आजचे पंचांग
- तिथि-प्रथम – 12:12:13 पर्यंत
- नक्षत्र-धनिष्ठा – 13:53:34 पर्यंत
- करण-कौलव – 12:12:13 पर्यंत, तैतुल – 23:26:29 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शोभन – 24:02:19 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:21
- सूर्यास्त- 19:07
- चन्द्र-राशि-कुंभ
- चंद्रोदय- 20:03:59
- चंद्रास्त- 07:00:59
- ऋतु- वर्षा
[spacer height=”20px”]
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिवस
- जागतिक सिंह दिन
महत्त्वाच्या घटना :
- 1519 : फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेऊन पृथ्वी प्रदक्षिणाला निघाले.
- 1675 : चार्ल्स (द्वितीय) यांनी ग्रीनविच येथे जगप्रसिद्ध जगप्रसिद्ध वेधशाळा रॉयल ऑब्झर्व्हेटरीची पायाभरणी केली.
- 1809 : इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य घोषित केले.
- 1810 : स्मिथसोनियन संस्थेची स्थापना झाली.
- 1821 : मिसूरी अमेरिकेचे 24 वे राज्य बनले.
- 1988 : राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान बेकायदेशीरपणे कैदेत ठेवलेल्या किंवा निर्वासित केलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना प्रत्येकी $20,000 नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.
- 1990 : मॅगेलन अंतराळयान शुक्रावर पोहोचले.
- 1999 : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने औषध दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या औषधांमध्ये प्राण्यांच्या घटकांचा उल्लेख करणे बंधनकारक असल्याचा निर्णय दिला.
- 1999 : इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार, डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1755 : ‘नारायणराव पेशवा’ – 5 वा पेशवा यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1773)
- 1810 : ‘कॅमिलो बेन्सो’ – इटलीचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 6 जून 1861)
- 1814 : ‘हेनरी नेस्ले’ – नेस्ले कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 जुलै 1890)
- 1855 : ‘उस्ताद अल्लादियाँ खाँ’ – जयपूर, अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 16 मार्च 1946)
- 1860 : ‘पं. विष्णू नारायण भातखंडे’ – संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 19 सप्टेंबर 1936)
- 1874 : ‘हर्बर्ट हूव्हर’ – अमेरिकेचे 31 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑक्टोबर 1964)
- 1889 : ‘चार्ल्स डॅरो’ – मोनोपोली खेळाचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 28 ऑगस्ट 1968)
- 1894 : ‘व्ही. व्ही. गिरी’ – भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 23 जून 1980)
- 1902 : ‘नॉर्मा शिअरर’ – कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 12 जून 1983)
- 1913 : ‘डॉ. अमृत माधव घाटगे’ – संस्कृत व प्राकृत विद्वान यांचा जन्म. (मृत्यू : 8 मे 2003)
- 1933 : ‘किथ डकवर्थ’ – कोसवर्थ कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 18 डिसेंबर 2005)
- 1956 : ‘पेरीन वॉर्सी’ – भारतीय-इंग्रजी उद्योगपती यांचा जन्म.
- 1960 : ‘देवांग मेहता’ – भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज चे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 12 जुलै 2001)
- 1963 : ‘फुलन देवी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 जुलै 2001)
- 1979 : ‘दिनुशा फर्नान्डो’ – श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1945 : ‘रॉबर्ट गॉडार्ड’ – अमेरिकन रॉकेटतज्ञ.
- 1950 : ‘खेमचंद प्रकाश’ – संगीतकार यांचे निधन. (जन्म : 12 डिसेंबर 1907)
- 1982 : ‘एम. के. वैणू बाप्पा’ – भारतीय खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 10 एप्रिल 1927)
- 1986 : ‘अरुणकुमार वैद्य’ – महावीरचक्र प्राप्त जनरल यांचे निधन (जन्म : 27 जानेवारी 1926)
- 1992 : ‘शंकरराव पांडुरंगराव थोरात’ – कीर्तिचक्र, पद्मश्री लेफ्टनंट जनरल यांचे निधन. (जन्म : 12 ऑगस्ट1906)
- 1997 : ‘नारायण पेडणेकर’ – कवी व नाट्यसमीक्षक यांचे निधन.
- 1999 : ‘आचार्य बलदेव उपाध्याय’ – भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक यांचे निधन. (जन्म : 10 ऑक्टोबर 1899)
- 2012 : ‘सुरेश दलाल’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1932)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.