Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway : जबलपूर कोईमतूर गाडीला कल्याण येथे थांबा देण्याची मागणी

Konkan Railway News : गाडी क्रमांक ०२१९७/०२१९८ जबलपूर कोईमतूर या कोकण मार्गे धावणाऱ्या गाडीला कल्याण येथे थांबा देण्यात यावा या मागणीसाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. 
कल्याण,अंबरनाथ,बदलापूर येथे मोठ्या प्रमाणात कोकणातील चाकरमानी स्थित आहेत. त्यांना कोकणात जाण्यासाठी ठाणे किंवा दादर या ठिकाणी जावे लागते. सध्या गणेशचतुर्थीचा हंगाम असल्याने या स्थानकावरून जाणाऱ्या गाडयांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जबलपूर कोईमतूर ही गाडी  कल्याण स्थानकावरून जाते; मात्र या स्थानकावर या गाडीला थांबा नाही आहे. या गाडीला कोकणातील रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी,  कणकवली आणि कुडाळ या स्थानकावर थांबा आहे. या गाडीला कल्याण स्थानकावर कायम स्वरूपी थांबा मिळाल्यास येथील कोकणवासीयांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.  

Loading

आंबोली पर्यटनस्थळापेक्षा “मृतदेह विल्हेवाट स्थळ” म्हणुन प्रसिद्ध होत चालले आहे?

सावंतवाडी:  दोन दिवसांपूर्वी म्हापसा येथील तरुणीची हत्या करुन तिचा मत्यूतदेह आंबोली घाटाच्या दरीत टाकण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारावर सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सिंधुदुर्ग पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. 
खून करून आंबोलीत मृतदेह टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सिंधुदुर्ग पोलिस नेमके काय करताहेत? चेकपोस्ट केवळ मलिदा खाण्यासाठीच आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. गोव्यातील युवतीचा मृतदेह आंबोलीपर्यंत कसा नेला? त्यावेळी कोण पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत होते? याची पोलिस अधीक्षकांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंबोली घाटात दिवसेंदिवस मृतदेह आणून टाकण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे तेथील पर्यटनाची बदनामी होत आहे. याबाबत पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. आंबोलीच्या प्रवेशद्वारावर तीन चेकपोस्ट उभारली आहेत, तरीही असे प्रकार नेमके का होतात? याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असे साळगावकर यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले असून, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे जगभरातील पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी भुरळ घालणारं ठिकाण आहे. मात्र, अलीकडे पर्यटनाच्या दृष्टीने कमी मात्र मृतदेह फेकण्याचं ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख बनू लागली आहे. अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांमधून जोर धरत आहे. 

Loading

कोकण रेल्वे मार्गावर पुढच्या आठवड्यात दोन ठिकाणी मेगाब्लॉक; ५ गाड्या उशिराने धावणार

रत्नागिरी :  कोकण रेल्वे मार्गावर मंगळवार दिनांक ०५ सप्टेंबर आणि गुरुवार दिनांक ०७ सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतले जाणार आहेत. या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
दिनांक ०५  सप्टेंबर चिपळूण ते करंजाडी दरम्यान रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटे ते ३ वाजून २० मिनिटे असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.. या  मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. 
१)Train no. 02197 Coimbatore Jn. – Jabalpur Express
दिनांक ०४ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते चिपळूण दरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावणार आहे.
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Jn. Express 
दिनांक ०५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी रोड ते चिपळूण दरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावणार आहे.
३)Train no. 16345 Lokmanya Tilak (T) – Thiruvananthapuram Central Netravati Express 
दिनांक ०५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही  गाडी कोलाड ते वीर दरम्यान सुमारे अर्धा तास उशिराने धावणार आहे.
दिनांक ०७ सप्टेंबर गुरुवारी सेनापुरा ते ठोकूर दरम्यान रोजी दुपारी ३ संध्याकाळी ६ असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.. या  मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. 
१)Train no. 10108 Mangaluru Central – Madgaon Jn. MEMU Express 
 दिनांक ०७ सप्टेंबर प्रवास सुरु करणारी ही गाडी मंगुळुरु सेंट्रल या सुरवातीच्या स्थानकावरून १ तास १५ मिनिटे उशिराने सुटणार आहे. 
२)Train no. 12134 Mangaluru Jn. – Mumbai CSMT Express journey commences 
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मंगुळुरु सेंट्रल या सुरवातीच्या स्थानकावरून १ तास उशिराने सुटणार आहे. 

Loading

“गणेशोत्सवात रेल्वेने ५० रूपयांत चिपळूण” ही चुकीची बातमी; कोंकण रेल्वेचा बातमीवर आक्षेप

Konkan Railway News : आज दिनांक ०२ सप्टेंबर रोजी लोकमतने “गणेशोत्सवात रेल्वेने ५० रूपयांत चिपळूण : – पनवेलहून ३० सप्टेंबरपर्यंत थेट सेवा ” अशा आशयाची बातमी प्रसारित केली होती. या बातमीला कोंकण रेल्वे प्रशासनाने आक्षेप घेतला असून अशा ट्रेन चालवण्याबाबत रेल्वेकडून कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच “प्रकाशित बातम्या खोट्या आणि चुकीच्या आहेत” असे सांगून उद्याच्या लोकमत मुंबई वृत्तपत्रात, आजच्या “लोकमत ऑनलाइन” मध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर करण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे. 

अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्यांमुळे अफवा पसरतील आणि सर्वसामान्यांमध्ये चुकीच्या बातम्या पसरतील वातावरण निर्माण होईल. तसेच तुमच्या रिपोर्टरला कळवावे की कोकण रेल्वेशी संबंधित बातम्या कोकण रेल्वेच्या प्रवक्त्याशी खात्री केल्याशिवाय प्रकाशित करू नये अशी विनंती पण करण्यात आली आहे.

 

कोकण रेल्वे तर्फे लोकमतला पाठविण्यात आलेले पत्र 👇🏻

The Editor
Lokmat
Mumbai

Subject: Rejoinder with regard to article on 02/09/2023 regarding “ गणेशोत्सवात रेल्वेने ५० रूपयांत चिपळूण : – पनवेलहून ३० सप्टेंबरपर्यंत थेट सेवा ”.

Ref : News article published in Lokmat dated 02/09/2023.

Find attached herewith news clipping about Konkan Railway published in the Lokmat Mumbai edition dated 02/09/2023 regarding running of DEMU train between Panvel & Chiplun from 04/09/2023. It is clarified that there is no such notification issued by the Railways regarding running of such train. Such kind of incorrect news will spread rumors and create a panic among general public.

You are requested to issue immediate rejoinder stating that “the published news is false & incorrect” in tomorrow’s Lokmat Mumbai newspaper, also in today’s “Lokmat Online” and on social media platforms to avoid unnecessary panic. Also your reporter should be informed that news related to Konkan Railway should not be published without confirming with Konkan Railway’s spokespersons.

Thanking you,

With Regards,

Chief Public Relations Officer
Konkan Railway Corporation Ltd.

 

Loading

Konkan Railway | मार्ग मोकळा करण्यात रेल्वेला यश, मात्र अजूनही वाहतूक विस्कळीतच; प्रवाशांचे अतोनात हाल

Konkan Railway News : पनवेल – वसई रेल्वेमार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून गावावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.तर अनेक गाड्या रद्द, अंशतः रद्द आणि पर्यायी मार्गावरून वळविण्यात आलेल्या आहेत. काल संध्याकाळी ७:३० वाजता त्या मालगाडीचे डबे हटवून मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले होते. मात्र अजूनही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली नाही आहे. गाड्या १० ते १२ तास रखडल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

अडकलेल्या प्रवाशांना रेल्वेची माहिती देण्यासाठी सीएसएमटी, पनवेल, कल्याण, ठाणे येथे मदतकक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अडकलेल्या प्रवाशांसाठी सुमारे 4000 पाण्याच्या बाटल्या, 4000 बिस्किट/स्नॅक्स/खाण्याच्या पाकिटांची व्यवस्था करून ती प्रवाशांमध्ये वाटण्यात आली. नागोठणे, कळंबोली, तळोजा आदी ठिकाणी काल प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे.

कोंकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची सध्याची स्थिती. वेळ 09:42 AM दिनांक 02/10/2023

kokan railway station list

 

Live Updates>>>>>

KR Bulletin No. 04 KR Bulletin No. 03 KR Bulletin No. 02 KR Bulletin No. 01

 

Loading

जालना लाठीमार : “इथे सरकारचं चुकलं” राज ठाकरेंची सरकारवर टीका

मुंबई :जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी लाठीमार आणि हवेत गोळीबार ही केला. या घटनेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मत मांडले असून यात त्यांनी सरकारची चुकी दाखवली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार पण झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो. 

ह्या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे, आणि ह्या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला, तर मी माझ्या अनेक सभांमध्ये म्हणलं तसं की, ती आंदोलनं, मोर्चे ह्याचा आदर्श जगाने घ्यावा इतकी शांततेत आणि समंजसपणे झाली होती. 

अशी पार्श्वभूमी असताना जालन्यात काल काय असं घडणार होतं की प्रशासनाने असं टोकाचं पाऊल उचललं? पोलिसांच्या अहवालात माहिती येईलच, पण मी खात्रीने सांगतो की, पूर्व-इतिहास बघता आंदोलकांनी कोणतंच चुकीचं पाऊल नसतं टाकलं. त्यामुळे इथे सरकारचं चुकलं हे निश्चित. 

राहता राहिला प्रश्न ह्या संवेदनशील विषयाचा, तर ह्याला आत्ताचे आणि आधीचे सगळेच जबाबदार आहेत. मराठा समाजाला आरक्षण देणं खरंच शक्य आहे का? ते न्यायालयात टिकेल का? बरं आरक्षण देऊन मराठा समाजातील मुलामुलींना देण्यासाठी किती सरकारी नोकऱ्या आहेत? त्या जोडीला ह्या समाजातील तरुण तरुणींना स्पर्धात्मक जगात घौडदौड करण्यासाठी कसं तयार करता येईल ह्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होत आहेत का? (इथे घोषणा केलेल्या योजनांबद्दल बोलायचं नाहीये तर प्रयत्नांबद्दल बोलायला हवं). 

मुळात हा प्रश्न फक्त मराठा समाजाच्या आरक्षणापुरता नाहीये, तर एकूणच मराठी तरुण-तरुणींच्या रोजगाराशी संबंधित आहे. साध्या तलाठी भरतीसाठी जर लाखभर अर्ज येत असतील आणि भरती अवघ्या शेकड्यात होणार असेल, तर मराठी मुलांच्या मनात काय धुमसतंय ह्याचा विचार करावा लागेल. शिकलीसवरलेली मुलं नोकरीच्या शोधात वणवण फिरत आहेत, हे चित्रं चांगलं नाही. त्यामुळे उगाच भूलथापा देणं किंवा एकमेकांवर आरोप करून स्वतःची मान काढून घेणं ह्या दोन्ही गोष्टी आधीच्यांनी आणि आत्ताच्यानी करू नयेत. 

काल जे घडलं त्यात प्रशासनाची चूकच आहे पण ते ज्या कारणांनी घडलं, त्याला गेल्या २० वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण जबाबदार आहे. ह्यावर दीर्घकालीन उपायांची गरज आहे. चकवा देऊन सरकार बनवणं आणि ते पाडून दुसरं सरकार आणणं, ह्यातून जे काही शौर्य दाखवायची खुमखुमी होती, ती खुमखुमी आता मिटली असेल असं आम्ही मानतो. त्यामुळे आता दोषारोप नकोत तर कृती अपेक्षित आहे. 

माझी तमाम मराठा समाजातील बांधवांना विनंती आहे की ह्या घटनेचे पडसाद उमटू देऊ नका. तुम्ही आंदोलनं आणि मोर्च्यांचा आदर्श घालून दिला आहेत, तो खरंच वाखाणण्यासारखा आहे. तुमचा राग समजू शकतो पण तुम्ही कोणाच्या राजकारणाला आणि भूलथापांना बळी पडणार नाही ह्याबद्दल मला आणि माझ्या पक्षाला खात्री आहे. मराठी माणसाच्या आक्रोशातून उभ्या राहणाऱ्या कुठल्याही आंदोलनाच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत उभी राहिली आहे आणि ह्यापुढे पण राहील. 

Loading

Sindhudurg Airport : ऐन हंगामात नियमित सेवा देता येत नसतील तर…..

यश सावंत | सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी गेल्याच आठवड्यात दिली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरून गेल्याचे दिसत आहे. आज दिनांक ०१ सप्टेंबर असूनही अजूनही येथे नियमित सेवा चालू झाली नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मागील चार दिवस चिपी विमानतळावर विमानच उतरले नाही. 

विमानाची बूकिंग सेवा उपलब्ध करून देणार्‍या क्लीअर ट्रीप तसेच मेक माय ट्रीप या वेबसाईटवर तपासले असता मुंबई ते सिंधुदुर्ग या दरम्यान एक दोन दिवस आड करून विमान फेरी असल्याचे चित्र दिसत आहे. गणेश चतुर्थीच्या जवळील तारखांचे विमान भाडे दहा हजाराच्या वर गेले आहे. त्यामुळे यंदा विमानाने गावी जाण्याचा बेतात असणाऱ्या कोकणवासियांचा हिरमोड झाला आहे.

 

.. तर सिंधुदुर्ग विमानतळाचा उपयोग काय?

गणेश चतुर्थी आणि इतर हंगामाच्या दिवसांत सुद्धा अशा अनियमित फेर्‍या असतील तर सिंधुदुर्ग जिल्हय़ातील विमान सेवेचा उपयोग तरी काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  विमानसेवेच्या तिकीट बूकिंग साठी Dynamic Pricing Strategy चा अवलंब करण्यात येत असतो. तरीपण मुंबई ते गोवा विमानसेवा तिकीट भाडे सर्व चार्जेस पकडून साधारणपणे 1800 ते 2000 रुपये एवढे आहे. हंगाम असल्याने एवढे भाडे देवून कोकणात गावी जाण्यासाठी किती तरी कोकणवासिय उत्सुक आहेत. प्रवासी असूनही विमानसेवा अनियमित असल्याने प्रशासनाला हंगामाचा फायदा घेणे जमत नसल्याचे दिसत आहे. येथील राजकिय पक्ष पण यामध्ये लक्ष घालताना दिसत नाही आहेत. अनियमित सेवेमुळे पर्यटकांनी सुद्धा या सेवेकडे पाठ फिरवली आहे. असेच चित्र राहिले तर एक दिवस हे विमानतळ बंद होईल असे बोलले तर नवल वाटायला  नको.

 

Loading

वैभववाडी स्थानकात गाडयांना थांबा देणे ‘रेल्वे बोर्ड’ च्या अधिकार कक्षेत; कोकण रेल्वेने हात झटकले

Konkan Railway News: वैभववाडी स्थानकात तेजस एक्सप्रेस आणि एलटीटी- मडगाव एक्सप्रेस या गाडयांना थांबा देण्याबाबत कोकण विकास समितीने केलेल्या निवेदनाला रेल्वे प्रशासनाकडून उत्तर आले आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड KRCL ने ही मागणी रेल्वे बोर्डच्या कक्षेत येत आहे असे सांगून आपले हात झटकले आहेत. 
वैभववाडी स्थानकात सध्या ५ नियमित गाडयांना थांबा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे गणपती/होळी/दिवाळी विशेष गाडयांना येथे थांबा देण्यात येत आहे. यंदाही गणेशोत्सव विशेष गाडयांना वैभववाडी या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या स्थानकावर अधिक गाडयांना थांबे द्यावेत कि नाही याबाबत रेल्वे बोर्ड ठरवणार आहे अशा शब्दात या निवेदनास उत्तर देण्यात आले आहे. 
वैभववाडी स्थानकावर वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेऊन या स्थानकावर गाडी क्रमांक २२११९/२२१२० तेजस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक ११०९९/१११०० एलटीटी- मडगाव  एक्सप्रेस या गाडयांना थांबा देण्याबाबत कोकण विकास समितीने २३/०६/२०२३ रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे याना  एक निवेदन सादर केले होते. या निवेदनात मागील १० वर्षात रेल्वेला येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचे आकडे अधोरेखित करून येथे या दोन गाडयांना थांबा दिल्यास प्रवासीसंख्या वाढून रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याने येथे थांबा मजूर करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती. 
 

Loading

Konkan Railway : पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त धावणार गणपती स्पेशल “मोदी एक्सप्रेस”

Modi Express : आ. नितेश राणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईस्थित कणकवली विधानसभा मतदारसंघातील चाकरमानी गणेशभक्तांसाठी खुशखबर दिली असून गणेशचतुर्थीसाठी स्पेशल मोदी एक्सप्रेस ची मोफत सोय उपलब्ध करून दिली आहे..
दिनांक १७ सप्टेंबर रोजी भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून “मोदी एक्सप्रेस” याच दिवशी सोडून तिला स्पेशल बनवण्यात येत आहे. दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता ही गाडी दादरच्या ८ नंबर प्लॅटफॉर्म वरून सोडण्यात येणार आहे. या गाडीची बुकिंग दिनांक ०५ सप्टेंबर ते १० सप्टेंबर या कालावधीत होणार असून ज्यांना सीट बुक करायची आहे त्यांनी या कालावधी दरम्यान कणकवली मतदारसंघाच्या मुंबईस्थित मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी या चित्रफितीत केले आहे. या प्रवासादरम्यान प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांची दरवर्षीप्रमाणे  जेवण आणि पाण्याची सोय करण्यात अली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
 

Loading

सिंधुदुर्ग: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी

सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाची मागणी

सिंधुदुर्ग :प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे पर्यावरणास हानी पोचत आहे.त्यामुळे अशा मूर्ती बनवणे, त्यांची आयात करणे आणि साठवणूक करणे यांवर बंदी घालावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा श्री गणेश मूर्तीकार संघाचे अध्यक्ष नारायण उपाख्य बापू सावंत, संचालक अरुण पालकर, विलास मळगावकर आदींनी हे निवेदन दिले आहे. पूर्वीपासून श्री गणेमूर्ती मातीच्या बनवल्या जात असत; परंतु गेल्या ८ ते १० वर्षांपासून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या श्री गणेशमूर्ती जिल्ह्यात आयात केल्या जात आहेत. या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने विसर्जनानंतर त्या बरेच महिने भग्नावस्थेत दिसतात. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search