Bareilly, UP
>3 men attended a wedding
>Used Google Maps on their way back.
>Map directed them to an incomplete bridge.
>The car sped ahead & fell down.
>All three tragically lost their lives. pic.twitter.com/H7SQbkeMX7— Gems (@gemsofbabus_) November 24, 2024
Author Archives: Kokanai Digital
Maharashtra Assembly Election:महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाच्या प्रतिष्ठेसाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत पक्षाला खातेही उघडता आलेले नाही. पक्षाकडून तब्बल १२५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्यानंतरदेखील एकही जागा जिंकता न आल्याने मनसेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यासह नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत पक्षाच्या मतांचा टक्का अवघ्या १.५५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या निवडणुकीत हे प्रमाण २.२५ टक्के इतके होते.
Maharashtra Assembly Election:विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र विरोधी पक्षातील कोणत्याही पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नसल्याने यंदा विधानसभेत विरोधी पक्षनेते पदच नसणार आहे. या अगोदर लोकसभेत २०१४ आणि २०१९ निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षनेते पद नव्हते. आता राज्यात हे पद नसणार आहे.
| क्र. | पक्ष | टक्केवारी |
| 1 | भारतीय जनता पार्टी – भाजपा | 26.77% |
| 2 | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | 12.42% |
| 3 | शिवसेना | 12.38% |
| 4 | राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार | 11.28% |
| 5 | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | 9.96% |
| 6 | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) | 9.01% |
| 7 | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | 1.55% |
| 8 | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन | 0.85% |
| 9 | नोटा | 0.72% |
| 10 | बहुजन समाज पार्टी | 0.48% |
| 11 | समाजवादी पक्ष – सपा | 0.38% |
| 12 | भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) | 0.34% |
| 13 | इतर | 13.86% |
Maharashtra Assembly Election Statistics: सर्व राजकीय विश्लेषक, मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज चुकीचे ठरवत विधानसभा निवडणुकीत महायुतीने तब्बल २३४ जागांवर विजय मिळवला आहे. रात्री १२ वाजता हाती आलेल्या अंतिम निकालांनुसार २८८ पैकी २३४ जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीत शिवसेनेला (ठाकरे) २०, काँग्रेसला १६ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने १० जागा जिंकल्या आहेत.
| क्र. | पक्ष | विजयी आमदार |
| 1 | भारतीय जनता पार्टी – भाजपा | 132 |
| 2 | शिवसेना | 57 |
| 3 | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) | 41 |
| 4 | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | 20 |
| 5 | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | 16 |
| 6 | राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार | 10 |
| 7 | समाजवादी पक्ष – सपा | 2 |
| 8 | जन सुराज्य शक्ती | 2 |
| 9 | राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष | 1 |
| 10 | राष्ट्रीय समाज पक्ष | 1 |
| 11 | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन | 1 |
| 12 | भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) | 1 |
| 13 | भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष | 1 |
| 14 | राजर्षी शाहू विकास आघाडी | 1 |
| 15 | अपक्ष | 2 |
आजचे पंचांग
- तिथि-नवमी – 22:22:31 पर्यंत
- नक्षत्र-पूर्व-फाल्गुनी – 22:17:04 पर्यंत
- करण-तैतुल – 09:07:56 पर्यंत, गर – 22:22:31 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-वैधृति – 12:16:30 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:53
- सूर्यास्त- 17:57
- चन्द्र-राशि-सिंह – 29:02:44 पर्यंत
- चंद्रोदय- 25:51:00
- चंद्रास्त- 13:46:00
- ऋतु- हेमंत
- १४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.
- १७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद
- १८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ’ओरिजिन ऑफ द स्पिशिज’ प्रकाशित केला.
- १८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.
- १९२६: आजच्याच दिवशी प्रख्यात तत्वज्ञानी महर्षी अरविंद यांना पूर्ण सिद्धी ची प्राप्ती झाली होती.
- १९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
- १९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.
- १९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.
- १९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.
- १९८६: आजच्याच दिवशी तामिळनाडू राज्यातील विधानसभेत एकाच वेळी सर्वच सदस्यांना सदनातून बरखास्त करण्यात आले होते.
- १९८८: पक्षांतर बंदी कायद्यान्वये पहिल्यांदा लोकसभा सदस्य लालदुहोमा यांना अयोग्य घोषित करण्यात आले होते.
- १९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर
- १९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा ’जी. डी. बिर्ला पुरस्कार’ हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर
- १९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला ‘कवी माधव पुरस्कार‘ जाहीर
- १९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा ’आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार’ ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर
- १९९८: समाजसेविकांना दिला जाणारा ‘अहल्यादेवी होळकर पुरस्कार‘ आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना
- २०००: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
- २००१: नेपाळ या देशात आजच्याच दिवशी स्थानिक पोलीस ,सैन्य व माओवादी यांच्यात चकमक होऊन ३८ पोलीस व सैनिक मारले गेले होते.
- २००८: आजच्याच दिवशी मालेगाव बॉम्बस्फो टातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी ए टी एस या दहशतवाद विरोधी शोध पथकावर अश्लील चलचित्र दाखविल्याचा आरोप लावला होता.
- १८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)
- १८८१: स्वाधीनता सेनानी छोटूराम यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता.
- १८८१: डेप्युटी कमिशनर बनणारे पहिले भारतीय कावसजी पेटिगारा यांचा जन्म झाला होता.
- १८९४: हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २२ जानेवारी १९७८)
- १८९९: राजस्थान राज्याचे प्रथम मुख्यमंत्री व राजनेते हिरा लाल शास्त्री यांचा जन्म झाला होता.
- १९१४: लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली. (मृत्यू: २५ एप्रिल २००३)
- १९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.
- १९४१: भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.
- १९५५: इयान बोथॅम – इंग्लंडचा क्रिकेटपटू
- १९६१: अरुंधती रॉय – लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या
- १६७५: गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत. (१ एप्रिल १६२१)
- १९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
- १९४८: मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन. (जन्म: १ मे १८६४)
- १९६३: ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी (जन्म: १८ आक्टोबर १९३९)
- १९६३: महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३), मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १९००)
- २००३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (जन्म: १ जानेवारी १९२३)
- २००४: आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (जन्म: ५ एप्रिल १९२०)
- २०१४: भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९३७)
आजचे पंचांग
- तिथि-अष्टमी – 20:00:00 पर्यंत
- नक्षत्र-माघ – 19:28:02 पर्यंत
- करण-बालव – 07:00:26 पर्यंत, कौलव – 20:00:00 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-इंद्रा – 11:40:51 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 06:53:49
- सूर्यास्त- 17:57:08
- चन्द्र-राशि-सिंह
- चंद्रोदय- 25:03:00
- चंद्रास्त- 13:13:00
- ऋतु- हेमंत
- १९२४: एडविन हबल यांनी ’देवयानी’ (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
- १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
- १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
- १९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
- १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
- १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल ’अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार’ प्रदान.
- ८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)
- १७५५: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)
- १८८२: वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)
- १८९७: निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ’अॅन आटोबायोग्राफी ऑफ अॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)
- १९२३: नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक (मृत्यू: १६ आक्टोबर २००२)
- १९२६: सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (मृत्यू: २४ एप्रिल २०११)
- १९३०: गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (मृत्यू: २० जुलै १९७२)
- १९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.
- १९६७: गॅरी कर्स्टन – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक
- १९८४: अमृता खानविलकर – अभिनेत्री
- १९३७: जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)
- १९५९: ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (जन्म: १२ मार्च १८९१)
- १९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)
- १९८९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
- १९९३: ब्रूनो रॉस्सी – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)
- १९९९: कुमुद सदाशिव पोरे – अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????
- २०००: बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)
- २००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)
Mumbai Local: मुंबई लोकल मध्ये शुल्लक कारणाने झालेल्या भांडणांमुळे एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना घाटकोपर येथे घडली. 15 नोव्हेंबर रोजी घाटकोपर (Ghatkopar) स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये सीटवरून झालेल्या भांडणात एका मुलाने एका व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहवालानुसार, टिटवाळ्यातील या 16 वर्षीय मुलाने 35 वर्षीय व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. खुनाच्या एक दिवस अगोदर मयत अंकुश भालेराव आणि त्याच्या साथीदारांचा ट्रेनमध्ये प्रवास करताना या मुलासोबत जोरदार वाद झाला होता. त्यानंतर दुसर्या दिवशी हा मुलगा चाकू घेऊन गेला आणि त्याने कामावर जात असलेल्या भालेराव यांच्यावर हल्ला केला.
गव्हर्नमेंट रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) अखेर स्टेशनवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग काढला आणि खुनाच्या दोन दिवसांनंतर टिटवाळा येथून त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा मोठा भाऊ मोहम्मद सनाउल्ला बैथा (25) याला गोवंडी येथून अटक केली. त्याने आपल्या भावाला चाकू लपवण्यात आणि पकडण्यापासून वाचवण्यात मदत केल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत दोघेही टिटवाळा येथील रहिवासी आहेत. 14 नोव्हेंबरला ट्रेनमधील चौथ्या सीटवरून दोघांमध्ये भांडण सुरू झाले. बेनाली गावातील रहिवासी भालेराव आणि त्यांच्या इतर दोन मित्रांनी भांडणाच्या वेळी या अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याचा आरोप आहे. यानंतर मुलाने भालेराव यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आरोपी टिटवाळ्याहून ट्रेनमध्ये चढला आणि घाटकोपर स्टेशनवर उतरला. तो भालेराव येण्याची वाट पाहू लागला.
सकाळी दहाच्या सुमारास भालेराव खाली उतरले आणि ते आपल्या कामावर जाऊ लागले. त्याचवेळी आरोपीने गुपचूप त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर पाठीमागून वार करून पळ काढला. त्यानंतर भालेराव यांना राजावाडी रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये त्याने पोलिसांना आरोपीने दिलेल्या धमकीबद्दल सांगितले. ट्रेनमध्ये जेव्हा भांडण झाले होते तेव्हा भालेराव यांनी आरोपीचा फोटो काढला होता.
आजचे पंचांग
- तिथि-सप्तमी – 18:10:46 पर्यंत
- नक्षत्र-आश्लेषा – 17:10:47 पर्यंत
- करण-भाव – 18:10:46 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-ब्रह्म – 11:33:00 पर्यंत
- वार-शुक्रवार
- सूर्योदय- 06:52
- सूर्यास्त- 17:57
- चन्द्र-राशि-कर्क – 17:10:47 पर्यंत
- चंद्रोदय- 24:12:59
- चंद्रास्त- 12:37:59
- ऋतु- हेमंत
- १९४३: लेबनॉन (फ्रान्सपासुन) स्वतंत्र झाला.
- १९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा
- १९५०: आजच्या दिवशी अमेरिकेतील रिचमंड हिल्स येथे भीषण रेल्वे दुर्घटनेत ७९ लोक मृत्यमुखी पडले होते.
- १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
- १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन
- १९६५: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.
- १९६८: आजच्याच दिवशी मद्रास राज्याचे नामकरण तामिळनाडू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत पारित करण्यात आला होता.
- १९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.
- १९७५: जुआन कार्लोस आजच्याच दिवशी स्पेन ह्या देशाचे राजा म्हणून नियुक्त झाले होते.
- १९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.
- १९८९: आजच्याच दिवशी मंगळ, शुक्र, शनि, युरेनस, नेपच्यून व चंद्र हे सर्व एका सम रेषेत आले होते.
- १९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू
- १९९७: नायजेरियात ’मिस वर्ल्ड’ स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार
- २००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
- २००६: भारतासह विश्वातील अन्य सहा देशांनी सूर्यासारखी उर्जा निर्मिती करणाऱ्या पहिल्या फ्युजन रिएक्टरची स्थापना करण्यासाठी पेरीस येथील बैठकीत ऐतेहासिक करार केला होता.
- २०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.
- १८०८: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (मृत्यू: १८ जुलै १८९२)
- १८६४: भारताची प्रथम महिला चिकित्सक रुक्माबाई यांचा जन्म झाला होता.
- १८७७: एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०)
- १८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाङ्मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९५६)
- १८८२: प्रसिध्द भारतीय उद्योजक वालचंद हिराचंद जन्म झाला होता.
- १८८५: हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (मृत्यू: १८ आक्टोबर १९५१)
- १८९०: चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)
- १८९९: भारतीय स्वतंत्रता सेनानी शहीद लक्ष्मण नायक यांचा जन्म झाला होता.
- १९०९: द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)
- १९१३: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)
- १९१५: किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)
- १९१६: भारतीय स्वतंत्रता सेनानी शांती घोष यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
- १९२२: साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.
- १९२६: मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००७)
- १९३९: मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री.
- १९४३: बिली जीन किंग – अमेरिकन लॉनटेनिस पटू
- १९६७: बोरिस बेकर – ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉनटेनिस पटू
- १९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.
- १९७०: मार्वन अट्टापट्टू – श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार
- १९८०: नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.
- १८८१: स्वतंत्रता सेनानी अहमदुल्लाह यांचा मृत्यू झाला होता.
- १९०२: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)
- १९२०: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर – कवी व संपादक (जन्म: ? ? १८८७)
- १९४४: खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.
- १९५७: पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)
- १९६३: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (जन्म: २६ जुलै १८९४)
- १९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या (जन्म: २९ मे १९१७)
- १९८०: मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)
- २०००: डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक (जन्म: ६ आक्टोबर १९१२?)
- २००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.
- २००८: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)
- २०१२: पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६)
- २०१६: प्रसिध्द भोजपुरी व हिंदी भाषेचे साहित्यकार विवेकी राय यांचे निधन झाले होते.
- २०१६: भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९३०)











