Category Archives: महाराष्ट्र

Vande Bharat Express : वंदे भारत स्लीपर कोचचा श्रीगणेशा महाराष्ट्रात?

Vande Bharat Express : वेगवान आणि आरामदायक प्रवास होत असल्यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस संपूर्ण देशात लोकप्रिय होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या  34 वंदे भारत एक्स्प्रेसची  संख्या 200 पर्यंत नेण्यात येणार आहे. वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. सध्या महाराष्ट्रातून चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता वंदे भारतची स्लीपर कोच येत आहे. ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवरुन धावणार आहे.
प्रवासाचा कमी वेळ, चांगल्या सुविधा आणि वाजवी भाडे यामुळे विमान प्रवासापेक्षा अनेक जण वंदे भारत एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे काही मार्गांवर विमान कंपन्यांनी भाडे कमी केले आहे. देशभरात लोकप्रिय झालेल्या या ट्रेनमध्ये स्लीपर कोच सुरु होणार आहे. ही ट्रेन पुणे ते बेंगळुरु दरम्यान असणार आहे. मार्च 2024 पर्यंत स्लीपर वंदे भारत सुरु होण्याची शक्यता आहे.
स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 16 कोच असणार आहेत. त्यात दोन कोच विमानच्या धर्तीवर असणार आहे. त्या कोचमधून किती वजन घेऊन जात येईल, हे निश्चित असणार आहे. वंदे भारत स्लीपरमध्ये 11 एसी टियर असून त्यात 611 सीटे असणार आहेत. 4 एसी टियर-2 मध्ये 188 बर्थ असतील. एक फर्स्ट एसी असणार असून त्यात 24 बर्थ असणार आहेत. एकूण 823 सीट या ट्रेनमध्ये असणार आहेत.

‘जगह दिखाओ’ अभियान; एसटीला मराठी भाषेचे वावडे?

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि “अक्षरा केंद्र” या स्वयंसेवी संस्थेने मिळून सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी महिलांच्या लैगिक छळाच्या विरोधात जनजागृती मोहीम सुरु केलेल्या माहिती शुक्रवारी समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आली. मात्र या मोहिमेस देण्यात आलेल्या ‘जगह दिखाओ’ या नावावरून मराठी भाषिक जनतेतून नाराजीचे स्वर ऐकू येताना दिसत आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ MSRTC हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या अखत्यारीत येते. त्यामुळे महामंडळाने जनतेशी संवाद साधताना मराठी भाषेला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. त्यामुळे अभियानाचे  माहितीपत्रक मराठीत असून अभियानाचे नाव हिंदीत का असा प्रश्न समोर येणे स्वाभाविकच आहे.
वाचकांचे विचार 
संयुक्त महाराष्ट्राची निर्मित एक भाषिक राज्य म्हणून झालेली असून मराठी भाषिक एकमेव राज्य आहे. राज्य परिवहन मंडळाची सेवा बहुतांश मराठी भाषिकांकडून वापरली जात असल्यामुळे व महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महामंडळाचे कामकाज संपूर्ण कामकाज मराठीतच होणे आवश्यक आहे. तरी, “जगह दिखाओ” अभियानाचे नाव शुद्ध मराठीतच करावे, ही विनंती.
–अक्षय म्हापदी,कळवा 

 

Mumbai Goa Highway | “माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही…” केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली

नागपूर: मुंबई गोवा हा महामार्ग इतके वर्ष बनू शकला नाही त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. मी त्यासाठी कोणालाही जबाबदार धरणार नाही, असं खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे. तसेच या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग बनवून पूर्ण होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरात एका वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ”मनातले गडकरी” या मुलाखतीत मुलाखतकार प्रसिध्द अभिनेता प्रशांत दामले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नितीन गडकरी बोलत होते.
“मुंबई गोवा मार्ग पहिले महाराष्ट्र सरकारला काम दिलं होतं. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. जागा हस्तांतरित करण्याच्या अजूनही येतात. त्यासाठी कोणाला जबाबदार धरत नाही. या रस्त्यासाठी मी 75 ते 80 म्हणजे सर्वात जास्त बैठका घेतल्या आहेत. तरी पण मला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यावर यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आत मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल. मी मुंबई ते दिल्ली 1380 किलोमीटरचा रस्ता जवळपास पूर्ण केला. पण माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता मी तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही. नागपुरात बाराशे कोटीचा मल्टी मॉडेल हब स्टेशन होतं ते एकदा मी रद्द केलं. पण आता ते स्टेशन रेल्वे बांधत असून 1200 कोटी लॉजिस्टिक कॅपिटल साठी भारत सरकारने दिले. भारतातील सर्वात मोठा लॉजिस्टिक पार्क तयार करत आहे वादाचे मुद्दे सोडवले भारतातील सगळ्यात मोठा प्रोजेक्ट बनवण्याचा ते स्वप्न आहे ते पूर्ण करेल,” असेही नितीन गडकरी म्हणाले.

विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

VIDEO : खाजगी बस चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ; बस चालवत असताना मोबाईलवर…….

नागपूर :समृद्धी महामार्गावर होत असलेले जीवघेणे अपघात खूपच चर्चेचा विषय बनला आहे. शासनाने महामार्गावरील प्रवासी वाहने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कसोट्यांच्या पूर्तता केल्या नसल्याने हे अपघात होत असल्याचे आरोपही होत आहेत. मात्र अशातच एका खाजगी बस ड्रायव्हरचा धक्कादायक विडिओ समोर आला असल्याने येथे होणाऱ्या अपघातास चालकांचा निष्काळजीपणा  कसा जबाबदार आहे हे सुद्धा दिसून आले आहे.
एका प्रवाशाने हा विडिओ व्हायरल केला आहे. गाडी वारंवार रस्ता सोडत असल्याने त्याला संशय आल्याने तो चालकाच्या केबिनजवळ गेला. तेथील प्रकार पाहून त्याला धक्काच बसला. बस चालकाने बस स्टिअरिंग च्या खाली आपला मोबाईल ठेवून त्यावर एक  चित्रपट चालू ठेवला होता. बस चालवता चालवता तो वारंवार मोबाईल कडे पाहत होता. १०/१० सेकंड मान खाली घालत होता.  
प्रवाशांनी सांगूनसुद्धा त्याने आपले वर्तन बदलेले नाही..केवळ नशीब बलवत्तर म्हणून कोणती दुर्घटना न होता आम्ही सुखरूप अंतिम स्थानकावर पोहोचलो असे त्या प्रवाशाने ट्विट केलेल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

 

मुंबई ते बांदा शयनयान प्रवास फक्त ५ रुपयांत; रेल्वेने वाऱ्यावर सोडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचा दिलासा

मुंबई :एसटीची शयनयान Sleeper बस सेवा राज्यात सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा या सेवेची सुरवात झाली असून पहिली बस सेवा मुंबई ते बांदा अशी सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे आणि ईतर खाजगी बस प्रमाणे लांब पल्ल्याच्या आरामदायी प्रवासासाठी ही सेवा निश्चितच उपयोगी ठरणार आहे. मात्र या सेवेचा विशेष लाभ ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे.
याचे कारण असे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने MSRTC या बस साठी ईतर बस प्रमाणे देण्यात येणार्‍या सवलती या बस दिल्या आहेत. त्यात महिलांना अर्धे तिकीट आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत या महत्त्वाच्या सवलतींचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांना कुठल्याही स्थानका दरम्यान च्या प्रवासासाठी फक्त 5 रुपये एवढे आरक्षण शुल्क भरून प्रवास करता येणार आहे.
आरोग्याच्या समस्या असल्याने दहा ते बारा तास बसुन प्रवास करणे हे अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायक आणि गैरसोयीचे होते. सध्या रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकिट दरांमध्ये असलेल्या सवलती कोरोना काळापासून बंद केल्या आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरामदायक आणि मोफत असलेला पर्याय एसटीने उपलब्ध करून दिला आहे. याचा फायदा राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना नक्किच होईल.

”तेथे सभा घेतलीही असती. परंतु…” शिवाजी पार्कवर सभा न घेण्याबद्दल नेमके काय बोलले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? येथे वाचा..

मुंबई : शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार याबाबत दोन्ही बाजूने तुफान राडा चालू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर सभा घेणार नाही असे जाहीर करून या विषयाला पूर्णविराम लावला. आपण माघार का घेतली याबाबत त्यांनी समाज माध्यमातून स्पष्टीकरणही दिले.

या स्पष्टीकरणात ते म्हणाले

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही.

बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले #शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती.

बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल.

कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार”

राज्यातील मुलींना १ लाख १ हजार रुपये लाभ देणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेस मंत्रिमंडळाकडून मान्यता.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मंगळवारी  पार पडली. या बैठकीत मुलींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मार्च 2023 च्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची (Lek Ladki Yojana) घोषणा झाली होती, या योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या योजनेनुसार, मुलगी जन्माला आल्यापासून ते मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला आर्थिक मदत केली जाणार आहे. या योजनेनुसार, राज्यात मुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये देण्यात येणार आहेत. तर मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर मुलीला रोख 75 रुपये देण्यात येतील.
या ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना मिळणार आहे.  
अशी मिळणार मुलींना आर्थिक मदत
मुलगी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये
मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये
मुलगी सहावीत गेल्यावर 7,000 रुपये
मुलगी अकरावीत गेल्यावर 8,000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये 
अशा रितीने मुलीला एकूण 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ राज्य सरकारकडून मिळणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी मनसेची संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर; वाचा तुमच्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढविणार…

मुंबई :सर्व राजकीय पक्षांनी येत्या 2024 लोकसभा निवडणुकी साठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना  लोकसभा निवडणुकीत लढवणार हे निश्चित झाले आहे, मनसे खाली नमूद केलेल्या लोकसभा क्षेत्रात सध्या चाचपणी करत असून त्यातील पाहिले संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

ही यादी खालील प्रमाणे 

  • कल्याण लोकसभा – श्री राजू पाटील
  • ठाणे लोकसभा – श्री अभिजित पानसे/ श्री अविनाश जाधव
  • पुणे लोकसभा – श्री वसंतराव मोरे
  • उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- सौ.शालिनीताई ठाकरे
  • दक्षिण मुंबई लोकसभा- श्री बाळा नांदगावकर
  • संभाजी नगर लोकसभा – प्रकाश महाजन
  • सोलापूर लोकसभा – दिलीप धोत्रे
  • चंद्रपूर लोकसभा – श्री राजू उंबरकर
  • रायगड लोकसभा – वैभव खेडेकर

ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेच्या तिकीट दरातील सवलत पुन्हा सुरु करावी; दीपक केसरकरांचे रेल्वे राज्यमंत्र्यांना साकडे

मुंबई : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची रामटेक या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी केसरकर यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे तिकीट दरात असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी. तसेच महालक्ष्मी आणि हरिप्रिया एक्सप्रेसचे जुने डबे बदलून मिळावेत, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्याकडे पत्राद्वारे केली.
मंत्री केसरकर म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक हे सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देतात. त्यांना रेल्वे प्रवासात यापूर्वी लागू असलेली सवलत पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याकडे केली आहे. यामुळे त्यांच्यावरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच त्यांना सुरक्षित आणि सुखद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर येथे तिरूपती तसेच मुंबई येथून अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. यासाठी उपलब्ध असलेल्या हरिप्रिया तसेच महालक्ष्मी एक्सप्रेसचे डबे जुने आणि गैरसोयीचे झाले असल्याने ते बदलून मिळण्याबाबत भाविक आणि प्रवाशांकडून विनंती करण्यात येत आहे. हे डबे बदलून नवीन डबे मिळाल्यास प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुखद होऊ शकणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांना सांगितले.

पुण्यात गोवन दारूचा मोठा साठा जप्त; आरोपींमध्ये सिंधुदुर्गातील दोघेजण

पुणे: राज्य उत्पादन शुल्क पथक क्रमांक 1 ने आज पुण्यातील कात्रज परिसरात एका लक्झरी बसमधून गोव्याच्या  दारूचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 42,90,000 रुपये आहे. या कारवाईत अवैध धंद्यात गुंतलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला अवैध धंद्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक एस.एल. पाटील यांच्या पथकाने जुना पुणे-सातारा रोडवरील कात्रज परिसरात गस्त घालत असताना भारत पेट्रोल पंपासमोर सहा चाकी लक्झरी बस अडवल्या.
तपासणी केल्यावर, त्यांना बॅगपायपर क्लासिक व्हिस्कीच्या 180 सील न केलेल्या बाटल्या (15 बॉक्स) सापडल्या, हा ब्रँड महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे परंतु गोव्यात कायदेशीर आहे. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 42,90,000 रुपये आहे.
गणेश बाळकृष्ण चव्हाण (वय 50, रा. सिंधुदुर्ग), अक्षय अनंत जाधव (वय 32, रा. नालासोपारा पश्चिम) आणि उमेश सीताराम चव्हाण (वय 37 रा . सिंधुदुर्ग) तिघांनाही ताब्यात घेण्यात आले

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search