Deprecated: Optional parameter $depth declared before required parameter $output is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/structure/structure-header.php on line 82

Deprecated: Optional parameter $depth declared before required parameter $output is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/structure/structure-header.php on line 202

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $code is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/accordion.php on line 3

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $code is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/accordion.php on line 18

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $tag is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/tabs.php on line 3

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $tag is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/blog_posts.php on line 3

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $code is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/google_maps.php on line 3

Deprecated: Optional parameter $content declared before required parameter $tag is implicitly treated as a required parameter in /home/kokanaii/web/kokanai.in/public_html/wp-content/themes/flatsome/inc/shortcodes/portfolio.php on line 4
Kokanai Digital, Author at Kokanai - Page 12 of 245

Author Archives: Kokanai Digital

०५ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • दिनांक : 5 जुलै 2025
  • वार : शनिवार
  • माह (अमावस्यांत) : आषाढ
  • माह (पूर्णिमांत) : आषाढ
  • ऋतु : वर्षा
  • आयन : दक्षिणायन
  • पक्ष : शुक्ल पक्ष
  • तिथी : दशमी तिथी (सायंकाळी 06:58 पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
  • नक्षत्र : स्वाती नक्षत्र (रात्री 07:50 पर्यंत) त्यानंतर विशाखा नक्षत्र
  • योग : सिद्ध योग (रात्री 08:35 पर्यंत) नंतर साध्य योग
  • करण : गराजा करण (सायंकाळी 06:58 पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
  • चंद्र राशी : तुळ राशी
  • सूर्य राशी : मिथुन राशी
  • अशुभ मुहूर्त:
  • राहु काळ : सकाळी 09:25 ते सकाळी 11:04 पर्यंत
  • शुभ मुहूर्त:
  • अभिजित : दुपारी 12:16 ते दुपारी 01:09
  • सूर्योदय : सकाळी 06:07
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:19
  • संवत्सर : विश्वावसु
  • संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
  • विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
  • शक संवत: 1947 शक संवत

महत्त्वाच्या घटना :

  • 1687 : सर आयझॅक न्यूटन यांनी फिलॉसॉफी नॅचरलिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे मुख्य पुस्तक प्रकाशित केले.
  • 1811 : व्हेनेझुएलाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1830 : फ्रान्सने अल्जेरिया जिंकला.
  • 1841 : थॉमस कुकने लीसेस्टर ते लॉफबरो या पहिल्या प्रवासाचे आयोजन केले.
  • 1884 : जर्मनीने कॅमेरूनवर कब्जा केला.
  • 1905 : लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.
  • 1913 : बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली.
  • 1946 : फ्रान्सच्या फॅशन शोमध्ये पदार्पण केल्यानंतर बिकिनींची विक्री सुरू झाली.
  • 1950 : इस्रायलच्या क्वनेसेटने जगातील ज्यूंना इस्रायलमध्ये राहण्याचा अधिकार दिला.
  • 1954 : आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 1954 : बीबीसीने पहिले टेलिव्हिजन न्यूज बुलेटिन प्रसारित केले.
  • 1962 : अल्जेरियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले
  • 1975 : जागतिक आरोग्य संघटनेने,भारतातून देवी रोगाचे निर्मूलन घोषित केले.
  • 1975 : केप वर्देला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1975 : विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकणारा आर्थर ॲशे हा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू ठरला.
  • 1977 : पाकिस्तानात लष्करी उठाव. झुल्फिकार अली भुट्टो तुरुंगात.
  • 1980 : स्वीडिश टेनिसपटू ब्योर्न बोर्गने सलग पाच वेळा विम्बल्डन एकेरी लॉन टेनिस स्पर्धा जिंकली.
  • 1997 : 1997 : स्वित्झर्लंडच्या 16 वर्षीय मार्टिना हिंगीसने चेक प्रजासत्ताकच्या याना नोवोत्ना हिचा पराभव करून विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
  • 2006 : निर्बंधांचे उल्लंघन करत उत्तर कोरियाने नोडोंग-2, स्कड आणि तायपोडोंग-2 क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली.
  • 2012 : लंडनमधील शार्ड 310 मीटर (1020 फूट) उंचीसह युरोपमधील सर्वात उंच इमारत बनली.
  • 2016 : नासाचे अंतरिक्ष यान जूनो गुरू ग्रहाच्या कक्षात प्रवेश केला
  • 2017 : राज्य मतदार दिन महाराष्ट्र सरकार सुरुवात.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1882 : ‘हजरत इनायत खाँ’ – हिन्दुस्थानी शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 5 फेब्रुवारी 1927)
  • 1918 : केंद्रीय उद्योगमंत्री आणि केरळचे मुख्यमंत्री के. करुणारन यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2010)
  • 1920 : ‘आनंद साधले’ – साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1996)
  • 1925 : ‘नवल किशोर शर्मा’ – केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे राज्यपाल यांचा जन्म. (मृत्यू: 8 ऑक्टोबर 2012)
  • 1946 : ‘रामविलास पासवान’ – केंद्रीय मंत्री यांचा जन्म.
  • 1952 : ‘रेणू सलुजा’ – चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट संकलक यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑगस्ट 2000)
  • 1954 : ‘जॉन राइट’ – न्यूझीलंडचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक यांचा जन्म.
  • 1960 : ‘राकेश झुनझुनवाला’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
  • 1968 : ‘सुसान वॉजिकी’ – युट्युब चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जन्म.
  • 1973 : ‘गीता कपूर’ – भारतीय नृत्यदिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1995 : ‘पुसारला वेंकट सिंधू’ – भारतीय बॅडमिंटनपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1826 : ‘सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स’ – सिंगापूरचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 जुलै 1781)
  • 1833 : ‘निकेफोरे निओपे’ – जगातील पहिले परिचित असलेला फोटो काढणारे यांचे निधन. (जन्म: 7 मार्च 1765)
  • 1945 : ‘जॉन कर्टिन’ – ऑस्ट्रेलियाचे 14 वे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1957 : ‘अनुग्रह नारायण सिन्हा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 18 जून 1887)
  • 1996 : ‘बाबूराव अर्नाळकर’ – रहस्यकथाकार यांचे निधन.
  • 2005 : ‘बाळू गुप्ते’ – लेगस्पिन गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1934)
  • 2006 : ‘थिरुल्लालु करुणाकरन’ – भारतीय कवी आणि विद्वान यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1924)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

०३ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 14:08:45 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 13:51:00 पर्यंत
  • करण-भाव – 14:08:45 पर्यंत, बालव – 27:20:02 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-परिघ – 18:34:54 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:04:52
  • सूर्यास्त- 19:20:09
  • चन्द्र-राशि-कन्या – 27:19:34 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:03:59
  • चंद्रास्त- 24:53:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1608 : सॅम्युअल बी. चॅम्पलेनने कॅनडातील क्विबेक शहराची स्थापना केली.
  • 1850 : ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीला सुपूर्द केला.
  • 1852 : महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा उघडली.
  • 1855 : भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
  • 1884 : शेअर मार्केट मध्ये डाऊ जोन्स इंडेक्स लाँच झाला.
  • 1886 : जर्मनीच्या कार्ल बेंझने यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
  • 1890 : ओहायो हे अमेरिकेचे 43 वे राज्य बनले.
  • 1928 : लंडनमध्ये पहिला रंगीत दूरदर्शन कार्यक्रम प्रसारित झाला.
  • 1938 : मॅलार्ड स्टीम इंजिन 202 किमी प्रतितास वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही आहे.
  • 1962 : फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी अल्जेरियाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.
  • 1998 : कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • 2000 : विमानवाहू युद्धनौका विक्रांतचे मुंबईच्या समुद्रातील सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.
  • 2001 : सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
  • 2006 : एक्स. पी. 14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.
  • जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1683 : ‘एडवर्ड यंग’ – इंग्लिश कवी यांचे जन्म.
  • 1838 : ‘मामा परमानंद’ – पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 13 सप्टेंबर 1893)
  • 1886 : ‘रामचंद्र दत्तात्रय रानडे’ – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक यांचा जन्म. (मृत्यू: 6 जून 1957)
  • 1909 : ‘बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे’ – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 22 मार्च 2004)
  • 1912 : ‘श्रीपाद गोविंद नेवरेकर’ – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1977)
  • 1914 : ‘दत्तात्रय गणेश गोडसे’ – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार यांचा जन्म. (मृत्यू : 5 जानेवारी 1992)
  • 1918 : ‘व्ही. रंगारा राव’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुलै 1974)
  • 1924 : ‘सेल्लप्पन रामनाथन’ – तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे 6वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1924 : ‘अर्जुन नायडू’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1926 : ‘सुनीता देशपांडे’ – लेखिका स्वातंत्र्य सैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 2009)
  • 1951 : ‘सररिचर्ड हॅडली’ – न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1952 : ‘अमित कुमार’ – भारतीय गायक यांचा जन्म.
  • 1952 : ‘रोहिनटन मिस्त्री’ – भारतीय कॅनेडियन लेखक यांचा जन्म.
  • 1962 : ‘टॉम क्रूझ’ – प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता यांचा जन्म.
  • 1971 : ‘ज्युलियन असांज’ – विकीलीक्स चे संस्थापक यांचा जन्म.
  • 1976 : ‘हेन्‍री ओलोंगा’ – झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1980 : ‘हरभजन सिंग’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1984 : ‘भारती सिंग’ – भारतीय विनोदी कलाकार यांचा जन्म.
  • मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1350 : ‘संत नामदेव’ – यांनी समाधी घेतली. (जन्म : 29 ऑक्टोबर 1270)
  • 1933 : ‘हिपोलितो य्रिगोयेन’ – अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जम : 12 जुलै 1852)
  • 1935 : ‘आंद्रे सीट्रोएन’ – सिट्रोएन कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1878)
  • 1969 : ‘ब्रायन जोन्स’ – द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1942)
  • 1996 : ‘राजकुमार’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचे निधन. (जन्म : 8 ऑक्टोबर 1926)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

०२ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 12:00:41 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा फाल्गुनी – 11:07:59 पर्यंत
  • करण-वणिज – 12:00:41 पर्यंत, विष्टि – 25:01:42 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-वरियान – 17:45:59 पर्यंत
  • वार-बुधवार
  • सूर्योदय-06:04:33
  • सूर्यास्त-19:20:06
  • चन्द्र राशि-कन्या
  • चंद्रोदय-12:16:59
  • चंद्रास्त-24:22:59
  • ऋतु-वर्षा

जागतिक दिन :

  • जागतिक ट्यूटर (शिक्षक) दिन
  • जागतिक UFO दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1698 : थॉमस सेव्हरीने पहिले स्टीम इंजिन पेटंट केले.
  • 1850 : बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
  • 1865 : सॅल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
  • 1962 : रॉजर्स, आर्कान्सा येथे पहिले वॉल-मार्ट स्टोअर उघडले.
  • 1972 : पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षरी केली.
  • 1983 : कल्पक्कम, तामिळनाडू येथे अणुऊर्जा केंद्र कार्यान्वित झाले.
  • 1994 : चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्य प्रदेश सरकारने कालिदास सन्मानासाठी निवड केली.
  • 2001 : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गावात 104 फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला.
  • 2002 : स्टीव्ह फॉसेट हा गरम हवेच्या फुग्यातून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारा पहिला व्यक्ती ठरला.
  • 2004 : युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश केला.
  • 2013 : इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन द्वारे प्लूटोच्या चौथ्या आणि पाचव्या चंद्रांना, कर्बेरोस आणि स्टायक्स, नाव देण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1862 : ‘विल्यम हेन्री ब्रॅग’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1877 : ‘हेर्मान हेस’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक यांचा जन्म.
  • 1880 : ‘गणेश गोविंद बोडस’ – श्रेष्ठ गायक यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 1965)
  • 1904 : ‘रेने लॅकॉस्ता’ – फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 12 ऑक्टोबर 1996)
  • 1906 : ‘बेटे हान्स आल्ब्रेख्ट’ – नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ यांचा जन्म.
  • 1922 : ‘पिअर कार्डिन’ – फ्रेन्च फॅशन डिझायनर यांचा जन्म.
  • 1923 : ‘जवाहरलालजी दर्डा’ – लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी यांचा जन्म.
  • 1925 : ‘पॅट्रिक लुमूंबा’ – काँगोचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 17 जानेवारी 1961)
  • 1926 : ‘विनायक आदिनाथ बुवा’ – विनोदी लेखक यांचा जन्म.
  • 1930 : ‘कार्लोस मेनेम’ – अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1566 : ‘नॉस्ट्रॅडॅमस’ – जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता यांचे निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1503)
  • 1778 : ‘रुसो’ – फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म : 28 जून 1712)
  • 1843 : ‘डॉ. सॅम्यूअल हानेमान’ – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक याचं निधन. (जन्म : 10 एप्रिल 1755)
  • 1950 : ‘युसूफ मेहेर अली’ – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 23 सप्टेंबर 1903)
  • 1961 : ‘अर्नेस्ट हेमिंग्वे’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक यांचे निधन. (जन्म : 21 जुलै 1899)
  • 1999 : ‘मारिओ पुझो’ – अमेरिकन लेखक यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1920)
  • 2007 : ‘दिलीप सरदेसाई’ – क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1940)
  • 2011 : ‘चतुरनन मिश्रा’ – कम्युनिस्ट नेते यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1925)
  • 2013 : ‘डगलस एंगलबर्ट’ – कॉम्पुटर माउस चे शोधक यांचे निधन. (जन्म : 30 जानेवारी 1925)
  • 2018 : ‘ऍडमिरल जयंत नाडकर्णी’ – परम विशिष्ट सेवा पदक, भारताचे 14वे नौसेनाप्रमुख यांचे निधन. (जन्म : 5 डिसेंबर 1931)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Pandharpur Special Train: आषाढी एकादशी निमित्त गोव्याहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे धावणार

   Follow us on        

गोवा: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता गोव्यातून रेल्वेने थेट पंढरपूरला जाणे अधिक सोपे झाले आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने कॅसल-रॉक येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कॅसलरॉक-मिरज एक्सप्रेस (गाडी क्रमांक १७३३४) ही रेल्वे ४ ते ९ जुलै या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पंढरपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गोव्यातून निघणाऱ्या भाविकांना आता थेट पंढरपूरला रेल्वेने पोहोचणे शक्य होणार आहे. विशेषतः आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भाविकांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

रेल्वेने आजपर्यंत कोकण रेल्वे मार्गे पंढरपूरला जाणारी गाडी सोडलेली नाही!

कोकणातूनही बरेच भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला जातात. या भाविकांमध्ये वयस्कर नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. रेल्वेने गेल्यास आरामदायक प्रवास होऊ शकतो. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देवून दिनांक १ जुलै, २०२५ ते १० जुलै, २०२५ पर्यंत सावंतवाडी – पंढरपूर मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली होती. मात्र यावेळीही या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

MSRTC Updates: आगाऊ आरक्षण केल्यास १५ टक्के सूट! एसटीच्या नवीन सवलतीची आजपासून अंबलबजावणी

   Follow us on        

एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (१५० कि.मी. पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पुर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात १ जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभघ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

१ जुनला एस टी च्या ७७ व्या वर्धापन दिन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकीटामध्ये १५ टक्के सूट देण्यात येईल अशी घोषणा केली होती त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात, ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे.

येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात १५ टक्के सवलत उद्यापासून (१जुलै) लागू होत आहे. तथापि जादा बसेस साठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on         Konkan Railway: उन्हाळी हंगामासाठी विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या गाडी  क्रमांक ०७३११/०७३१२ वास्को द गामा – मुझफ्फरपूर – वास्को द गामा  या गाडीला मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधी धावत असलेल्या वेळापत्रकानुसार आणि डब्यांच्या संरचनेनुसार धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक २३/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २५/०८/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर – वास्को द गामा साप्ताहिक विशेष गाडीची मुदत दिनांक २५/०६/२०२५ पर्यंत होती तिला मुदतवाढ देण्यात आली असून ती दिनांक २८/०८/२०२५ पर्यंत धावणार आहे.
गाडी क्रमांक ०७३११ वास्को द गामा – मुझफ्फरपूर जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल ३०/०६/२०२५ ते २५/०८/२०२५ पर्यंत दर सोमवारी वास्को द गामा येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १२:३० वाजता मुझफ्फरपूर जंक्शनला पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७३१२ मुझफ्फरपूर जंक्शन – वास्को द गामा साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल. ०३/०७/२०२५ ते २८/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी १४:४५ वाजता मुझफ्फरपूर जंक्शन येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी १४:५५ वाजता वास्को द गामाला पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर जंक्शन, प्रयागराज, छे इथं थांबेल. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र आणि हाजीपूर जंक्शन या स्थानकांवर थांबेल
डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

 

०१ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 10:23:06 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्व-फाल्गुनी – 08:54:46 पर्यंत
  • करण-तैतुल – 10:23:06 पर्यंत, गर – 23:07:20 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-व्यतापता – 17:18:19 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:07
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-सिंह – 15:24:38 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:28:00
  • चंद्रास्त- 23:51:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय विनोद दिन
  • कृषी दिन
  • राष्ट्रीय डाक कर्मचारी दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1693 : संभाजी राजांच्या मृत्यूनंतर, मुघलांच्या ताब्यात गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी स्वराज्यात परत आणला.
  • 1837 : इंग्लंडमध्ये जन्म, मृत्यू आणि विवाह यांची अधिकृत नोंदणी सुरू झाली.
  • 1874 : पहिले व्यावसायिक टाइपरायटर विक्री सुरु झाली.
  • 1881 : जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.
  • 1903 : पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत सुरू झाली.
  • 1908 : SOS हे आंतरराष्ट्रीय आपत्कालीन चिन्ह म्हणून स्वीकारले गेले.
  • 1909 : कर्नल विल्यम कर्झन वायली यांची क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने गोळ्या घालून हत्या केली.
  • 1919 : कै. बाबूराव ठाकूर यांनी तरुणभारत वृत्तपत्र सुरू केले.
  • 1921 : चिनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना.
  • 1933 : नाट्यमन्वंतर नाटकाची शाळा अंधांसाठी प्रथम रंगली.
  • 1931 : युनायटेड एअरलाइन्स सुरू झाली.
  • 1934 : मानवी शरीराचे पहिले छायाचित्र काढण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.
  • 1947 : फिलीपीन हवाई दलाची स्थापना झाली.
  • 1948 : बाजारातील व्यापाऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी पूना मर्चंट्स चेंबरची स्थापना करण्यात आली.
  • 1948 : कायद-ए-आझम मुहम्मद अली जिना यांनी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे उद्घाटन केले.
  • 1949 : त्रावणकोर आणि कोचीनचे विलीनीकरण करून तिरुकोचीची स्थापना झाली.
  • 1955 : स्टेट बँक ऑफ इंडिया कायदा 1955 अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. पूर्वी बँकेचे नाव इम्पीरियल बँक होते.
  • 1960 : रवांडा आणि बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.
  • 1961 : महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1962 : सोमालिया आणि घाना स्वतंत्र देश झाले.
  • 1963 : यूएस पत्रव्यवहारात पिन कोड वापरण्यास सुरुवात झाली.
  • 1964 : न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.
  • 1966 : कॅनडातील पहिले रंगीत टेलिव्हिजन प्रसारण टोरोंटो येथे सुरू झाले.
  • 1979 : सोनी कंपनी ने वॉकमन प्रकाशित केला.
  • 1980 : ओ कॅनडा अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रगीत बनले.
  • 1991 : वॉर्सा कराराने सोव्हिएत रशिया, अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि पूर्व जर्मनी या विद्यमान कम्युनिस्ट राष्ट्रांचा अंत केला.
  • 1997 : भारताच्या कुंजराणी देवीने सर्वोत्तम वेटलिफ्टर्सच्या यादीत स्थान मिळवले.
  • 2001 : फेरारीच्या मायकेल शूमाकरने फॉर्म्युला वन वर्ल्ड सीरिजमध्ये फ्रेंच ग्रांप्री जिंकली. पूर्व. त्याने ही शर्यत जिंकली आणि फॉर्म्युला वन मालिकेतील आपले 50 वे विजेतेपद मिळवले.
  • 2002 : आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना.
  • 2007 : इंग्लंडमध्ये सर्व सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी घालण्यात आली.
  • 2015 : डिजिटल इंडिया प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
  • 2017 : वस्तू आणि सेवा कर (GST) हा अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण सुधारणा म्हणून भारतात लागू करण्यात आला.
  • 2020 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो च्या मार्स ऑर्बिटर मिशनने मंगळाच्या सर्वात जवळचा आणि सर्वात मोठा चंद्र असलेल्या फोबोसचे छायाचित्र घेतले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1887 : ‘एकनाथ पांडुरंग रेंदाळकर’ – कविवर्य यांचा जन्म.
  • 1882 : ‘डॉ. बिधनचंद्र रॉय’ – भारतरत्न, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार यांचा जन्म. (मृत्यू: 1 जुलै 1962)
  • 1913 : ‘वसंतराव नाईक’ – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 18 ऑगस्ट 1979)
  • 1938 : ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया’ – प्रख्यात बासरीवादक यांचा जन्म.
  • 1949 : ‘वेंकय्या नायडू’ – भारताचे 13 वे उपराष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1961 : ‘कल्पना चावला’ – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म. (मृत्यू: 1 फेब्रुवारी 2003)
  • 1966 : ‘उस्ताद राशिद खान’ – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म.
  • 1975 : ‘कर्नाम मल्लेश्वरी’ -पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, भारतीय वेटलिफ्टर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1860 : ‘चार्ल्स गुडईयर’ – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक यांचे निधन. (जन्म : 29 डिसेंबर 1800)
  • 1938 : ‘दादासाहेब खापर्डे’ – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान यांचे निधन. (जन्म : 27 ऑगस्ट 1854)
  • 1941 : ‘सर सी. वाय. चिंतामणी’ – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री याचं निधन. (जन्म : 10 एप्रिल 1880 – विजयनगरम, आंध्र प्रदेश)
  • 1962 : ‘पुरुषोत्तमदास टंडन’ – अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष यांचे निधन.
  • 1962 : ‘डॉ. बिधनचंद्र रॉय’ – भारतरत्‍न, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य यांचे निधन. (जन्म : 1 जुलै 1882)
  • 1969 : ‘मुरलीधरबुवा निजामपूरकर’ – कीर्तनकार यांचे निधन.
  • 1989 : ‘प्राचार्य ग. ह. पाटील’ – कवी तसेच शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन.
  • 1994 : ‘राजाभाऊ नातू’ – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक यांचे निधन.
  • 1999 : ‘फॉरेस्ट मार्स सीनियर’ – एम अँड एम चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 21 मार्च 1904)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Banda: एसटी बस दुसर्‍या बसवर आदळली आणि १०० फूट फरफटत नेले; बांद्याजवळ २ एसटी बसमध्ये मोठा अपघात

   Follow us on        

Banda: बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जिवितहानी झाली नाही पण दोन्ही बस मधील एकूण १९ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला.

बांदा फुकेरी बस फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने. येत होती. पानवळ येथे बस आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या उस्मानाबाद पणजी बसची समोरून जोरदार धडक बसली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगात तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले. फुकेरी बस मधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्यात. सर्व जखमीना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.

फुकेरी बसमधील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या. “बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव वेगात तब्बल 100 फूट फुकेरी बसला फरफटत नेले,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सर्व जखमी प्रवाशांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले आहे. डॉक्टरांनी सांगितले की, “जखमी प्रवाशांवर योग्य उपचार केले जात आहेत.” अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली

Railway Updates:रेल्वे तिकीट आरक्षण नियमात मोठे बदल; उद्यापासून अंमलबजावणी

   Follow us on        

Railway Updates:भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत आता तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. 1 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार असून यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल व फसवणूक टाळली जाईल, असा रेल्वे मंत्रालयाचा उद्देश आहे.

रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी एक अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, “01.07.2025 पासून, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) च्या वेबसाईट किंवा अ‍ॅपद्वारे तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी युजर्सचे खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे. त्यानंतर 15.07.2025 पासून बुकिंग करताना आधार-आधारित ओटीपी व्हेरिफिकेशनदेखील बंधनकारक करण्यात आले आहे.”

हे नवे नियम केवळ ऑनलाइन बुकिंगपुरते मर्यादित नसून काउंटर बुकिंगवरसुद्धा लागू होतील. पीआरएस काउंटर किंवा अधिकृत एजंटमार्फत तत्काळ तिकीट बुकिंग करतानाही वापरकर्त्याला सिस्टम-जनरेटेड ओटीपी प्रमाणीकरण करणे आवश्यक असेल, जो बुकिंग वेळी नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. याची अंमलबजावणी 15 जुलैपासून होणार आहे.

या नवीन नियमामुळे अधिकृत तिकीट एजंटसाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांमध्ये एजंट तत्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत. याचा अर्थ, एसी क्लाससाठी सकाळी 10 ते 10.30 या वेळेत व नॉन-एसी क्लाससाठी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत एजंटना बुकिंगची परवानगी दिली जाणार नाही.

रेल्वे सूचना प्रणाली केंद्र (CRIS) व IRCTC यांना याबाबत सर्व झोनल रेल्वेला माहिती देण्यात आली असून, सिस्टममध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

रेल्वे मंत्रालयानुसार, हे बदल तिकीट बुकिंग प्रणालीतील अनियमितता व दलाली रोखण्यासाठी आवश्यक आहेत. अनेकदा दलाल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून काही सेकंदात हजारो तिकीट बुक करतात, यामुळे सामान्य प्रवाशांना तत्काळ योजना अंतर्गत तिकीट मिळणे अवघड होते. या नवीन नियमांमुळे ही समस्या बर्‍याच अंशी कमी होईल, असा मंत्रालयाचा विश्वास आहे.

 

३० जून पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 09:26:35 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 07:21:52 पर्यंत
  • करण-बालव – 09:26:35 पर्यंत, कौलव – 21:49:12 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्वि – 17:20:31 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:07
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 10:37:59
  • चंद्रास्त- 23:18:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस
  • सोशल मीडिया दिवस
  • आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1859 : चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा पार केला.
  • 1868 : क्रिस्टोफर श्लेसने टाइपरायटरचे पेटंट अधिकार मिळवले.
  • 1937 : जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
  • 1944 : प्रभातचा रामशास्त्री सिनेमा, सेंट्रल मुंबई येथे प्रदर्शित झाला.
  • 1960 : काँगोला बेल्जियमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1965 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात कच्छचा करार झाला.
  • 1966 : कोकसुब्बा राव भारताचे पहिले सरन्यायाधीश झाले.
  • 1966 : नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमन, अमेरिकेतील सर्वात मोठी स्त्रीवादी संघटना स्थापन झाली.
  • 1971 : रशियन सोयुझ-11 अंतराळयानामध्ये बिघाड होऊन तीन अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
  • 1978 : यूएस राज्यघटनेतील 26 वी घटनादुरुस्ती संमत करण्यात आली, मतदानाचे वय 18 वर नेण्यात आले.
  • 1986 : केंद्र सरकार आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यातील कराराद्वारे मिझोरामला राज्याचा दर्जा देण्यात आला.
  • 1997 : ब्रिटनने चीन कडून 99 वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट चीनला परत दिले.
  • 2002 : ब्राझीलने फुटबॉल विश्वचषक जिंकला.
  • 2019 : डोनाल्ड ट्रम्प हे उत्तर कोरियाला भेट देणारे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले
  • 2022 : एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1470 : ‘चार्ल्स-आठवा’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 7 एप्रिल 1498)
  • 1919 : ‘एड यॉस्ट’ – हॉट एअर बलूनचे निर्माते यांचा जन्म: (मृत्यू: 27 मे 2007)
  • 1928 : ‘कल्याणजी वीरजी शहा’ – कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑगस्ट 2000)
  • 1934 : ‘चिंतामणी नागेश रामचंद्र राव’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1943 : ‘सईद मिर्झा’ – दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचा जन्म.
  • 1954 : ‘पिएर चार्ल्स’ – डॉमिनिकाचे पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1959 : ‘संदीप वर्मा’ – भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1966 : ‘माइक टायसन’ – अमेरिकन मुष्टीयोद्धा यांचा जन्म.
  • 1969 : ‘सनत जयसूर्या’ – श्रीलंकेचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1973 : ‘दोड्डा गणेश’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1917 : ‘दादाभाई नौरोजी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय यांचे निधन. (जन्म: 4 सप्टेंबर 1825)
  • 1919 : ‘जॉनविल्यम स्टूट रॅले’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1992 : ‘डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे’ – साहित्यिक, वक्ते समीक्षक यांचे निधन.
  • 1994 : ‘बाळ कोल्हटकर’ – नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 25 सप्टेंबर 1926)
  • 1997 : ‘राजाभाऊ साठे’ – शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक यांचे निधन.
  • 1999 : ‘कृष्णा बळवंत निकुंब’ – मराठी काव्यसृष्टीतील कवी यांचे निधन.
  • 2007 : ‘साहिबसिंह वर्मा’ – दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री यांचे निधन. ( जन्म: 15 मार्च 1943)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search