Author Archives: Kokanai Digital

२९ जून पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 09:17:20 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 06:35:27 पर्यंत
  • करण-विष्टि – 09:17:20 पर्यंत, भाव – 21:15:50 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वज्र – 17:58:36 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:06
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-कर्क – 06:35:27 पर्यंत
  • चंद्रोदय- 09:43:59
  • चंद्रास्त- 22:45:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय उष्णकटिबंधीय दिवस
  • आंतरराष्ट्रीय चिखल दिवस
  • आंतरराष्ट्रीय मच्छिमार दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1871 : ब्रिटिश संसदेने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा संमत केला.
  • 1974 : इसाबेल पेरिन यांनी अर्जेंटिनाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
  • 1975 : स्टीव्ह वोझ्नियाकने ऍपल -1 संगणकाच्या पहिल्या प्रोटोटाइपची चाचणी केली.
  • 1952 : पहिली मिस युनिव्हर्स स्पर्धा झाली आणि फिनलंडच्या आर्मी कुसेलाने विजेतेपद पटकावले.
  • 1976 : सेशेल्सला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1986: अर्जेंटिनाने 1986 चा फुटबॉल विश्वचषक जिंकला.
  • 2001 : ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना एम. पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
  • 2001 : पं.हृदयनाथ मंगेशकर यांना नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
  • 2007 : ऍपलने आपला पहिला मोबाईल फोन आयफोन जारी केला.
  • 2018 : मध्य प्रदेशला प्रधान मंत्री सुरक्षा मातृत्व अभियानांतर्गत माता मृत्यू दर कमी करण्यासाठी पुरस्कृत करण्यात आले.
  • 2022 : उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री यांनी मुख्यामंत्री पदाचा राजीनामा दिला.
  • 2024 : भारतीय संघाने टी20 विश्वकप जिंकला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1793 : ‘जोसेफ रोसेल’ – प्रोपेलर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1857)
  • 1864 : ‘आशुतोष मुखर्जी’ – शिक्षणतज्ज्ञ व वकिल यांचा जन्म.
  • 1871 : ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर’ – मराठी नाटककार, विनोदकार यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1934)
  • 1893 : ‘प्रसंत चंद्र महालनोबिस’ – भारतीय संख्याशास्त्राचे जनक, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्युट चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 28 जून 1972)
  • 1908 : ‘प्रतापसिंग गायकवाड’ – बडोद्याचे महाराज यांचा जन्म. (मृत्यू: 19 जुलै 1968)
  • 1934 : ‘कमलाकर सारंग’ – रंगकर्मी, निर्माते, दिग्दर्शक आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 25 सप्टेंबर 1998)
  • 1936 : ‘बुद्धदेव गुहा’ – बंगाली भाषेतील प्रसिद्ध कथाकार यांचा जन्म.
  • 1945 : ‘चंद्रिका कुमारतुंगा’ – श्रीलंकेच्या 5व्या राष्ट्राध्यक्षा यांचा जन्म.
  • 1946 : ‘अर्नेस्टोपेरेझ बॅलादारेस’ – पनामाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1956 : ‘पेद्रोसंताना लोपेस’ – पोर्तुगालचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1975 : उपासना सिंग – भारतीय अभिनेत्री आणि स्टँड-अप कॉमेडियन यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1873 : ‘मायकेल मधुसूदन दत्त’ – बंगाली कवी यांचे निधन. (जन्म: 25 जानेवारी 1824)
  • 1895 : ‘थॉमस हक्सले’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ, विज्ञानकथालेखक यांचे निधन. (जन्म: 4 मे 1825)
  • 1966 : ‘दामोदर धर्मानंद कोसंबी’ – गणितज्ञ, विचारवंत आणि इतिहासकार यांचे निधन. (जन्म: 31 जुलै 1907)
  • 1981 : ‘दि.बा. मोकाशी’ – मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1915)
  • 1992 : ‘मोहंमद बुदियाफ’ – अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
  • 1992 : ‘शिवाजीराव भावे’ – सर्वोदयी कार्यकर्ते यांचे निधन.
  • 1993 : ‘विष्णुपंत जोग’ – चिमणराव-गुंड्याभाऊ मधील गुंड्याभाऊची भूमिका अमर करणारे गायक आणि अभिनेते यांचे निधन.
  • 2000 : ‘कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर’ – ऐतिहासिक कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 18 फेब्रुवारी 1911)
  • 2003 : ‘कॅथरिन हेपबर्न’ – हॉलिवूड अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 12 मे 1907)
  • 2010 : ‘प्रा. शिवाजीराव भोसले’ – विचारवंत, वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांचे निधन. (जन्म: 15 जुलै 1927)
  • 2011 : ‘के. डी. सेठना’ – भारतीय कवि आणि विद्वान लेखक यांचे निधन.(जन्म: 26 नोव्हेंबर 1904)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना १ कोटीचे विमा संरक्षण मिळणे गरजेचे

   Follow us on        

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या दीड दशकाहून अधिक काळ सुरु आहे. पळस्पे – इंदापूर विभाग, चिपळूण – आरवली – संगमेश्वर – हातखंबा अशा कित्येक भागातील रास्ता गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्थेत आहे. इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण रस्त्यांचे, पळस्पे – इंदापूर पट्ट्यातील पूल, लोणेरे पूल, चिपळूण पूल अशा कित्येक ठिकाणी कामच अद्याप सुरु न झाल्यामुळे तेथे कित्येक तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. पेण, नागोठणे, सुकेळी येथील रस्त्यांची चाळण झाली आहे. ते टाळण्यासाठी प्रवासी पर्यायी मार्गांचा अवलंब करतात. त्यामुळे काहीही केले तरी वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय होतोच.

काही पर्यायी मार्ग अरुंद असल्यामुळे तेथेही वाहतूक कोंडी होऊन वाहने घासून नुकसान होते. तर मुख्य मार्गावर काही भागांत चांगला रस्ता असला तरी अचानक मध्ये खड्डे येतात. काही ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नसल्यामुळे चिखल मातीतून वाहनचालकांना गाडी हाकावी लागते. या सर्वांत गाडी आपटून टायर फुटणे, गाडीचे काही महत्वाचे भाग तुटणे, गाडी रस्त्यात बंद पडणे असे प्रकार हमखास घडतात. यामुळे सर्वांना या मार्गावरून प्रवास करून झाल्यावर गाडीच्या देखभाल दुरुस्तीचा मोठा खर्च सहन करावा लागतो. तसेच, गेल्या काही वर्षांत हजारो नागरिकांना अपघाती मरण आले तर काहींना कायमचे अपंगत्व आहे. एकूणच, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य व जीवघेणे आव्हान आहे. मुळात या मार्गाला राष्ट्रीय महामार्ग न म्हणता महाराष्ट्रातील दुर्लक्षित व भारतातील सर्वाधिक काळ रखडलेला महामार्ग म्हणून घोषित केले पाहिजे.

ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गांसारख्या चांगल्या व सुस्थितीत असलेल्या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांकडून टोल घेतला जातो त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ मुंबई गोवा मार्गावरून (पळस्पे ते इंदापूर व पुढे इंदापूर ते पत्रादेवी मार्गावरून) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीची नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक फेरीला काही विशिष्ट रक्कम द्यावी (टोल द्यावा). तसेच, अपघात होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे सर्व प्रवाशांना अपघात झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी किमान ५० लाखांचा व मृत्यू झाल्यास किमान १ कोटी रुपयांचा विमा उपलब्ध करून द्यावा व त्याचा खर्चही शासनाने करावा. अशी मागणी कोकण विकास समितीने निवेदनाद्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे.

वाहनांची नोंदणी करण्यासाठी महामार्गाचे काम पूर्ण होण्याआधीच बांधून तयार असलेल्या टोल नाक्यांचा उपयोग करता येईल असेही त्यांनी या निवेदनात सुचवले आहे.

२८ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 09:56:50 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 06:36:55 पर्यंत
  • करण-गर – 09:56:50 पर्यंत, वणिज – 21:31:04 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-हर्शण – 19:15:22 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:06
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 08:46:00
  • चंद्रास्त- 22:06:00
  • ऋतु- वर्षा

महत्त्वाच्या घटना :

  • 1778 : अमेरिकन क्रांती मधील मॉनमाउथची लढाई झाली.
  • 1838 : इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक झाला.
  • 1846 : अ‍ॅडॉल्फ सॅक्स यांनी सॅक्सोफोन या वाद्याचे पेटंट घेतले.
  • 1911 : ‘नखला’ मंगळ ग्रहाची उल्का पृथ्वीवर इजिप्त देशामध्ये पडली.
  • 1914 : पहिले महायुद्ध – ऑस्ट्रियाचा आर्कड्यूक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी, डचेस ऑफ होहेनबर्ग यांची हत्या झाली. या घटनेमुळे पहिले महायुद्ध सुरू झाले.
  • 1926 : गॉटलीब डेमलर आणि कार्ल बेंझ यांनी त्यांच्या दोन कंपन्यांचे विलीनीकरण करून मर्सिडीज-बेंझची स्थापना केली.
  • 1972 : दुसऱ्या भारत-पाक युद्धानंतर सिमला परिषद सुरू झाली.
  • 1978 : यूएस सुप्रीम कोर्टाने कॉलेज प्रवेशांमध्ये आरक्षण बेकायदेशीर ठरवले.
  • 1994 : रशियाच्या ओलेम सेलेन्कोने फिफा विश्वचषक स्पर्धेत कॅमेरूनविरुद्ध पाच गोल केले.
  • 1997 : बॉक्सिंग सामन्यादरम्यान इव्हेंडर होलीफिल्डचा कान चावल्याबद्दल माईक टायसनला निलंबित करण्यात आले आणि होलीफिल्डला विजेता घोषित करण्यात आले.
  • 1998 : संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्कांच्या सार्वत्रिक जाहीरनाम्याची पन्नास वर्षे पूर्ण झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1491 : ‘हेन्‍री (आठवा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 28 जानेवारी 1547)
  • 1712 : ‘रुसो’ – फ्रेंच विचारवंत, लेखक संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 1778)
  • 1921 : ‘नरसिम्हा राव’ – भारताचे 9वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2004)
  • 1928 : ‘बाबूराव सडवेलकर’ – चित्रकार, महाराष्ट्राचे कला संचालक यांचा जन्म. (मृत्यू: 23 नोव्हेंबर 2000)
  • 1931 : ‘मुल्लापुडी वेंकट रमना’ – तेलगू भाषेतील त्यांच्या कार्यासाठी प्रसिद्ध असलेले भारतीय लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 24 फेब्रुवारी 2011)
  • 1934 : ‘रॉय गिलख्रिस्ट’ – कसोटी क्रिकेटमधील भेदक वेगवान गोलंदाज यांचा जन्म. (मृत्यू: 18 जुलै 2001)
  • 1937 : ‘डॉ.गंगाधर पानतावणे’ – साहित्यिक समीक्षक, दलित साहित्य दलित चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श या त्रैमासिकाचे ते संस्थापक संपादक यांचा जन्म.
  • 1970 : ‘मुश्ताक अहमद’ – पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1973 : ‘विशाल ददलानी’ – भारतीय गायक, गीतकार, अभिनेता आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1995 : ‘मरियप्पन थान्गावेलु’ – रिओ दि जानेरो येथे झालेल्या 2016 उन्हाळी पॅरालिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक, दक्षिण भारतीय उंच उडी मारणारे, यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1836 : ‘जेम्स मॅडिसन’ – अमेरिकेचे चौथे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 16 मार्च 1751)
  • 1972 : ‘प्रशांतचंद्र महालनोबीस’ – प्रसिध्द भारतीय संख्याशास्रज्ञ तसेच इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 29 जून 1893)
  • 1987 : ‘पं. गजाननबुवा जोशी’ – व्हायोलियनवादक, गायक, संगीतज्ञ यांचे निधन. (जन्म: 30 जानेवारी 1911)
  • 1990 : ‘प्रा. भालचंद खांडेकर’ – कवी यांचे निधन.
  • 1999 : ‘रामभाऊ निसळ’ – स्वातंत्र्य सैनिकांचे नेते झुंजार पत्रकार यांचे निधन.
  • 2000 : ‘विष्णू महेश्वर जोग’ – उद्योजक यांचे निधन. (जन्म: 6 एप्रिल 1927)
  • 2006 : ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले’ – संत साहित्यकार, समीक्षक, वक्ते यांचे निधन.
  • 2009 : ‘ए. के. लोहितदास’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचे निधन. (जन्म: 6 मे 1955)
  • 2022 : ‘पल्लोनजी शापूरजी मिस्त्री’ – शापूरजी पालोनजी समूहाचे अध्यक्ष आणि टाटा समूहाचे प्रमुख भागधारक यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: गणेशभक्तांसाठी खुशखबर! तब्बल १५ स्लीपर कोच असलेल्या विशेष गाडीला मुदतवाढ; आरक्षण ‘या’ तारखेपासून सुरु होणार

   Follow us on         Konkan Railway: पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक २९ जून पासून सुरू होणार आहे.
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल दिनांक २८ सप्टेंबर पर्यंत उधना जंक्शन येथून दिनांक दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती  मंगळुरू जंक्शनला  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५  वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल ही गाडी दिनांक २९ डिसेंबरपर्यंत मंगळुरु जंक्शन येथून गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.गुरुवार आणि सोमवारी रात्री २२:१०  वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३ :०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, एसएलआर – 02.

Amboli: धक्कादायक! वर्षा पर्यटनासाठी आलेला पर्यटक ३०० फूट दरीत पडला; शोधमोहीम सुरु

   Follow us on        

सिंधुदुर्ग : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या आंबोली घाटाजवळील कावळेसाद पॉईंटवर वर्षा पर्यटनासाठी आलेला कोल्हापूर येथील युवक खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी हा युवक गेला असता, पाय घसरून पडल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरीत पडलेल्या युवकाचा शोध घेतला जात आहे. वाऱ्यांच्या वेगामुळे उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्यापाशी हा युवक कोसळल्याची माहिती आहे.
कोल्हापूरमधून मित्राचा ग्रुप वर्षा पर्यटनासाठी कोकणात आला होता. त्यावेळी, आंबोली घाटाता या पर्यटकांनी आपला गाडी थांबवून निसर्स सौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, दुर्दैवाने यावेळी एक युवका रोलिंगच्या पलिकडे जाऊन दरीत कोसळल्याची दु:खद घटना घडली. त्यानंतर, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून या युवकाच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांची चौकशी करण्यात येत आहे. युवक नेमकं दरीत कोसळला कसा याबाबत माहिती घेतली जात आहे, पण रोलिंग पलिकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असता हा अपघात झाल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी दाट धुके आणि मोबाईल टॉवरला रेंज नसल्यामुळे मदतकार्य करताना पोलिसांना अडचणी येत आहेत.

जिल्हा परिषदेचे कर्मचारी राजेंद्र सनगर
राजेंद्र बाळासो सनगर (45 वर्षे) चिले कॉलनी, कोल्हापूर असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव आहे. ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. कोल्हापूर येथील सनगर हे त्यांच्या 14 सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंग जवळून असताना पाय घसरला आणि ते दरीत कोसळले. आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील ११ गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्याची गरज

   Follow us on        

Konkan Railway: २५ वर्षांपूर्वी कोकणात रेल्वे आली आणि कोकणवासीयांसाठी एक जलद, परवडणारा आणि सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला. सुरुवातीला प्रवासी संख्या कमी होती, त्यामुळे ज्या गाड्या या मार्गावर धावत होत्या त्या प्रवाशांच्या त्यावेळच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम होत्या. मात्र हळूहळू परिस्थिती बदलत गेली, गर्दी वाढत गेली आणि अधिक गाड्यांची मागणी होण्यास सुरवात झाली रेल्वे प्रशासनानेही गरज लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढवली. मात्र कोकण रेल्वे मार्गाचे एकेरीकरण आणि इतर मर्यादांमुळे त्यात अपेक्षित वाढ झाली नाही आहे. कोकण रेल्वे प्रशासनाच्या मते सध्या कोकण रेल्वे आपल्या पूर्ण क्षमतेने चालत असून आत गाड्यांमध्ये वाढ करणे शक्य नाही आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि विलीनीकरण या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच हे शक्य आहे.

कोकण रेल्वे प्रवाशी संघटनांनी याबाबत आवाज उठवल्यामुळे प्रशासनाने सुद्धा यात लक्ष घातले असून त्या दृष्टीने प्रयत्नही चालू झाले आहेत. रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करणे या गोष्टीला काही वर्षे जातील. मात्र तोपर्यंत रेल्वेकडे जी संसाधनाने आहेत त्याचा पूर्णपणे उपयोग करून रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा कसा होईल याकडे लक्ष देणे गरजचे आहे. दुर्दैवाने तसे होत नसल्याचे दिसत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर नियमित धावणाऱ्या काही गाड्या कमी क्षमतेने धावत आहेत. या गाडयांना डबे जोडून त्याची क्षमता वाढवणे शक्य आहे. मात्र रेल्वे प्रशासन रेकची आणि डब्यांची उपलब्धता नसणे, पिट लाईनची कमी लांबी अशी थातुर मातुर कारणे देऊन हे टाळत आहे. खरेतर काही बदल करून या गाड्या पूर्ण क्षमतेने चालविणे शक्य आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये सध्या मोठी गर्दी होत आहे. गर्दीमुळे आत शिरता न आल्याने दरवाजावरून तोल जाऊन प्रवासी खाली पडण्याच्या घटना देखील वाढू लागल्या आहेत. कधी कधी भीती वाटत आहे कि गर्दीमुळे मुंब्रा स्थानकावर घडलेल्या घटनेसारखा अपघात घडेल. अशा घटना घडल्यावर जागे न होता हे अपघात घडू न देणे यासाठी प्रयत्न करणे रेल्वे प्रशासनाकडून अपेक्षित आहे.

नवीन गाड्या येतील तेव्हा येतील. परंतु आताच कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दी, तुतारी, मंगळुरू सुपरफास्ट, रत्नागिरी दिवा, सावंतवाडी दिवा, मडगाव वांद्रे, पुणे एर्नाकुलम, तेजस २२ डब्यांनी आणि वंदे भारत २० डब्यांची चालवल्यास दिवसाला एका दिशेला किमान ४० डबे वाढवता येतील. एका डब्यात सरासरी ८० प्रवासी धरल्यास दिवसाला किमान ३००० प्रवासी जास्त नेता येऊ शकतील. ही संख्या दोन नवीन गाड्यांएवढी आहे. रेल्वे उपलब्ध साधनसंपत्तीचा अपव्यय करत आहे.

अक्षय महापदी
सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती

Pic credit – @akshaymahapadi

 

Sawantwadi Terminus: भूमीपूजन दगडाचा प्रतिकात्मक केक कापून अपूर्ण कामाचा वाढदिवस साजरा..

   Follow us on        

Sawantwadi: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज २७ जून रोजी १० वर्षे पूर्ण होऊन देखील ते अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर वाढदिवस साजरा केला. सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून हाताला काळ्या फिती बांधून साखर वाटत, भुमिपुजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध नोंदविण्यात आला.

सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले. मात्र, दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून, केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे प्रशासन, प्रवाशी यांना साखर वाटून गांधीगिरी मार्गान प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर म्हणाले, १० वर्ष प्रकल्प रखडलेला आहे. तिन्ही सार्वत्रिक निवडणूक एकाच पक्षाची सत्ता राज्यात आलेली आहेत. त्याच सरकारने भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प पूर्ण होत नसेल तरी ती क्षरमेची बाब आहे. सरकारला जाग आणण्यासाठी व अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे‌. केवळ रेल्वे मंत्री बदलले म्हणून प्रकल्प अर्धवट ठेवणं योग्य नाही. प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याच जाहीर करा असं आवाहन त्यांनी केलं‌. तर ज्या दगडावर नारळ फोडून भुमिपूजन केलं तो दगड केक स्वरूपात आम्ही कापून अर्धवट कामाचा निषेध केला. जन आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नसल्याने दगडी सरकारला हा दगड होता. त्यामुळे निदान आता तरी सरकारनं कोकणवासीयांना न्याय द्यावा. प्रवाशांची होणारी गैरसोय रोखावी असं मत सचिव मिहिर मठकर यांनी व्यक्त केले. तसेच गणेशोत्सवापूर्वी रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास आणून चाकरमान्यांचे होणारे हाल, अपेष्टा रोखाव्यात असे मत उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले. उपस्थित पोलिस, रेल्वे कर्मचारी, प्रवासी, रिक्षा चालक यांना साखर वाटून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, सल्लागार सुभाष शिरसाट, सल्लागार अँड सायली दुभाषी ,भूषण बांदिवडेकर,पांडुरंग राऊळ, सागर तळवडेकर,तेजस पोयेकर,पुंडलिक दळवी, अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, विनायक गांवस , नितिन गावडे, सिद्धार्थ निंबाळकर, मंगेश सावंत, चंद्रकांत राघो कोरगावकर, रवी सातवळेकर, पांडुरंग परब, नारायण मसुरकर, प्रमोद खानोलकर,विनायक राऊळ, लवू नाईक, एकनाथ नाटेकर, राजेंद्र वरडे , प्रकाश महादेव भाईंडकर , दिलीप कुलकर्णी, काका पांढरे, रिक्षा व्यावसायिक तसेचं रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Sangameshvar: अंत्रवली ग्रामपंचायत कार्यालयाला आश्वासनाचा विसर, पत्रकार संदेश जिमन यांच्या स्मरणपत्राने कार्यकारी मंडळाला येईल काय जाग?

   Follow us on        

गतवर्षी १२ जून २०२३ रोजी पत्रकार संदेश जिमन आणि वाडी ग्रामस्थ यांनी प्रशासनाला धारेवर धरत मागणी नसताना बांधण्यात आलेल्या मालपवाडी येथील साकवाचा मुद्दा उपस्थित केला. त्या साकवाला दोन्ही बाजूला चढणे उतरणे यासाठी योग्य ती सुविधा नसल्याने उपोषण करणार असे पत्र संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला दिले होते.

या पत्राची दखल घेत सरपंच महोदयांनी लेखी पत्र संदेश जिमन यांना दिले. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला असा की “३१ जानेवारी २०२४ पर्यंत साकवाच्या दोन्ही बाजूचे काम पूर्ण केले जाईल.” हे एक वेळकाढू आश्वासन ठरले. अद्याप ते काम पूर्ण न झाल्याने पत्रकार संदेश जिमन यांनी या समस्येकडे आपला मोर्चा पुन्हा वळवला आहे.

दिनांक २० जून २०२४ रोजी ग्रामपंचायत अंत्रवली येथे ग्रामसेवक महोदयांना स्मरणपत्र देऊन संदेश जिमन यांनी चांगली झाडाझडती घेतली. या पत्रात संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत अंत्रवली च्या कार्यकारी मंडळाला दिलेल्या आश्वासनाकडे डोळे झाक का केली? उपोषणाला विरोध करण्यासाठीच केवळ हा आश्वासनाचा बनाव होता काय?
असे प्रश्न विचारले आहेत.

ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने जर कर्तव्यदक्षतेने हा विषय मार्गी लावला असता तर स्थानिक ग्रामस्थांना आणि संदेश जिमन यांना हा खटाटोप करावा लागला नसता. केवळ मोठ्या पदांची लालसा बाळगणे पण प्रत्यक्षात त्या पदांचे महत्त्व ध्यानात न घेता कामात कुचराई करणे हे कितपत योग्य! कोणत्या दबावामुळे हे काम आजवर पुर्ण झाले नाही,याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी. प्रश्न निकाली काढावा. जर काहीच शक्य नसेल तर संदेश जिमन यांनी कायदेशीर मार्गाने जाण्यास ग्रामपंचायत कार्यालयाची काही हरकत नसल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने द्यावे असे पत्रात म्हटले आहे.

या विषयाचे गांभीर्य ध्यानात घेऊन संबंधित विभागाने चौकशी आदेश देऊन सत्यता पडताळणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. लाखोंचा निधी कोणाच्या भल्यासाठी? ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांसाठी की जनसामान्यांच्या हितासाठी?  ही अनागोंदी कोणाच्या आशिर्वादाने चालते? याला जबाबदार कोण? कारवाई झाली पाहिजे! ही ग्रामस्थांची मागणी आहे.

२७ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 11:22:17 पर्यंत
  • नक्षत्रपुनर्वसु – 07:23:13 पर्यंत
  • करण-कौलव – 11:22:17 पर्यंत, तैतिल – 22:34:08 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्याघात – 21:10:21 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:03:06
  • सूर्यास्त- 19:19:36
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 07:44:00
  • चंद्रास्त- 21:22:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :
  • औद्योगिक कामगार जागतिक दिन
  • सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराचे उद्योग दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1806 : ब्रिटिश सैन्याने अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स ताब्यात घेतली.
  • 1946 : कॅनडाच्या संसदेने कॅनडाच्या नागरिकत्व कायद्यामध्ये कॅनडाच्या नागरिकत्वाची व्याख्या केली.
  • 1950 : अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.
  • 1954 : मॉस्कोजवळील ओबनिंस्क येथे जगातील पहिले अणुऊर्जेवर चालणारे वीज केंद्र सुरू झाले.
  • 1967 : लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. वापरण्यास सुरुवात.
  • 1977 : जिबूतीला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1991 : युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
  • 1996 : अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.
  • 2002 : जी-8 देशांनी रशियाच्या अण्वस्त्रे नष्ट करण्याच्या योजनेला सहमती दिली.
  • 2004 : अमेरिका आणि युरोपियन युनियनने G.P.S. गॅलिलिओच्या विकासात सहकार्य करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली.
  • 2014 : भारतातील आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या पाइपलाइनचा स्फोट होऊन किमान चौदा जणांचा मृत्यू झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1462 : ‘लुई (बारावा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 1 जानेवारी 1515)
  • 1550 : ‘चार्ल्स (नववा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1574)
  • 1806 : ‘ऑगस्टस डी मॉर्गन’ – ब्रिटिश गणितज्ञ आणि तर्कशास्त्रज्ञ यांचा जन्म
  • 1864 : ‘शिवराम महादेव परांजपे’ – काळ या साप्ताहिकाचे संपादक याचं जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1929)
  • 1869 : ‘हॅन्स स्पेमन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1875 : ‘दत्तात्रेय कोंडो घाटे’ – यांचा जन्म. (मृत्यू: 13 मार्च 1899)
  • 1880 : ‘हेलन केलर’ – अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका यांचा जन्म. (मृत्यू: 1 जून 1968)
  • 1899 : ‘जुआन पेप्पे’ – पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 एप्रिल 1981)
  • 1917 : ‘खंडू रांगणेकर’ – आक्रमक डावखुरे फलंदाज यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 1984)
  • 1939 : ‘राहुलदेव बर्मन’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 4 जानेवारी 1994)
  • 1962 : ‘सुनंदा पुष्कर’ – भारतीय-कॅनडातील उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2014)
  • 1964 : ‘पी. टी. उषा’ – पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट सेवानिवृत्त भारतीय धावपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1708 : ‘धनाजी जाधव’ – मराठा साम्राज्यातील सेनापती यांचे निधन.
  • 1839 : ‘रणजितसिंग’ – शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक यांचे निधन. (जन्म: 13 नोव्हेंबर 1780)
  • 1996 : ‘अल्बर्ट आर. ब्रोकोली’ – जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1909)
  • 1998 : ‘होमी जे. एच. तल्यारखान’ – सिक्कीमचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1917)
  • 2000 : ‘द. न. गोखले’ – शिक्षणतज्ञ व चरित्रकार यांचे निधन.
  • 2002 : ‘कृष्ण कांत’ – भारतीय उपराष्ट्रपती यांचे निधन.
  • 2008 : ‘सॅम माणेकशाॅ’ – फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: गणेश चतुर्थी रेल्वे आरक्षणासाठी कोकण रेल्वेचे ‘रिग्रेट’ गाणे

   Follow us on        

 

Konkan Railway: यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी नियमित गाड्यांसाठी रेल्वे आरक्षण सुरु झाले असून या गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही सेकंदात फुल्ल होत आहे. बहुतेक सर्वच गाड्या आता रिग्रेट हे स्टेटस दाखवत असल्याने ज्या गणेश भक्तांना आरक्षण भेटले नाही ते नाराज झाले आहेत.

यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण खुले होताच मिनिटभरातच सर्वच नियमित गाड्या हाऊसफुल्ल झाल्या. सर्वच नियमित गाड्यांची आसन क्षमता संपल्याने ‘रिग्रेट’चा शेरा मिळत आहे. यामुळे आरक्षित तिकिटांसाठी तासन्तास रांगेत उभ्या राहिलेल्या गणेशभक्त तिकीटे न भेटल्याने नाराज झाले आहेत.

 

गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावी दाखल होतात. रेल्वे प्रशासनाने यंदा ६० दिवस अगोदरच म्हणजेच २३ जूनपासून आरक्षणाची दालने खुली केली. त्यानुसार चाकरमान्यांची गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी आरक्षित तिकिटे पदरात पाडण्यासाठी सकाळपासूनच तिकिट खिडक्यांवर झुंबड उडाली. मात्र अवघ्या दीड मिनिटातच नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले. यामुळे असंख्य चाकरमानी प्रतीक्षा यादीवर राहिले. यानंतर ‘रिग्रेट’चाच शेरा मिळत असल्याने चाकरमानी कोंडीत अडकले आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्प्रेस, सुपरफास्ट कोकणकन्या, मांडवी, मत्स्यगंधा, एलटीटी-मडगाव, मुंबई-मंगळूर या एक्स्प्रेस गाड्यांची गणेशोत्सवातील आसन क्षमता संपली आहे. यामुळे या सर्व गाड्यांचे शेकडो गणेशभक्त प्रतीक्षा यादीवर आहेत. रेल्वे प्रशासनाने अजूनही गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केलेली नाही. यामुळे गणेशभक्तांची सारी मदार आता गणपती स्पेशल गाड्यांवर अवलंबून आहे. कोकण विकास समितीसह अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, जल फाऊंडेशनसह अन्य प्रवासी संघटनांनी गणेशोत्सवात कोकण मार्गावर विशेष गाड्या चालवण्यासाठी आग्रह धरला आहे. मुंबई-चिपळूणसह मुंबई-सावंतवाडी स्वतंत्र विशेष गाडी चालवण्याची मागणीही केली जात आहे. तशी निवेदनेही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह रेल्वे बोर्डाला देण्यात आली आहेत. केवळ निवेदने देवून न थांबता सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. रेल्वे बोर्ड सकारात्मक निर्णय घेवून गणेशभक्तांना दिलासा देईल, अशी गणेशभक्त बाळगून आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने यंदाही दिवा-चिपळूण व दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशल चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी गणेशभक्तांकडून करण्यात येत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search