Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway: चाकरमान्यांचा परतीचा प्रवास ‘खडतर’

   Follow us on        

Konkan Railway: कोकणात उन्हाळी सुट्टीसाठी गावी गेलेले चाकरमानी आता परतीच्या मार्गाला लागले आहेत. मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे त्यांना हा प्रवास खडतर आणि त्रासदायक ठरत आहे.

अवकाळी पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला असून बर्‍याच गाड्या आपले वेळापत्रक सोडून धावत आहेत. त्यामुळे 9 ते 10 तासांचा प्रवास 13-14 किंवा त्यापेक्षा जास्त तासांवर आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस सुमारे दोन ते तीन तास उशिराने तर आठवड्यातुन चार दिवस धावणारी  मडगाव – एलटीटी एक्सप्रेस उशीरा धावण्याचे आपलेच विक्रम मोडत आहे. मागच्या आठवड्यात तर दोन वेळा ही गाडी 8 ते 10 तास उशिराने (चालत?) धावत होती. या गाड्यांसाठी एकच रेक असल्याने, पेअरींग ट्रेन उशिरा आल्यास आरंभ स्थानकावरून गाड्या उशिराने सुटत आहेत. पुढे लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य देवून या गाड्या अजून रखवडल्या जातात.

प्लॅटफॉर्म वर शेड नसल्याने त्रास

अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने प्रवाशांना पावसात भिजत गाडी पकडावी लागत आहे. गाडीची घोषणा झाल्यानंतर ती गाडी येईपर्यंत प्लॅटफॉर्म वर सामान सांभाळत गाडीची वाट पहावी लागत आहे. मुसळधार पावसात दोन्ही हातात सामान घेऊन भिजत भिजत गाडी पकडावी लागत आहे. कोकणातील स्थानकांना विमानतळांसारखे स्वरूप देण्यात आले पण प्लॅटफॉर्म शेड सारख्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष केले गेल्याने प्रवासी वर्ग नाराज आहे.

प्रवास ‘वेटिंग’ वरच
कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांचे कन्फर्म तिकीट भेटणे म्हणजे एक दिव्यच मानावे लागेल अशी परिस्थिती सध्या आहे. कोटा कमी, त्यात दलालांचा सुळसुळाट त्यामुळे सामान्य प्रवाशांना सहजासहजी आरक्षित तिकीट उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा परतीचा प्रवास त्यांना सामान्य कोच मध्येच करावा लागत आहे.

२६ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • आजचे पंचांग
  • तिथि-चतुर्दशी – 12:14:34 पर्यंत
  • नक्षत्र-भरणी – 08:24:40 पर्यंत, कृत्तिका – 29:33:48 पर्यंत
  • करण-शकुन – 12:14:34 पर्यंत, चतुष्पाद – 22:24:05 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-शोभन – 07:01:27 पर्यंत, अतिगंड – 26:54:33 पर्यंत
  • वार-सोमवार
  • सूर्योदय-06:03
  • सूर्यास्त-19:08
  • चन्द्र राशि-मेष – 13:41:44 पर्यंत
  • चंद्रोदय-29:47:00
  • चंद्रास्त-18:30:00
  • ऋतु-ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक रेड हेड दिवस
  • स्वयं-शासित प्रदेशांच्या लोकांसह एकतेचा आंतरराष्ट्रीय सप्ताह
महत्त्वाच्या घटना :
  • 1896 : निकोलस (दुसरा) रशियाचा झार झाला.
  • 1971 : बांगलादेशातील सिल्हेटमध्ये पाकिस्तानी सैन्याने 71 हिंदूंची हत्या केली.
  • 1986 : युरोपियन समुदाय ने नवीन ध्वज स्वीकारला.
  • 1989 : मुंबईजवळील न्हावा-शेवा बंदराचे उद्घाटन झाले.
  • 1999 : श्रीहरिकोटा येथून पी.एस.एल.व्हि. सी2  या धृवीय उपग्रहवाहकाने भारताचा आय.एस.एस.पी. 4 (ओशनसॅट), कोरियाचा किटसॅट व जर्मनीचा डी.एल.आर.–टबसॅट या तीन उपग्रहांना त्यांच्या कक्षेत यशस्वीरीत्या पोहोचवले.
  • 2014 : नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1667  : ‘अब्राहम डी. मुआव्हर’ – फ्रेन्च गणिती यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 1754)
  • 1885 : ‘राम गणेश गडकरी’ – नाटककार, कवी व विनोदी लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 23 जानेवारी 1919)
  • 1902 : सदाशिव अनंत शुक्ल ऊर्फ ‘कुमुदबांधव’ – नाटककार व साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 1968)
  • 1906 : ‘बेन्जामिन पिअरी पाल’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय कृषी संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 14 सप्टेंबर 1989)
  • 1930 : ‘करीम इमामी’ – भारतीय-ईराणी भाषेतील शब्दलेखक आणि समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 9 जुलै 2005)
  • 1937 : ‘मनोरमा’ – भारतीय अभिनेत्री आणि गायक यांचा जन्म. (मृत्यू: 10 ऑक्टोबर 2015)
  • 1938 : ‘बी. बिक्रम सिंग’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 12 मे 2013)
  • 1945 : ‘विलासराव देशमुख’ – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑगस्ट 2012)
  • 1951 : ‘सॅली क्रिस्टेन राइड’ – अमेरिकेची पहिली महिला अंतराळयात्री यांचा जन्म. (मृत्यू: 23 जुलै 2012)
  • 1961 : ‘तारसेम सिंग’ – भारतीय-अमेरिकन दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1966 : ‘झोला बड’ – दक्षिण अफ्रिकेची धावपटू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1703 : ‘सॅम्युअल पेपिस’ – विख्यात इंग्रजी रोजनिशीकार व कुशल प्रशासक यांचे निधन. (जन्म: 23 फेब्रुवारी 1633)
  • 1902 : ‘अल्मोन स्ट्राउजर’ – अमेरिकन संशोधक यांचे निधन. (जन्म: 11 फेब्रुवारी 1839)
  • 1908 : ‘मिर्झा गुलाम अहमद’ – अहमदिया पंथाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 13 फेब्रुवारी 1835)
  • 2000 : ‘श्रीपाद वामन काळे’ – अर्थतज्ञ व लेखक, मराठी भाषेतील पहिल्या अर्थविषयक नियतकालिकाचे संपादक यांचे निधन.
  • 2000 : ‘प्रभाकर शिरुर’ – चित्रकार यांचे निधन
  • 2017 : ‘कंवर पाल सिंह गिल’ – पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पोलीस सेवा अधिकारी आणि पंजाब राज्याचे माजी पोलीस महासंचालक यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेसवर झाड कोसळले; लोको पायलटच्या प्रसंगवधाने अनर्थ टळला

   Follow us on    

 

 

त्रिशूर: चेरुथुरुथी येथील रेल्वे पुलाजवळ एक झाड उन्मळून चालत्या ट्रेनवर पडले. ही घटना सकाळी १०.३० च्या सुमारास जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेस परिसरातून जात असताना घडली. झाड ट्रेन आणि ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन्सवर आदळले, परंतु लोको पायलटने तातडीने कारवाई केली आणि ट्रेन थांबवली, ज्यामुळे संभाव्य अनर्थ टळला आहे.
या मार्गावरील रेल्वे सेवा सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. काही गाड्या तात्पुरत्या थांबवण्यात आल्या किंवा पर्यायी मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. ट्रॅक्शन डिस्ट्रिब्युशन डिपार्टमेंट (टीआरडी) ची एक टीम घटनास्थळी पोहोचली आणि पडलेल्या झाडाला बाजूला केले, त्यानंतर दोन्ही ट्रॅकवरील सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

‘कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यास यूआरएल फाऊंडेशनचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर

   Follow us on    

 

 

कोकणातील शाश्वत जीवन शैलीचे महत्व देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या, तळकोकणातील ‘रानमाणूस’ म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रसाद गावडे यास यूआरएल फाऊंडेशनचा यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील, सांगेली गावातील जायपेवाडीत राहणाऱ्या प्रसाद गावडेने आज कोकणी रानमाणूस म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोकणातील पर्यटन, इथली खाद्यसंस्कृती, जीवनशैली, शेती याबद्दलची माहिती प्रसाद आपल्या कोकणी रानमाणूस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. चांगल्या पगाराची नोकरी सोडून या इंजिनिअर तरुणाने इकोटूरिझमच्या माध्यमातून स्वंयरोजगाराची वाट धरली. कोकणाच्या शाश्वत विकासाबद्दल बोलताना प्रसाद तितक्याच परखडपणे स्थानिक प्रश्नही प्रशासनासमोर मांडतो म्हणूनच तो असामान्य ठरत आहे. त्याच्या या कार्याची दखल घेण्यात आली असून त्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रोख रक्कम रुपये एक लाख आणि सन्मानचिन्ह असे या  पुरस्काराचे स्वरूप आहे. दिनांक २९ मे रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा मुंबई येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
युआरएल फाउंडेशनबाबत 
उदयदादा लाड यांनी स्थापना केलेल्या युआरएल (उदयदादा राजारामशेठ लाड) फाउंडेशनतर्फे  मुख्यत्वेकरून समाजातील साहित्य आणि सामाजिक कार्य करणाऱ्या निस्वार्थी व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक निधीतून हे पुरस्कार दरवर्षी वितरित केले जातात. महाराष्ट्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या पात्र सामाजिक कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना ‘१,००,००० (एक लाख)’ बक्षीस देण्याचा वारसा यूआरएल फाउंडेशनने सुरू ठेवला आहे.

New Railway Line: महाराष्ट्रात अजून एका रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

   Follow us on    

 

 

New Railway Line:महाराष्ट्रात अजून एका नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. शनिशिंगणापूरला थेट रेल्वे नसल्याने राहुरी-शनिशिंगणापूर या नव्या रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी देण्यात आली आहे. 22 किलोमीटर लांबीच्या या मार्गासाठी 494 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शनिशिंगणापूर हे प्रमुख धार्मिक स्थळ आहे. शनि दर्शनासाठी दररोज सुमारे 45 हजार भाविक दर्शनासाठी येतात.
शनिशिंगणापूर राहुरीतील राहू-केतू मंदिर, नेवाशातील मोहिनीराज मंदिर, पैस खांब यांसारख्या धार्मिक स्थळांना हा रेल्वे मार्ग सोयीस्कर होणार आहे. त्यातून परिसरात स्थानिक पर्यटनवाढ आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. दररोज चार रेल्वे या मार्गावर धावण्याचे प्रस्तावित असून, त्यातून वर्षाकाठी 18 लाख प्रवासी रेल्वे प्रवास करतील, असा अंदाज रेल्वे मंत्रालयाने वर्तविला आहे.
विकास आणि अध्यात्मिक केंद्र जोडण्यासाठी हा रेल्वेमार्ग एक दिशादर्शक असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकल्पाला जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. तसेच केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डुंगरवाल यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर मंजुरी मिळाली आहे.

Panvel: पनवेल स्थानकावरून जाणार्‍या गाड्यांची वाहतुक जलद करण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

   Follow us on    

 

 

पनवेल: मुंबईत रेल्वेची क्षमता वाढवणे आणि रेल्वे वाहतूक सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमाटणे आणि पनवेल-चिखलीदरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड लाइन्स बांधण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यासाठी ४४४.६४ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प मध्य रेल्वेकडून राबविला जाईल. पनवेल हे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर मार्गावरील एक महत्त्वाचे टर्मिनल आहे. उत्तरेकडे दिवा, दक्षिणेकडे रोहा, पश्चिमेकडे जेएनपीटी आणि पूर्वेकडे कर्जत महत्त्वाचे जंक्शन आहे. सध्या, ग्रेड सेपरेटेड क्रॉसिंग नसल्यामुळे इंजिन रिव्हर्सने वाहतुकीसाठी विलंब होतो. यावर मात करण्यासाठी, दोन कॉर्ड लाइन्स प्रस्तावित केल्या होत्या. आता त्यांना मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे पनवेल स्थानकाहून होणारी वाहतूक जलदगतीने होणार आहे.
खालील दोन कॉर्ड लाइन्सना मान्यता देण्यात आली आहे. 
१)जेएनपीटी ते कर्जत कॉरिडॉरवर दिवा-पनवेल लाइन फ्लायओव्हर मार्गे कॉर्ड लाइन
२) काळटुंरीगाव केबिन आणि सोमाटणे स्थानकादरम्यान कॉर्ड लाइन

२५ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि-त्रयोदशी – 15:54:02 पर्यंत
  • नक्षत्र-अश्विनी – 11:13:20 पर्यंत
  • करण-वणिज – 15:54:02 पर्यंत, विष्टि – 26:04:59 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-सौभाग्य – 11:05:56 पर्यंत
  • वार-रविवार
  • सूर्योदय-06:04
  • सूर्यास्त-19:08
  • चन्द्र राशि-मेष
  • चंद्रोदय-28:52:59
  • चंद्रास्त-17:22:00
  • ऋतु-ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक थायरॉईड दिवस
  • जागतिक मासे स्थलांतर दिन
  • जागतिक फुटबाल दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1666 : शिवाजी महाराज आग्रा येथे नजरकैदेत.
  • 1953 : अमेरिकेच्या पहिल्या सार्वजनिक टेलिव्हिजन स्टेशनने अधिकृत पृष्ठे प्रसारित करण्यास सुरुवात केली.
  • 1955 : कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वोच्च शिखर ब्रिटिश गिर्यारोहक जो ब्राउन आणि जॉर्ज बँड यांनी सर केले.
  • 1961 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी हे दशक संपण्यापुर्वी चंद्रावर मानव उतरवण्याचा कार्यक्रम पूर्ण करण्यात येईल असे अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात जाहीर केले.
  • 1963 : आफ्रिकन युनिटी (OAU) ची स्थापना अदिस अबाबा, इथियोपिया येथे झाली.
  • 1977 : चिनी सरकारने विल्यम शेक्सपियरच्या कलाकृतींवरील बंदी उठवली. ही बंदी सुमारे 10 वर्षे लागू होती.
  • 1981 : सौदी अरेबियातील रियाध येथे गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) या संघटनेची स्थापना झाली. बहारिन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि UAE हे या संघटनेचे सदस्य देश आहेत.
  • 1985 : बांगलादेशात चक्रीवादळामुळे सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1992 : प्रख्यात बंगाली लेखक सुभाष मुखोपाध्याय यांना ज्ञानपीठ पुरस्कार 1991 जाहीर.
  • 1999 : पंढरपूरला सुमारे 100 वर्षे लाखो भाविक आणि नागरिकांची सेवा करणाऱ्या पंढरपूर-कुर्डूवाडी नॅरोगेज रेल्वेचा निरोप देण्यात आला.
  • 2010 : भारतीय वंशाच्या 59 वर्षीय कमला प्रसाद बिसेसर यांची त्रिनिदाद आणि टोबॅगोचे माजी पंतप्रधान पॅट्रिक मॅनिंग यांचा पराभव करून प्रथम महिला पंतप्रधान म्हणून निवड झाली.
  • 2012 : SpaceX ड्रॅगन हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासह यशस्वीरित्या डॉक करणारे पहिले व्यावसायिक अंतराळयान ठरले.
  • 2014 : मालवथ पूर्णा ही जगातील सर्वात कमी वयात (13 वर्षे) एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला ठरली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 803 : ‘राल्फ वाल्डो इमर्सन’ – अमेरिकन लेखक व तत्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 एप्रिल 1882)
  • 1831 : ‘सर जॉन इलियट’ – ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 18 मार्च 1908)
  • 1886 : ‘रास बिहारी घोष’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 21 जानेवारी 1945)
  • 1895 : ‘त्र्यंबक शंकर शेजवलकर’ – इतिहासकार व लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 28 नोव्हेंबर 1963)
  • 1899 : स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, बंगाली कवी काझी यांचा जन्म. (मृत्यू : 29 ऑगस्ट 1976)
  • 1927 : ‘नझरुल इस्लाम’ – अमेरिकन लेखक रॉबर्ट लुडलुम यांचा जन्म. (मृत्यू : 12 मार्च 2001)
  • 1936 : ‘रुसी सुरती’ – क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 13 जानेवारी 2013)
  • 1954 : ‘मुरली’ – भारतीय अभिनेता, निर्माता आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 2009)
  • 1972 : ‘करण जोहर’ – भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1954 : ‘गजानन यशवंत ताम्हणे’ तथा माणिकराव – आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक, कन्या आरोग्य मंदिरा चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 31 डिसेंबर 1878)
  • 1998 : ‘लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर’ – लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार यांचे निधन. (जन्म : 3 नोव्हेंबर 1937)
  • 1999 : बाळ दत्तात्रय तथा ‘बी. डी. टिळक’ – संशोधक, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) संचालक यांचे निधन.
  • 2005 : ‘सुनील दत्त’ – अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक व केंद्रीय मंत्री यांचे निधन. (जन्म : 6 जून 1929)
  • 2013 : ‘महेंद्र कर्मा’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. ( जन्म : 5 ऑगस्ट 1950)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Remote control lifebuoy: पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणाऱ्या यंत्राचे नवबाग येथे प्रात्यक्षिक

   Follow us on    

 

 

सिंधुदुर्ग: समुद्र किनारपट्टीवर पाण्याचा अंदाज न आल्याने नागरिक बुडण्याच्या घटना घडत असतात. अशा बुडणाऱ्या व्यक्तींना मनुष्याचा सहभाग न घेता रिमोट द्वारे वाचविण्याचे यंत्र पुणे येथील एका कंपनी द्वारे बनवण्यात आले आहे. समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणारे “रिमोट कार्स्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट” (दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र) रिमोट द्वारे नियंत्रित करून बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवते.  पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वेंगुर्ले नवाबाग समुद्र किनारी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविणारे “रिमोट कार्स्ट फॉर लाइफ सेव्हिंग युनिट” (दूरनियंत्रित जीवन रक्षक यंत्र) या यंत्राचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले.
स्वतः जिल्हाधिकारी यांनीही रिमोट द्वारे या यंत्राची माहिती घेऊन कृतीद्वारे अनुभव प्रात्यक्षिक अनुभवले. कंपनीचे पुणे येथील भूषण चिंचोले यांनी वेंगुर्ले नवाबाग समुद्रात या यंत्राचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी यांना करून दाखविले. यावेळी रिमोट वर चालणाऱ्या या यंत्राचे प्रात्यक्षिक बघितल्या नंतर जिल्हाधिकारी यांनी त्याच स्वतः वापरून प्रात्यक्षिक केले आणि सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनीष दळवी, तहसीलदार ओंकार ओतारी, उभादांडा सरपंच निलेश चमणकर, मंडळ अधिकारी विनायक कोदे, तलाठी सायली आदुर्लेकर, भाजप वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पप्पू परब, मच्छीमार नेते वसंत तांडेल, तसेच पोलीस पाटील, कोतवाल, नागरिक उपस्थित होते.
हे यंत्र समुद्रात दीड किलो मीटर पर्यंत बुडणाऱ्या व्यक्ती पर्यंत जाऊ शकते. एका वेळी तीन व्यक्तींना समुद्राच्या पाण्यावर आपल्या सोबत तरंगत ठेऊ शकते. तसेच एक व्यक्ती बुडत असेल तर त्या व्यक्तीला तरंगत पकडून किनाऱ्यापर्यंत आणू शकते.

Special Trains: मुंबई – गुजरात दरम्यान धावणार अतिजलद तेजस विशेष गाड्या

   Follow us on    

 

 

मुंबई :प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विशेषतः उन्हाळी हंगामात प्रवाशांची वाढती मागणी गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते राजकोट आणि मुंबई सेंट्रल ते गांधीधाम दरम्यान विशेष भाड्याने अतिजलद तेजस विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी, पश्चिम रेल्वेने विशेष भाड्याने दोन विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे .

ट्रेन क्रमांक ०९००५ मुंबई सेंट्रल -राजकोट स्पेशल दर बुधवार आणि शुक्रवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ .४५ वाजता राजकोटला पोहोचेल. ही ट्रेन ३० मे ते २७ जून पर्यंत धावेल. त्याचप्रमाणे,

ट्रेन क्र. ०९००६ राजकोट-मुंबई सेंट्रल स्पेशल दर गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी ६.३० वाजता राजकोटहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ३१ मे ते २८ जून पर्यंत धावेल.ही गाडी बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, सुरेंद्रनगर आणि वांकानेर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर कोच असतील.

ट्रेन क्रमांक ०९०१७ मुंबई सेंट्रल – गांधीधाम स्पेशल ही गाडी दर सोमवारी मुंबई सेंट्रलहून रात्री ११. २० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५५ वाजता गांधीधामला पोहोचेल. ही ट्रेन ०२ जून ते ३० जूनपर्यंत धावेल. त्याचप्रमाणे, ट्रेन क्रमांक ०९०१८ गांधीधाम-मुंबई सेंट्रल स्पेशल दर मंगळवारी गांधीधामहून संध्याकाळी ६. ५५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल. ही ट्रेन ०३ जून ते ०१ जुलैपर्यंत धावेल. ही ट्रेन दोन्ही दिशांना बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, समख्याली आणि भचाऊ स्थानकांवर थांबेल. या ट्रेनमध्ये फर्स्ट एसी, एसी २-टायर आणि एसी ३-टायर
कोच आहेत.

कालावधी वाढवण्यात आलेल्या विशेष गाड्या: ट्रेन क्रमांक ०९०६७ उधना-जयनगर अनारक्षित विशेष गाडी २९ जून पर्यंत,ट्रेन क्रमांक ०९०६८ जयनगर-उधना अनारक्षित विशेष गाडी ३० जून पर्यंत , ट्रेन क्रमांक ०६०९६ उधना-समस्तीपूर स्पेशल २८ जून पर्यंत आणि ट्रेन क्रमांक ०९०७० समस्तीपूर-उधना स्पेशल ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर मोठे भगदाड; वाहतुकीस धोका निर्माण

   Follow us on    

 

 

Mumbai Goa Highway: मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप ते पत्रादेवी बायपासवरील इन्सुली कुड़व टेंब येथे एक भला मोठा भगदाड, असा खड्डा पडल्याने वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे माती खचल्याने हा खड्डा पडल्याची माहिती मिळाली आहे. या खड्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना हा खड्डा दिसणे कठीण असल्याने मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गांवर प्रवास करताना नागरिकांनी सतर्क राहुन आपला प्रवास करावा.
निगुडे येथील माजी सरपंच झेवियर फर्नांडीस यांनी या गंभीर समस्येकडे महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी तात्काळ यावर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तातडीने दुरुस्ती काम हाती घ्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून जोर धरू लागली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search