Category Archives: देश
Vande Bharat Cargo: प्रवाशांना वंदे भारत मेट्रो, वंदे स्लीपर, वंदे मेट्रो( नमो भारत रॅपिड रेल) या ट्रेन धावण्यास सज्ज झाल्यानंतर आता मालवाहतुकीसाठी लेटेस्ट टॅक्नलॉजी असलेली वंदे कार्गो ट्रेन धावणार आहे. वंदे कार्गो ट्रेनची पहिली झलक समोर आली असून रेल्वे लवकरच वंदे कार्गो ट्रेनला प्रवाशांच्या सेवेत आणणार आहे.
आता विमानाप्रमाणेच ट्रेनमध्येही पार्सल सप्लाय होणार आहेत. वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर आता माल वाहतूक करण्यासाठी हायस्पीड मालगाड्या चालवण्याची तयारी सुरू आहे. रेल्वे सेवा अधिक चांगली आणि आधुनिक करण्यावर भर देत आहे. चेन्नई येथील रेल्वे कोच फॅक्ट्रीत वंदे कार्गो ट्रेनचं काम सुरू आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत आणि वंदे मेट्रो ट्रेनच्या कोचचे काम करण्यात आले आहे तिथेच हाय स्पीड वंदे कार्गो तयार होत आहे.
कमी अतंर असलेल्या शहरांत वंदे भारत कार्गो ट्रेन चालवण्यात येण्याची शक्यता आहे. या Vande Cargo मध्ये प्रवाशांसाठी कोणतीही सीट नसणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या Vande Cargo गाड्यांचा वापर कमी वेळेत एका शहरातून दुस-या शहरात सुलभ आणि सुरक्षित माल वाहतुकीसाठी केला जाईल. या Vande Cargo गाड्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्णपणे तयार होतील अशी माहिती देण्यात आली आहे.
Vande Bharat Express: भारतीय रेल्वेकडे तयार असलेल्या 16 वंदे भारत ट्रेन धूळ खात यार्डात उभ्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वंदे भारत सेवा सुरु करण्यासाठी तांत्रिक तसेच आर्थिक दृष्ट्या परवडेल अशा मार्गांची चाचपणी सुरु असून सध्या तरी असे मार्ग सापडले नसल्याने या वंदे भारत ट्रेन यार्डातच हिरव्या झेंड्याच्या प्रतिक्षेत धूळ खास उभ्या असल्याचं समजतं.
ट्रेन सुरु करण्यात अडचण काय?
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वे सध्या अशा मार्गांच्या शोधात आहे तिथे या वंदे भारत ट्रेन ताशी 130 ते 160 किलोमीटर वेगाने चालवता येतील. तसेच वंदे भारत ट्रेनसाठी आधुनिक सिग्नल यंत्रणेचीही गरज असल्याने या ट्रेन धूळ खात पडल्याची माहिती ‘मातृभूमी’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. परवडतील अशा मार्गांवर सर्वात प्रिमिअम ट्रेन्सपैकी असलेल्या वंदे भारत चालवण्याचा रेल्वेचा मानस असून आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या मार्गांची चाचपणी सुरु आहे. इतर ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये अडथळा निर्माण न करता चालवता येतील अशापद्धतीने या ट्रेनचा समावेश वेळापत्रकात करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र असा टाइम स्लॉट अद्याप सापडलेला नाही. तसेच अनेक ट्रॅक हे हायस्पीड ट्रेनच्या वाहतुकीसाठी अद्यावत करण्यात आलेले नाही. त्यामुळेच कमी अंतरावरील अनेक मार्गांवर आवश्यकता असूनही या वंदे भारत ट्रेन सुरु करता येत नसल्याचे समजते.
सामान्यपणे 8 डब्ब्यांची एक वंदे भारत ट्रेन चालवण्यासाठी चार ते पाच ट्रेनच्या वेळापत्रकामध्ये बदल करावा लागतो. त्यामुळे एका ट्रेनचा परिमाण किमान 5 हजार प्रवाशांवर होतो. दुसरीकडे वंदे भारतमधून 500 प्रवासी प्रवास करतात. म्हणूनच वंदे भारतला स्लॉट देण्यासाठी केल्या जाणाऱ्या तडजोडीमुळे इतर प्रवाशांची नाराजी ओढावून घ्यावी लागते, असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यामुळे जनतेत वंदे भारत सेवेबद्दल चुकीचा संदेश जाता कामा नये असा रेल्वेचा प्रयत्न आहे.
वंदे भारतसाठीच्या अटी
वंदे भारत चेअर कार ट्रेन एका वेळेस एका मार्गावर जास्तीत जास्त 8 तासांचा प्रवास करते. त्यामुळेच मागणी असलेल्या आणि 8 तासांमध्ये प्रवास पूर्ण होईल अशा मार्गांचा शोध सध्या सुरु आहे. तसेच वंदे भारत ट्रेन मध्य रात्री 12 पासून पहाटे 5 पर्यंत चालवल्या जात नाहीत.
Train Derailment: मागच्या काही दिवसांपासून ट्रेनचे अपघात किंवा दुर्घटना थांबण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा पहाटेच्या सुमारास एक्सप्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेन रुळ सोडून पुढे गेली. या दुर्घटनेत मोठं नुकसान झालं असून घटनास्थळावरचे फोटो समोर आले आहेत.
19168 वाराणसी अहमदाबाद साबरमती एक्सप्रेस रुळावरुन घसरले. 22 डबे डिरेल झाले आहेत. मागच्या काही दिवसांपासून अशा घटना वाढत आहेत. या दुर्घटनेचं कारण अद्याप समोर आलं नाही
कानपूर भीमसेन सेक्शनदरम्यान ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेनंतर हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहेमहत्त्वाची बाब म्हणजे अजून तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे.
प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर अधिकारी, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. हा अपघात भयंकर होता. मात्र थोडक्यात जीवितहानी टळली आहे.
इंजिनला बोल्डर आदळल्याने इंजिनच्या कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाल्याचं लोको पायलनं सांगितलं आहे. त्यामुळे ट्रेन डिरेल झाली असावी असा अंदाज आहे.
Senior citizens lower birth quota:भारतीय रेल्वे कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांसाठी लोअर बर्थ आणि साईड लोअर बर्थ आता राखीव ठेवणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांना रेल्वे प्रवासात मधील Middle किंवा वरचा Upper बर्थ खूपच गैरसोयीचा ठरत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी लोअर बर्थ राखीव ठेवावे याची मागणी वाढत होती. या मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांसाठी सर्व सर्व शयनयान श्रेणींच्या डब्यांचे लोअर बर्थ आणि साईड लोअर बर्थ आता राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्लीपर क्लासमध्ये ६ ते ७ लोअर बर्थ, थ्री टीयर एसी कोचमध्ये ४ ते ५ लोअर बर्थ आणि टू टीयर एसी कोचमध्ये ३ ते ४ लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांसाठी राखीव असतील. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेनचे कोचही वाढण्यास सुरुवात केली असून काल ९ ऑगस्ट रोजी देशात पहिल्यांदाच २० डबे असलेली वंदे भारत ट्रेन धावली. अहमदाबाद येथून आज सकाळी ७ वाजता या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान २० कोच असलेल्या पहिल्या वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन सुरू झाली आहे.
२० कोच असलेली पहिली वंदे भारत ट्रेन ताशी १३० किलोमीटर वेगाने चालवली जात आहेआत्तापर्यंत देशातील मोठ्या शहरांमध्ये १६ कोच आणि लहान शहरांमध्ये ८ कोच असलेली धावते. आतापर्यंत अहमदाबाद ते मुंबई दरम्यान प्रत्येकी १६ कोचच्या दोन वंदे भारत ट्रेन धावत होत्या. मात्र, आजपासून अहमदाबाद ते मुंबई दरम्यान २० कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनची ट्रायल सुरू झाली आहे. वंदे भारत ट्रेनच्या या चाचण्या यशस्वी झाल्या तर कालांतराने लोकांना २० कोच असलेल्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा लाभ मिळणार आहे. सध्याच्या १६ कोचच्या ट्रेनमध्ये ११२८ प्रवासी असतात, ज्यामध्ये प्रत्येकी ५२ सीट आहेत. नवीन २० कोचच्या ट्रेनची क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे अधिक प्रवासी एकत्र प्रवास करू शकतील.याशिवाय वंदे भारत ट्रेनचा वेग वाढवणे हा देखील या चाचणीचा उद्देश होता , सध्या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी १२०-१३० किमी आहे, तो ताशी १६० किमीपर्यंत वाढवण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.
संस्थापक सदस्य – कोकण रेल्वे,
सल्लागार- सखांड कोकण रेल्वे सेवा समिती