Author Archives: Kokanai Digital

Malvan: राजकोट किल्ल्यावर पर्यटकांना बंदी; कारण काय?

   Follow us on        

Malvan: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवणमधील समुद्र तटबंदीवरील राजकोट किल्ला आजपासून पुढील काही दिवस शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. किल्ल्यावरील पदपथाची आवश्यक दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत राजकोट किल्ला शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंतआजपासून राजकोट किल्ला बंद राहणार आहे.

मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. ‘मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीमुळेच किल्ला बंद ठेवण्यात आला आहे का?’, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

तसंच, ‘शंभर कोटी रूपये खर्च करून शंभर वर्षे टीकेल असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून जे अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे.’ अशी मागणी देखील माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

राजकोट किल्ला बंद करण्यात आल्यामुळे कोकणामध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किल्ल्याच्या बाहेर येऊन पर्यटकांना परत जावे लागत आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल असे सांगितले जात आहे.

२२ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-द्वादशी – 25:24:48 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 17:39:30 पर्यंत
  • करण-कौलव – 14:58:56 पर्यंत, तैतुल – 25:24:48 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सुकर्मा – 16:57:03 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:01:51
  • सूर्यास्त- 19:18:44
  • चन्द्र-राशि-मेष – 23:04:42 पर्यंत
  • चंद्रोदय- 27:32:00
  • चंद्रास्त- 16:11:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :
  • जागतिक पर्जन्यवन दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1633 : गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले, सूर्य नव्हे.
  • 1757 : प्लासीची लढाई सुरू झाली.
  • 1897 : दामोदर हरी चाफेकर यांनी पुणे शहरात प्लेगच्या साथीच्या वेळी झालेल्या अत्याचाराचा बदला म्हणून चार्ल्स रँड या नागरी अधिकारीची गोळ्या घालून हत्या केली.
  • 1908 : इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) यांचा प्रवेश.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीला शरणागती पत्करली.
  • 1940 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडली आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
  • 1976 : कॅनडाने फाशीच्या शिक्षेवर बंदी घातली.
  • 1978 : खगोलशास्त्रज्ञ जेम्स क्रिस्टीने ऍरिझोनामधील वेधशाळेतून प्लूटोचा चंद्र शेरॉन शोधला.
  • 1984 : व्हर्जिन अटलांटिक एअरवेजचे पहिले उड्डाण लंडन हिथ्रो विमानतळावरून उड्डाण केले.
  • 1994 : महाराष्ट्र सरकारचे महिला धोरण जाहीर झाले. त्याद्वारे महिलांना सरकारी आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये 30 टक्के आरक्षण.
  • 2007 : अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी सुमारे 194 दिवस 18 तास पूर्ण करून सर्वाधिक काळ अंतराळात राहून पृथ्वीवर परत आले.
  • 2016 : भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने जागतिक विश्वविक्रम रचत आपल्या देशाच्या उपग्रहासह विदेशातील एकूण 20 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विक्रम रचला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1805 : ‘जोसेफ मॅझिनी’ – इटालियन स्वातंत्र्यवीर यांचा जन्म. (मृत्यू: 10 मार्च 1872)
  • 1887 : ‘ज्यूलियन हक्सले’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 फेब्रुवारी 1975)
  • 1896 : ‘बाबुराव पेंढारकर’ – नटश्रेष्ठ यांचा जन्म.
  • 1899 : ‘रिचर्ड गिर्ली ड्र्यू’ – मास्किंग टेप चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 14 डिसेंबर 1980)
  • 1908 : ‘डॉ. विष्णू भिकाजी कोलते’ – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांचा जन्म. (मृत्यू: 9 एप्रिल 1998)
  • 1927 : ‘एन्थोनी लो’ – भारतीय-इंग्लिश इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 2015)
  • 1932 : ‘अमरीश पुरी’ – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार यांचा जन्म. (मृत्यू  12 जानेवारी 2005)
  • 1974 : ‘विजय चंद्रशेखर’ – तमिळ चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1955 : ‘सदाशिव शिंदे’ – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1923)
  • 1993 : ‘विष्णूपंत जोग’ – चित्रपट अभिनेते यांचे निधन.
  • 1994 : ‘अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1908)
  • 2014 : ‘रामा नारायणन’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1949)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार! मंत्रालयातील बैठकीत घेतले गेले महत्वाचे निर्णय

   Follow us on    

 

 

Mumbai Goa Highway : कोकणात जाण्यासाठी मुंबई व गोवा हायवे हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. याच मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेले आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई गोवा महामार्गाला जे चार पर्यायी मार्ग आहेत. याबाबत उपमुख्यंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आढावा घेण्यात आला.  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण, दुरुस्ती करुन तातडीची उपाययोजना करण्यात येणार आहे.  इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.  मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी चारही रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक 15 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अजित पवार यांनी बैठकीत याबाबत महत्वाच्या सूचना केल्या.  मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी  मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई – गोवा महामार्गावरील इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता, अशा चारही रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक 15 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. ही कामे  पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

२१ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-दशमी – 07:21:31 पर्यंत, एकादशी – 28:30:21 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 19:51:16 पर्यंत
  • करण-विष्टि – 07:21:31 पर्यंत, भाव – 17:58:09 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-अतिगंड – 20:28:41 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:01:38
  • सूर्यास्त- 19:18:31
  • चन्द्र-राशि-मेष
  • चंद्रोदय- 26:41:59
  • चंद्रास्त- 15:05:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस,
  • दक्षिण गोलार्धातील वर्षातला सर्वात छोटा दिवस.
  • आंतरराष्ट्रीय योग दिवस
  • जागतिक जिराफ दिन


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Devgad: रिक्षेची एसटीला धडक बसून भीषण अपघात; ४ प्रवाशांचा मृत्यू

   Follow us on    

 

 

देवगड: देवगड तालुक्यातील नारिंग्रे कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक अचानक समोरून आलेल्या एसटीला बाजू देताना रिक्षेची एसटीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकासह रिक्षेतील चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक संकेत सदानंद घाडी (२९, आचरा देऊळवाडी), संतोष रामजी गावकर (३३, आचरा गाऊडवाडी), सुनिल उर्फ सोनू सूर्यकांत कोळंबकर (४८, आचरा पिरावाडी), रोहन मोहन नाईक (२९, आचरा गाऊडवाडी) यांचा समावेश आहे. तर रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण आचरा येथील रिक्षा व्यावसायिक असून ते वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते.

हा अपघात शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच मिठबाव सरपंच तथा रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे, शैलेश लोके, काका नरे यांच्यासह मिठबाव, नारिंग्रे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, नीलेश पाटील, स्वप्नील ठोंबरे, योगेश महाले, नितीन डोईफोडे, गणपती गावडे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अपघातातील मृतदेह विच्छेदनासाठी मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या अपघाताची माहिती आचरा गावात पसरताच मोठ्या संख्येने आचरावासीय मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा झाले. मृत व्यक्तींचे नातेवाईकही मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यासह आचरा येथील रिक्षा व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२० जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-नवमी – 09:52:15 पर्यंत
  • नक्षत्र-रेवती – 21:45:51 पर्यंत
  • करण-गर – 09:52:15 पर्यंत, वणिज – 20:39:44 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शोभन – 23:46:15 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:01:27
  • सूर्यास्त- 19:18:17
  • चन्द्र-राशि-मीन – 21:45:51 पर्यंत
  • चंद्रोदय- 25:57:59
  • चंद्रास्त- 14:03:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक निर्वासित दिन
  • जागतिक उत्पादकता दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1837 : इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया विराजमान झाल्या.
  • 1840 : सॅम्युअल मोर्स यांना टेलीग्राफचे पेटंट मिळाले.
  • 1863 : वेस्ट व्हर्जिनिया हे अमेरिकेचे 35 वे राज्य बनले.
  • 1877 : अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी कॅनडात जगातील पहिली व्यावसायिक टेलिफोन सेवा सुरू केली.
  • 1887 : व्हिक्टोरिया टर्मिनस (सध्याचे नाव C.S.T.), मुंबई येथील देशातील सर्वात व्यस्त स्थानक उघडले.
  • 1899 : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांना केंब्रिज युनिव्हर्सिटी ट्रायपॉसच्या गणित विषयात प्रथम श्रेणीत प्रथम येऊन वरिष्ठ रँग्लर ही पदवी प्रदान करण्यात आली.
  • 1921 :  भारतातील चेन्नई शहरातील ‘बकिंगहॅम’ आणि कर्नाटक मिल्सच्या कामगारांनी चार महिन्यांचा संप सुरू केला.
  • 1921 : टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना.
  • 1960 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली.
  • 1990 : इराणमध्ये 7.4 मेगावॅट क्षमतेच्या भूकंपात 50,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 150,000 लोक जखमी झाले.
  • 1997 : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने पुण्याजवळ राज्यातील मुलींसाठी पहिली सैनिकी शाळा सुरू केली.
  • 2001 : परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले.
  • 2014 : प्रसिद्ध कवी केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1869 : ‘लक्ष्मणराव किर्लोस्कर’ – किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 सप्टेंबर 1956)
  • 1915 : ‘टेरेन्स यंग’ – चिनी-इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार यांचा जन्म. (मृत्यू: 7 सप्टेंबर 1994)
  • 1920 : ‘मनमोहन अधिकारी’ – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान, कम्युनिस्ट नेते यांचा जन्म. (मृत्यू: 26 एप्रिल 1999)
  • 1939 : ‘रमाकांत देसाई’ – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 28 एप्रिल 1998)
  • 1946 : ‘जनाना गुस्माव’ – पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1948 : ‘लुडविग स्कॉटी’ – नौरूचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1952 : ‘विक्रम सेठ’ – भारतीय लेखक आणि कवी यांचा जन्म.
  • 1954 : ‘अ‍ॅलन लॅम्ब’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1958 : ‘द्रौपदी मुर्मू’ – भारताच्या राष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1972 : ‘पारस म्हांब्रे’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1976 : ‘देविका पळशीकर’ – प्रसिद्ध भारतीय महिला कसोटी व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1668 : ‘हेन्‍रिच रॉथ’ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक यांचे निधन. (जन्म: 18 डिसेंबर 1620)
  • 1837 : ‘विल्यम (चौथा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1765)
  • 1917 : ‘जेम्समेसन क्राफ्ट्स’ – अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1997 : ‘भाऊसाहेब पाटणकर’ उर्फ ‘जिंदादिल’ – मराठीतले शायर यांचे निधन.
  • 1997 : ‘बासू भट्टाचार्य’ – राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2008 : ‘चंद्रकांत गोखले’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1921)
  • 2013 : ‘डिकी रुतनागुर’ – भारतीय पत्रकार यांचे निधन. (जन्म: 26 फेब्रुवारी 1931)
  • 1987 : ‘डॉ. सलीम अली’ – जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 नोव्हेंबर 1896)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: महत्वाची बातमी! गणेशचतुर्थीसाठीचे रेल्वे आरक्षण उद्यापासून सुरु

   Follow us on    

 

 

Konkan Railway: पावसाळा सुरू होताच कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध सुरू होतात. यासाठी चाकरमानी गणेशोत्सवास गावी जाण्याचे नियोजन करण्यास सुरूवात करतात. यामध्ये महत्वाचे नियोजन असते ते गावी जाण्यासाठी रेल्वे किंवा एसटी बसचे आरक्षण करणे. यासाठी रेल्वे प्रशासन दोन महिने आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करते.

गणेशोत्सवाला चाकरमानी किमान आठ दिवस अगोदर गावी जातात. या वर्षी श्री गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट रोजी आहे. यावर्षी गणपतीसाठी गावी जाणारे चाकरमानी 19 ऑगस्ट पासून सुरूवात करतील. म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनी दोन महिने अगोदर म्हणजेच 20 जून रोजी आपल्या इच्छीत गाडीचे आरक्षण घेणे आवश्यक आहे.

खरेतर गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासन नियमीत गाड्यांबरोबरच शेकडो विशेष गाडया कोकण रेल्वे मार्गावर सोडते. मात्र, या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच पहिल्या एक-दोन मिनिटातचं संपूर्ण गाडीचे आरक्षण फूल्ल होते. कधीकधी तर तिकीट खिडकीवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रवाशालाही संबधित गाडीचे कर्फम तिकीट मिळत नाही. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासूनची ही समस्या आहे.दुसरीकडे खासगी तिकीट एजंटकडे याच गाड्यांची तिकीटे सहज उपलब्ध होतात. मात्र, त्यासाठी मूळ तिकीटाच्या दामदुप्पट दर आकारला जातो. तासनतास् रांगेत राहूनही जे तिकीट प्रवाश्याला मिळत नाही ते एजंटला सहज कसे मिळते? यामागचे गौडबंगाल काय? प्रवाशांची खुलेआम लूट करणारा हा गोरख धंदा कुणाचा? रेल्वे प्रशासनाचे यावर काहीच नियंत्रण नाही कसे? अवघ्या एका मिनिटात संपूर्ण रेल्वेची हजारो तिकीट कशी आरक्षित होतात? लोकप्रतिनिधी याबाबत आवाज का उठवत नाहीत? याबाबत रेल्वे प्रशासन कधी खुलासा का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न कोकणवासींय रेल्वे प्रवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले आहेत. मात्र याचे योग्य उत्तर कुणीच देत नसल्याने कोकणवासींय प्रवाशांच्या नशिबी गुराढोरा प्रमाणे रेल्वे डब्यात कोंबून घेत प्रवास करण्याची परवड कायम आहे.

 

आजरा ते बांदा अंतर येणार २० मिनिटांवर! आंबोलीजवळ बनणार देशातील सर्वात लांब बोगदा

   Follow us on    

 

 

Shakteepith Expressway: राज्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासंबधी काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. आजरा ते बांदा हे अंतर जलद गतीने पार करण्यासाठी या महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात आंबोलीजवळ पश्चिम घाटाखाली २ बोगदे मोठे बोगदे बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही बोगद्यांची एकूण लांबी २१.९ किलोमीटर असणार आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, तर हा कदाचित देशातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे.

आंबोली घाटातून आजरा ते बांदा प्रवास करण्यासाठी सुमारे १.५ तास लागतात. डीपीआरनुसार, आजरा ते बांदा या पॅकेजच्या संपूर्ण ३९ किलोमीटर लांबीचा प्रवास करण्यासाठी लागणारा प्रवास वेळ फक्त २० मिनिटे असणार आहे. तर या टप्प्यात वेगमर्यादा १२० किमी प्रतितास असणार आहे.

नागपूर आणि गोवा यांना जोडणारा हा नवीन द्रुतगती मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळेल. या मोठ्या प्रकल्पाची अंदाजीत किंमत ८६,००० कोटी रुपये आहे. हा द्रुतगती मार्ग १२ जिल्ह्यांना जोडून प्रादेशिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ पत्रादेवी येथे संपेल. हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी आणि सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.

१९ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-अष्टमी – 11:58:23 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 23:17:49 पर्यंत
  • करण-कौलव – 11:58:23 पर्यंत, तैतुल – 22:58:34 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सौभाग्य – 26:45:29 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:01:15
  • सूर्यास्त- 19:18:04
  • चन्द्र-राशि-मीन
  • चंद्रोदय- 25:18:00
  • चंद्रास्त- 13:05:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
  • जागतिक सिकलसेल दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1676 : शिवाजी महाराजांनी पश्चात्तापी सरनोबत नेताजी पालकर यांना विधीपूर्वक शुद्ध केले आणि त्यांना हिंदू धर्मात पुनर्स्थापित केले.
  • 1862 : अमेरिकेने गुलामगिरीवर बंदी घातली.
  • 1865 : गॅल्व्हेस्टन, यूएसए येथे गुलामांची मुक्तता. हा दिवस यापुढे जूनीटींथ म्हणून साजरा केला जातो.
  • 1912 : अमेरिकेत कामगारांसाठी 8 तासांचा दिवस सुरू करण्यात आला.
  • 1949 : शार्लोट मोटर स्पीडवे येथे पहिल्यांदा नासकारची स्पर्धा आयोजित केली गेली.
  • 1961 : कुवेतला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1966 : शिवसेना राजकीय पक्षाची स्थापना.
  • 1977 : ट्रान्स-अलास्कन पाइपलाइनने आर्क्टिक प्रदेशातून तेलाची वाहतूक सुरू केली.
  • 1978 : गारफिल्ड या कार्टून पात्राने वृत्तपत्रात पदार्पण केले.
  • 1981 : भारताच्या ‘ऍपल’ उपग्रहाचे प्रक्षेपण.
  • 1989 : ई. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे 19 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
  • 1999 : कोलकाता ते ढाका मैत्रेयी एक्सप्रेस बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1595 : ‘गुरु हर गोविंद’ – सहावे सिख गुरु यांचा जन्म. (मृत्यू: 3 मार्च 1644)
  • 1623 : ‘ब्लेस पास्कल’ – फ्रेंच गणितज्ञ तत्त्वज्ञानी यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1662)
  • 1764 : ‘जोसेगेर्व्हासियो आर्तिगास’ – उरुग्वेचे राष्ट्रपिता यांचा जन्म.
  • 1877 : ‘पांडुरंग चिमणाजी पाटील’ – पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य यांचा जन्म.
  • 1941 : ‘वाक्लाव क्लाउस’ – चेकोस्लोव्हाकियाचा राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1945 : ‘ऑँगसान सू की’ – म्यानमारची राजकारणी यांचा जन्म.
  • 1947 : ‘सलमान रश्दी’ – ब्रिटिश लेखक यांचा जन्म.
  • 1962 : ‘आशिष विद्यार्थी’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
  • 1970 : ‘राहुल गांधी’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1976 : ‘डेनिस क्रॉवले’ – फोरस्क्वेअरचे सह-संस्थापक यांचा जन्म.
  • 1985 : ‘काजल अगरवाल’ –  भारतीय सिने-अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1747 : ‘नादिर शहा’ – पर्शियाचा सम्राट यांचे निधन. (जन्म: 22 ऑक्टोबर 1698)
  • 1932 : ‘रेव्ह. जस्टिन एडवर्ड’ – मराठी संतवाङमयाचे अभ्यासक आणि प्रचारक यांचे निधन.
  • 1949 : ‘सैयद जफरुल हसन’ – भारतीय तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 14 फेब्रुवारी 1885)
  • 1956 : ‘थॉमस वॉटसन’ – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. चे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 17 फेब्रुवारी 1874)
  • 1993 : ‘विल्यम गोल्डिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक यांचे निधन. (जन्म: 19 सप्टेंबर 1911)
  • 1996 : ‘कमलाबाई पाध्ये’ – समाजसेविका यांचे निधन.
  • 1998 : ‘रमेशमंत्री’ – प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म: 6 जानेवारी 1925)
  • 2000 : ‘माणिक मुदलियार’ तथा ‘माणिक कदम’ – मराठी- हिंदी रंगभूमी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन.
  • 2008 : ‘बरुण सेनगुप्ता’ – बंगाली पत्रकार यांचे निधन. (जन्म: 23 जानेवारी 1934)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: “….तर मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालविणे शक्य”

   Follow us on    

 

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे. सद्यस्थितीत सुपरफास्ट एक्सप्रेस ८ डब्यांची धावत आहे. मात्र हे डबे अपुरे पडत आहेत. त्यात पावसाळ्यात या गाडीच्या फेऱ्यांत कपात केली जात असल्याने प्रचंड मागणी असूनही या गाडीची सेवा अपुरी पडत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.

जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसशी तिचे एकीकरण करण्याचा निर्णय अलिकडेच रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या डब्यांची प्राथमिक देखभाल आता नांदेडला हलवण्यात आली आहे. यामुळे मुंबईत पिट लाईन आणि देखभाल स्लॉट उपलब्ध झाला आहे. या पिट लाईन आणि देखभाल स्लॉटचा वापर मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेस साठी वापरल्यास ती १६ किंवा २० डब्यांची चालविणे शक्य होणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने ९५ टक्के आसन क्षमतेची प्रभावी अंमलबजावणी राखली आहे. यामुळे सध्या धावणारी ८ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांसाठी आसनांअभावी गैरसोयीची ठरत आहे. यामुळे एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आर्जवही करण्यात आले आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search