Author Archives: Kokanai Digital

कोकण – पश्चिम महाराष्ट्र जोडणारा महामार्ग धोकादायक अवस्थेत

   Follow us on        

चिपळूण : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी पहाटे संरक्षक भिंत कोसळली असून या भागातील लोखंडी रेलिंगही निखळले आहे. घाटात खोल दरीच्या बाजूने असलेली ही भिंत कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पोलिसांकडून खचलेल्या ठिकाणी दगड, पिंप उभे करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे.
या घाटात गेल्या 2 वर्षात कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला आहे. यामध्ये संरक्षक भिंतीसह रस्ता दुरुस्तीचा समावेश आहे. मात्र कितीही कोटी या घाटातील दुरुस्तीवर, सुरक्षेच्या उपाययोजनांवर खर्च केले तरीही पावसाळ्यात दरवर्षी हा घाट धोकादायक बनत आला आहे. दरड कोसळणे, केलेली बांधकामे ढासळणे हे नित्याचेच झाले आहे.

शनिवारी कोसळलेल्या संरक्षक भिंतीमुळे यावर्षीचा पावसाळा कसा जाणार, याचीच चिंता वाहनचालकांना लागून राहिली आहे. या घाटातून दररोज शेकडो वाहने जात-येत असतात. सध्या घाटात तीन ठिकाणी रस्ता खचण्याचे व संरक्षक भिंत कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. सद्यस्थितीत खचलेल्या रस्ता ठिकाणी वाहने जाऊ नयेत म्हणून तेथे फक्त दगड आणि काही ठिकाणी पिंप उभी करून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.
पावसाळ्यात हा रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच पावसाळ्यात अवजड वाहतूक असणाऱ्या घाट परिसरात आधीच दृश्यमानता कमी झाल्याने अवजड वाहनांसह मोठी वाहतूक कोंडी होते. त्यात आता रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या संरक्षक भिंतीसह रेलींगही निखळल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, प्रशासनाने अद्याप कोणतीही मोठी यंत्रसामुग्री पाठवली नसल्याने स्थानिकांनी उच्च आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

०८ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-द्वादशी – 07:20:43 पर्यंत
  • नक्षत्र-स्वाति – 12:42:48 पर्यंत
  • करण-बालव – 07:20:43 पर्यंत, कौलव – 20:31:45 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-परिघ – 12:17:20 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:03
  • सूर्यास्त- 19:13
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 16:48:59
  • चंद्रास्त- 28:07:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :

  • जागतिक महासागर दिवस
  • जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1670 : पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत मिळवला.
  • 1624 : पेरूमध्ये भूकंप.
  • 1707 : औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, त्याचे दोन पुत्र, मुअज्जम आणि आझमशाह, दिल्लीच्या तख्तासाठी लढले. यात मुअज्जमने आझमशहाला ठार मारून दिल्लीचे तख्त बळकावले.
  • 1713 : 1689 मध्ये मुघलांनी जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधीने सिद्दीकींच्या राजकारणातून जिंकला.
  • 1783 : आइसलँडमधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अनेकांचा मृत्यू झाला.
  • 1912 : कार्ल लेमले यांनी युनिव्हर्सल पिक्चर्सची स्थापना केली.
  • 1915 : मंडाले येथील तुरुंगात असताना लिहिलेले लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
  • 1918 : सर्वात तेजस्वी तेजोमेघाचा शोध, नोव्हा अक्विला.
  • 1936 : इंडियन स्टेट ब्रोडकास्टिंग सेवेचे नाव ऑल इंडिया रेडिओ करण्यात आले.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी सीरिया आणि लेबनॉनवर कब्जा केला.
  • 1948 : एअर इंडियाने मुंबई-लंडन सेवा सुरू केली.
  • 1948 : जॉर्ज ऑर्वेलची 1984 ही कादंबरी प्रकाशित झाली.
  • 1953 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हॉटेलमध्ये कृष्णवर्णीयांना सेवा नाकारण्यावर बंदी घातली.
  • 1968 : बर्मोडा देशाने संविधान अंगिकारले.
  • 1969 : लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.
  • 1992 : जागतिक महासागर दिवस प्रथमच साजरा करण्यात आला.
  • 2004 : आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण 1882 या वर्षी झाले होते.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1906 : ‘सैयद नझीर अली’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1910 : ‘दिनकर केशव’ तथा ‘दि. के. बेडेकर’ – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1973)
  • 1915 : ‘काययार सिंहनाथ राय’ – भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 2015)
  • 1917 : ‘गजाननराव वाटवे’ – भावगीत गायक यांचा जन्म. (मृत्यू: 2 एप्रिल 2009)
  • 1921 : ‘सुहार्तो’ – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 2008)
  • 1925 : ‘बार्बरा बुश’ – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी व जॉर्ज डब्ल्यु. बुश यांची आई यांचा जन्म.
  • 1932 : ‘रे इलिंगवर्थ’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1936 : ‘केनिथ गेडीज विल्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1955 : ‘टिम बर्नर्स-ली’ – वर्ल्ड वाईड वेब चे जनक यांचा जन्म.
  • 1957 : ‘डिंपल कपाडिया’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1975 : ‘शिल्पा शेट्टी’ – भारतीय अभिनेत्री आणि निर्माता यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 632 : 632 ई.पुर्व : ‘मोहंमद पैगंबर’ – इस्लाम धर्माचे संस्थापक यांचे निधन.
  • 1795 : ‘लुई 17 वा’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 27 मार्च 1785)
  • 1809 : ‘थॉमस पेन’ – अमेरिकन विचारवंत राजकारणी यांचे निधन. (जन्म: 29 जानेवारी 1737)
  • 1845 : ‘अन्ड्रयू जॅक्सन’ – अमेरिकेचे 7वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 15 मार्च 1767)
  • 1995 : ‘राम नगरकर’ – रंगभूमी कलावंत एकपात्री प्रयोगकार यांचे निधन.
  • 1998 : ‘सानी अबाचा’ – नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

“Happy Birthday Mandovi Express!” मांडवी एक्सप्रेसचा २६ वा वाढदिवस मुंबईत उत्साहात आणि जल्लोषात साजरा

   Follow us on        

मुंबई: तत्कालीन रेल्वेमंत्री श्री. नितीश कुमार यांनी रेल्वे अर्थसंकल्पात सांगितल्यानुसार १ जुलै, १९९९ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरु झाली. मुंबई गोवा मार्गावर दिवसाची सेवा देणारी ही पहिलीच एक्सप्रेस होती. तत्पूर्वी सुरु असणारी कोकणकन्या एक्सप्रेस रात्रीची सेवा देत होती तर दिवा सावंतवाडी पॅसेंजर संथ गतीने जात असल्यामुळे लांबच्या प्रवाशांना अडचणी येत होत्या. कोकणवासीयांना दिवसाच्या जलद प्रवासाची सवय याच इंटरसिटी एक्सप्रेसने लावली.

गेज बदलण्यापूर्वी मिरज वास्को दरम्यान मांडवी एक्सप्रेस धावत असे. परंतु ब्रॉडगेज मार्ग झाल्यावर ती बंद करण्यात आली व मुंबई मडगाव दरम्यानच्या इंटरसिटी एक्सप्रेसचे नामकरण मांडवी एक्सप्रेस म्हणून करण्यात आले. तसेच पूर्वी केवळ आसनी डबे असणाऱ्या गाडीचे रेक नंतर कोकणकन्या एक्सप्रेस सोबत एकत्रित करण्यात आल्यामुळे मांडवी एक्सप्रेसला स्लीपर डबे मिळाले. पुढे १० जून, २०१९ पासून या दोन्ही गाड्यांना आधुनिक एलएचबी डबे देण्यात आले. १ फेब्रुवारी,२०२४ पासून मांडवी एक्सप्रेसला दोन अद्ययावत एसी थ्री टायर इकॉनॉमी डबे जोडण्यात आले. अशाप्रकारे वेगवेगळी स्थित्यंतरं पाहत मांडवी एक्सप्रेस गेली २६ वर्षे कोकणवासीयांची अविरत सेवा करत आहे.

रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवार दि. ७ जून, २०२५ सकाळी ६ पासून रेल्वेप्रेमींनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.

सर्वप्रथम रेल्वेप्रेमींनी रात्रभर जागून गाडीचे इंजिन सजवले. त्यानंतर पहाटे ५:४५ ला मडगावहून कोकणकन्या एक्सप्रेस मुंबईत दाखल झाल्यानंतर गाडीचे काही डबेही सजवण्यात आले. चिन्मय कोले यांनी नारळ वाढवून पुढील कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशा व तुतारीच्या गजरात गाडीचे इंजिन जोडण्यात आले. गाडीचे चालक (लोको पायलट व सहाय्यक लोको पायलट), तिकीट तपासनीस, पॅन्ट्री कार कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांच्याच हस्ते केक कापून हा कार्यक्रम साजरा झाला.

यासाठी चिन्मय कोले, साहिल कोसिरेड्डी, अमित फाटक, राहुल नायर, जिनेश सावंत, शुभम नागपुरे, अभय आभाळे, अनुष जाधव, यश राणे, ओमकार फाटक, आदित्य कांबळी आणि अक्षय महापदी यांनी विशेष मेहनत घेतली. यातील काही रेल्वेप्रेमी केवळ या कामासाठी रात्री पुण्याहून मुंबईला येऊन सकाळी पुन्हा पुण्याला गेले.याचसोबत श्रेयश हुले, मंदार सहस्त्रबुद्धे, पौरव शहा, दीपक नागमोती, सुमन घोष, जोशुआ मेंडोसा, प्रथमेश प्रभू, सुनीत चव्हाण, निलेश परुळेकर, परम, इंद्रजित रावराणे, रोहित नायर, अभिषेक असोलकर, तमिळ सेल्व्हन, पवन, प्रणित शिवलकर, निलय काटदरे, जयशंकर, कमल, जेसन कोएल्हो, मिहीर मठकर, सौरभ सावंत, धनुष चंदन, कुणाल जाधव, तेजस भिवंडे, हिमांशू शर्मा, टायरोन डिसूझा, चिंतन नाईक यांनीही सहकार्य केले.

Ξ श्री. अक्षय महापदी 

 

Kolhapur: कोयना, महाराष्ट्र एक्स्प्रेसला गांधीनगर, रुकडी येथे थांबा देण्याचा निर्णय

   Follow us on        

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटणाऱ्या कोयना व महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वेला गांधीनगर, रुकडी व ताकारी येथे थांबे देण्याचा मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.मध्य रेल्वेची १२६ वी क्षेत्रीय सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे मध्य रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ही निर्णय घेण्यात आला. सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी यांनी ही माहिती दिली.कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस व हुबळी-पुणे वंदे भारतला कराड येथे थांबा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्याच वेळी येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी कोल्हापूरहून पंढरपूरला विशेष गाड्या सोडणार असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेसचा विशेष दर्जा काढून सर्वसाधारण आकारणी करण्याचे ठरले.सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यासंबंधी प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी लवकर सोडण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.सांगली-परळी एक्स्प्रेस सध्या डेमू धावतो, त्याऐवजी आयसीएफ कोचने सोडण्याचा मागणीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. यावेळी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, किशोर भोरावत, गोपाळ तिवारी व गजाधर मानधना उपस्थित होते

Thane: गणेशोत्सव रेल्वे आरक्षणासाठी ठाणे स्थानकावर दोन अतिरिक्त खिडक्या उघडणार

   Follow us on        

Thane: गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार आहे. या खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले 4 वर्ष लावून धरली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेने ही मागणी नरेश म्हस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लागला आहे.

खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे 7 मे रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला. या पत्राची तातडीने दखल घेत 2 जून रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. 20 जून ते 5 जुलै 2025 या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत.

सध्या 4 आरक्षण खिडक्या कार्यरत असून 2 अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत. 6 आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे. आपल्या खासदारकीच्या पाहिल्याच टर्ममध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी अनेक रेल्वे विषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल प्रवासी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.

 

०७ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-द्वादशी – पूर्ण रात्र पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 09:40:30 पर्यंत
  • करण-भाव – 18:06:36 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वरियान – 11:16:29 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:00:01
  • सूर्यास्त- 19:14:27
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 15:58:59
  • चंद्रास्त- 27:29:00
  • ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
  • जागतिक अन्न सुरक्षा दिवस
  • जागतिक काळजी दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1893 : महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली.
  • 1938 : डी. सी. चार प्रकारच्या विमानाचे पहिले उड्डाण.
  • 1965 : यूएस सर्वोच्च न्यायालयाने विवाहित जोडप्यांकडून गर्भनिरोधक वापरण्यास कायदेशीर मान्यता दिली.
  • 1975 : पहिला क्रिकेट विश्वचषक इंग्लंडमध्ये सुरू झाला
  • 1979- भारताचा दुसरा उपग्रह भास्कर -एक सोव्हिएत रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आला.
  • 1981 : इस्रायलने इराकची ओसिराक अणुभट्टी नष्ट केली.
  • 1985 : बोरिस बेकर सतराव्या व्या वर्षी विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
  • 1991 : फिलीपिन्समधील माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.
  • 1994 : आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
  • 1999 : इंडोनेशियामध्ये 1955 नंतर प्रथमच लोकशाही निवडणुका झाल्या.
  • 2001 : युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.
  • 2004 : शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.
  • 2006 : इराकमधील अल कायदाचा म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारला गेला.
  • 2008  : अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी स्टेम सेल संशोधनाला मान्यता देण्याच्या विरोधात दुसऱ्यांदा व्हेटोचा वापर केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1837 : ‘अ‍ॅलॉइस हिटलर’ – अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे वडील यांचा जन्म. (मृत्यू: 3 जानेवारी 1903)
  • 1913 : ‘मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष’ – लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 2010)
  • 1914 : ‘ख्वाजा अहमद’ तथा ‘के. ए. अब्बास’ – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 1 जुन 1987)
  • 1917 : ‘डीन मार्टिन’ – अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 25 डिसेंबर 1995)
  • 1942 : ‘मुअम्मर गडाफी’ – लिबियाचा हुकूमशहा यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑक्टोबर 2011)
  • 1974 : ‘महेश भूपती’ – भारतीय टेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1975 : ‘एकता कपूर’ – भारतीय चित्रपट निर्माता आणि संचालक यांचा जन्म.
  • 1981 : ‘अमृता राव’ – मराठी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1821 : ‘ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु’ – रोमेनियाचे क्रांतिकारी यांचे निधन.
  • 1954 : ‘ऍलन ट्युरिंग’ – ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 23 जुन 1912)
  • 1970 : ‘इ. एम. फोर्स्टर’ – ब्रिटिश साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1879)
  • 1978 : ‘रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड’ – नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1992 : ‘डॉ. स. ग. मालशे’ – मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1921)
  • 1992 : ‘बिल फ्रान्स सीनियर’ – नासकार चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 26 सप्टेंबर 1909)
  • 2000 : ‘गोपीनाथ तळवलकर’ बालसाहित्यिक यांचे निधन. (जन्म: 29 नोव्हेंबर 1907)
  • 2002 : बसप्पा दानप्पा तथा ‘बी. डी. जत्ती’ – भारताचे उपराष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 10 सप्टेंबर 1912)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Chhatrapati Shiavaji Maharaj Statue in Japan: मूळ अंबरनाथकर आणि जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक (योगी) यांनी जपानमध्ये उभारला शिवरायांचा पुतळा

   Follow us on        
टोकियो, जपान:अंबरनाथचे सुपुत्र व टोकियो आमदार असलेले योगेंद्र पुराणिक (योगी) यांनी  पुढाकार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा टोकियो येथे उभारण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मितेचा गौरव करणाऱ्या या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे.
मा. योगेंद्र पुराणिक यांचे बालपण अंबरनाथमधील कानसई परिसरात गेले असून, त्यांनी आपले शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय, अंबरनाथ येथून पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी जपानमध्ये गेलेल्या योगी पुराणिक यांनी तिथे समाजकारणात सक्रिय भाग घेत जपानमध्ये निवडून आलेले पहिले भारतीय आमदार म्हणून ऐतिहासिक ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत-जपान सांस्कृतिक मैत्री अधिक दृढ होत आहे
या पवित्र स्मारकाला अंबरनाथचे माजी नगरधायक्ष श्री.सुनील चौधरी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवरायांना अभिवादन केले. भेटीदरम्यान श्री सुनील चौधरी टोकियोतील मराठी व भारतीय समाजातील प्रतिनिधींशीही संवाद साधला.

०६ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • दिनांक : 6 जून 2025
  • वार : शुक्रवार
  • माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
  • माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
  • ऋतु : ग्रीष्म
  • आयन : उत्तरायण
  • पक्ष : शुक्ल पक्ष
  • तिथी : एकादशी तिथी (7 जून पहाटे 04:47 पर्यंत) त्यानंतर द्वादशी तिथी
  • नक्षत्र : हस्त नक्षत्र (सकाळी 06:44 पर्यंत) त्यानंतर चित्रा नक्षत्र
  • योग : व्यातीपात योग (सकाळी 10:12 पर्यंत) त्यानंतर वरीयान योग
  • करण : वाणीजा करण (दुपारी 03:31 पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
  • चंद्र राशी : कन्या राशी (रात्री 08:06 पर्यंत) त्यानंतर तुळ राशी
  • सूर्य राशी : वृषभ राशी
  • अशुभ मुहूर्त:
  • राहु काळ : सकाळी 10:58 ते दुपारी 12:37 पर्यंत
  • शुभ मुहूर्त:
  • अभिजित : दुपारी 12:11 ते दुपारी 01:04
  • सूर्योदय : सकाळी 06:09
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:18
  • संवत्सर : विश्वावसु
  • संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
  • विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
  • शक संवत: 1947 शक संवत
जागतिक दिन :
  • रशियन भाषा दिवस
  • जागतिक हरित छप्पर दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1674 : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
  • 1808 : जोसेफ बोनापार्टला स्पेनचा राजा म्हणून घोषित करण्यात आले.
  • 1833 : अँड्र्यू जॅक्सन रेल्वेने प्रवास करणारे पहिले अमेरिकन राष्ट्रप्रमुख बनले.
  • 1882 : मुंबईत चक्रीवादळ. अनेक ठार.
  • 1930 : गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.
  • 1933 : कॅमडेन, न्यू जर्सी, यूएसए येथे पहिले ड्राईव्ह-इन थिएटर उघडले.
  • 1944 : ‘डी डे’, दुसऱ्या महायुद्धात मित्रराष्ट्रांनी फ्रान्समधल्या नॉर्मेडी इथल्या जर्मन छावणीवर, एकाच रात्रीत जमीन, समुद्र आणि आकाशतून हल्ला करून हजारो सैनिक मारले व हजारो कैदी केले.
  • 1968 : रॉबर्ट एफ. केनेडींचा खून.
  • 1969 : वि. स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात.
  • 1970 : सी. हेन्केल या ब्रिटीश शास्त्रज्ञाने प्रथम घरगुती वापरासाठी उपलब्ध असलेले डिटर्जंट साबण तयार केले.
  • 1971 : सोव्हिएत युनियनने सोयुझ 11 लाँच केले.
  • 1974 : स्वीडनने संसदीय राजेशाही स्वीकारली.
  • 1982 : इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.
  • 1984 : ऑपरेशन ब्ल्यू स्टार समाप्त.
  • 1993 : मंगोलियाची पहिली अध्यक्षीय निवडणूक.
  • 1999 : भारतीय टेनिस जोडी लिएंडर पेस आणि महेश भूपती यांनी ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले.
  • 2004 : भारताच्या राष्ट्रपतींनी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून धोषित केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1799 : ‘अलेक्जेंडर सर्गेयेविच पुश्किन’ – एक रशियन कवी, नाटककार आणि कादंबरीकार यांचा जन्म.
  • 1850 : ‘कार्ल ब्राऊन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 20 एप्रिल 1918)
  • 1891 : ‘मारुती वेंकटेश अय्यंगार’ – कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार यांचा जन्म.
  • 1901 : ‘सुकार्नो’ – इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 21 जुन 1970)
  • 1903 : ‘बख्त सिंग’ – भारतीय धर्मगुरू यांचा जन्म.
  • 1909 : ‘गणेशरंगो भिडे’ – अभिनव मराठी ज्ञानकोशकार यांचा जन्म.
  • 1919 : ‘राजेंद्रकृष्ण’ – गीतकार, कवी आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1929 : ‘सुनीलदत्त’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 25 मे 2005)
  • 1936 : ‘डी. रामनाडू’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 18 फेब्रुवारी 2015)
  • 1940 : कुमार भट्टाचार्य बैरन भट्टाचार्य – भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिक यांचा जन्म.
  • 1943 : ‘आसिफ इक्बाल’ – भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर यांचा जन्म.
  • 1955 : ‘सुरेश भारद्वाज’ – भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक यांचा जन्म.
  • 1956 : ‘बियॉन बोर्ग’ – स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू यांचा जन्म.
  • 1965 : ‘निवेदिता जोशी-सराफ’ – मराठी व हिंदी चित्रपट तसेच नाट्य अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1970 : ‘सुनील जोशी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1861 : ‘कॅमिलो बेन्सो’ – इटलीचे पहिले पंतप्रधान  यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1810)
  • 1891 : ‘सरजॉन ए. मॅकडोनाल्ड’ – कॅनडाचे पंतप्रधान  यांचे निधन. (जन्म: 11 जानेवारी 1815)
  • 1941 : ‘लुईस शेवरोले’ – शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक  यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1878)
  • 1957 : ‘संतरामचंद्र दत्तात्रय’ तथा गुरूदेव रानडे – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ  यांचे निधन. (जन्म: 3 जुलै 1886)
  • 1961 : ‘कार्लगुस्टाफ जुंग’ – स्विस मानसशास्त्रज्ञ  यांचे निधन.
  • 1976 : ‘जे. पॉल गेटी’ – अमेरिकन उद्योगपती  यांचे निधन. (जन्म: 15 डिसेंबर 1892)
  • 1982 : ‘डी. देवराज अर्स’ – कर्नाटकचे 8 वे मुख्यमंत्री यांचे निधन.
  • 2002 : ‘शांता शेळके’ –  मराठी कवयित्री यांचे निधन. (जन्म: 12 ऑक्टोबर 1922)
  • 2004 : ‘रोनाल्ड रेगन’ – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचे निधन


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: ऐन पावसाळ्याच्या सुरवातीला कोकण रेल्वे मार्गावर धावणार एकेरी विशेष गाडी; विस्टाडोम कोचही जोडण्यात येणार

   Follow us on        
Konkan Railway: कोकणचे पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य प्रवाशांना अनुभवता यावे यासाठी कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने एक एकेरी विशेष गाडीची घोषणा केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर दिनांक १४/०६/२०२५ रोजी रेल्वे प्रशासनाने एक एकेरी One Way ही विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. चेअर कार,  सेकंड सीटिंग या डब्यांसोबत निसर्गसौदर्य पाहण्यासाठी या गाडीला एक विस्टाडोम कोचही जोडण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०११७१ मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन एकेरी विशेष गाडी दिनांक  १४/०६/२०२५ रोजी सकाळी ७:३५ वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटेल  त्याच दिवशी रात्री १२:३० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचतील.
ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना: एकूण १६ एलएचबी कोच: व्हिस्टा डोम – ०१ कोच, चेअर कार – ०३ कोच, सेकंड सीटिंग – १० कोच, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.

Railway Updates: कन्फर्म तात्काळ तिकीट मिळण्याच्या शक्यता वाढणार; भारतीय रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

   Follow us on        
नवी दिल्ली : रेल्वे तिकीट आरक्षणात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.  भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकीट बुकिंगसाठी (Tatkal Ticket Booking) ई-आधार पडताळणीचे काम सुरू करणार आहे. यामुळे प्रवाशांना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकिटे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. रेल्वेने असेही म्हटले आहे की, ज्या लोकांचे ओळखपत्र आधारशी जोडलेले असतील. त्यांना तत्काळ तिकीट बुकिंगच्या पहिल्या १० मिनिटांत प्राधान्य दिले जाणार आहे. आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटनाही तात्काळ विंडो उघडल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत सिस्टमवर तिकिटे बुक करण्याची परवानगी आतापर्यंत नाही. अशा परिस्थितीत, ज्या लोकांचे ओळखपत्र आधारशी जोडलेले असेल त्यांना तिकिटे बुकिंग करणे अधिक सोयीस्कर ठरणार आहे, असे रेल्वेने घोषित केले आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेने स्वयंचलित साधनांचा वापर करून ऑनलाइन तिकिटे बुक करणाऱ्या तिकीट एजंटविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रेल्वेचे असेही नमूद केले की, अकाउंट्सच्या अलीकडच्या तपासणीत २० लाख इतर खाती देखील संशयास्पद आढळली आहेत. त्यांचे आधार आणि इतर कागदपत्रे तपासली जात आहेत. सध्या, आयआरसीटीसी वेबसाइटवर १३ कोटींहून अधिक सक्रिय ग्राहक आहेत. यापैकी, आधारशी जोडलेल्या खात्यांची संख्या १.२ कोटी आहे.
आता आयआरसीटीसीने आधारशी प्रमाणित नसलेल्या या सर्व ११ कोटी ८० लाख खात्यांविरोधात सक्त भूमिका घेतली आहे. यासाठी विशेष चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संशयास्पद आढळणारी सर्व खाती ब्लॉक केली जाणार आहेत. रेल्वे तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ सेवेअंतर्गत फक्त योग्य प्रवाशांनाच तिकिटे मिळावीत यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अशा परिस्थितीत, जे खातेधारक त्यांचे खाते आधारशी लिंक करतील, त्यांना तत्काळ बुकिंगच्या पहिल्या १० मिनिटांत प्राधान्य मिळणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search