


मुंबई :एप्रिल 2022 पासून पुढील 9 महिन्यात राज्यातील मद्य विक्रीत कमालीची वाढ झाली आहे. खासकरून विदेशी मद्य विक्रीत वाढ झाली आहे. ह्या विक्री वाढीमुळे सरकारच्या महसुलात 30% वाढ झाली आहे. मद्यविक्रीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विदेशी मद्यावर कमी करण्यात आलेले उत्पादन शुल्क, तसेच अन्य उपाययोजनांनंतर ही वाढ दिसून आली आहे. तळीरामांनी मागील नऊ महिन्यांत रिचविलेल्या मद्यामुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार ४८० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
(Also Read >उर्फी जावेद रुपी स्त्री देहाचा बाजार रोखा…..चित्रा वाघ यांचे आयुक्तांना पत्र)
कोरोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने, मद्य विक्रीमध्येही जोमाने वाढ झाली आहे. मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या महिन्यात ३५ कोटी लीटर देशी मद्य विक्री झाली होती. यंदा याच कालावधीत ही विक्री ३४.५ कोटी लीटरवर पोहोचली आहे. तर विदेशी मद्य १७.५ कोटी लीटर विकले गेले होते, यंदा नऊ महिन्यांत २३.५ कोटी लीटर विदेशी मद्याची विक्री झाली आहे.

रत्नागिरी: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळतर्फे (MIDC) रत्नागिरी येथे २ औद्योगिक क्षेत्रांकरिता उपलब्ध भूखंड वाटप केले जाणार आहे. हे वाटप “जसे आहे तसे व जेथे आहे तेथे” ह्या तत्वावर (सामान्य/अ.जा./अ.ज. ह्या प्रवगासाठी राखीव) ऑनलाईन सरळ पद्धतीने केले जाणार आहे. त्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०४/०१/२०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
खालील औद्योगिक क्षेत्राकरिता अर्ज मागवले आहेत.
| औद्योगिक क्षेत्र | वाटपास उपलब्ध क्षेत्र (हे. आर) |
भूखंडाची संख्या |
| अतिरिक्त लोटे परशुराम | 10.24 | 12 |
| अडाळी | 32.02 | 210 |
वाटप केल्या जाणाऱ्या भूखंडाचे दर,क्षेत्र आणि इतर माहितीसाठी खालील पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.
(Also Read>कचरा गोळा करण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचे ‘ई’ पाउल.)
अर्ज करण्यासाठी आणि इतर सविस्तर माहितीकरिता https://www.midcindia.org ह्या संकेतस्थळास भेट द्यावी
Follow us on
कोकणाच्या समृद्धीसाठी 'मुंबई-गोवा महामार्ग' सुस्थितीत आणायलाच हवा ह्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis ह्यांच्याशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय मंत्री @nitin_gadkari ह्यांच्याशी आज चर्चा केली. लवकरच रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून कामाच्या सद्यस्थितीबाबत माहिती मिळेल. pic.twitter.com/uQ8PjmaOK9
— Raj Thackeray (@RajThackeray) December 20, 2022
Vision Abroad
ग्रामपंचायत निवडणूक २०२२ – संपूर्ण महाराष्ट्र – पक्षनिहाय
| पक्ष | ग्रामपंचायती | सरपंच |
|---|---|---|
| भाजप | 2241 | 1987 |
| शिंदे गट | 772 | 709 |
| ठाकरे गट | 668 | 571 |
| राष्ट्रवादी | 1512 | 1263 |
| काँग्रेस | 1038 | 796 |
| इतर | 1255 | 989 |
माविआ : 2715
शिंदे-भाजप : 2795
इतर : 1135
कोकणातील स्थिती
पक्षनिहाय ग्रामपंचायती
| पक्ष | रत्नागिरी | सिंधुदुर्ग | रायगड | पालघर | ठाणे |
|---|---|---|---|---|---|
| भाजप | 17 | 182 | 18 | 11 | 13 |
| शिंदे गट | 45 | 24 | 79 | 02 | 14 |
| ठाकरे गट | 101 | 74 | 38 | 07 | 4 |
| राष्ट्रवादी | 08 | 02 | 45 | 04 | 0 |
| काँग्रेस | 03 | 01 | 03 | 00 | 0 |
| इतर | 47 | 21 | 57 | 39 | 4 |

Grampanchayat Election 2022 : जास्तीत जास्त मतदारांनी या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान करावे यासाठी १८ डिसेंबरला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ज्या खाजगी आस्थापनांना आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देणं शक्य नसेल त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना किमान २ तासांची सवलत द्यावी असे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच मतदानासाठी कर्मचाऱ्यांना सवलत न देणाऱ्या दुकाने, कार्यालयांवर कारवाई केली जाणार असल्याचही या आदेशात म्हटलं गेलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा आणि कामगार विभागाने हे आदेश जारी केले आहेत.
नक्की काय आहे हा आदेश
1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
2) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल (उदा. खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाटयगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ.)
Follow us on3) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.
4) वर नमूद केल्यानुसार उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईल.

कालनिर्णय 2023च्या आवृत्तीमध्ये 16 जानेवारी रोजी असणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिनाचा उल्लेख करण्याचे राहून गेले आहे. या पुढील कालनिर्णयच्या उर्वरित सर्व प्रतींमध्ये तसेच या पुढील सर्व आवृत्त्यांमध्ये हा उल्लेख केला जाईल.धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आम्हाला अतीव आदर आहे. छत्रपती संभाजी महाराजप्रेमींच्या भावना अनवधानाने दुखावल्या गेल्या असल्यास आम्ही मनापासून दिलगीर आहोत.
— Kalnirnay (@Kalnirnay) December 15, 2022

पुणे : आज सरकारकडून (Maharashtra Government) राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काही अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे. या बदलीच्या यादीत विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) सदानंद दाते (Sadanand Date) यांचीहा समावेश आहे.
खालील अधिकाऱ्यांची बदली/पदोन्नती करण्यात आलेली आहे.
विश्वास नांगरे पाटील
विश्वास नांगरे पाटील यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील हे आतापर्यंत मुंबई सहपोलीस आयुक्त पदावर होते.
सदानंद दाते
मिरा भाईंदरचे पोलीस आयुक्त असलेले सदानंद दाते यांची बदली ही राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाच्या (Anti-Terrorism Squad) अप्पर पोलीस महासंचालकपदी करण्यात आली आहे.
अमिताभ गुप्ता
अमिताभ गुप्तांची पुणे आयुक्तपदावरून बदली झालीय. ते आता अमिताभ गुप्ता कायदा सुव्यवस्थेचे अप्पर पोलीस महासंचालक असणार आहेत.
तर खालील शहराच्या पोलीस आयुक्तपदी नवीन नावाची वर्णी लागली आहे.
रितेश कुमार – पुणे
विनय कुमार चौबे – पिंपरी-चिंचवड
मिलिंद भारंबे – नवी मुंबई
अमरावती – आरती सिंह

Follow us on
मुंबई : येणार्या १ जानेवारीपासून राज्यातील सर्व सेवा ऑनलाइन स्वरूपात देण्याची शासकीय विभागांना सक्ती करण्यात आली आहे. सर्व विभागांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. नागरिकांना पारदर्शक, वेळेत आणि कार्यक्षम पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे पाउल उचलले आहे. सर्व विभागांना मुख्य सचिवांनी तसे आदेश दिले आहेत. यानुसार महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. तर उर्वरित विभागांना या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. या निर्णयाने राज्यातील नागरिकांची सरकारी दप्तरदिरंगाईतून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या ऑनलाइन तसेच ऑफलाइन स्वरूपात प्रशासनाकडून सेवा दिली जाते.यानुसार महसूल विभागानेही आपल्या सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश दिले आहेत. तर उर्वरित विभागांना या आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे.
Also Read :ग्रामपंचायत निवडणूक -२०२२! उमेदवार आणि मतदार यांना माहिती असाव्यात अशा महत्वाच्या काही गोष्टी.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी या कायद्याखाली अधिसूचित केलेल्या सर्व सेवा १ जानेवारी २०२३ पासून शंभर टक्के ऑनलाइन स्वरूपात केल्या जाणार आहेत. कोणतेही कारण सांगून कोणतीही सेवा शासकीय कर्मचाऱ्यांना यापुढे ऑफलाइन देता येणार नाही. ज्या सेवा ऑनलाइन स्वरूपात देता येणार नाहीत त्याची स्पष्टीकरणासह उत्तरे ३१ डिसेंबपर्यंत द्यावी लागणार आहेत.
Als Read :….तर दोडामार्ग तालुका भविष्यात गोवा राज्याचा भाग असेल!!!!
ह्या सेवा उपलब्ध..
जन्म-मृत्यूचा दाखला, नळ, वीजजोडणी, जात प्रमाणपत्र, विविध प्रकारच्या परवानग्या, मंजुरी आदींसह विविध प्रकारच्या ५०६ सेवा कालबद्ध पद्धतीने नागरिकांना देणे प्रशासनास बंधनकारक आहे. विविध विभागांच्या अधिसूचित ५०६ सेवांपैकी ४०० सेवा ऑनलाइन स्वरूपात सध्या देण्यात येतात. उरलेल्या १०६ सेवा ऑफलाइन पद्धतीने देण्यात येतात. या सेवा ‘आपले सरकार पोर्टल’, सेवा अधिकारांसाठी तयार करण्यात आलेले मोबाइल अॅप याद्वारे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर ‘आपले सरकार सेवा केंद्रा’च्या ३५ हजार केंद्रांतून या सेवा राज्यभर ऑनलाइन पद्धतीने दिल्या जातात.
Also Read :मराठी अभिनेता अभिजीत केळकरची मुंबई-गोवा महामार्गाविषयी संतप्त पोस्ट! तो म्हणाला आमचं कोकण….

Content Protected! Please Share it instead.