Author Archives: Kokanai Digital

१८ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-सप्तमी – 13:37:40 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 24:23:52 पर्यंत
  • करण-भाव – 13:37:40 पर्यंत, बालव – 24:51:27 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-प्रीति – 07:39:46 पर्यंत, आयुष्मान – 29:23:43 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:01:05
  • सूर्यास्त- 19:17:48
  • चन्द्र-राशि-कुंभ – 18:36:08 पर्यंत
  • चंद्रोदय- 24:40:00
  • चंद्रास्त- 12:09:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • द्वेषयुक्त भाषणाचा प्रतिकार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस
  • आंतरराष्ट्रीय सहल दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1776 : महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात ’हळदी घाटा’ ची प्रसिद्ध लढाई झाली.
  • 1815 : वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा दारूण पराभव.
  • 1830 : फ्रान्सने अल्जेरिया ताब्यात घेतला.
  • 1908 : फिलीपिन्स विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1930 : चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
  • 1946 : डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
  • 1956 : रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
  • 1981 : प्राण्यांमध्ये पाय आणि तोंडाच्या आजाराविरूद्ध पहिली अनुवांशिक लस विकसित करण्यात आली.
  • 1983 : अंतराळवीर सॅली राइड अंतराळात जाणारी पहिली अमेरिकन महिला बनली.
  • 1987 : एम. एस. स्वामीनाथन यांना पहिला जागतिक अन्न पुरस्कार मिळाला.
  • 2009 : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पाण्याचा शोध घेण्यासाठी चंद्रावर एक विशेष उपग्रह पाठवला.
  • 2017 : किदम्बी श्रीकांत भारतीय बॅडमिंटनपटूला  इंडोनेशिया सुपर सीरिजचे जेतेपद – इंडोनेशिया सुपर सीरिज प्रिमिअरच्या पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले, असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1887 : ‘डॉ.अनुग्रह नारायण सिन्हा’ – थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, शिक्षक, राजनीतिज्ञ, तसचं, बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांचा जन्मदिन.
  • 1899 : ‘शंकर त्रिंबक’ तथा ‘दादा धर्माधिकारी’ – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 1 डिसेंबर 1985)
  • 1911 : ‘कमला सोहोनी’ – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 8 सप्टेंबर 1997)
  • 1931 : ‘के. एस. सुदर्शन’ – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5 वे सरसंघचालक यांचा जन्म. (मृत्यू: 15 सप्टेंबर 2012)
  • 1931 : ‘फर्नांडो हेन्रिक कार्डोसो’ – ब्राझील देशाचे समाजशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी तसचं, ब्राझील देशाचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1942 : ‘थाबो म्बेकी’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1942 : ‘पॉल मॅकार्टनी’ – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य यांचा जन्म.
  • 1987 : ‘मोईन अली’ – इंग्लंड देशाचे महान क्रिकेटपटू यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1858 : झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ ‘राणी लक्ष्मीबाई’ – इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: 19 नोव्हेंबर 1828)
  • 1901 : ‘रामचंद्र भिकाजी गुंजीकर’ – मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक यांचे निधन. (जन्म: 10 एप्रिल 1843)
  • 1902 : ‘सॅम्युअल बटलर’ – इंग्लिश लेखक यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1835)
  • 1936 : ‘मॅक्झिम गॉर्की’ रशियन लेखक यांचे निधन. (जन्म: 28 मार्च 1868)
  • 1958 : ‘डग्लस जार्डिन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1900)
  • 1962 : जे. आर. तथा ‘नानासाहेब घारपुरे’ – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य यांचे निधन.
  • 1974 : ‘सेठ गोविंद दास’ – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 16 ऑक्टोबर 1896)
  • 1999 : ‘श्रीपाद रामकृष्ण काळे’ – साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार यांचे निधन.
  • 2003: ‘जानकीदास’ – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते यांचे निधन.
  • 2005 : ‘मुश्ताक अली’ – भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1914)
  • 2009 : ‘उस्ताद अली अकबर खाँ’ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1922)
  • 2020 : ‘लच्छमानसिंग लेहल’  – परम विशिष्ठ सेवा वीर चक्र, मेजर-जनरल, यांचे निधन. (जन्म: 9 जुलै 1923)
  • 2021 : मिल्खा सिंग – पद्मश्री, द फ्लाइंग शीख, धावपटू, यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1935)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Goa:टेकऑफ होताच विमानाचा तोल गेला! प्रवाशांचा आक्रोश; पायलटच्या प्रसंगावधानामुळे धोका टळला

   Follow us on        

मोपा : अहमदाबाद विमानतळाजवळ  झालेल्या विमान दुर्घटनेतून देश सावरत असताना गोव्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. 172 प्रवाशांना घेऊन गोवा विमानतळावरुन उड्डाण घेताच  इंडिगोच्या विमानाचा तोल जाऊन, विमान खाली येऊ लागलं. मात्र, पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित केलं.

गोव्यातील मोपा विमानतळावरून इंडिगो कंपनीचे ६ई – ६८११ विमानाने दुपारी ३.४८ वाजता लखनऊसाठी उड्डाण घेतलं. उड्डाण घेल्यानंतर विमानाचा तोल जाऊन विमान जमिनीच्या दिशेने येऊ लागलं होतं. विमान कोसळणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. अचानक विमानाचा तोल गेल्यामुळे एकच खळबळ उडाली. या भीतीने विमानातील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. दरम्यान, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित करत सुरक्षितपणे लखनऊच्या अमौसी विमानतळावर सुरक्षितपणे विमान लँड केलं.

या घटनेनंतर इंडिगोचा वैमानिक अधिकारी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसंच विमानात देखील नेमका काय बिघाड झाला होता का? किंवा झालेला प्रकार का घडला? याचे कारण शोधण्याची मागणी केली आहे. अहमदाबाद येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर विमानांची सुरक्षा आणि देखभाल याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर आता गोव्यात घडलेल्या या घटनेमुळे १७२ प्रवासी चांगलेच घाबरले होते.

Mumbai Goa Highway: सावधान! कळंबणीमध्ये रस्ता खचल्याने धोकादायक स्थितीत

   Follow us on    

 

 

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीमध्ये रस्ता खचला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे तडे गेलेले आहेत. तर खबरदारी म्हणून स्थानिकांनी या महामार्गावर झाडाच्या फांद्या देखील टाकल्या आहेत. या खचलेल्या रस्त्यावरूनच वाहनांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. अतिशय धोकादायक असा हा मार्ग सध्या बनलेला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी येथे रस्ता खचल्याची घटना घडली आहे. वाळंजगाडी येथील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रीटला मोठे तडे गेले असून रस्ता खचायला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला असून रस्ता तात्काळ बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्थानिकांनी खबरदारी म्हणून महामार्गावर झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत. ही घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडली असली तरी काल रात्रीपासून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

१७ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-षष्ठी – 14:49:33 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 25:02:43 पर्यंत
  • करण-वणिज – 14:49:33 पर्यंत, विष्टि – 26:17:01 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-विश्कुम्भ – 09:33:41 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:00:54
  • सूर्यास्त- 19:17:34
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 24:03:59
  • चंद्रास्त- 11:13:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिवस
  • जागतिक टेसेलेशन दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1632 : मुघल सम्राट शाहजहानची पत्नी मुमताज यांचा मृत्यू. शाहजहानने तिच्या स्मरणार्थ आग्रा येथे ताजमहाल बांधला.
  • 1885 : स्टॅच्यू ऑफ लिबर्टी न्यूयॉर्क हार्बरमध्ये दाखल झाला.
  • 1929 : सोव्हिएत युनियनने चीनसोबतचे राजनैतिक संबंध संपवले.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी फ्रान्समधून माघार घेण्यास सुरुवात केली.
  • 1944 : आइसलँडने (डेन्मार्कपासून) स्वातंत्र्य घोषित केले आणि प्रजासत्ताक बनले.
  • 1961 : भारतात निर्मित स्वदेशी एच.एफ-24 सुपर सोनिक लढाऊ विमानाणे भरारी घेतली.
  • 1967 : चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.
  • 1970 : शिकागो येथे पहिली मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
  • 1991 : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.
  • 2006 : कॅझसॅट या कझाकस्तानच्या पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1239 : ‘एडवर्ड (पहिला)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 7 जुलै 1307)
  • 1704 : ‘जॉन के’ – फ्लाइंग शटल चे शोधक यांचा जन्म.
  • 1867 : ‘जॉनरॉबर्ट ग्रेग’ – लघुलेखन पद्धतीचा शोधक यांचा जन्म.
  • 1898 : ‘कार्ल हेर्मान’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1903 : ‘बाबूराव विजापुरे’ – संगीतशिक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 7 डिसेंबर 1982)
  • 1903 : ‘रुथ ग्रेव्हस वेकफिल्ड’ – चॉकोलेट चिप कुकी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 10 जानेवारी 1977)
  • 1920 : ‘फ्रांस्वा जेकब’ नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1973 : ‘लिएंडर पेस’ – भारतीय टेनिसपटू यांचा जन्म.
  • 1980 : ‘वीनस विलियम्स’ – महान अमेरिकन टेनिसपटू यांचा जन्मदिन.
  • 1981 : ‘शेन वॉटसन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1981 : ‘अमृता राव’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1631 : ‘मुमताज महल’ – शाहजहानची पत्नी यांचे निधन. (जन्म: 27 एप्रिल 1593)
  • 1297 : ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. (जन्म: 29 जानेवारी 1274)
  • 1674 : ‘राजमाता जिजाबाई’ – यांचे निधन. (जन्म: 12 जानेवारी 1598)
  • 1893 : ‘लॉर्ड विल्यम बेंटिंक’ – भारताचे 14 वे राज्यपाल जनरल यांचे निधन. (जन्म: 14 सप्टेंबर 1774)
  • 1895 : ‘गोपाल गणेश आगरकर’ – थोर समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 14 जुलै 1856)
  • 1928 : ‘गोपबंधूदास’ – ओरिसातील समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 9 ऑक्टोबर 1877)
  • 1965 : ‘मोतीलाल राजवंश’ – अभिनेते यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1910)
  • 1983 : ‘शरद पिळगावकर’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांचे निधन.
  • 1996 : ‘बाळासाहेब देवरस’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1915)
  • 2004 : ‘इंदुमती पारीख’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Important Notice: कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना.

   Follow us on        

Konkan Railway: पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे पावसाळी वेळापत्रक १५ जून २०२५ ते २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत लागू केले जाणार आहे.

प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट NTES म्हणजेच enquiry.indianrail.gov.in किंवा ऑल इंडिया रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ वर ट्रेनच्या वेळा तपासाव्यात.

कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्हाला मनापासून वाईट वाटते आणि तुमच्या सहकार्याबद्दल आणि समजुतीबद्दल धन्यवाद.

कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड (KRCL)

Loading

१६ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-पंचमी – 15:34:43 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 25:14:40 पर्यंत
  • करण-तैतुल – 15:34:43 पर्यंत, गर – 27:15:24 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-वैधृति – 11:06:19 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:00:46
  • सूर्यास्त- 19:17:18
  • चन्द्र-राशि-मकर – 13:10:55 पर्यंत
  • चंद्रोदय- 23:26:59
  • चंद्रास्त- 10:18:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय कौटुंबिक प्रेषण दिवस
  • जागतिक रिफिल दिवस
  • आफ्रिकन मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस
  • जागतिक समुद्री कासव दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1903 : फोर्ड मोटर कंपनी सुरू झाली.
  • 1911 : न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग तथा आय. बी. एम. कंपनीची स्थापना.
  • 1914 : लोकमान्य टिळकांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
  • 1947 : नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
  • 1963 : व्हॅलेंटिना रेशकोवा अंतराळात प्रवास करणारी पहिली महिला अंतराळवीर ठरली.
  • 1990 : मुंबई शहरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली, 104 वर्षातील एका दिवसात 600.42 मि.मी. पावसाचा उच्चांक.
  • 2010 : तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरला.
  • 2013 : उत्तराखंडवर केंद्रित असलेल्या ढगफुटीमुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, 2004 च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती बनली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1723 : ‘अ‍ॅडम स्मिथ’ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1790)
  • 1920 : ‘हेमंत कुमार’ – गायक, संगीतकार आणि निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 26 सप्टेंबर 1989)
  • 1936 : ‘अखलाक मुहम्मद खान’ – प्रसिद्ध ऊर्दू कवी यांचा जन्म. (मृत्यू: 13 फेब्रुवारी 2012)
  • 1950 : ‘मिथुन चक्रवर्ती’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
  • 1992 : ‘शीना बजाज’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1994 : ‘आर्या आंबेकर’ – मराठी पार्श्वगायिका आणि अभिनेत्री यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1869 : ‘चार्ल्स स्टर्ट’ – भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक यांचे निधन. (जन्म: 28 एप्रिल 1795)
  • 1925 : ‘चित्तरंजन दास’ – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू यांचे निधन.
  • 1930 : ‘एल्मर अॅम्ब्रोज स्पीरी’ – गायरो होकायंत्र चे सहसंशोधक यांचे निधन.
  • 1944 : ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1971 : ‘जॉन रीथ’ – बीबीसी चे सह-संस्थापक यांचे निधन.
  • 1977 : मराठी रंगभूमीवरील गायक-नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचे निधन.
  • 1995 : ‘शुद्धमती माई मंगेशकर’ – दीनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Panvel Express: पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा

   Follow us on    

 

 

मुंबई: पुणे आणि कोकण जोडणारी विशेष गाडी सुरु करण्यात यावी किंवा गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल (पनवेल एक्सप्रेस) या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघटनांनी केली आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांचे केंद्रीय विमान वाहतूक तसेच सहकार राज्यमंत्री यांना साकडे.

सध्या २२१४९/५० पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस ही एकमेव गाडी पुण्याहून कोकणमार्गे चालवली जाते. मात्र ही गाडी आठवड्यातून फक्त दोन दिवसच धावत असून कोकणात काही मोजक्याच स्थानकावर थांबा घेत असल्याने या गाडीची सेवा अपुरी पडते. त्यामुळे पुणे आणि कोकण जोडणारी विशेष गाडी सुरु करण्यात यावी किंवा गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) वतीने संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी केंद्रीय विमान वाहतूक तसेच सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन दिले आहे.

“आपण पुणे – जोधपूर ही नवीन रेल्वे पुण्यातून सुरू केलीत, आणि आता आपण पुणे – रीवा वाया जबलपूर ही रेल्वे गाडीची घोषणा केलीत, फक्त एका वर्षात आपण रेल्वे संदर्भात जे कार्य केले आहे त्याला प्रेरित होऊन आम्ही कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, आपल्याला विनंती करत आहोत की पुण्याहून सावंतवाडीसाठी देखील नवीन रेल्वे किंवा सध्या सुरू असलेली १७६१३/१४ नांदेड – पुणे – पनवेल या दैनिक गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करावा, जेणेकरून पुण्यात राहणाऱ्या लाखो कोकणी जनतेला याचा फायदा होईल.” अशी विनंती करणारे निवेदन त्यांना देण्यात आले आहे. या बरोबरच सावंतवाडी टर्मिनस स्थानकावरील विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच स्थानकाचा विकास करण्यासाठी या स्थानकाचा समावेश ‘अमृत भारत स्थानक योजने’त समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे.

गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे करण्यात आलेली आहे. या समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी अशी मागणी करणारे निवेदन समितीच्या वतीने संबंधित रेल्वे आस्थापना आणि अधिकाऱ्यांना दिले आहे.

या गाडीसाठी एका अतिरिक्त रेकची सोया करून तिचा विस्तार केला गेल्यास मराठवाडा-पुणे-कोकण अशी कनेक्टिव्हिटी मिळेल. या गाडीचा विस्तार करताना तिला पेण, नागोठणे, रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे.

याशिवाय ही गाडी पुणे-कर्जत-कल्याण- पनवेल या मार्गाने चालविण्यात यावी. जेणेकरून ‘लोको रिव्हर्सल’ साठी लागणार वेळही वाचेल आणि कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या प्रवाशांचीही सोय होईल. त्याच प्रमाणे या गाडीला आधुनिक एलएचबी कोच जोडण्यात यावेत अशी मागणी करण्यात या निवेदनांत करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल ही नांदेड (NED) ते पनवेल (PNVL) दरम्यान चालणारी एक्सप्रेस गाडी आहे. गाडी क्रमांक १७६१४ नांदेड-पनवेल ही नांदेड येथून संध्याकाळी ६:२० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३५ वाजता पनवेलला पोहोचते. परतीच्या प्रवासासाठी, गाडीक्रमांक १७६१३ पनवेल येथून दुपारी ४:०० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:४५ वाजता नांदेडला पोहोचते.

१५ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-चतुर्थी – 15:54:22 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 25:00:56 पर्यंत
  • करण-बालव – 15:54:22 पर्यंत, कौलव – 27:47:39 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-इंद्रा – 12:18:48 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:03
  • सूर्यास्त- 19:15
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 22:47:00
  • चंद्रास्त- 09:20:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस
  • जागतिक पवन दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1667 : वैद्यकीय इतिहासात प्रथमच, जॉन बॅप्टिस्ट डेनिस या डॉक्टरने 15 वर्षांच्या फ्रेंच मुलाच्या शरीरात कोकरूचे रक्त टोचले.
  • 1762 : ऑस्ट्रिया देशांत कागदी नोटाचे चलन सुरु करण्यात आले.
  • 1844 : चार्ल्स गुडइयरने रबरच्या व्हल्कनीकरणाचे पेटंट घेतले.
  • 1869 : महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
  • 1908 : कलकत्ता स्टॉक एक्सचेंज सुरू झाले.
  • 1919 : कॅप्टन जॉन अल्कॉक, लेफ्टनंट आर्थर ब्राउन यांनी अटलांटिक महासागर ओलांडून पहिले उड्डाण केले.
  • 1970 : बा. पां. आपटे पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.
  • 1977 : स्पेनमध्ये 40 वर्षांनी मुक्त निवडणुका झाल्या.
  • 1993 : संपूर्ण देशी बनावटीच्या सहा ‘अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द करण्यात आली.
  • 1994 : इस्रायल आणि व्हॅटिकन सिटी यांच्यात पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • 1997 : सर्वोच्च न्यायालयाने अजामीनपात्र गुन्ह्यातील आरोपी फरार असल्यास, त्याच्याविरुद्ध आरोपपत्र नसतानाही न्यायाधीश अटक वॉरंट जारी करू शकतात, असा ऐतिहासिक निर्णय दिला.
  • 2001 : ग्रँडमास्टर विजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी राष्ट्रीय ‘अ’ बुद्धिबळ स्पर्धा विक्रमी पाचव्यांदा जिंकली.
  • 2007 : जागतिक पवन दिवस वार्षिक कार्यक्रमाची सुरुवात, युरोपियन विंड एनर्जी असोसिएशन द्वारे पवन ऊर्जेच्या स्वच्छ, नूतनीकरणीय स्त्रोताला प्रोत्साहन देण्यासाठी केली गेली.
  • 2008 : लेहमन ब्रदर्स या वित्तसंस्थेने दिवाळखोरी जाहीर केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1878 : ‘गोल्फर मार्गारेट अॅबॉट’ – भारतीय-अमेरिकन यांचा जन्म. (मृत्यू: 10 जून 1955)
  • 1898 : ‘गजानन श्रीपत’ तथा ‘अण्णासाहेब खेर’ – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 29 ऑगस्ट 1986)
  • 1907 : ‘ना. ग. गोरे’ – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आणि समाजवादी विचारवंत यांचा जन्म.
  • 1917 : ‘सज्जाद हुसेन’ – संगीतकार मेंडोलीनवादक यांचा जन्म.
  • 1923 : ‘केशवजगन्नाथ पुरोहित’ ऊर्फ ‘शांताराम’ – साहित्यिक यांचा जन्म.
  • 1927 : ‘इब्न-ए-इनशा’ – भारतीय-पाकिस्तानी कवी आणि लेखक यांचा जन्म.
  • 1928 : ‘शंकर वैद्य’ – साहित्यिक यांचा जन्म.
  • 1929 : ‘सुरैय्या जमाल शेख’ – गायिका व अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 31 जानेवारी 2004)
  • 1932 : ‘झिया फरिदुद्दीन डागर’ – धृपद गायक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 2013)
  • 1933 : ‘सरोजिनी वैद्य’ – लेखिका यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 2007)
  • 1937 : ‘अण्णा हजारे’ – समाजसेवक यांचा जन्म.
  • 1947 : ‘प्रेमानंद गज्वी’ – साहित्यिक आणि नाटककार यांचा जन्म.
  • 1950 : ‘लक्ष्मी मित्तल’ – भारतीय-इंग्रजी व्यापारी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1534 : योगी चैतन्य महाप्रभू यांचे निधन. (जन्म: 18 फेब्रुवारी 1486)
  • 1931 : ‘अच्युत बळवंत कोल्हटकर’ – अर्वाचीन मराठीतील सुलभ लेखन शैलीचे प्रवर्तक, संदेशकार यांचे निधन.
  • 1979 : ‘सूर्यकांत रामचंद्र खांडेकर’ – कवी गीतकार यांचे निधन. (जन्म: 2 एप्रिल 1926)
  • 1983 : ‘श्रीरंगम श्रीनिवास’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी गीतकार यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1910)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Samruddi Expressway: आता बोगद्यांमध्ये सुद्धा फुल्ल मोबाईल नेटवर्क मिळणार

   Follow us on    

 

 

कल्याण : महामार्गावरील बोगद्यांमधून प्रवास करत असताना मोबाईलवरून बोलत असताना प्रवाशांचे संभाषण मोबाईल नेटवर्क अभावी अचानक खंडित होते. प्रवाशांची ही अडचण विचारात घेऊन बोगद्यांमध्ये आणि महामार्गावर कोणत्याही भागात मोबाईल सुरू राहावेत यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावरील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात प
बोगद्यांच्या बाहेर आणि महामार्गाच्या अन्य भागात मोबाईल मनोरे आणि बोगद्यांमध्ये आवश्यक मोबाईल जाळे उभारणीचा निर्णय घेतला आहे.
शहापूर तालुक्यातील समृध्दी महामार्गाचा भाग हा १२ किलोमीटर लांबीच्या कसारा घाट डोंगर रांगांमधून गेला आहे. या घाट मार्गावरील शहापूर ते इगतपुरी डोंगर रांगांमध्ये सर्वाधिक बोगदे आहेत. खर्डी गाव परिसरातील फुगाळे ते वाशाळा गाव हद्दीतील डोंगर रांगांमधील आठ किलोमीटरचा बोगदा हा या महामार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याची उभारणी करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी समृध्दी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे (भिवंडी) या ७६ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे लोकार्पण करण्यात आले.
मुंबई ते नागपूर राज्याच्या नऊ जिल्ह्यांमधून गेलेल्या समृध्दी महामार्गाला तालुका, जिल्ह्याप्रमाणे महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी बाह्यवळणे आहेत. कमी वेळात सुसाट वेगाने प्रवास करण्यासाठी नागरिक या महामार्गाला पसंती देत आहेत.प्रवासात बहुतांशी प्रवासी मोबाईलवर संभाषण सुरू करतात. हे प्रवासी ठाणे जिल्ह्यातील शहापूर परिसरातील डोंगर रांगांमध्ये, कसारा, इगतपुरी घाट मार्गावरील बोगद्यांमधून जात असताना काही ठिकाणी, बोगद्यांमध्ये मोबाईलवरील मोबाईल जाळ्यांअभावी खंडित (डिसकनेक्ट) होत होते. समृध्दीवरील बोगद्यांमध्ये वाहन गेल्यावर मोबाईलचे जाळे (नेटवर्क) गायब होत होते. याविषयी अनेक जागरूक प्रवाशांनी शासनाकडे तक्रारी केल्या होत्या.
प्रवाशांच्या सूचनांची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाने शहापूर तालुक्यातील समृध्दीच्या बोगदे असलेल्या भागात, महामार्गावर ज्याठिकाणी मोबाईल जाळ्याच्या अडचणी आहेत तेथे मोबाईल मनोरे उभारणीची कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. शहापूर, कसारा, इगतपुरी परिसरातील पाचही बोगद्यांमधून जात असताना प्रवाशांना मोबाईल खंडित होण्याचा अनुभव येऊ नये यासाठी बोगद्यांमध्ये ठराविक अंतराने राऊटर, कनेक्टर बसविण्यात येणार आहेत. लिकी केबल्सच्या माध्यमातून बिनतारी संदेशवहन यंत्रणा बोगद्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. राऊटरला रेंज येण्यासाठी एक्सटेंडर, बुस्टर सुविधा बसविण्यात येणार आहे, असे एमएमआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Vande Bharat Express: महाराष्ट्रातील अजून दोन जिल्ह्य़ांना मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची सेवा

   Follow us on    

 

 

मुंबई : राज्यभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात असून प्रत्येक जिल्ह्यात वंदे भारत धावण्यासाठी तिचे विस्तारीकरण केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना या मार्गावर धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार आहे. तसेच या गाडीला परभणी रेल्वे स्थानकात थांबा दिला आहे. त्यामुळे ही वंदे भारत आणखीन दोन जिल्ह्यांना जोडली जाणार आहे.
मुंबईत ये-जा करण्यासाठी, प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी, प्रवाशांना आरामदायी सेवा पुरविण्यासाठी राज्यासह देशभरातील महत्त्वाची ठिकाणे वंदे भारतने जोडली जात आहेत. गांधीनगर, शिर्डी, सोलापूर, मडगाव या धार्मिक, व्यावसायिक, शैक्षणिक स्थळांना वंदे भारत जोडली आहे. तसेच मुंबई ते जालना या वंदे भारतमुळे नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना जोडली आहे.
आता या मार्गाचा विस्तार झाल्याने परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईत येण्यासाठी पर्यायी सोय उपलब्ध झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस हुजूर साहिब नांदेड या रेल्वे स्थानकापर्यंत चालवण्याची मागणी होती. प्रवाशांच्या मागणीवर विचार करून रेल्वे मंडळाने १२ जून रोजी विस्तारीकरणाला मंजुरी दिली आहे.
स्थानक – स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी १.१० वाजता
  • दादर – दुपारी १.१७ वाजता / दुपारी १.१९ वाजता
  • ठाणे – दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता
  • कल्याण – दुपारी २.०४ वाजता / २.०६ वाजता –
  • नाशिक रोड – दुपारी ४.१८ वाजता / दुपारी ४.२० वाजता
  • मनमाड जंक्शन – सायंकाळी ५.१८ वाजता / सायंकाळी ५.२० वाजता –
  • अंकाई – सायंकाळी ५.५० वाजता –
  • छत्रपती संभाजीनगर – सायंकाळी ७.०५ वाजता / सायंकाळी ७.१० वाजता –
  • जालना – रात्री ८.५० वाजता / रात्री ८.०७ वाजता
  • परभणी – रात्री ९.४३ वाजता / रात्री ९.४५ वाजता
  • हुजूर साहिब नांदेड – रात्री ११.५० वाजता
स्थानक – स्थानकात येण्याची वेळ/ स्थानकातून सुटण्याची वेळ
  • हुजुर साहिब नांदेड – पहाटे ५.०० वाजता
  • परभणी – पहाटे ५.४० वाजता / पहाटे ५.४२ वाजता –
  • जालना – सकाळी ७.२० वाजता / सकाळी ७.२२ वाजता –
  • छत्रपती संभाजीनगर – सकाळी ८.१३ वाजता / पहाटे ८.१५ वाजता
  • अंकाई – सकाळी ९.४० वाजता
  • मनमाड जंक्शन – सकाळी ९.५८ वाजता / सकाळी १०.०३ वाजता –
  • नाशिक रोड – सकाळी ११ वाजता / सकाळी ११.०२ वाजता
  • कल्याण जंक्शन – दुपारी १.२० वाजता / दुपारी १.२२ वाजता
  • ठाणे – दुपारी १.४० वाजता / दुपारी १.४२ वाजता
  • दादर – दुपारी २.०८ वाजता / दुपारी २.१० वाजता –
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दुपारी २.२५ वाजता
दोन्ही दिशेकडून येणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड अंकाई, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी येथे थांबे देण्यात आले आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search