Author Archives: Kokanai Digital

शेती: कोकणात होणार सुपारी संशोधन केंद्र

कोकणातील रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत पाच एकर जागेत सुपारी संशोधन केंद्र उभारण्यास कृषी विभागाने मान्यता प्रदान केली आहे. यासाठी ५ कोटी ६४ लाख रुपये निधी खर्चास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड येथे या केंद्रासाठी पाठपुरावा केला होता.
रायगड जिल्ह्यात सुपारीचे बागायती  पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन सुपारी संशोधन केंद्र उभारले जावे यासाठी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे, खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आग्रही होते.
या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

०९ डिसेंबर देवगड दुर्घटना: जबाबदार कोण? बेलगाम तरुणाई, निष्काळजीपणा की अपुरी सुरक्षा व्यवस्था ?

देवगड :काल दिनांक ०९ डिसेंबर रोजी देवगड पर्यटनासाठी पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल आली असताना या समुद्रात गेलेल्या चार विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची आणि एकजण बेपत्ता झाल्याची  दुर्घटना घडली.
अशा घटना घडल्या कि पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे त्या जागेवरील सुरक्षाव्यवस्था. साहजिकच सर्व स्तरावरून अशा येथील प्रशासनास जबाबदार धरले जाते आणि येथून प्रशासन सुरक्षा देण्यास कुठे कुठे कमी पडले त्यावर सर्वच माध्यमावर चर्चा सुरु होते. येथेही काही त्रुटी आढळून आल्यात.
देवगड नगरपंचायतीतर्फे जीव रक्षकांना पगार दिला जातो एवढा खर्च करू नाही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम नाही आहे. देवगड किनारपट्टीवर एक जीव रक्षक यापूर्वीच नोकरी सोडून गेला त्या ठिकाणी दुसऱ्याची नेमणूक अद्यापही करण्यात आलेली नाही. या ठिकाणी नगरपंचायतीचा एक सफाई कर्मचारीही उपस्थित असतो मात्र तोही या दुर्घटनेच्या वेळी नव्हता तो कोठे होता? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. हजारो लाखो रुपये खर्च करून आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालीम करण्यात येतात मात्र आपत्ती आल्यावर ही रंगीत तालीम काहीच उपयोगाची नसते याचा प्रत्यय आजच्या घटनेवरून आला व्यक्ती बुडाल्यावर पोलीस हजर झाले व देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या अपुऱ्या कर्मचारी वर्गाने बुडालेल्या  व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले सागरी पोलिसांची एकच नौका देवगड समुद्रात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत होती देवगड मधील मच्छिमार, ग्रामस्थ यांनीच आपत्ती व्यवस्थापन राबवले. पोलीस व देवगड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वगळून कुठल्याही खात्याचे लोक आपत्ती व्यवस्थापनासाठी फिरकले नाहीत
सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आहेत, त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा घटना घडल्यास हानी होता नये.  पण पूर्णपणे अशा घटनेस प्रशासनास जबाबदार धरणे योग्य ठरेल का? मुले जवळपास असली कि पालकवर्ग मुलांकडे लक्ष ठेवून असतो.  तेच पालक मुलांना सहलीसाठी किंवा एका अभ्यास दौऱ्यासाठी शाळेतर्फे किंवा एखाद्या अकॅडेमी तर्फे पाठवत असतात आणि तीच जबाबदारी त्या संस्थेला वर्ग pass करतो. त्यांच्यावर विश्वास ठेवतो.
मात्र कालच्या घटनेत संस्थेतर्फे निष्काळजीपणाचे दर्शन झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही सैनिक अकॅडमी आहे, जेथे शिस्तीला मोठे स्थान आहे. संस्थेच्या शिक्षकांनी सहलीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या नाही होत्या का? विध्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे शिक्षकांची संख्या कमी होती का? त्यांचा विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कृतींवर पुरेसा लक्ष नाही होता का?  या घटनेवरून विद्यार्थी बेलगाम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अकॅडमीच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मालवण: सागरी महामार्गावर दोन कार धडकल्या; ५ जण जखमी

मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ-वेंगुर्ले सागरी महामार्गावरकाल सायंकाळी चारच्या सुमारास दोन मोटारींची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले.या अपघातात दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले असून या अपघाताची नोंद येथील पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्या सर्व जखमींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 
याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळ-माड्याचीवाडी येथील काहीजण मोटारीने (एम. एच- ४३ एन- ७०५०) मालवणात लग्न समारंभासाठी आले होते. समारंभ आटोपून सायंकाळी ते पुन्हा कुडाळच्या दिशेने निघाल्यावर कुंभारमाठ-वेंगुर्ले सागरी महामार्गावर मोटार आली असता समोरून वेंगुर्लेहून श्रावणच्या दिशेन येत असलेली मोटार (एम. एच. ०२ डीएस ११०६) यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात घडला. या अपघातात दशरथ धोंडू तेली (वय ५५) व चंद्रशेखर मधुसूदन परब (५८ दोघे रा. माड्याचीवाडी, कुडाळ) हे तर दुसऱ्या गाडीतील सुनीता महेश पवार (५८), सिद्धेश महेश पवार (३३), सचिन गणपत पवार (३६, सर्व रा. श्रावण) हे तिघे असे एकूण पाचजण जखमी झाले आहेत,

कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी मेगाब्लॉक; २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी सावर्डा ते रत्नागिरी या विभागां दरम्यान  रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी  ०७:०० ते ०९:३० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक मुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 12617 Ernakulam Jn. – H. Nizamuddin Express
दिनांक १४ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान  १ तास ४५ मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे. 
२) Train no. 20923 Tirunelveli – Gandhidham Express
दिनांक १४ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते रत्नागिरी या स्थानकांदरम्यान  १ तास १० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे 

धक्कादायक! पाच विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाले! चार मुलींचा समावेश

देवगड : सिंधुदुर्गातील देवगड येथे सहलीला आलेल्या पुण्यातील सहा पर्यटक बुडाल्याची घटना घडलीय. यात ४ जणांचा मृत्यू झाला असून एकजण असून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे येथील संकल्प सैनिक अॅकॅडमीची सहल देवगड येथे आली होती. यातील काहीजण समुद्रात आनंद लुटण्यासाठी उतरले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडाले.

बुडालेल्यांपैकी चार जणांचे मृत सापडले आहेत. प्रेरणा डोंगरे,अंकिता गालटे,अनिषा पडवळ,पायल बनसोडे अशी मृतांची नावे आहेत. याच्याबरोबर अजून दोनजण बुडाले आहेत, त्यातील आकाश तुपे नावाच्या पर्यटकाला वाचवण्यात आलंय. तर राम डिचवलकर हे अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.

कणकवली: कोंडये येथे ‘शांत’ बिबट्या समोर जीवघेणी स्टंटबाजी… …

कणकवली: कोंडये येथील फांदीचा माळ येथे काजू बागेत सोमवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. विशेष म्हणजे बिबट्या अगदी शांत स्थितीत होता. बिबट्या दिसल्याचे कळताच ग्रामस्थांनीही तेथे धाव घेतली. ग्रामस्थ अगदी काही फुटांवर असून देखील बिबट्या शांत होता. याचा फायदा घेत काही ग्रामस्थांनी स्टंटबाजी केली आणि व्हिडीयो बनवलेत. बिबट्याच्या काही फूट जवळ जाऊन फोटो सुद्धा काढले गेलेत. ही स्टंटबाजी जीवघेणी ठरली असती.

मात्र तो बिबट्या एवढा शांत का होता? याचे उत्तर अजूनही भेटले नाही. कदाचित तो जखमी असेल असा अंदाज बांधला जात आहे.  जवळपास पंधरा मिनिटे बिबट्या तेथे होता. त्यानंतर तो जंगलच्या दिशेने निघून गेला. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल अमित कटके आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.  दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोंडये ग्रामपंचायतीतर्फे वनविभागाकडे करण्यात आली आहे

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! दादर स्थानकावर उद्यापासून होणार मोठे बदल

मुंबई: मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर हे सर्वात मोठे आणि मध्यवर्ती स्थानक आहे. मात्र, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकातील फलाट क्रमांकावरून प्रवाशांचा काहीसा गोंधळ उडतो. फलाटांचा हा गोंधळ पाहता मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील सध्याचे फलाट क्रमांक बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ८ ते १४ पर्यंत फलाटांचे क्रमांक निश्चित करण्यात आले असून, उद्या शनिवारी ९ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मात्र, या बदलांमुळेही सुरुवातीला प्रवाशांमध्ये काहीसा गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
येत्या शनिवारपासून पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील फलाटांना एका रांगेतील क्रमांक दिले जाणार आहेत. पश्चिम रेल्वेवरील फलाटांचे क्रमांक हे एक ते सातपर्यंतच राहतील. मात्र, मध्य रेल्वेवरील फलांटांना ८ पासून ते १४ पर्यंत क्रमांक दिले जातील.
सध्या मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील एक क्रमांकाचा फलाट हा ९ डिसेंबरपासून आठ नंबर फलाट म्हणून ओळखला जाणार आहे. तर दोन क्रमांकाचा फलाट सध्या बंदच असून, तेथे रेल्वेचे काम सुरू आहे. तीन क्रमांकाचा फलाट हा नऊ क्रमांकाने, चार क्रमांकाचा फलाट दहा, पाच क्रमांकाचा फलाट हा ११ क्रमांकाचा फलाट, सध्याचा सहा क्रमांकाचा फलाट हा १२, सात क्रमांकाचा फलाट हा १३ आणि दादर टर्मिनसचा आठ क्रमांकाचा फलाट १४ क्रमांकाने ओळखला जाणार आहे. फलाट क्रमांकाच्या बदलामुळे केंद्रीयकृत रेल्वे सूचना प्रमाणालीमधील उद्घोषणा यंत्रणेतही बदल केले जाणार आहे. तर मध्य रेल्वेच्या पादचारी पुलांवर पूल आणि स्थानकात असलेल्या दिशादर्शक फलकांवरील क्रमांकातही बदल केले जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या फलाटांच्या क्रमांकात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
फलाट क्रमांकाच्या बदलामुळे केंद्रीयकृत रेल्वे सूचना प्रमाणालीमधील उद्घोषणा यंत्रणेतही बदल केले जाणार आहे. तर मध्य रेल्वेच्या पादचारी पुलांवर पूल आणि स्थानकात असलेल्या दिशादर्शक फलकांवरील क्रमांकातही बदल केले जाणार आहे. पश्चिम रेल्वेच्या फलाटांच्या क्रमांकात कोणतेही बदल केले जाणार नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.
फलाटांच्या क्रमांकातील बदल
जुना क्रमांक नवीन क्रमांक
फलाट एक – आठ
फलाट दोन – सध्या बंदच असून, तेथे काम सुरू आहे.
फलाट तीन – ९
फलाट चार – १०
फलाट पाच – ११
फलाट सहा – १२
फलाट सात – १३
फलाट आठ (दादर टर्मिनस) – १४

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामधील रिक्त पदांसाठी भरती; ‘असा’ करा अर्ज

नोकरी :सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

⇒ पदाचे नाव : लघुलेखक (ग्रेड-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल.

⇒ एकूण रिक्त पदे: 62 पदे.

⇒ नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग.

⇒ वेतन/ मानधन: रु. 15,000/- ते रु. 1,22,800/- पर्यंत.

⇒ वयोमर्यादा: १८ – ३८ वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट).

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 4 डिसेंबर 2023.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023.

⇒ अर्ज करण्याची लिंक 👇🏻

https://bombayhighcourt.nic.in

जाहिरात 👇🏻

सिंधुदुर्ग किल्ल्यावर ‘लेझर शो’; नौसेना दिन कार्यक्रमाचे औचित्य

सिंधुदुर्ग: मालवणात सध्या नौसेना दिनाची धामधूम सुरू आहे. नौदलाच्या कवायती पाहण्यासाठी तारकर्ली समुद्रकिनारी लोकांची मोठी गर्दी होते आहे. गुरूवारी रात्री ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर शोला प्रारंभ झाला. लेझर शोमुळे किल्ल्यासमोरील परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.

प्रसिद्ध ‘कोका कोला’ कंपनीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रत्नागिरीत उद्घाटन 

रत्नागिरी : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध बेव्हरेज कंपनी ‘कोका कोला’ चे उद्घाटन  रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे- परशूराम औद्योगिक वसाहतीमध्ये पार पडलं. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या असून चांगली सुरुवात कोकणच्या भूमीत होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
हिंदुस्तान कोको कोला ब्रेव्हरेज कंपनीनं सुरुवातीला २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत. विविध प्रकारची ६० उत्पादनं या कंपनीची देशभरात आहेत. या कंपनीनं हजारो कर्मचारी काम करतात. या कंपनीनं २०२३ मध्ये भारतात एकूण १२८४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अशी एक मोठी कंपनी इथं उभी राहत आहे त्यामुळं लोकांना चांगला रोजगार उभा राहिलं. व्यवस्थापनानं स्थानिक लोकांना प्राधान्य कारखान्यात दिलं पाहिजे, असा आग्रह यावेळी मुख्यंमत्र्यांनी धरला.
फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ अमेरिका दौऱ्यातच याबाबत बोलणी झाली होती. पण नंतर सरकार बदलल्यानंतर ते काम थांबलं. कोकणानं नेहमीच बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. त्यामुळं कोकणी माणला वापरुन घ्यायचं काम आमचं सरकार कधी करणार नाही. इथल्या भूमिपुत्रांना मोठी स्वप्न दाखवायची आणि एखादा चांगला प्रकल्प आला की त्याला विरोध करायचं हे आम्हाला कधी शिकवलं नाही. त्यामुळेच आता हा प्रकल्प इथं सुरु होत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search