Author Archives: Kokanai Digital

रत्नागिरीत एक मोठा आंतरराष्ट्रीय प्रकल्प येण्याच्या बेतात

रत्नागिरी: जिल्ह्यात आणखी एक मोठा प्रकल्प येण्याची शक्यता आहे. एप्रिल एशिया कंपनी असे त्याचे नाव आहे. उच्च दर्जाचे टिश्यू बनवणारी ही सिंगापूरमधील कंपनी आहे. हे टिश्यू कंपनी निर्यात करते. त्यासाठी किनारपट्टी भागात सुमारे दोन हजार एकर जागा कंपनीला अपेक्षित असून, १० हजार कोटीची गुंतवणूक करण्यास तयार आहे. यामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
कच्चा माल आणण्यास सोपे जात असल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टीजवळच्या जागांना मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील सहाही एमआयडीसींमधील जागा शिल्लक नसल्याने नव्या उद्योगांसाठी ही एक अडचण निर्माण झाली आहे; परंतु काही नव्या एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने नवे उद्योग येण्यास तयार झाले आहेत.(Latest Marathi News)
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील जिल्ह्यातील बंद पडलेल्या काही उद्योगांची धडधड पुन्हा सुरू केली आहे. नवे उद्योग यावे यासाठी स्टर्लाईटची मोठी जागा एमआयडीसीला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच जेके फाइल्सच्या जागेतही नवा उद्योग आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. उद्योगांना सहज गुंतवणूक करता यावी यासाठी राज्य शासनानेही आपले उद्योग धोरण बदलून त्यामध्ये गतिमानता आणली आहे.
त्यामुळे सिंगापूरची एप्रिल एशिया कंपनी जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणूक करण्यास तयार झाली आहे. हे टिश्यू विमानात व अन्य ठिकाणी वापरले जातात. हे टिश्यू निर्यात केले जाणार असल्याने बंदराच्या ठिकाणी जागा मिळाल्यास त्याला कंपनी अधिक प्राधान्य देणार आहे. 

Loading

कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात २ ठिकाणी मेगाब्लॉक

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या गुरुवार दिनांक ०९ नोव्हेंबर आणि शुक्रवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ४ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
A) गुरुवार दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी कुमठा – भटकल दरम्यान दुपारी १२:०० ते १५:०० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१)Train no. 22114 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express
दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी भटकल स्थानकावर २० मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे .
B) शुक्रवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान दुपारी ०८:३० ते ११:०० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) “Netravati” Express 
दिनांक ०९ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी उडपी ते कणकवली दरम्यान २ तास ३० मिनिटे उशिराने धावणार आहे.
२) TTrain no. 10106 Sawantwadi Road – Diva Jn. Express 
दिनांक १० नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी रोड ते कणकवली दरम्यान ३० मिनिटे उशिराने धावणार आहे.
३) Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Janshatabdi Express
दिनांक १० नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी स्थानकावर १० मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.

Loading

धोक्यातली कातळ खोदचित्रे !!!

वाचकांचे व्यासपीठ: जैतापूर हातिवले हमरस्त्यावरील साखर या गावच्या कातळावर चिरेखाणींच्या विळख्यात कातळ खोदचित्रांच्या दोन साईट आहेत.पैकी एलिफंट बर्डचे 12 फुट x 4 फुटाचे चित्र नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले दिसते.लगतच्या चिरेखाणीचे मार्किंग या चित्रावर झाल्याचे स्पष्टपणे दिसते.कदाचित नजिकच्या काळात ते नष्ट झालेले असेल.

एकीकडे कोकणातल्या निवडक नऊ साईट्सचा समावेश जागतिक वारसा प्राथमिक यादीत झालेला असतानाच अनेक ठिकाणची चित्रे रस्ते,चिरेखाणी,आंबा कलमबागा यामुळे नष्ट झाली आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे.

रत्नागिरीतील “निसर्गयात्री” संस्थेसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक संस्था, समुह किंवा व्यक्तींनी आजवर 125 गावांमधून 151 साईट्सवरची 2000 हजारहून अधिक कातळ खोदचित्रे (Geoglyphs) शोधून काढली आहेत.मात्र त्यातील काही निवडक साईट्स सोडल्या तर बहुतांश ठिकाणी हा अनमोल ठेवा बेवारस अवस्थेत पडून आहे.

या सर्व साईट्स खासगी मालकीच्या असून बहुतांश मालकांना त्यांचे महत्व/गांभीर्य अद्याप कळलेले नाही.बहुतांश साईट्स अक्षरशः उघड्यावर असंरक्षित अवस्थेत आहेत. कित्येक चित्रांवरून माणसे,गाईगुरे यांची रहदारी सुरू आहे.कित्येक साईट्स वरून पावसाच्या पाण्याचे लोट वहाताना दिसतात.या गोष्टींमुळे ऑलरेडी अनेक चित्रांची भरपूर झीज झाली आहे.ती आता भरून न येणारी हानी आहे.मात्र सध्या अस्तित्वात असणारी सर्वच्या सर्व चित्रे आहेत त्या अवस्थेत संरक्षित होणे ही काळाची गरज आहे.

त्यासाठी त्या त्या साईट्सच्या मालकांना कनव्हिन्स करून माणसे आणि गाईगुरांची रहदारी तसेच पावसाळी पाण्याचे प्रवाह थांबवावे लागतील. त्या त्या गावातील स्थानिक मंडळे, संस्था किंवा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून साईटभोवती दोन दोन चिऱ्यांची लाईन फिरविता येऊ शकेल.तसेच चिरेखाणी,कलम बागा,प्लॉटिंग,रस्ते विस्तार या बाबीही थांबवाव्या लागतील.

“निसर्गयात्री” संस्थेच्या अथक प्रयत्नातून रत्नागिरी येथे नुकतेच “कोकणातील कातळशिल्पे आणि वारसा केंद्र” सुरू झाले आहे. उपलब्ध होणाऱ्या निधीतील काही टक्के रकमेचा विनियोग या तातडीच्या आणि अत्यावश्यक कामांवर करता येणे शक्य झाल्यास धोक्यात असलेली अनेक कातळ खोदचित्रे नष्ट होण्यापासून वाचविता येतील अशी आशा करण्यास हरकत नाही.

AK मराठे,कुर्धे

पावस,रत्नागिरी

9405751698

Loading

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरील अतिजलद आणि आरामशीर प्रवासासाठी ओळखली जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत काहीसा बदल केला जाणार आहे. या गाडीच्या डब्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. सेकंड स्लीपरचे अजून ४ डबे या गाडीला जोडले जाणार आहेत, त्यामुळे या गाडीच्या सेकंड स्लीपर डब्यांची संख्या ४ वरून ८ इतकी होणार आहे. हा बदल दिनांक ०२ मार्च २०२४ पासून अमलांत आणला जाणार आहे.
सध्याची स्थिती – १६ एलएचबी कोच
१  फर्स्ट एसी
२  एसी टू टियर
६  एसी थ्री टियर
४  स्लीपर
१  एसी पँट्री कार
1  गार्ड ब्रेक व्हॅन
1  पॉवर कार
सुधारित स्थिती – २० एलएचबी कोच
१  फर्स्ट एसी
२  एसी टू टियर
६  एसी थ्री टियर
८  स्लीपर क्लास
१  एसी पँट्री कार
१  गार्ड ब्रेक व्हॅन
१  पॉवर कार

Loading

उद्याची मंगळुरू – मुंबई एक्सप्रेस पनवेलपर्यंतच धावणार!

Konkan Railway News: मंगळुरू ते मुंबई सीएसएमटी अशी कोकण रेल्वे मार्ग रोज धावणारी सुपरफास्ट एक्सप्रेस दि. 4 नोव्हेंबरच्या प्रवासासाठी मुंबई सीएसएमटी ऐवजी पनवेलपर्यंत धावणार आहे.

 

मध्य रेल्वेच्या हद्दीत विद्याविहार स्थानजीक गर्डर चढवण्याच्या कामासाठी रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी प्रवास सुरू होणारी मंगळूर मुंबई (12134) सुपरफास्ट एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकातच संपणार आहे. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान ही गाडी या दिवसाच्या प्रवासापुरती रद्द करण्यात आली आहे.

Loading

गोवा आणि सिंधुदुर्गात येत्या तीन दिवसांत पावसाची शक्यता

सिंधुदुर्ग: हवामान खात्याने गोवा आणि सिंधुदुर्गात येत्या तीन दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढल्याने गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर येत्या तीन दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोवा आणि सिंधुदुर्गात येत्या तीन दिवसात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढल्याने वारे तेलंगणा, कर्नाटकातून दक्षिण कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी गोव्यात काही ठिकाणी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या. त्यानंतर येत्या तीन दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Loading

रेल्वेच्या आरक्षण प्रणालीत आणि IRCTC वेबसाईटवर दिवा स्थानकाबाबत झालेल्या ‘त्या’ चुकीची अखेर दुरुस्ती

Konkan Railway News : एकच उपनगरीय विभाग असल्यामुळे आरक्षण प्रणालीत किंवा IRCTC वेबसाईटवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, ठाणे, वांद्रे टर्मिनस, वसई, कल्याण यांसारख्या मुंबई विभागातील स्थानकांतून गाड्या शोधल्यास संबंधित स्थानकावर गाडी थांबत नसल्यास जवळील स्थानकांवरून किंवा गाडी सुटण्याच्या सुरुवातीच्या स्थानकावरून गाड्या दाखवल्या जातात. उदा. कल्याण ते माणगावसाठी गाड्या शोधल्यास ०११३९ नागपूर मडगाव एक्सप्रेस कल्याणयेथून तर ११००३ तुतारी एक्सप्रेस कल्याणवरून जात नसल्यामुळे दादरपासून दाखवली जाते. त्यात १०१०५ दिवा सावंतवाडी एक्सप्रेस पकडण्यासाठी कल्याणवरून दिवा जवळ असले तरीही ती पनवेलपासून दाखवली जात असे. यामुळे दिवा सावंतवाडी एक्सप्रेस पनवेलवरूनच सोडली जाते असा काही प्रवाशांचा गैरसमज होत असे. कदाचित दिव्यावरून एकच गाडी असल्यामुळे दिव्याचा समावेश मुंबई विभागात करणे राहून गेल्यामुळे हे घडत होते.
ही चूक रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय मधुकर महापदी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ती दुरुस्ती करून घेण्यासाठी प्रयत्न केले व त्यांना त्यात यशही आले.  दिनांक २५ ऑक्टोबर, २०२३ ला ईमेल व सार्वजनिक तक्रार निवारण प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी ही गोष्ट मध्य रेल्वेच्या लक्षात आणून दिली होती. संबंधित विभागाने ती तक्रार तातडीने २७ ऑक्टोबरला संबंधित अधिकाऱ्यांना पाठवली. त्यानुसार रेल्वेने सकारात्मक कारवाई केली व आजपासून मुंबईतील स्थानकांवरून गाडी शोधल्यास दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेसचे सुरुवातीचे व शेवटचे स्थानक दिवा दाखवले जाते. यामुळे भविष्यात प्रवाशांचा गोंधळ उडणार नाही आहे. 

Loading

विद्यार्थीनी आणि महिलांचे चोरुन आक्षेपार्ह फोटो काढल्याबद्दल कसाल येथे एकाविरोधात गुन्हा दाखल

ओरोसः महाविद्यालयीन विद्यार्थीनींचे व महिलांचे चोरुन आक्षेपार्ह छायाचित्र काढल्याप्रकरणी कसाल गांगोची राई येथील नंदकुमार लक्ष्मण वनकर (वय ५०) याच्या विरोधात सिंधुदुर्गनगरी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ढोकमवाडी (ता.कुडाळ) येथील एका महिलेने तक्रार दाखल केली आहे.
कसाल बाजारपेठ येथे आज सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला आहे. फिर्याद देणाऱ्या महिलेने संबंधित महिलांचे छायाचित्र काढत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याबाबत विचारणा केली असता ते तेथून पळून गेले. त्यानंतर याबाबत त्या महिलेने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित वनकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमती नागरगोजे या अधिक तपास करीत आहेत.

Loading

सरपणाच्या आडून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा कंटेनर ताब्यात; मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे उत्पादन शुल्कच्या पथकाची मोठी कारवाई;

सिंधुदुर्ग : ओसरगाव येथे ज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने काल एक मोठी कारवाई केली आहे.  सरपणाच्या आडून कंटेरनमधून बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कऱ्हाड येथील एकाला ओसरगाव येथे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ७० लाखांच्या दारूसह सरपण व १६ चाकांचा कंटेनर असा तब्बल एक कोटी २६ लाख ३२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने केली. या प्रकरणी लक्ष्मण अर्जुन ढेकळे (वय ३४, रा. बेघरवस्ती-पाडळी ता. कऱ्हाड) याला ताब्यात घेतले. गेल्या चार दिवसांत कोटींचा मुद्देमाल जप्त करण्याची ही दुसरी कारवाई आहे.
याबाबत पथकाने दिलेली माहिती अशी ः दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या भरारी पथकाला मिळाली. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) ओसरगाव येथे आज सकाळी सापळा रचण्यात आला. यावेळी १६ चाकी कंटेनर (एनएल ०१ एजी ३८२०) तपासणीसाठी थांबविण्यात आला. चालकाकडे चौकशी केली असता त्याने आतमध्ये सरपणाच्या गोण्या असल्याचे सांगितले. अधिक तपासणीत गोण्यांमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा आणि बियर बॉक्स आढळून आले.
पुठ्ठ्याच्या खोक्यात विदेशी मद्याच्या ७५० मिलीलिटरच्या नऊ हजार ६६० बाटल्या, १८० मिलीलिटरच्या ११ हजार ४० बाटल्या, ५०० मिलीलिटरच्या बियरच्या २ हजार ८०८ बाटल्या आढळल्या. पथकाने एकूण एक हजार १५२ खोके जप्त केली. ती सर्व सरपण गोण्याच्या मागे लपविली होती. पथकाने ७० लाख ८० हजार ३६० रुपये किमतीची दारू, ५५ लाखांचा कंटेनर आणि इतर साहित्य ५२ हजार ५०० रुपये असा एकूण एक कोटी २६ लाख ३२ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर भरारी पथकातील निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, कॉन्स्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, योगेश शेलार, राहुल सकपाळ यांनी कारवाई केली. श्री. येवलुजे तपास करीत आहेत.

Loading

कोंकण रेल्वे मार्गावर आज धावणार दिल्ली – एर्नाकुलम अमृतकलश विशेष गाडी

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर आज दिल्ली – एर्नाकुलम अमृतकलश विशेष गाडी धावणार आहे. ही गाडी दिल्ली ते एर्नाकुलम दरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train No. 06082 Delhi Safdarjung – Ernakulam Jn. Amrutkalash Special:
ही गाडी आज  दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी रात्री १:१५ या वेळेस सुटून तिसऱ्या दिवशी एर्नाकुलम येथे रात्री ०२:३५ या वेळेस पोहोचणार आहे.
या गाडीची वसई या स्थानकावरील वेळ आज रात्री २०:१०, पनवेल – २१:२५ , रोहा २३:३५, रत्नागिरी – पहाटे ५ वाजता तर मडगाव येथे सकाळी ९:३० अशी आहे.  
या गाडीला एकूण १८ डबे असून त्यांची स्लीपर -१४, सामान्य-२ आणि एसएलआर -२ अशी संरचना असणार आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search