Author Archives: Kokanai Digital

०३ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • दिनांक : 3 जून 2025
  • वार : मंगळवार
  • माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
  • माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
  • ऋतु : ग्रीष्म
  • आयन : उत्तरायण
  • पक्ष : शुक्ल पक्ष
  • तिथी : अष्टमी तिथी (रात्री 09:56 पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
  • नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (4 जून रात्री 12:58 पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
  • योग : हर्षण योग (सकाळी 08:07 पर्यंत) त्यानंतर वज्र योग
  • करण : विस्ती भद्रा करण (सकाळी 09:10 पर्यंत) त्यानंतर भाव करण
  • चंद्र राशी : सिंह राशी
  • सूर्य राशी : वृषभ राशी
  • अशुभ मुहूर्त:
  • राहु काळ : दुपारी 03:54 ते सायंकाळी 05:33 पर्यंत
  • शुभ मुहूर्त:
  • अभिजित : दुपारी 12:10 ते दुपारी 01:03
  • सूर्योदय : सकाळी 06:01
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:12
  • संवत्सर : विश्वावसु
  • संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
  • विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
  • शक संवत: 1947 शक संवत
जागतिक दिन :
  • जागतिक सायकल दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1818 : शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांच्या कडे सोपवले, नंतर इंग्रजानी शनिवार वाड्यावर कब्जा करून तिथे युनियन जॅक फडकावला.
  • 1889 : ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.
  • 1916 : महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
  • 1940 : डंकर्कची लढाई – जर्मन विजय. दोस्त फौज पळाली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – जर्मन हवाई दलाने पॅरिसवर बॉम्ब टाकला.
  • 1947 : हिंदुस्थानच्या फाळणीसाठी माउंटबॅटन योजना जाहीर करण्यात आली.
  • 1950 : मॉरिस हर्झॉग आणि लुई लाचेनल यांनी 8091 मीटर अन्नपूर्णा शिखरावर पहिले यशस्वी चढाई केली.
  • 1979 : मेक्सिकोच्या आखातातील एहटॉक तेलाच्या विहिरीला आग लागली. 600000 टन तेल समुद्रात सांडले.
  • 1984 : ऑपरेशन ब्ल्यू स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
  • 1989 : चीनने थियानमन स्क्वेअरवर सात आठवड्यांपासून तळ ठोकलेल्या आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी सैन्य पाठवले.
  • 1998 : जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱ‍या त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1865 : ‘जॉर्ज (पाचवा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1936)
  • 1890 : ‘बाबूराव पेंटर’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 16 जानेवारी 1954)
  • 1890 : खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी – यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1988)
  • 1892 : ‘आनंदीबाई शिर्के’ – लेखिका तसेच बालसाहित्यिका यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑक्टोबर 1986)
  • 1895 : ‘के.एम. पण्णीक्कर’ – चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत यांचा जन्म. (मृत्यू: 10 डिसेंबर 1963)
  • 1924 : ‘एम. करुणानिधी’ – तामिळनाडूचे 15 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1930 : ‘जॉर्ज फर्नांडिस’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1966 : ‘वासिम अक्रम’ – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1657 : ‘विल्यम हार्वी’ – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 1 एप्रिल 1578)
  • 1932 : ‘सर दोराबजी टाटा’ – उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1859)
  • 1956 : ‘वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1881)
  • 1974 : ‘कृष्ण बल्लभ सहाय’ – बिहारचे मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म:31 डिसेंबर 1898)
  • 1989 : ‘रुहोलह खोमेनी’ – इराणी धर्मगुरू आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1902)
  • 1990 : ‘रॉबर्ट नोयिस’ – इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1927)
  • 1997 : ‘मीनाक्षी शिरोडकर’ – चित्रपट व नाट्य अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1916)
  • 1977 : ‘आर्चिबाल्ड विवियन हिल’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 2010 : ‘अजय सरपोतदार’ – मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 16 ऑक्टोबर 1959)
  • 2011 : ‘भजन लाल बिश्नोई’ – भारतीय राजकारणी, हरियाणाचे सहावे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1930)
  • 2013 : ‘अतुल चिटणीस’ – जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार यांचे निधन. (जन्म: 20 फेब्रुवारी 1962)
  • 2013 : नफिसा खान उर्फ ‘जिया खान’ – बॉलिवूड अभिनेत्री यांचे निधन.
  • 2014: ‘गोपीनाथ मुंडे’ – भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1949)
  • 2016 : ‘मुहम्मद अली’ – अमेरिकन बॉक्सर यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1942)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका एक्सप्रेस गाडीच्या संरचनेत बदल करण्यात आला असल्याची माहीत कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ट्रेन क्रमांक १६३३६ / १६३३५ नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेसच्या रचनेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही गाडी सध्या २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, जनरल – ०४, पॅन्ट्री कार -०१,जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१ असे मिळून एकूण २२ एलएचबी डब्यांसहित धावत आहे. मात्र या गाडीचा एक स्लीपर डबा कमी करून त्या जागी २ टियर एसी श्रेणीचा एक डबा जोडला जाणार आहे. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची सुधारित रचना खालील प्रमाणे असेल
२ टियर एसी – ०२ , ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०७, जनरल – ०४, पॅन्ट्री कार -०१,जनरेटर कार – ०१ असे मिळून एकूण २२ एलएचबी डबे.
दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ पासून ही गाडी सुधारित संरचनेसह धावणार आहे.

०२ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • वार : सोमवार
  • माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
  • माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
  • ऋतु : ग्रीष्म
  • आयन : उत्तरायण
  • पक्ष : शुक्ल पक्ष
  • तिथी : सप्तमी तिथी (रात्री 08:34 पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
  • नक्षत्र : मघा नक्षत्र (रात्री 10:55 पर्यंत) त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
  • योग : व्याघात योग (सकाळी 08:19 पर्यंत) त्यानंतर हर्षण योग
  • करण : गराजा करण (सकाळी 08:11 पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
  • चंद्र राशी : सिंह राशी
  • सूर्य राशी : वृषभ राशी
  • अशुभ मुहूर्त:
  • राहु काळ : सकाळी 07:40 ते सकाळी 09:19 पर्यंत
  • शुभ मुहूर्त:
  • अभिजित : दुपारी 12:10 ते दुपारी 01:03
  • सूर्योदय : सकाळी 06:01
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:12
  • संवत्सर : विश्वावसु
  • संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
  • विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
  • शक संवत: 1947 शक संवत
जागतिक दिन :
महत्त्वाच्या घटना :
  • 1800 : कॅनडामध्ये जगातील पहिली कांजिण्याची लस दिली गेली.
  • 1896 : गुग्लिएल्मो मार्कोनी यांना रेडिओसाठी पेटंट देण्यात आले.
  • 1897 : मार्क ट्वेन यांनी वृत्तपत्रात त्यांचे मृत्युलेख वाचून म्हटले, “माझे मृत्युलेख अतिशयोक्ती आहे.”
  • 1946 : इटलीने राजेशाही संपवली आणि स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले, राजा उम्बर्टो II याला पदच्युत केले. 1949 : दक्षिण अफ्रिकेने गोरे सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
  • 1953 : इंग्लंडमध्ये राणी एलिझाबेथ दुसरीचा राज्याभिषेक.
  • 1979 : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
  • 1999 : भूतानमध्ये दूरदर्शन प्रसारण सुरू झाले.
  • 2000 : लेखिका अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारने अकरा लाख रुपयांचा सहस्राब्दी कवयित्री पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2003 : युरोपने दुसऱ्या ग्रहावर, मंगळावर आपला पहिला प्रवास सुरू केला. युरोपियन स्पेस एजन्सीचे मार्स एक्सप्रेस प्रोब कझाकस्तानमधील बायकोनूर अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित झाले.2014 : तेलंगण भारताचे 29वे राज्य झाले.
  • 2022 : विनंतीनंतर, युनायटेड नेशन्सने अधिकृतपणे संघटनेतील तुर्की प्रजासत्ताकचे नाव पूर्वी “तुर्की” वरून “तुर्किये” असे बदलले.
  • 2023 : पूर्व भारतातील ओडिशातील बालासोर शहराजवळ दोन प्रवासी गाड्या आणि पार्क केलेली मालवाहू ट्रेन यांच्यात झालेल्या टक्करमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि 1,200 हून अधिक लोक जखमी झाले
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1731 : ‘मार्था वॉशिंग्टन’ – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची पत्नी यांचा जन्म. (मृत्यू : 22 मे 1802)
  • 1840 : ‘थॉमस हार्डी’ – इंग्लिश लेखक आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जानेवारी 1928)
  • 1907 : ‘विष्णू विनायक बोकील’ – मराठी नाटककार आणि लेखक यांचा जन्म.
  • 1930 : ‘पीट कॉनराड’ – अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म.
  • 1943 : ‘इलय्या राजा’ – भारतीय संगीतकार यांचा जन्म.
  • 1955 : ‘नंदन निलेकणी’ – इन्फोसिस चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1955 : ‘मणिरत्नम’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1963 : ‘आनंद अभ्यंकर’ – अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 23 डिसेंबर 2012)
  • 1965 : ‘मार्क वॉ’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
  • 1965 : ‘स्टीव्ह वॉ’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
  • 1974 : ‘गाटा काम्स्की’ – अमेरिकन बुद्धीबळपटू यांचा जन्म.
  • 1987 : ‘सोनाक्षी सिन्हा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1989 : ‘ललिता बाबर’ – भारतीय महिला धावपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1882 : ‘ज्युसेप्पे गॅरिबाल्डी’ – इटलीचा क्रांतिकारी यांचे निधन. (जन्म : 4 जुलै 1807)
  • 1975 : ‘देवेन्द्र मोहन बोस’ – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरुवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म : 26 नोव्हेंबर 1885)
  • 1988 : ‘राज कपूर’ – भारतीय अभिनेता आणि चित्रपट निर्माता दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1924)
  • 1990 : ‘सर रेक्स हॅरिसन’ – ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलीवूड चित्रपटांतील अभिनेते यांचे निधन. (जन्म : 5 मार्च 1908)
  • 1992 : ‘डॉ. गुंथर सोन्थायमर’ – मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक यांचे निधन. (जन्म : 21 एप्रिल 1934)
  • 2014 : ‘दुर्यसामी सायमन लौरडुसामी’ – भारतीय कार्डिनल यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1924)

 


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Amboli Waterfall: वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आंबोली धबधब्याबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

   Follow us on        
Amboli Waterfall: आंबोली पर्यटन स्थळी वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद करण्यात येणार आहे.
मुख्य धबधब्यावरील पर्यटकांना खाली उतरवून धबधब्यावर जाणाऱ्या पर्यटकांना मज्जाव करण्यात येणार असून सायंकाळी पाच वाजल्यानंतर मुख्य धबधबा बंद करण्यात येणार आहे. पावसाळ्यात आंबोलीतील मुख्य धबधबा परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मुख्य धबधबा, हिरण्यकेशी, कावळेसाद, महादेवगड पॉईंट या ठिकाणी आता शनिवार आणि रविवार सायंकाळी 5 नंतर प्रवेशास मज्जाव असणार आहे. 5 वाजता धबधबा परिसरात असलेल्या पर्यटकांना खाली उतरवण्यात येणार आहे आणि नवीन पर्यटकांना वर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. सर्व स्टॉलही 5 वाजता बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पावसामुळे आंबोली घाटात सुरु झालेल्या धबधब्यामुळे परिसरात दृश्यमानता कमी होते. त्यामुळे ज्या भागात दृश्यमानता कमी असेल अशा भागात पर्यटकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला असून परिस्थितीनुरुप पुढील निर्देश केले जातील असे आदेश पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितलं.

“फ्लाय९१” ची मान्सून हंगामासाठी विशेष ऑफर; सिंधुदुर्ग-पुणे, हैदराबाद आणि बंगळूरुसाठीच्या मार्गावरही लागू

   Follow us on        
सिंधुदुर्ग: गोवास्थित प्रादेशिक विमान कंपनी “फ्लाय९१” ने मान्सून हंगामासाठी विशेष ऑफर जाहीर केली आहे. ज्या अंतर्गत कंपनीच्या २० मार्गावर तिकिटांवर ₹ ३०० पर्यंत सवलत दिली जाईल. या सवलतीमध्ये गोव्याला जोडणारे पाच प्रमुख मार्ग समाविष्ट आहेत. तसेच सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळावरून पुणे, हैदराबाद आणि बंगळूरुसाठीच्या मार्गावरही ही सवलत लागू असेल, ज्यामुळे सिंधुदुर्गमधील प्रवाशांना मोठा लाभ मिळेल.
ही ऑफर केवळ १ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू आहे आणि त्या तिकिटांवर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत प्रवास करता येईल. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अलीकडेच घेतलेल्या बैठकीत, पावसाळी हंगामात गोव्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विमान कंपन्या आणि ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सींनी प्रवाशांना आकर्षित करणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत फ्लाय९१ ने ही खास सवलतीची योजना जाहीर केली आहे. या सवलतीमध्ये गोवा (GOX) येथून हैदराबाद (HYD), जळगाव (JLG), अगत्ती (AGX), पुणे (PNQ), सिंधुदुर्ग (SDW) आणि सोलापूर (SSE) या मार्गांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पुणे-सिंधुदुर्ग, बेंगळूरु-सिंधुदुर्ग, हैदराबाद-सिंधुदुर्ग, जळगाव-हैदराबाद, जळगाव-पुणे आणि गोवा-सोलापूर या मार्गावर देखील ही ऑफर लागू होईल.
फ्लाय९१ चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले की, पावसाळ्यात पर्यटनसंख्या कमी होत असल्याने, या काळात प्रादेशिक हवाई प्रवास अधिक सुलभ आणि परवडणारा करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. गोव्यातील पावसाळी पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारच्या धोरणाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत ही योजना आखली आहे. फ्लाय९१ ही गोवा स्थित विमान सेवा असून, सध्या पुणे, हैदराबाद, सिंधुदुर्ग, जळगाव आणि लक्षद्वीपमधील अगत्ती यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर नियमित उड्डाणे चालवते. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (GOX) वरून कार्यरत असलेली ही सेवा, एटीआर ७२-६०० प्रकारच्या अत्याधुनिक विमानांनी प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव देते. पुढील पाच वर्षांत, फ्लाय९१ देशभरात ५० हून अधिक शहरांशी कनेक्ट होण्याच्या महत्वाकांक्षी ध्येयासह प्रादेशिक पर्यटनाला चालना देण्यासोबतच, शेवटच्या टप्प्यांतील भागांमध्येही कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर देणार आहे.

०१ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि- षष्ठी – 20:02:33 पर्यंत
  • नक्षत्र- आश्लेषा – 21:37:38 पर्यंत
  • करण- कौलव – 08:03:58 पर्यंत, तैतुल – 20:02:33 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- घ्रुव – 09:11:07 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:00:12
  • सूर्यास्त- 19:12:17
  • चन्द्र राशि- कर्क – 21:37:38 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:01:00
  • चंद्रास्त- 24:11:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक पालक दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1792 : केंटकी अमेरिकेचे 15 वे राज्य बनले.
  • 1796 : टेनेसी हे अमेरिकेचे 16 वे राज्य बनले.
  • 1831 : सर जेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.
  • 1929 : विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम आणि केशवराव धायबर यांनी कोल्हापुरात प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली.
  • 1930 : दख्खनची राणी डेक्कन क्वीन ट्रेन मुंबई-पुणे दरम्यान सुरू झाली.
  • 1945 : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना झाली.
  • 1959 : द. जा. कर्वे हे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.
  • 1961 : यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने जगातील पहिल्या स्टिरिओ एफ. एम. प्रसारणासाठी परवानगी दिली.
  • 1996 : भारताचे 11वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
  • 2001 : नेपाळचे राजे वीरेंद्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेंद्र यांनी निर्घृण हत्या केली.
  • 2003 : चीनमधील भव्य थ्री गॉर्जेस धरणात पाणीसाठा सुरू झाला.
  • 2004 : रमेशचंद्र लाहोटी यांनी भारताचे 35 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1842 : ‘सत्येंद्रनाथ टागोर’ – पहिले भारतीय सनदी अधिकारी यांचा जन्म. (मृत्यू : 9 जानेवारी 1923)
  • 1843 : ‘हेन्री फॉल्स’ – फिंगरप्रिंटिंग चे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 24 मार्च 1930)
  • 1872 : ‘नारायण मुरलीधर गुप्ते’ ऊर्फ कवी बी – मराठी कवी यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑगस्ट 1947)
  • 1907 : ‘फ्रँक व्हाईट’ – जेट इंजिन विकसित करणारे यांचा जन्म. (मृत्यू : 9 ऑगस्ट 1996)
  • 1926 : ‘मेरिलीन मन्रो’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑगस्ट 1962)
  • 1929 : ‘फातिमा रशिद’ ऊर्फ ‘नर्गिस दत्त’ – हिन्दी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 3 मे 1981)
  • 1947 : ‘रॉन डेनिस’ – मॅक्लारेन ग्रुप चे संस्थापक यांचा जन्म.
  • 1965 : ‘नायगेल शॉर्ट’ – इंग्लिश बुद्धिबळपटू यांचा जन्म.
  • 1970 : ‘आर. माधवन’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1985 : ‘दिनेश कार्तिक’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1830 : ‘स्वामीनारायण’ – भारतीय धार्मिक नेते यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1781)
  • 1868 : ‘जेम्स बुकॅनन’ – अमेरिकेचे 15 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 23 एप्रिल 1791)
  • 1872 : ‘जेम्स गॉर्डन बेनेट’ – न्यूयॉर्क हेरॉल्ड चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 1 सप्टेंबर 1795)
  • 1934 : ‘श्रीपादकृष्ण कोल्हटकर’ – प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक यांचे निधन. (जन्म : 29 जून 1871)
  • 1944 : ‘महादेव विश्वनाथ धुरंधर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार यांचे निधन. (जन्म : 18 मार्च 1867)
  • 1960 : ‘पॉड हिटलर’ – जर्मन-ऑस्ट्रियन बहीण यांचे निधन. (जन्म : 21 जानेवारी 1896)
  • 1962 : ‘अ‍ॅडॉल्फ आइकमॅन’ – दुसर्‍या महायुद्धात शेकडो ज्यू लोकांची कत्तल करणार्‍या या जर्मन सेनापतीला इस्त्रायलमधे फाशी देण्यात आले.
  • 1968 : ‘हेलन केलर’ – अंध मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती आणि समाजसेविका यांचे निधन. (जन्म : 27 जून 1880)
  • 1984 : ‘नाना पळशीकर’ – हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते यांचे निधन.
  • 1987 : ‘के.ए. अब्बास’ – दिग्दर्शक, पटकथाकार आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 7 जून 1914)
  • 1996 : ‘नीलमसंजीव रेड्डी’ – भारताचे 6वे राष्ट्रपती, लोकसभेचे 4 थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म : 19 मे 1913 – इलुरू, तामिळनाडू)
  • 1998 : ‘गो. नी. दांडेकर’ – ज्येष्ठ साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1916)
  • 1999 : ‘ख्रिस्तोफर कॉकेरेल’ – होव्हर्क्राफ्ट चे निर्माते यांचे निधन. (जन्म : 4 जून 1910)
  • 2000 : ‘मधुकर महादेव टिल्लू’ – एकपात्री कलाकार यांचे निधन.
  • 2001 : नेपाळचे राजे ‘वीरेन्द्र’ यांची हत्या. (जन्म : 28 डिसेंबर 1945)
  • 2002 : ‘हॅन्सी क्रोनिए’ – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान यांचे विमान अपघातात निधन. (जन्म : 25 सप्टेंबर 1969)
  • 2006 : ‘माधव गडकरी’ – लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Konkan Railway: कमी गाड्यांपासून अधिक उत्पन्न! सावंतवाडी स्थानकावर अधिक गाड्यांना थांबे मिळणे गरजेचे, प्रवासी संघटनेचे खासदारांना निवेदन

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी टर्मिनस या स्थानकावर १२१३३/३४ मुंबई मंगुळुरु एक्सप्रेसला थांबा मिळावा आणि सावंतवाडी टर्मिनसचा ‘अमृत भारत स्थानक योजना’  अंतर्गत विकास करावा या मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने (सावंतवाडी) लोकसभा खासदार रवींद्र वायकर यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवले आहे.
सावंतवाडी हे कोकण रेल्वे मार्गावरील एक महत्वाचे स्थानक आहे. या स्थानकावरून प्रतिदिवसी सरासरी २१०० प्रवासी प्रवास करतात. मात्र येथील प्रस्तावित टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्याचे काम निधीअभावी अपूर्ण असून येथे सध्याची गरज पाहता खूपच कमी गाडयांना थांबे देण्यात आले आहेत. टर्मिनसचे काम पूर्ण करून या टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार कै. प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्याची मागणीही दुर्लक्षित राहिली आहे..
या स्थानकावर सध्या अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि टर्मिनस लाईनची गरज आहे. तसेच निवारा शेड, पाण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्मवरील बैठक व्यवस्था, पुरेशी प्रकाश योजना तसेच फूटओव्हर ब्रिज या सुविधांची गरज आहे. या स्थानकाचा ‘अमृत भारत स्थानक योजनेत सहभाग केला गेल्यास या सुविधा प्राप्त होण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे या मागणीचा विचार करण्यात यावा अशी विनंती प्रवासी संघटनेकडडून करण्यात आली आहे.
कमी गाड्यांपासून जास्त उत्त्पन्न
या स्थानकावर गर्दीच्या वेळी म्हणजे संध्याकाळी आणि रात्री (मुंबईच्या दिशेने जाताना) फक्त २ दैनिक आणि  ३ साप्ताहिक गाडयांना थांबे देण्यात आले आहेत. या वेळेत इथे अधिक गाडयांना थांबे असणे आवश्यक आहे. तुतारी एक्सप्रेस आणि कोकणकन्या एक्सप्रेस या दोन दैनिक गाड्या या वेळेत मुंबईच्या दिशेने रवाना होतात.  आकडेवारी पाहता या दोन्ही गाड्यांना या स्थानकापासून खूप चांगले उत्त्पन्न मिळते. तुतारी एक्सपेसला  या गाडीला मिळणार्‍या एकूण उत्पन्नाच्या २२% उत्त्पन्न तर कोकणकन्या एक्सप्रेसला तिच्या एकूण उत्पन्नाच्या १५% उत्त्पन्न सावंतवाडी स्थानकापासून प्राप्त होते. माहितीच्या आकडेवारीनुसार मिळवण्यात आलेल्या माहितीनुसार सावंतवाडी स्थानकावरून स्लीपर श्रेणीतून ५०० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरासाठी प्रत्येक गाडीत प्रतिदिन ४० प्रवासी प्रवास करतात. रेल्वे स्थानकांचे व्यावसायिक स्वरूप ठरविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिनांक १६.०६.२००५ च्या दिलेल्या कसोटीनुसार Criteria ही संख्या जास्त आहे.
ही आकडेवारी या स्थानकाचे महत्व सांगून जाते, तसेच ईथे अधिक गाड्यांना थांबा असण्याची गरज देखील अधोरेखित करते. माननीय खासदारांनी या गोष्टी विचारात घेऊन आपल्या या मागणीला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. pacer height=”20px”]

Mumbai Goa Highway: चिपळुणात १७ लाखांचा गुटखा जप्त; सावंतवाडीच्या तरुणाला अटक

   Follow us on        
चिपळूण: मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ येथे अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथे तब्बल 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो टेम्पो चिपळूण पोलिसांनी सापळा रचत पकडल्याची घटना गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली हा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर टेम्पोचालक सावंतवाडी येथे राहणारा आहे.. गुरुवारी परजिह्यातून बोलेरो टेम्पो भरुन तब्बल 16 लाख 94 हजार किंमतीचा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची गोपनीय माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंग, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे आदींच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे सापळा रचला. यावेळी महामार्गावरुन आलेला बोलेरो टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याने भरलेली मोठ-मोठी पोती असल्याचे आढळले. त्यात 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या विविध प्रकारच्या गुटख्याचा समावेश आहे. या प्रकरणी सज्जन निवेगी याला पोलिसांनी अटक केली तसेच गुटख्यासह लाखाचा टेम्पो असा 23 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सज्जन निवेगी पाला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे पानटपरीवर बिनधास्तपणे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परजिह्यातून आणलेला हा गुटखा चिपळुणात नेमका कोणाला दिला जाणार होता, शिवाय यामागे अन्य कोणाचा समावेश आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search