत एकदा साजरा होणारा हा महोत्सव लाखो भाविकांसाठी जीवनातील एक अद्वितीय आणि धार्मिक अनुभव ठरेल. त्यामुळे कोकणातील अनेक भक्त प्रयागराजला प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत.महा कुंभमेळ्यासाठी सावंतवाडी ते प्रयागराजदरम्यान काही विशेष गाड्यांची व्यवस्था करावी, कोकण रेल्वे मार्गावरील सर्व तालुक्यांतील नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी या गाड्यांना सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पेण व पनवेल स्थानकांवर थांबे देऊन पुढे प्रयागराजला रवाना करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
हिंदू धर्मात महाकुंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातून सनातन धर्माच्या परंपरेचे सखोल प्रतिबिंब उमटते. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्णकुंभ म्हणतात. बाराव्या पूर्णकुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा होतो. तब्बल १४४ वर्षांनंतर यंदा महाकुंभ होत आहे. महाकुंभमेळ्यात शाही स्नानाची व्यवस्थाही आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी काही तारखा निश्चित केल्या जातात. यंदा महाकुंभात एकूण ६ शाही स्नान होणार असून त्यापैकी २ स्नान पूर्ण झाले आहेत.
महाकुंभ शाही स्नानाच्या तारखा
१. पौष पौर्णिमा: १३-०१-२०२५/सोमवार
२. मकर संक्रांत : १४-०१-२०२५/मंगळवार
३. मौनी अमावस्या (सोमवती): २९-०१-२०२५/बुधवार
४. वसंत पंचमी: ०३-०२-२०२५/सोमवार
५. माघी पौर्णिमा: १२-०२-२०२५/बुधवार
६. महाशिवरात्री: २६-०२-२०२५/बुधवार
महाकुंभमेळा कधी संपणार?
महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीला होणार आहे. यावर्षी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. महाकुंभाचे शेवटचे शाही स्नानही याच दिवशी केले जाणार आहे.




Konkan Railway: गणेश चतुर्थी नंतर कोकणातला मोठा सण म्हणजे शिमगोत्सव म्हणजेच होळी. अगदी तळकोकणापासून पालघर ठाणे पर्यंत ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. गणेश चतुर्थी प्रमाणेच हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातो. चाकरमान्यांचा मोठा वर्ग गावी जाण्यासाठी रेल्वेला प्राधान्य देतो.
यावर्षी होलिकाउत्सव मार्च १३ रोजी पासून सुरू होत आहे. मात्र या तारखे दरम्यानच्या जवळ जवळ सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने ज्या चाकरमान्यांना आरक्षण भेटले नाही त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. होळी आणि धूलिवंदन दिवशीच्या आणि आदल्या दिवशीच्या (१२,१३, १४ मार्च) तुतारी, कोकणकन्या, मांडवी, वंदे भारत, जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा – सावंतवाडी एक्सप्रेस, मत्स्यगंधा एक्सप्रेसची आरक्षण स्थिती ‘रिग्रेट’ दाखवत आहे.
नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्याने चाकरमान्यांना अतिरिक्त गाड्यांची घोषणा होण्याची वाट पहावी लागणार आहे. अजूनपर्यंत रेल्वे प्रशासनाने कोणत्याही अतिरिक्त गाडीची घोषणा केली नाही आहे. मात्र या सणादरम्यान गाड्यांची आरक्षण स्थिती पाहता रेल्वे प्रशासनाला या मार्गावर जास्त गाड्या सोडाव्या लागणार आहेत.
- गाडी क्रमांक ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव एक्स्प्रेस ही गाडी दिनांक २६ जानेवारीपासून (वेळ ०३.०० – ०३.०२)
- गाडी क्रमांक. १११०० मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस २५ जानेवारीपासून ( वेळ २०.३० -२०.३२)
- गाडी क्रमांक. २२६२९ दादर तिरुनेलवेली एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ २३.१५ – २३.१७)
- गाडी क्रमांक. २२६३० तिरुनेलवेली – दादर एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ १२.१० – १२.१२)
- गाडी क्रमांक.१२२१७ कोचुवेली-चंदिगड एक्स्प्रेस २६ जानेवारीपासून ( वेळ ०९.१५ – ०९.१७ )
- गाडी क्रमांक. १२२१८ चंदिगड कोचुवेली एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ ०९.२० – ०९.२२)
- गाडी क्रमांक. २०९३१ कोचुवेली – इंदूर एक्स्प्रेस २५ जानेवारीपासून ( वेळ १२.१० – १२.१२)
- गाडी क्रमांक. २०९३२ इंदूर – कोचुवेली एक्स्प्रेस एक्स्प्रेस २९ जानेवारीपासून ( वेळ १२.४५ – १२.४५ )
- गाडी क्रमांक. २२४७५ हिसार -कोइम्बतूर एक्स्प्रेस ३० जानेवारीपासून ( वेळ १६.५० – १६.५२ )
- गाडी क्रमांक. २२४७६ कोइम्बतूर-हिसार एक्सप्रेस २६जानेवारीपासून ( वेळ १२.१० – १२.१२)




Konkan Railway: उद्या दिनांक २४/०१/२०२५ (शुक्रवार) रोजी चिपळूण स्थानकावर तिसर्या पॅसेंजर लूप लाईन च्या कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकचे रेल्वे सेवांवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
दिनांक २४/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर ही गाडी रत्नागिरी स्थानकावरून पुनर्नियोजित वेळेनुसार ०१:२५ तास उशिराने म्हणजे सकाळी ७.०० वाजता रत्नागिरीहून निघणार आहे.
दिनांक २३/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक रत्नागिरी – चिपळूण विभागादरम्यान मर्यादित वेगाने म्हणजेच उशिराने चालविण्यात येणार आहे.