Author Archives: Kokanai Digital

१४ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-तृतीया – 15:49:44 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 24:22:52 पर्यंत
  • करण-विष्टि – 15:49:44 पर्यंत, भाव – 27:55:01 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-ब्रह्म – 13:12:11 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:03
  • सूर्यास्त- 19:15
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 22:04:59
  • चंद्रास्त- 08:22:59
  • ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
  • जागतिक रक्तदाता दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1158 : म्युनिक शहराची स्थापना इसार नदीच्या काठावर झाली.
  • 1704 : मुघलांच्या कैदेत असलेल्या संभाजीराजे यांच्या मुलाचे औरंगजेबाने लग्न लावून दिले.
  • 1777 : अमेरिकेने तारे आणि पट्टे असलेला ध्वज स्वीकारला.
  • 1789 : कॉर्नपासून बनवलेली पहिली व्हिस्की. तिचे नाव बोर्बन असे होते.
  • 1896 : महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली.
  • 1907 : नॉर्वेमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 1926 : ब्राझील लीग ऑफ नेशन्समधून बाहेर पडले.
  • 1938 : सुपरमॅन चित्रपटाची कथा प्रथम प्रकाशित.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी पॅरिस जर्मनीच्या स्वाधीन केले.
  • 1945 : भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी वेव्हेल योजना जाहीर करण्यात आली.
  • 1952 : अमेरिकेची पहिली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी, यू.एस. ने नॉटिलस बांधण्यास सुरुवात केली.
  • 1962 : पॅरिसमध्ये युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना झाली.
  • 1967 : मरीनर स्पेसक्राफ्ट व्हीनसवर प्रक्षेपित.
  • 1967 : चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली.
  • 1972 : डी.डी.टी. या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली.
  • 1972 : जपान एअरलाइन्सचे फ्लाइट 471 नवी दिल्ली, भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ येताना क्रॅश झाले, त्यात विमानातील 87 पैकी 82 लोक आणि जमिनीवर आणखी चार लोक ठार झाले.
  • 1999 : दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचा कायर्काळ संपला.
  • 2001 : ए.सी. किंवा डी.सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा शुभारंभ पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1444 : ‘निळकंथा सोमायाजी’ – भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा जन्म.
  • 1736 : ‘चार्ल्स कुलोम’ – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑगस्ट 1806)
  • 1864 : ‘अलॉइस अल्झायमर’ – जर्मन मेंदुविकारतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1915)
  • 1868 : ‘कार्ल लॅन्ड्स्टायनर’ – नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 26 जून 1943)
  • 1899 : ‘ब्रिगेडियर राजिंदर सिंह’ – महावीर चक्र सन्मानित माजी भारतीय सैन्य अधिकारी यांचा जन्म.
  • 1969 : ‘स्टेफी ग्राफ’ – प्रसिद्ध जर्मन टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1916 : ‘दिवान प्रेम चंद’ – माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी यांचा जन्म.
  • 1922 : ‘के. आसिफ’ – हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक यांचा जन्म.
  • 1946 : ‘डॉनल्ड ट्रम्प’ – अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1955 : ‘किरण अनुपम खेर’ – सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1967 : ‘कुमार मंगलम बिर्ला’ – प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1968 : ‘राज ठाकरे’ – प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन राजकारणी तसचं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक, अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1969 : ‘स्टेफनी मारिया’ – प्रसिद्ध जर्मन माजी टेनिसपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1825 : ‘पिअर चार्ल्स एल्फांट’ – वॉशिंग्टन शहराचे रचनाकार फ्रेन्च अमेरिकन वास्तुविशारद आणि स्थापत्य अभियंता यांचे निधन. (जन्म: 9 ऑगस्ट 1754)
  • 1916 : ‘गोविंद बल्लाळ देवल’ – मराठी नाटककार नाट्यदिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 13 नोव्हेंबर 1855)
  • 1920 : ‘मॅक्स वेबर’ जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 एप्रिल 1864)
  • 1946 : ‘जॉन लोगी बेअर्ड’ – ब्रिटिश शास्त्रज्ञ, आद्य दूरचित्रवाणी संशोधक यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1888)
  • 1989 : ‘सुहासिनी मुळगावकर’ – मराठी अभिनेत्री संस्कृत पंडित यांचे निधन.
  • 2007 : ‘कुर्त वाल्ढहाईम’ – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस यांचे निधन. (जन्म: 21 डिसेंबर 1918)
  • 2010 : ‘मनोहर माळगावकर’ – इंग्रजी लेखक यांचे निधन. (जन्म: 12 जुलै 1913)
  • 2020 : ‘सुशांत सिंग राजपुत’ – बॉलीवूड अभिनेता यांच निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसचे डबे वाढले

   Follow us on        

Konkan Raiwlay:कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एका लांब पल्ल्याच्या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक १२२२३ /१२२२४ लोकमान्य टिळक (टी) – एर्नाकुलम जं. – लोकमान्य टिळक (टी) दुरांतो” एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक) या गाडीच्या डब्यांत वाढ करण्यात येणार आहे.

या गाडीच्या डब्यांची सध्याची संरचना अशी आहे: फर्स्ट एसी – ०१, टू टायर एसी – ०२, थ्री टायर एसी – ०६, स्लीपर – ०८,पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २० एलएचबी डबे

सुधारित संरचना: फर्स्ट एसी – ०१, टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – ०७, स्लीपर – ०८,पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ एलएचबी डबे

थ्री टायर एसी आणि स्लीपर स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवून या गाडीच्या डब्यांची संख्या २० वरून २२ करण्यात आली आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रवास चालू करताना गाडी क्रमांक १२२२३ तर एर्नाकुलम येथून प्रवास सुरु करताना गाडी क्रमांक १२२२४ या सुधारित संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.

 

Konkan Railway: आषाढी वारीसाठी सावंतवाडी-पंढरपुर विशेष गाडी चालविण्यात यावी

   Follow us on        

Konkan Railway: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायाची भेट घेण्यासाठी वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात. मध्य रेल्वेने नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर, मिरज अशा महाराष्ट्रातील सर्वच विभागांतून पंढपूरला जाण्यासाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

रेल्वेने आजपर्यंत एकदाही सावंतवाडीतून पंढरपूरला जाणारी गाडी सोडलेली नाही.

कोकणातूनही बरेच भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला जातात. या भाविकांमध्ये वयस्कर नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. रेल्वेने गेल्यास आरामदायक प्रवास होऊ शकतो.

रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देवून दिनांक १ जुलै, २०२५ ते १० जुलै, २०२५ पर्यंत सावंतवाडी – पंढरपूर मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र च्या वतीने समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे. ही मागणी करणारे निवेदन ईमेल द्वारे संबधित अधिकारी आणि प्रशासकीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.

१३ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-द्वितीया – 15:21:37 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 23:21:37 पर्यंत
  • करण-गर – 15:21:37 पर्यंत, वणिज – 27:38:35 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शुक्ल – 13:47:08 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:03
  • सूर्यास्त- 19:15
  • चन्द्र-राशि-धनु – 29:39:04 पर्यंत
  • चंद्रोदय- 21:18:00
  • चंद्रास्त- 07:25:00
  • ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
  • आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस
  • जागतिक सॉफ्टबॉल दिवस
महत्त्वाच्या घटना :
1881 : यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.
1886 : कॅनडातील व्हँकुव्हर शहर आगीत नष्ट झाले.
1934 : ॲडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी व्हेनिसमध्ये भेटले.
1956 : पहिली युरोपियन चॅम्पियन्स कप फुटबॉल स्पर्धा रिअल माद्रिदने जिंकली.
1978 : इस्रायली सैन्याने लेबनॉनमधून माघार घेतली.
1983 : पायोनियर 10 अंतराळयान हे सौर मंडळ बाहेर जाणारे पहिले मानवनिर्मित वस्तू बनले.
1997 : दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमाला लागलेल्या आगीत 59 लोकांचा मृत्यू झाला आणि 100 जण जखमी झाले.
2000 : ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने माद्रिद, स्पेन येथे एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध बारा सामने जिंकले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1822 : ‘कार्ल श्मिट’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 27 फेब्रुवारी 1894)
  • 1831 : ‘जेम्सक्लार्क मॅक्सवेल’ – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 5 नोव्हेंबर 1879)
  • 1879 : ‘गणेश दामोदर सावरकर’ – अभिनव भारत संघटनेचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 1945)
  • 1905 : ‘कुमार श्री दुलीपसिंहजी’ – इंग्लंडचे क्रिकेटपटू यांचा जन्म, कुमार श्री दुलीपसिंहजी’ यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (मृत्यू: 5 डिसेंबर 1959 )
  • 1909 :  ‘इ. एम. एस. नंबूद्रीपाद’ – केरळचे पहिले मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचा जन्म. (मृत्यू: 19 मार्च 1998)
  • 1923 : ‘प्रेम धवन’ – गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित यांचा जन्म. (मृत्यू: 7 मे 2001 )
  • 1937 : ‘आंद्रेस व्हिटॅम स्मिथ’ – द इंडिपेंडंट चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1964 : ‘पीयूष गोयल’ – भारतीय राजकारणी, (2017 रेल्वे मंत्री)  यांचा जन्म.
  • 1965 : ‘मनिंदर सिंग’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1950 : ‘दिवाण बहादूर सर गोपाठी’ – भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1967 : ‘विनायक पांडुरंग करमरकर’ – भारतीय शिल्पकार यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 1891)
  • 1969 : ‘प्रल्हाद केशव अत्रे’ – विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1898)
  • 1996 : ‘पंडित प्राण नाथ’ – प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक व शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याचे प्रशिक्षक यांचे निधन
  • 2008 : ‘जे. चितरंजन’ – भारतीय कामगार नेते, राजकारणी तसचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेता यांचे निधन
  • 2012 : ‘मेहंदी हसन’ – पाकिस्तानी गझल गायक यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1927)
  • 2013 : ‘डेव्हिड ड्यूईश’ – ड्यूईश इंक. कंपनी चे संस्थापक यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

AI ST Buses: चालकाला डुलकी लागली की अलार्म वाजणार! एसटीच्या ताफ्यात दाखल होणार अत्याधुनिक Ai बसेस

   Follow us on        

मुंबई: एसटी महामंडळाने अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या बसेस विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यात चालकांवर नजर ठेवणारे कॅमेरे असतील. हे कॅमेरे चालकांच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवणार आहेत. गाडी चालवत असताना चालक जर अपघात होण्यास कारणीभूत होईल अशी कृती करत असेल तर  (उदा. झोप लागणे, डुलकी घेणे, जांभई देणे) मोबाईल वापरणे असली तरी हे कॅमेरे अलार्म वाजवतील असे म्हटले जात आहे.

एसटी महामंडळ एकूण पाच हजार बसेस विकत घेणार आहे. त्यातील किमान एक हजार बसेस या ई-बसेस असणार आहेत. या बसेस टप्प्या टप्प्याने एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत.
पुण्यामध्ये आज स्मार्ट ई-बसेसच सादरीकरण झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई-बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात,एसटी महामंडळात दाखल होणाऱ्या ई-बसेस एआय तंत्रज्ञानावर आधारित आणि एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही दिल्या होत्या असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.त्यानुसार आज उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे आज  सादरीकरण करण्यात आले.

नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे एआय तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभई देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई-बसेस मध्ये असणार आहे. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

आणखी काय उपाययोजना ?
बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये असावी असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी हालचाली सुरु; तीन टप्प्यांत होणार दुहेरीकरणाचे काम

   Follow us on    

 

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गाच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला आता गती मिळत असून, भविष्यात या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट होणार आहे. नैसर्गिक अडचणींवर मात करत कोकण रेल्वेने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरणाचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सपाट मार्गांवर दर किलोमीटर १५ ते २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर बोगद्यांच्या भागात हा खर्च ८० ते १०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यापूर्वी रोहा ते वीर दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी ५३० कोटी रुपये खर्च झाले होते.

यापुढील टप्पे कोणते?

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार खालील तीन टप्प्यांत कोकण रेल्वे मार्गाचे दुपारदरीकरण करण्यात येणार आहे.
१)खेड–रत्नागिरी,
२) कणकवली–सावंतवाडी
३) मडगाव–ठोकुर

या तीन प्रमुख टप्प्यांमध्ये दुहेरीकरणाची योजना आहे. या टप्प्यांचा सविस्तर अहवाल लवकरच रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात येणार आहे. या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि निधी मंजूर होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

दुहेरीकरणासोबतच कोकण रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ९९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा आणि सोयी-सवलती मिळण्याची शक्यता आहे.

Chiplun: श्री क्षेत्र टेरव येथे भवानी मातेचा गोंधळ शुक्रवार १३ जून, २०२५ रोजी संपन्न होणार.

   Follow us on    

 

 

चिपळूण : श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा मंगलमय गोंधळ सोहळा रूढी परंपरेनुसार शुक्रवार दिनांक १३ जून, २०२५ रोजी मृग नक्षत्रात जल्लोषात व आनंदान संपन्न होणार आहे. भवानी माता ही महाराष्ट्राचे व कदम कुळांचे कुलदैवत असून ही देवता सुख, समृद्धी, सौभाग्य व स्वास्थ देणारी असून दुःखाचा नाश करणारी तसेच इच्छापूर्ती करणारी देवता आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे भवानी मातेच्या पूजेचा मान कदम कुळाचा असून त्यांना भोपे असे संबोधले जाते.

 

जसे वैष्णवाच्यांत भजन – कीर्तन, हरिनाम सप्ताह साजरे होतात, तसेच देवीचा, खंडोबाचा, ज्योतिबाचा गोंधळ, जागर करण्याचा अनेक कुळांचा कुलाचार आहे. ९६ कुळांपैकी ७२ कुळांची कुलस्वामिनी श्री भवानी माता आहे. गोंधळ हा भवानी मातेचा मुख्य व महत्वाचा धार्मिक विधी आहे.

 

देवस्थानच्या पुजाऱ्यानी पूजेची मांडणी व घट स्थापित केल्यावर मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात येईल. त्या नंतर दिवट्या पाजळून घटाच्या भोवती पाच प्रदक्षिणा घालून *’भैरी – भवानीचा गोंधळ मांडीला, गोंधळाला यावे, उदो -उदो -उदो’* असा उदघोष करण्यात येईल. परंपरेनुसार हा गोंधळ, गोंधळी न घालता श्री क्षेत्र टेरव गावातील कदम घालतील.

 

कुलस्वामिनी श्री भवानी मातेस गाऱ्हाणे घालून मंदिराच्या पूर्वेस आवाराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून देवीचे देणे-मागणे देण्यात येईल. विधिवत पूजा-अर्चा संपन्न झाल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

 

दुसऱ्या दिवशी मंदिर स्वच्छ करून उद्यापनासह देवीला अभिषेक करण्यात येईल व अशा प्रकारे गोंधळ ह्या धार्मिक विधीची सांगता होईल.

 

गोंधळ या भवानी मातेच्या मुख्य व आवडत्या मंगल उत्सवात सर्वांनी अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती टेरव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

 

१२ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • दिनांक : 12 जून 2025
  • वार : गुरुवार
  • माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
  • माह (पूर्णिमांत) : आषाढ
  • ऋतु : ग्रीष्म
  • आयन : उत्तरायण
  • पक्ष : कृष्ण पक्ष
  • तिथी : प्रथम तिथी (दुपारी 02:27 पर्यंत) त्यानंतर द्वितीया तिथी
  • नक्षत्र : मूळ नक्षत्र (रात्री 09:56 पर्यंत) त्यानंतर पूर्वाषाढा नक्षत्र
  • योग : शुभ योग (दुपारी 02:04 पर्यंत) त्यानंतर शुक्ल योग
  • करण : कौलव करण (दुपारी 02:27 पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
  • चंद्र राशी : धनु राशी
  • सूर्य राशी : वृषभ राशी
  • अशुभ मुहूर्त:
  • राहु काळ : दुपारी 02:18 ते दुपारी 03:57 पर्यंत
  • शुभ मुहूर्त:
  • अभिजित : दुपारी 12:12 ते दुपारी 01:05
  • सूर्योदय : सकाळी 06:03
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:14
  • संवत्सर : विश्वावसु
  • संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
  • विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
  • शक संवत: 1947 शक संवत

जागतिक दिन :
  • जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस
  • रशिया दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1896 : जे.टी. हर्न प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला.
  • 1898 : फिलीपिन्सने स्पेनपासून स्वातंत्र्य घोषित केले.
  • 1905 : गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली.
  • 1913 : जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म रिलीज़ झाली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – 13,000 ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांनी मेजर जनरल रोमेलला शरणागती पत्करली.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने वापरलेला पहिला फ्लाइंग बॉब लंडनला धडकला.
  • 1964 : वर्णभेद विरोधी नेते नेल्सन मंडेला यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
  • 1975 : अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द केली आणि त्यांना 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली.
  • 1993 : पृथ्वीक्षेपणास्त्राची 11 वी चाचणी यशस्वी.
  • 1996 : भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत आपले बहुमत सिद्ध केले.
  • 2001 : कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.
  • 2002 : जागतिक बालकामगार विरोधी दिनाला सुरुवात झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 499 : 499ई.पुर्व : ‘आर्यभट्ट’ – भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1894 : ‘पुरुषोत्तम बापट’ – बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 1991)
  • 1917 : ‘भालचंद्र दत्तात्रय खेर’ – लेखक व पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 2012)
  • 1924 : ‘जॉर्ज बुश’ – अमेरिकेचे 41 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1917 : ‘भालचंद्र दत्तात्रय खेर’ लेखक पत्रकार यांचा जन्म.
  • 1957 : ‘जावेद मियाँदाद’ – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1972 : ‘भालचंद्र कदम’ – लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी हास्य विनोदी रंगमंच कलाकार व चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1985 : ‘ब्लॅक रॉस’ –  मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1964 : ‘कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी’ – मराठी भाषेचे गाढे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1892 – इस्लामपूर, सांगली)
  • 1976 : ‘गोपीनाथ कविराज’ – भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान यांचे निधन.
  • 1978: ‘गुओ मोरुओ’ – चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार यांचे निधन.
  • 1981 : ‘प्र. बा. गजेंद्रगडकर’ – भारताचे 7 वे सरन्यायाधीश यांचे निधन. (जन्म: 16 मार्च 1901)
  • 1983 : ‘नॉर्मा शिअरर’ – कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1902)
  • 2000 : ‘पु.ल. देशपांडे’ – मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता यांचे निधन. (जन्म: 8 नोव्हेंबर 1919)
  • 2003 : ‘ग्रेगरी पेक’ – हॉलीवूड अभिनेता यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1916)
  • 2015 : ‘नेकचंद सैनी’ – भारतीय मूर्तिकार यांचे निधन.(जन्म: 15 डिसेंबर 1924)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Railway Updates: महत्वाची बातमी! वेबसाइट असो वा काउंटर….तात्काळ तिकिटांसाठी आता ‘आधार ओटीपी’ अनिवार्य

   Follow us on    

 

 

Tatkal Ticket:  रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जुलै महिन्यापासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला जाणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलैपासून आधार व्हेरिफिकेशन झालेल्या प्रवाशांनाच केवळ तत्काळ तिकीटचे बुकिंग करता येईल. तर रेल्वेचे एजंट अर्ध्या तासानंतर तिकीट बुक करू शकतील. आतापर्यंत तत्काळ तिकिटे आरक्षणात मोठे गैरव्यवहार होत होते.मात्र, रेल्वेच्या या नवीन नियमामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
रेल्वेचे प्रसिद्धी पत्रक
रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी एक पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकानुसार सर्व झोन्सना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, तत्काळ सुविधेचा लाभ सामान्य नागरिकाला मिळेल, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे आधार कार्डाचे व्हेरिफिकेशन झाले आहे, असे प्रवाशीच 1 जुलै 2025 पासून आयआरसीटीसी संकेतस्थळ किंवा ऍपच्या माध्यमातून तिकीट बुक करू शकतील. यासोबतच 15 जुलै 2025 पासून तत्काळ बुकिंगसाठी आधारवर आधारित ओटीपी देखील अनिवार्य करण्यात आला आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस काऊंटर्स तसेच अधिकृत एजंट्सच्या माध्यामातून आरक्षणासाठी तेव्हाच उपलब्ध होतील, जेव्हा यंत्रणेने दिलेल्या ओटीपीचे व्हेरिफिकेशन होईल. प्रवाशांना आरक्षण अर्जात मोबाईल आधार कार्डशी लिंक असलेला नंबर देणे बंधनकारक असणार आहे. काउंटर वरून आरक्षित तिकिटे बुक करताना या नंबर वर ओटीपी येणार आहे. हा ओटीपी काउंटर वर तिकीट बुक करण्यासाठी बसलेल्या कर्मचाऱ्याला द्यावा लागणार आहे. या ओटीपीची पडताळणी झाल्यावरच तिकीट बुक होणार आहे.
तत्काळ रेल्वे तिकीटसाठी सकाळी 10 वाजेपासून आरक्षण करता येते. यावेळी केवळ एसी तिकिटांचे बुकिंग होते. तर 11 वाजेपासून अन्य तिकिटांचे बुकिंग करता येते. या सगळ्या प्रक्रियेत सामान्य प्रवाशाला हमखास तिकीट मिळणे कठीण होते.
तत्काळ बुकिंगसाठी सामान्य प्रवाशांना सर्वाधिक त्रास होतो. तर दुसरीकडे एजंट आरामात तिकीट बुक करू शकतात. आणि त्यानंतर एजंट या तिकिटांची विक्री करताना ग्राहकांकडून अवाच्या सवा किंमत वसूल करतात. आता रेल्वेच्या या नवीन पत्रकानुसार, एजंट्स सकाळी 10 ते 10.30 पर्यंत एसी आणि सकाळी 11 ते 11.30 पर्यंत स्लीपर तिकिटे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे प्रवासी या वेळेत तिकीट काढू शकतात.

Liquor Rates Hiked: ‘झिंगणे’ महागले! महाराष्ट्रात मद्याच्या दरांत वाढ; नेमकी किती वाढ झाली? ईथे वाचा

   Follow us on    

 

 

मुंबई: काल मंगळवारी (10 जून) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दारू विक्रीवरील करात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या महसूल वाढीच्या दृष्टीकोनातून उत्पादन शुल्क विभाग मद्यविक्रीवरील कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता मद्यप्रेमींच्या खिशाला मोठी झळ बसणार असून, त्यांचे ‘सेलिब्रेशन’ देखील महागणार आहे.
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे, मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल 14,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल वाढणार आहे. राज्य सरकारच्या महसूल वाढीच्या उद्दिष्टासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसते.
काय असतील नवे दर? 
भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या (IMFL) रू. २६०/- प्रति बल्क लिटर पर्यंत निर्मिती मूल्य घोषित केलेल्या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या ३ पट वरुन ४.५ पट करण्यात येणार. देशी मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर प्रति प्रुफ लिटर रुपये १८०/- वरुन रुपये २०५/- करण्यात येणार.
महाराष्ट्र मेड लिकर (MML) हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्रातील मद्य उत्पादक असे उत्पादन करु शकतील. त्यांना या नव्या प्रकारातील उत्पादनाची (ब्रँड) नवीन नोंदणी करुन घेणे आवश्यक राहील.
उत्पादन शुल्काच्या दरातील वाढ व अनुषंगिक एमआरपी सूत्रातील बदल यामुळे १८० मि.ली. बाटलीची किरकोळ विक्रीची किमान किंमत मद्य प्रकारनिहाय पुढीलप्रमाणे :- देशी मद्य ८० रूपये, महाराष्ट्र मेड लिकर (MML) – १४८ रूपये, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य- २०५ रूपये, विदेशी मद्याचे प्रिमियम ब्रँड – ३६० रूपये. ही वाढ थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करणार आहे.
राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीवरील कर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) दीड टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर, विदेशी मद्यावरही हा कर वाढविण्यात आल्याने आता मद्यप्रेमींसाठी हा निर्णय खिशाला झळ देणारा ठरणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search